वचनयुक्त देशाचे देखावे
बाशान एक सुपीक प्रांत
पवित्र शास्त्राचे वाचन करतेवेळी आपण अनेक स्थळांची नावे तर वाचतो, पण त्यांचे चित्र डोळ्यांसमोर आणू शकतो का? यहोवाच्या साक्षीदारांनी पवित्र शास्त्र वाचनाच्या आपल्या कार्यक्रमात मीखा ते जखऱ्या या पुस्तकांचे वाचन केले व यात त्यांना तीनदा बाशानविषयीचा उल्लेख वाचावयास मिळाला. (मीखा ७:१४; नहूम १:४; जखर्या ११:२) तुम्ही जर आपल्या मनःचक्षुपुढे बाशानचे चित्र उभे केले तर ही तसेच इतर मनोरंजक शास्त्रवचने तुम्हाला अधिक अर्थभरीत वाटू लागतील हे नक्की.
बाशान कोठे होता? आपण सर्वसाधारणपणे त्याची ओळख गोलानच्या उंचवट्यासोबत काढू शकतो. हा भाग आपण वर्तमानपत्राच्या नकाशात पाहिला असेल. बाशान हा प्रांत गालील समुद्रकिनारा आणि यार्देन दरीच्या वरच्या भागावर, दोन्हीकडे पसरलेला आहे. तो प्रामुख्यत्वे यारमूक नदीकिनारा (जो आज यार्देन व सिरीयामधील सीमाभाग आहे) ते उत्तरेकडे हर्मोन पर्वत येथपर्यंत आहे.
प्राचीन काळातील इस्राएलांनी वचनयुक्त देशात प्रवेश मिळविण्याआधी बाशानचा राजा ओग याच्या बलाढ्य सैन्याशी तुंबळ युद्ध करुन त्याचा पराभव केला. यानंतर कालांतराने बाशानच्या बहुतेक भागात मनश्शे वंशाने वस्ती केली. (अनुवाद ३:१-७, ११, १३; गणना ३२:३३; ३४:१४) पवित्र शास्त्र काळात असणारा हा भाग कसा होता? बाशानच्या विभागातील डोंगराळ भागात जरी अरण्ये होती तरी त्याचा बहुतेक भाग पठारी होता.
बाशान प्रांत अन्नाच्या उत्पादनाविषयी महशूर होता याचे कारण चोहोकडे हिरवळ व कुरणे पसरलेली होती. (यिर्मया ५०:१९) सोबतची चित्रे तुम्हाला, बाशानचा पवित्र शास्त्रात जो उल्लेख आहे त्याची आठवण करुन देतील.a अनेकांनी “बाशानचे गोऱ्हे” याविषयीचे वाचन केले असेल. (स्तोत्रसंहिता २२:१२, किंग जेम्स व्हर्शन) होय, प्राचीन काळी हा प्रदेश गुरांचे कळप व दांडगे गोऱ्हे यांच्याविषयी प्रसिद्ध होता. याचप्रमाणे मेंढरे व बकऱ्या हे पशुधन देखील मोठे होते व यांच्याकडून दूध व लोणी समृद्धपणे मिळत असे.—अनुवाद ३२:१४.
तुम्हाला कदाचित नवल वाटेल की बाशानला एवढी सुपीकता कोठून मिळाली असेल, कारण तो यार्देनच्या पूर्वेकडील भाग आहे व अनेकांच्या मते तो कोरडा असावा. पण प्रत्यक्षात उत्तरेकडील गालीलचे डोंगर उतरते आहेत व भूमध्य समुद्रावरील कमी दाबाचे ढग त्यांना ओलांडतात व बाशानवर भरपूर पाऊस पाडतात. आणखी, हर्मोन पर्वतावरुन निघालेले धुके पाण्याचे ओढे बनून ओघळतात. हे धुके आणि बाशानची सुपीक जमीन यांचे एकत्रीकरण झाल्यावर काय होऊ शकते ते विचारात घ्या. या विभागात भरपूर पीक येत असे. रोमी लोकांसाठी मुख्य धान्य कोठार बनण्याआधी बाशानमधूनच शलमोन राजाच्या मेजावर अन्न पुरविले जाई. यास्तव काही चांगल्या कारणास्तव, मुक्तता प्राप्त झालेल्या देवाच्या लोकांना खाद्य वस्तु पुरवठा करण्यात असे म्हटले गेलेः “प्राचीनकाळच्या दिवसाप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांस चरू दे.”—मीखा ७:१४; १ राजे ४:७, १३.
फलदायीपणाची ही प्रसिद्धी जाणून, नहूमने देवाची नाराजी काय घडवून आणेल त्याच्या मर्मभेदक वर्णनात जे काही म्हटले होते ते मान्य करु शकताः “बाशान व कर्मेल [महासागराजवळचे हिरवेगार डोंगर] त्याच्यापुढे म्लान होतात. लबानोनाचा फुलवारा कोमेजून जातो.”—नहूम १:४ब.
बाशानची ही पार्श्वभूमी तुम्हास, पवित्र शास्त्रामध्ये त्याची जी सुप्त दृश्ये दिली आहेत त्यांचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर आणण्यात सहाय्य करतील. उदाहरणार्थ, धान्याची मळणी करण्याबद्दल, जसे की, बाशानमध्ये सर्वत्र गव्हाचे भरघोस पीक येई, त्याविषयी तुम्ही कदाचित वाचले असेल. गव्हाच्या पिकाचा हंगाम (यहुदी दिनदर्शिकेनुसार) अय्यार व सीवान महिन्यात (एप्रिल अखेर, मे व जून सुरवातीपर्यंत) असतो. या काळात सप्ताहांचा सण (पेंटेकॉस्ट) साजरा होतो. यामध्ये गव्हाच्या हंगामातील प्रथम फळ म्हणून काही अर्पण करीत. त्याजसोबत कोकरे मेंढरे व गोऱ्हे ही देखील अर्पण करीत. ही जनावरे बाशानमधूनच आणली जात नसावीत का?—निर्गम ३४:२२; लेवीय २३:१५-१८.
कापणीच्या वेळी सोबतच्या चित्रात दाखविलेल्या गोलाकार विळ्याने कामकरी उभ्या गव्हाची कापणी करीत. (अनुवाद १६:९, १०; २३:२५) मग, देठ गोळा करीत व ते मळणीच्या ठिकाणी नेत; येथे एक लाकडी घसरगाडी असे, (जिला तळास दगड बसविलेले असत) तिला त्यांचेवर फिरवीत व सरवा किंवा धान्य बाहेर काढून गोळा करीत. (रूथ २:२-७, २३; ३:३, ६; यशया ४१:१५) आता वर असलेले हे जे चित्र तुम्हाला दिसते आहे ते कदाचित देवाच्या अर्थभरीत नियमाचे तुम्हाला स्मरण देऊ शकेलः “मळणी करताना बैलास मुसके घालू नको.”—अनुवाद २५:४; १ करिंथकर ९:९.
शेवटी, प्राचीन बाशानात घनदाट अरण्येही होती, ज्यातील मोठमोठे ओक वृक्ष डाव्या बाजूच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे होते. फेनिकेचे वल्हेकरी आपली वल्ही बाशानच्या ओक लाकडांची बनवीत. (यहेज्केल २७:६) तरीपण, ‘बाशानचे हे प्रचंड वृक्ष व घनदाट अरण्ये’ देवाच्या क्रोधासमोर टिकू शकणार नाहीत. (जखर्या ११:२; यशया २:१३) असे हे वृक्ष पाहूनच वाटते की या घनदाट अरण्यातून पळ काढणारे सैन्य कसे निसटेल ही समस्या असणार. एखादा स्वार जरी एकटाच चालला असला तरी अबशालोम जसा येथेचे कोठेतरी अडकला तसा तो फांद्यात अडकेल.—२ शमुवेल १८:८, ९.
बाशान हा वचनयुक्त देशातील एक प्रांत होता व येथे जरी पुष्कळ घटना घडल्या नाहीत तरी त्याची ही चित्रे शास्त्रवचनीय संदर्भांना अधिक चांगली पुष्टी देतात हे आपल्या नजरेस आलेच असेल.
[तळटीपा]
a यहोवाच्या साक्षीदारांचे १९८९ चे कॅलेण्डर देखील पहा.