गणना
२४ इस्राएलला आशीर्वाद देणं यहोवाच्या नजरेत चांगलं आहे, हे जेव्हा बलामने पाहिलं, तेव्हा तो पुन्हा त्यांच्या नाशाचं शकुन पाहायला गेला नाही.+ त्याऐवजी त्याने ओसाड रानाकडे पाहिलं. २ बलामने नजर वर करून पाहिलं, तेव्हा इस्राएली लोकांनी आपापल्या वंशाप्रमाणे छावणी केल्याचं त्याला दिसलं.+ मग देवाची पवित्र शक्ती* त्याच्यावर आली.+ ३ तेव्हा त्याने हा संदेश दिला:+
“बौरचा मुलगा बलाम याचा संदेश,
ज्याचे डोळे उघडण्यात आले त्याचा संदेश,
४ देवाचा शब्द ऐकणाऱ्याचा संदेश,
त्याने सर्वसमर्थाचा दृष्टान्त पाहिला,
त्याचे डोळे उघडल्यावर त्याने नमन केलं:+
५ हे याकोब, तुझे तंबू किती सुंदर आहेत,
हे इस्राएल, तुझ्या वस्त्या किती मोहक आहेत!+
६ त्या दूरवर पसरलेल्या खोऱ्यांसारख्या आहेत,+
नदीकाठी लावलेल्या बागांसारख्या,
यहोवाने लावलेल्या अगरूच्या झाडांसारख्या,*
पाण्याजवळ लावलेल्या देवदाराच्या वृक्षांसारख्या त्या आहेत.
८ देवाने त्याला इजिप्तमधून बाहेर आणलं,
तो त्यांच्यासाठी रानरेड्याच्या शिंगांसारखा आहे.
तो त्याच्यावर जुलूम करणाऱ्या राष्ट्रांना गिळून टाकेल,+
तो त्यांची हाडं चावून खाईल आणि त्यांना बाणांनी मोडून टाकेल.
९ तो खाली वाकून बसलाय, तो सिंहासारखा लोळतोय,
त्याला उठवण्याचं धाडस कोण करेल?
तुला आशीर्वाद देणाऱ्यांना आशीर्वाद मिळेल,
आणि तुला शाप देणारे शापित ठरतील.”+
१० तेव्हा बालाक बलामवर संतापला आणि रागाने टाळ्या वाजवत त्याला म्हणाला: “मी तुला माझ्या शत्रूंना शाप द्यायला बोलवलं होतं,+ पण तू तर त्यांना तीन वेळा आशीर्वाद देऊन बसलास. ११ आत्ताच्या आता घरी जा. मला तुझा खूप आदरसत्कार करायचा होता,+ पण यहोवाने तुझा आदर होऊ दिला नाही.”
१२ बलाम बालाकला म्हणाला: “तू पाठवलेल्या माणसांना मी आधीच म्हणालो होतो, १३ ‘बालाकने सोन्याचांदीने भरलेलं आपलं घर जरी मला दिलं, तरीही मी यहोवाच्या आज्ञेबाहेर जाऊन माझ्या मनाने काही करू शकत नाही, मग ती चांगली गोष्ट असो किंवा वाईट. यहोवा जे सांगेल तेच मी बोलीन.’+ १४ मी माझ्या लोकांकडे परत चाललोय. पण, हे लोक तुझ्या लोकांसोबत पुढे* काय करतील, हे मी जाण्याआधी तुला सांगतो.” १५ तेव्हा त्याने हा संदेश सांगितला:+
“बौरचा मुलगा बलाम याचा संदेश,
ज्याचे डोळे उघडण्यात आले त्याचा संदेश,+
१६ देवाचा शब्द ऐकणाऱ्याचा संदेश,
त्याला सर्वोच्च देवाचं ज्ञान आहे,
त्याने सर्वसमर्थाचा दृष्टान्त पाहिला,
त्याचे डोळे उघडल्यावर त्याने नमन केलं:
१७ मी त्याला पाहीन, पण आता नाही;
तो मला दिसेल, पण लगेच नाही.
तो मवाबचं कपाळ फोडेल+
आणि क्रूर योद्ध्यांच्या कवट्या फोडेल.
१९ याकोबमधला एक आपल्या शत्रूंना काबीज करेल,+
शहरातला कोणी वाचला, तरीही त्याचा तो नाश करेल.”
२० बलामने जेव्हा अमालेकला पाहिलं, तेव्हा त्याने असा संदेश दिला:
२१ त्याने जेव्हा केनी+ लोकांना पाहिलं, तेव्हा त्याने पुढे असा संदेश दिला:
“तुमच्या वस्त्या सुरक्षित आहेत आणि तुमची घरं खडकांवर आहेत.
२२ पण कोणीतरी केनी लोकांना* जाळून टाकेल.
त्यांना बंदी बनवायला अश्शूरला किती वेळ लागेल?”
२३ त्याने पुढे असा संदेश दिला:
“हाय! हाय! देव जेव्हा हे करेल तेव्हा कोण वाचेल?
पण त्याचाही शेवटी नाश होईल.”
२५ मग बलाम+ उठला आणि आपल्या ठिकाणी परत गेला. बालाकही आपल्या घरी गेला.