वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w88 ८/१ पृ. २४-२५
  • शब्बाथ दिवशी धान्य तोडणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शब्बाथ दिवशी धान्य तोडणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • मिळती जुळती माहिती
  • शब्बाथ दिवशी धान्य तोडणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • काम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा उचित काळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
w88 ८/१ पृ. २४-२५

येशूचे जीवन व उपाध्यपण

शब्बाथ दिवशी धान्य तोडणे

येशू व त्याचे शिष्य गालीलास परत जाण्यासाठी यरूशलेम सोडतात. हा वसंत ऋतूचा काळ आहे आणि शेतात धान्याची कणसे आली आहेत. शिष्य भुकेले आहेत. त्यामुळे ते धान्याची कणसे तोडून खातात. पण हा शब्बाथ आहे, त्यामुळे त्यांचे हे कृत्य लक्षात आल्याविना राहात नाही.

येशू शब्बाथाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करतो म्हणून यरूशलेमेतील धार्मिक पुढाऱ्‍यांनी त्याला ठार मारण्याची योजना केली होती. परूशी त्याच्यावर आरोप करतात. ते म्हणतात: “पाहा! शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.”

परूश्‍यांचा असा आरोप असतो की, कणसे तोडणे व दाणे हातावर रगडून खाणे हे कापणी व मळणीच्या कामाप्रमाणे आहे. पण कामाविषयीच्या त्यांच्या कडक स्पष्टीकरणामुळे शब्बाथ एकंदरीत ओझ्यासमान वाटू लागला होता. पण वस्तुतः तो दिवस आनंदी, आध्यात्मिक उभारणीचा असावयास हवा होता. यासाठीच येशू शास्त्रवचनीय उदाहरणांची पुष्टी देऊन हे स्पष्ट करतो की, यहोवाच्या शब्बाथाच्या नियमाबाबतीत असे अयोग्य व कडक समर्थन यहोवा देवाने कधीच उद्देशिले नव्हते.

येशू सांगतो, भुकेलेला दाविद व त्याचे लोक निवास मंडपाजवळ थांबले व अर्पित भाकर त्यांनी खाल्ली. त्या भाकरी नुकत्याच यहोवा समोरून काढून तेथे दुसऱ्‍या ताज्या भाकरी ठेवण्यात आल्या होत्या. काढलेल्या भाकरी केवळ याजकांना खावयास राखून ठेवल्या जात. तरीपण, त्या परिस्थितीत, दाविद व त्याचे लोक त्या भाकरी खाऊनही दोषी ठरले नाहीत.

आणखीन एक उदाहरण देऊन येशू म्हणतो: “मंदिरात, शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून याजक निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय?” होय, शब्बाथ दिवशी देखील याजकांना प्राण्यांच्या अपर्णासाठी त्यांची कत्तल व इतर कामे करावी लागतात. “पण मी तुम्हास सांगतो,” येशू म्हणतो, “मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे.”

परूश्‍यांना सूचना देऊन येशू पुढे म्हणतो: “‘मला दया पाहिजे, यज्ञ नको,’ याचाच अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लाविला नसता.” शेवटी तो म्हणतो: “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.” येशूचा असे म्हणण्यामागील अर्थ काय होता?

येशू त्याच्या हजार वर्षिय शांतीमय राज्याच्या अधिपत्याचा उल्लेख करीत होता. ६,००० वर्षापासून मानवजात दियाबल सैतानाच्या कष्टमय गुलामगिरीखाली हिंसाचार आणि युद्ध यांच्या भीतीत जीवन जगत आहे. दुसऱ्‍या बाजूस पाहता, मोठा शब्बाथ हा येशूच्या अधिपत्याखाली दुःखातून व क्लेशातून विश्रांतीचा वेळ असेल. मत्तय १२:१-८; लेवीय २४:५-९; १ शमुवेल २१:१-६; गणना २८:९; होशेय ६:६.

◆ येशूच्या शिष्यांविरूद्ध कोणता आरोप करण्यात येतो, व येशू त्याला कसे उत्तर देतो?

◆ परूश्‍यांचा कोणता दोष येशू दाखवून देतो?

◆ येशू कोणत्या प्रकारे “शब्बाथाचा धनी” आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा