-
दिलेलं वचन नेहमी पाळाटेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१७ | एप्रिल
-
-
७. (क) हन्नाने देवाला कोणतं वचन दिलं होतं, आणि का? (ख) यहोवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं? (ग) हन्नाने देवाला जे वचन दिलं होतं त्याचा शमुवेलच्या जीवनावर कसा परिणाम होणार होता? (तळटीप पाहा.)
७ हन्नानेदेखील तिच्या जीवनातील कठीण काळादरम्यान यहोवाला एक वचन दिलं. ती खूप दुःखी होती कारण तिला एकही मूल होत नव्हतं. शिवाय, यामुळे तिला चिडवलंही जायचं आणि टोमणेही मारले जायचे. (१ शमु. १:४-७, १०, १६) अशा परिस्थितीत असल्यामुळे तिने आपल्या मनातील भावना यहोवापुढे व्यक्त केल्या आणि त्याला एक वचन दिलं. ती म्हणाली “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा एतदर्थ [याकरता] मी त्यास समर्पण करेन; त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही; असा तिने नवस केला.”a (१ शमु. १:११) यहोवाने हन्नाची प्रार्थना ऐकली आणि एका वर्षानंतर तिला मुलगा झाला. तिने त्याचं नाव शमुवेल ठेवलं. हन्ना खूप आनंदी होती पण त्याच वेळी यहोवाला दिलेलं वचनही ती विसरली नाही. जेव्हा तिच्या या मुलाचा जन्म झाला तेव्हा ती म्हणाली होती, की तिने त्याला परमेश्वराकडून मागून घेतलं आहे.—१ शमु. १:२०.
-