अचूक ज्ञानाकरवी आपली शांती वाढवा
“देव व आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्यांच्या अचूक ज्ञानाने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो.”—२ पेत्र १:२.
१, २. (अ) देवासोबतच्या शांतीसंबंधाची तुलना विवाहासोबत का करता येते? (ब) आम्ही देवाबरोबरची आमची शांती कशी दृढ करू शकतो?
तुमच्या बाप्तिस्मा प्रसंगी यहोवा देवासोबत प्रस्थापिण्यात आलेला शांतीसंबंध काही अंशी विवाहाप्रमाणे आहे. विवाहाचा दिवस हा आनंदमय असला तरी महत्वपूर्ण नातेसंबंधाची ती नुसती सुरुवात असते. प्रयत्न, वेळ व अनुभवाने वैवाहिक नातेसंबंध अधिक प्रिय होत जातो व तो संकटकाळी विश्रांतीस्थान बनतो. याचप्रमाणे प्रयत्न व यहोवाच्या मदतीने तुम्हाला त्याजसोबत आपली शांती वाढवता येईल.
२ “विश्वास मिळालेल्या लोकांना” देवासोबत आपली शांती कशी मजबूत करता येईल त्याचे स्पष्टीकरण प्रेषित पेत्राने केले. त्याने लिहिले: “देव व आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्यांच्या अचूक ज्ञानाने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो.”—२ पेत्र १:१, २.
‘देवाचे अचूक ज्ञान’
३. यहोवा व येशूविषयीचे अचूक ज्ञान संपादन करणे याचा काय अर्थ होतो?
३ ‘अचूक ज्ञान’ यास अनुलक्षून असणारा ग्रीक शब्द (ए.पि’ग्नो.सिस) या संदर्भात अधिक खोल, अधिक जवळचे ज्ञान असा अर्थ देतो. याचे क्रियापद व्यक्तिगत अनुभवाने प्राप्त झालेले ज्ञान यास अनुलक्षून असू शकते व ते लूक १:४ मध्ये “पूर्णपणे समजावे” या अर्थी वापरले आहे. ग्रीक प्रामाण्य कल्वरवेल यांच्या मते तो शब्द त्यांना, “मला ज्याविषयी पूर्वी माहीत आहे, त्या गोष्टीसोबत अधिक परिचित होणे; जी वस्तु मी दुरुन पाहिली तिचे खरे दर्शन घेणे” या अर्थाचा वाटतो. तर मग “अचूक ज्ञान” संपादित करणे यात यहोवा व येशू यांना व्यक्ति या नात्याने अधिक जवळीकीने जाणणे, त्यांच्या गुणांसोबत अधिक चांगले परिचित होणे याचा समावेश आहे.
४. आम्हाला देवाविषयीचे ज्ञान कसे वाढवता येईल व त्यामुळे आमची त्याच्याबरोबरील शांती का वाढीस लागते?
४ चांगली अशी वैयक्तिक अभ्यासाची सवय आणि देवाच्या लोकांच्या सभा मधील नियमित उपस्थिति हे ज्ञान संपादित करण्याचे दोन मार्ग आहेत. याद्वारे देवाची हालचाल व त्याला वाटणारे विचार तुम्हाला स्पष्टरित्या शिकायला मिळतील. त्याच्या व्यक्तित्वाविषयीची सुव्यक्त अशी मनोप्रतिमा तुम्हाला तयार करता येईल. परंतु देवाला सन्निधपणे ओळखणे म्हणजे त्याच्या या प्रतिमेचे अनुकरण करून तिचेच प्रतिबिंब दर्शविणे होय. उदाहरणार्थ, इश्वरी निस्वार्थपणा प्रदर्शित करणाऱ्या एका माणसाचे वर्णन केल्यावर यहोवाने म्हटले: “हेच मला जाणणे नव्हे काय?” (यिर्मया २२:१५, १६; इफिसकर ५:१) देवाचे जवळून अनुकरण करण्यामुळे त्याच्या बरोबरील तुमची शांती वाढीस लागते याचे कारण हे की, “आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे अचूक ज्ञानात नवे केले जात आहे” त्या नव्या व्यक्तित्वाला परिधान करीत राहता.—कलस्सैकर ३:१०)
५. (अ) अचूक ज्ञानामुळे एका ख्रिस्ती स्त्रीला कशी मदत मिळाली? (ब) आम्हाला आणखी कोणत्या मार्गानी यहोवाचे जवळून अनुकरण करता येईल?
५ लिन या खिस्ती स्त्रीला एका सह ख्रिश्चनाबद्दल गैरसमज उद्भवला होता त्यामुळे ती तिला क्षमा करीना. पण जेव्हा लिन ने काळजीपूर्वक व्यक्तिगत अभ्यास केला तेव्हा तिला स्वतःच्या वृत्तीची तपासणी करून पाहण्याची चालना मिळाली. “यहोवा हा कशा प्रकारचा देव आहे ते मी आठवले. तो अढी धरीत नाही हेही मला दिसले,” तिने कबूल केले. “आम्ही यहोवासंबंधाने लहानसहान गोष्टीत कितीतरी वेळा चुकत असतो पण तो ते मनात ठेवीत नसतो. याच्या दृष्टीकोणातून पाहता मजमधील व त्या माझ्या ख्रिस्ती बहिणीतील तेढ फारच क्षुद्र होती. त्यामुळेच मी तिला बघे तेव्हा मी मलाच म्हणे, ‘यहोवा जसे मजवर प्रेम करतो तसे तिजवरही करतो.’ या विचारसरणीमुळे मला तिच्याबरोबरील समस्या मिटवता आली.” तर मग, तुम्हाला स्वतःला अशी काही क्षेत्रे दिसतात का की जेथे तुम्ही यहोवाचे जवळून अनुकरण केले पाहिजे?—स्तोत्रसंहिता १८:३५; १०३:८, ९; लूक ६:३६; प्रे. कृत्ये १०:३४, ३५; १ पेत्र १:१५, १६.
ख्रिस्ताविषयीचे अचूक ज्ञान
६. आपल्या जीवनात प्रचार कार्य हे सर्वात महत्वपूर्ण आहे हे येशूने कसे दाखवून दिले?
६ ख्रिस्ताविषयीचे अचूक ज्ञान असणे याकरता “ख्रिस्ताचे मन” असणे व त्या प्रमाणे अनुकरण करण्याची गरज आहे. (१ करिंथकर २:१६) येशू सत्याचा आवेशी घोषक होता. (योहान १८:३७) वसाहतीतील पूर्वग्रह कलुषितता कसलीही असली तरी त्याद्वारे त्याने आपल्या उत्कट सुवार्तिक आवेशास कधीही थंडावू दिले नाही. दुसरे यहुदी शोमरोन्यांचा द्वेष करीत तरी त्याने विहीरीवर एका शोमरोनी स्त्रीला साक्ष दिली. चार चौघात असताना सुद्धा एका स्त्री बरोबर बराच वेळ बोलत राहण्या मुळे लोकांच्या कपाळाला आठ्या पडलेल्या दिसत!a तरीपण या वसाहतीच्या भावनांना येशूने स्वतःला साक्ष देण्यापासून थांबवू दिले नाही. देवाचे कार्य त्याच्यासाठी उत्साहवर्धक होते. त्याने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.” शोमरोनी स्त्री व तिच्या गावातील लोकांनी दाखविला तो प्रतिसाद बघण्याच्या आनंदाने येशूचे अन्नाप्रमाणे पोषण केले—योहान ४:४–४२; ८:४८.
७. (अ) येशूविषयीच्या ज्ञानाने आम्हाला काय करण्याची चालना लाभावी? (ब) आपल्या सर्व सेवकांनी एकाच प्रमाणाचे प्रचार कार्य दाखवावे असे देव अपेक्षितो का? विवेचीत करा.
७ येशूला वाटते तसेच तुम्हालाही वाटते का? कोणा अनोळख्यासोबत पवित्र शास्त्रावरील संभाषण सुरु करणे हे कठीण आहे व त्याकडे बाकीचे लोक बहुदा नापसंतीच्या नजरेने बघतात हेही खरे आहे. तरीपण, येशूप्रमाणेच मनोवृत्ति राखायची आहे तर ही गोष्ट कदापि विसरायची नाही की, आम्ही साक्ष ही दिलीच पाहिजे. अर्थातच सर्वांना एकाच प्रमाणात प्रचार करता येणार नाही. आमची क्षमता व परिस्थिती यामुळे त्यात भिन्नता राहते. त्यामुळे देव आमच्या पवित्रसेवेबद्दल कधीही संतुष्ट नसणार असा ग्रह करू नका. तथापि, येशूबद्दल आम्हास असणाऱ्या ज्ञानाने आम्हाला शक्य तितके चांगले करण्याची चालना मिळावी. येशूने संपूर्ण जिवाने केलेल्या सेवेची प्रशंसा केली.—मत्तय १३:१८–२३; २२:३७.
दुष्टतेचा द्वेष करण्याची गरज
८, ९. अशा काही गोष्टी कोणत्या आहेत ज्यांचा देव द्वेष करतो, आणि हाच द्वेष आम्हाला कसा प्रवर्तित करता येईल?
८ येशू आणि यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतात त्या विषयीची माहिती व रसिकता आम्हाठायी अचूक ज्ञानामुळेच वाढते. (इब्रीयांस १:९; यशायाह ६१:८) “यहोवा ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत; नव्हे, त्याला अशा सात गोष्टींचा वीट आहे: उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्या त्या होत.” (नीतीसूत्रे ६:१६–१९) या प्रवृफ़ा व वागणूक त्याला “वीट” आणणाऱ्या आहेत. ज्या इब्री शब्दावरून हा “वीट” शब्द आला आहे त्याचा अर्थ, “तिटकारा, किळस येणे,” “ज्याकडून गुन्हा निष्पण्ण हातो त्याच्या बाबतीत नाखूषता दाखविणे, प्रतिकार करणे, द्वेषाने त्याज्य मानणे” हा होतो. यामुळेच आम्हाला देवाबरोबरचे शांतीसंबंध राखायचे आहे तर अशीच नाखूषता वाढविण्यास हवी.
९ उदाहरणार्थ, “उन्मत्त दृष्टी” व गर्विष्ठपणाचा कसलाही दिखावा टाळावा. बाप्तिस्म्यानंतर काहींना वाटले की, ज्यांनी त्यांना शिक्षण दिले त्यांनी आता त्यांना आणखी मदत करण्याची जरूरी नाही. परंतु नव्या ख्रिश्चनांनी सत्यात दृढपणे मुळावले जाण्यासाठी मदतीचा स्विकार नम्रपणे करण्यास हवा. (गलतीकर ६:६) तसेच चहाड्या लावण्याचेही टाळा कारण यामुळे “भावाभावात वैर उत्पन्न” होते. निर्दयी अफवा पसरविणे, अवास्तव टीका, किंवा लबाड्या या गोष्टी ‘निर्दोष रक्त पाडीत’ नसल्या तरी ती एखाद्याची ख्याति नष्ट करू शकतात हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही आमच्या बंधुजनासोबत शांतीत नसलो तर देवासोबत देखील शांतीत राहू शकणार नाही. (नीतीसूत्रे १७:९; मत्तय ५:२३, २४) देव आपल्या वचनात असेही म्हणतो की त्याला “सूटपत्राचा तिटकारा आहे.” (मलाखी २:१४, १६) तुम्ही विवाहबद्ध असाल तर आपले वैवाहिक बंधन दृढ राखण्यात परिश्रम घेता का? दुसऱ्याच्या वैवाहिक सोबत्याशी लाडीगोडी करीत बसणे आणि मोकळेपणाचा फायदा घेत राहणे या गोष्टी तुम्हास किळसवाण्या वाटतात का? यहोवाप्रमाणेच तुम्हालाही लैंगिक अनैतिकतेचा वीट येतो का? (अनुवाद २३:१७, १८) अशा या सवया आमच्या पापीष्ट देहास प्रलोभित करीत असल्यामुळे व शिवाय जग या गोष्टी हसण्यावारी नेत असल्यामुळे त्यांचा द्वेष मानणे हे सहजसोपे नाही.
१०. आम्ही दुष्टतेचा द्वेष कसा वाढवू शकतो?
१० दुष्टतेबद्दलचा द्वेष वाढविण्याविषयीचा उपाय म्हणजे भूतविद्या, अनैतिकता वा हिंसाचार चित्रित करणारे चित्रपट, दुरदर्शन कार्यक्रम किंवा पुस्तके यांना टाळणे. (अनुवाद १८:१०–१२; स्तोत्रसंहिता ११:५) दुष्टाई ‘तेवढी काही वाईट नाही’ असे भासवून किंवा ती विनोदरूपात दाखवून त्या विषयीच्या इश्वरी द्वेषाविषयीचे प्राबल्य कमी केले जाते. उलटपक्षी, कळकळीची प्रार्थना साहाय्यक ठरते, कारण येशूने म्हटले: “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्तय २६:४१) जोरदार शारीरिक इच्छा सतावू लागल्या तेव्हा एका ख्रिश्चनाने म्हटले: “मी प्रार्थना करू लागतो. कधी कधी मला यहोवाकडे जाण्यास पात्र नाही असे वाटते, पण स्वतःला पुढे नेण्या मुळे, त्याला अपील करण्यामुळे मला हवे ते बळ मिळते.” वाईट गोष्टी करण्यामुळे जे वेदनादायक परिणाम उद्भवत असतात त्याची आपल्या मनात उजळणी केल्यामुळे यहोवा दुष्कृत्यांचा का द्वेष करतो ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल.—२ पेत्र २:१२, १३.
११. वेळोवेळी आम्हास कोणत्या गोष्टींचा त्रास होईल?
११ देवाबरोबरील शांती असली तरी कधी कधी तुम्हाला दरदिवशीचे दबाव, मोहपाश आणि स्वतःचा अशक्तपणा याकरवी सताविले जाईल. हे लक्षात असू द्या की तुम्ही सैतानाचे खास लक्ष्य आहात. देवाच्या आज्ञा पाळणाऱ्या व यहोवाचे साक्षीदार असणाऱ्यांसोबत तो युद्ध करतो. (प्रकटीकरण १२:१७) अशावेळी अंतःस्थ शांती कशी टिकविली जाऊ शकते?
शांतीस विचलीत करणाऱ्या विपत्तींसोबत सामना करणे
१२. (अ) स्तोत्रसंहिता ३४ची पार्श्वभूमि काय आहे? (ब) दावीदावर गुदरलेल्या अनुभवांमध्ये त्याच्या मनःस्थिती विषयीचे वर्णन शास्त्रवचने कसे करतात?
१२ “नीतीमानावर फार विपत्ति येतात,” असे दावीदाने स्तोत्रसंहिता ३४:१९ मध्ये लिहिले. या स्तोत्राचे शीर्षक लक्षात घेता त्याने या स्तोत्राचे लिखाण त्याजवर जो मरणप्रसंग गुदरला त्याच्या नंतर केलेले दिसते. शौल राजापासून पळ काढल्यावर दावीदाने आखीश या गथच्या पलिष्टी राजाचा आश्रय घेतला. राजाच्या सेवकांनी दावीदाला ओळखले व त्याने पूर्वी इस्राएलांसाठी ज्या युद्ध मोहिमा केल्या त्यांचे स्मरण देऊन आखीशकडे त्याची तक्रार केली. दावीदाने दुरुन त्यांचे संभाषण ऐकले तेव्हा त्याने “हे बोलणे मनात ठेवले. आणि गथचा राजा आखीश याचा त्याला फार धाक वाटला.” (१ शमुवेल २१:१०–१२) खरे म्हणजे गथ हे गल्याथाचे गाव होते आणि दावीदाने पलिष्ट्यांच्या या महावीराला ठार केले होते व त्याची मोठी तरवारही उचलून नेली होती! मग आता याच मोठ्या तरवारीने त्याचे शीर छाटले जाणार का? दावीद काय करणार होता?—१ शमुवेल १७:४; २१:९.
१३. या विपत्तीत दावीदाने काय केले आणि आम्ही त्याचे उदाहरण कसे अनुसरू शकतो?
१३ दावीदाने मोठ्या आक्रोशाने देवाकडे याचना केली. “ह्या पामराने धावा केला व यहोवाने तो ऐकला” दावीद म्हणाला. त्याने आणखी म्हटले: “त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले.” (स्तोत्रसंहिता ३४:४, ६, १५, १७) तुम्हीही यहोवाला, चिंतायुक्त काळात आपले अंतःकरण ओतून याचना करण्याचे शिकला का? (इफिसकर ६:१८; स्तोत्रसंहिता ६२:८) तुम्हावर ओढावलेला त्रास हा दावीदासारखा नाट्यमय नसला तरी देव तुम्हाला योग्य वेळी मदत देत आहे हे तुम्हाला पहायला मिळेल. (इब्रीयांस ४:१६) तथापि, दावीदाने प्रार्थनेशिवाय आणखी काही केले.
१४. दावीदाने “चाणाक्षपण” कसे वापरले आणि आम्हीही चाणाक्षपण करावे म्हणून मदतीसाठी देवाने कोणती तरतूद पुरविली आहे?
१४ “त्याने [दावीद] त्यांच्या पुढे आपली चालचर्या बदलून वेड्याचे मिष केले. . . . आखीश आपल्या सेवकांना म्हणाला: ‘पहा, हा माणूस वेडा आहे हे तुम्हास दिसते ना? तुम्ही त्यास मजकडे का आणिले?’ (१ शमुवेल २१:१३–१५) दावीदाने अशी काही युक्ति योजिली की त्यामुळे तो वाचला. यहोवाने त्याच्या प्रयत्नांना आशीर्वाद दिला. याचप्रमाणे काही खोडकर समस्या आम्हापुढे उभ्या राहतात तेव्हा यहोवानेच आमच्यासाठी काही तयारी करून द्यावी यापेक्षा आम्ही आमची मानसिक विचारशक्ती वापरावी असे यहोवा अपेक्षितो. त्याने आम्हासाठी प्रेरित वचन दिले आहे, जे, “भोळ्यांस चातुर्य . . . ज्ञान शहाणपण प्राप्त करून” देते. (नीतीसूत्रे १:४; २ तिमथ्यी ३:१६, १७) याशिवाय देवाने आम्हासाठी मंडळीत वडील दिले आहेत. ते आम्हाला देवाचे दर्जे कसे राखावेत ते जाणण्यात मदत देतात. (१ थेस्सलनीकाकर ४:१, २) योग्य निर्णय घेता यावा वा समस्यांबरोबर सामना करण्यात मदत द्यावी याकरता वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनात शोध करून देण्यात ही माणसे साहाय्य करतील.
१५. स्तोत्रसंहिता ३४:१८ सांत्वनदायक का आहे?
१५ आमच्या स्वतःचा अशक्तपणा किंवा अपयश यामुळे आमचे अंतःकरण यातनामय बनते अशावेळी आम्ही योग्य मनोवृत्ति राखली तर आम्ही देवासोबत आपले शांतीसंबंध राखू शकतो. दावीदाने स्तोत्रसंहिता ३४:१८ मध्ये लिहिले: “यहोवा भग्न हृदयी लोकांच्या सन्निध असतो. अनुतप्त लोकांचा तो उद्धार करतो.” आम्ही देवाकडे क्षमायाचना मागितली व एकंदरीत प्रकरणे सुधारण्यासाठी (खासपणे गंभीर चुकीची प्रकरणे) पावले उचलली तेव्हा यहोवा आम्हाजवळ राहील आणि आम्हाला भावनात्मक पाठबळ देईल.—नीतीसूत्रे २८:१३; यशया ५५:७; २ करिंथकर ७:९–११.
व्यक्तिगत ज्ञान शांती देते
१६. (अ) देवाच्या अचूक ज्ञानाच्या प्राप्तिचा आणखी कोणता एक मार्ग आहे? (ब) “यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा” या दावीदाच्या विधानाचे स्पष्टीकरण करा.
१६ आम्हास देवाच्या अचूक ज्ञानाविषयीची प्राप्ती, आध्यात्मिक माहितीचे ग्रहण करण्याशिवाय आणखी एका मार्गाने म्हणजे आम्हाला त्याच्या प्रेमळ मदतीचा जो व्यक्तिगत अनुभव येतो त्याकरवीच घडते. (स्तोत्रसंहिता ४१:१०, ११) कोणा त्रासापासून आमची सुटका झाली याचा अर्थ समस्येचा त्वरित पूर्ण शेवट झाला असा नाही; त्यास अधिक सहन करण्याची गरज भासेल. (१ करिंथकर १०:१३) दावीद गथ येथून वाचला पण त्याला कित्येक वर्षे भटक्या स्थितीतील जीवन कंठावे लागले व एकामागोमाग एक अशा अनेक धोक्यांचा सामना करावा लागला. पण या सर्वात, दावीदाला यहोवाकरवीची काळजी व पाठबळ यांचा अनुभव आला. त्याने देवाकडिल शांतीचा शोध घेतला व ती त्याला मिळाली; यात त्याला हे शिकायला मिळाले की जे तसे करतात त्यांना “कोणत्याही चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही.” विपत्तीकाळात यहोवा दावीदाचा कसा पाठीराखा झाला त्याविषयीच्या व्यक्तिगत अनुभवाची जाण ठेवूनच दावीद म्हणू शकला: “यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा; जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य!”—स्तोत्रसंहिता ३४:८–१०, १४, १५.
१७. विपत्ति काळात यहोवाकडिल आश्रय संपादित केल्यामुळे एका कुटुंबाला कोणता परिणाम अनुभवण्यास मिळाला?
१७ कठीण काळात यहोवाला आपला आश्रय बनविणे यामुळे तुम्हाला सुद्धा “यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव” प्रत्ययास येईल. अमेरिकेत मध्य पश्चिम विभागात राहणाऱ्या एका ख्रिश्चनाला अपघातामुळे आपली चांगल्या पगाराची नोकरी गमवावी लागली. ही त्याची नोकरी तो १४ वर्षे करीत आला होता. आता कुटुंबाला आर्थिक प्राप्तीचा उगम नसल्यामुळे त्यांनी देवाकडे याचना केली तरीही याच वेळी त्यांनी आपला खर्च कमी केला, शेतात सरवा वेचण्यासारखी कामे केली. ते आहारासाठी मासे धरीत. मंडळीतील काहींनी दिलेली मदत तसेच उपलब्ध होणारी अर्धवेळची नोकरी यामुळे चार सदस्यांचे हे कुटुंब व्यवस्थित राहू शकले. अपघाताच्या एक वर्षानंतर आईने म्हटले: “आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही यहोवावर विसंबून आहोत पण प्रत्यक्षात आम्ही आमची कुवत, आमचा सोबती वा आमची नोकरी यावर अवलंबून राहतो तेव्हा आम्हीच आमची फसवणूक करीत राहतो. तरीपण आम्हाला आता त्याजवर खरेपणाने कसे विसंबून राहता येते ते शिकता आले. या बाकीच्या सर्व गोष्टी आम्हाला सोडून जातील, पण यहोवाने आम्हाला केव्हाही त्यागले नाही—एका क्षणासाठी सुद्धा! आम्हाला आता जरूरीपुरत्या गोष्टी प्राप्त आहेत तरी कुटुंब या अर्थी आमचे यहोवाबरोबरचे नातेसंबंध अधिक जवळचे झाले आहेत.”
१८. समस्या सतत येत राहिल्या तरी कशामुळे तुम्हाला सहन करण्याचे शक्य होईल?
१८ होय, आर्थिक त्रास वाढता असेल, कोणाला जुनाट असा शारीरिक आजार जडला असेल, कोणाचा कदाचित दुसऱ्यासोबत व्यक्तिगत झगडा असेल, कोणाला नैराश्यासारखा भावनात्मक त्रास असेल, किंवा अशा इतर काही समस्या असतील. तरीपण देवाची खरी ओळख बाळगल्यामुळे त्याच्या पाठबळावरील तुमचा विश्वास दृढ होईल. (यशया ४३:१०) हा अभेद्य विश्वास तुम्हाला सहनशीलता बाळगण्याची मदत देईल आणि ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलिकडे असणारी देवाची शांती” प्रदान करील.—फिलिप्पैकर ४:७.
१९. आमच्या त्रासाकडे यहोवा क्षुल्लक नजरेने पाहत नाही हे आम्ही कसे जाणतो?
१९ त्रासदायक अनुभवातून जाताना यहोवाला तुमचा त्रास ठाऊक असतो हे कधीही विसरू नका. गथ येथील अनुभवावर विचार करूनच दावीदाने आणखी एक जे स्तोत्र लिहिले त्यात देवाकडे अशी याचना केली: “माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेव. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?” (स्तोत्रसंहिता ५६:८) देवाने दावीदाची विनंति ऐकली. काळजी व त्रास याकरवी उद्भवलेली आसवे देवाने जणू आपल्या बुधलीत, जेथे बहुमूल्य द्राक्षारस किंवा पिण्याचे पाणी भरून ठेवतात तेथे भरून ठेवावी हे किती सांत्वनदायक आहे बरे! अशा अश्रूंना नेहमी आठवणीत, देवाच्या पुस्तकात लिखित करून ठेवले जाईल. यहोवा किती कनवाळू रितीने काळजी करतो!
२०. आम्ही देवाबरोबरची आमची शांती कशी वाढवू शकतो?
२० यास्तव तुमचा बाप्तिस्मा हा देवाबरोबरच्या शांतीमय नातेसंबंधाची नुसती सुरुवात आहे. देव आणि येशू यांच्या व्यक्तिगत गुणांशी चांगल्या रितीने परिचित होण्यामुळे व शिवाय परीक्षा प्रसंगात यहोवाच्या पाठबळाचा अनुभव प्रत्यक्षपणे अनुभवून तुम्हाला देवासोबतच्या आपल्या शांतीत वाढ करता येईल. तुम्हाला देवाबरोबरचे केवळ असे नातेसंबंध लाभणार नाही जे आता तुम्हाला निर्भयतेचे आश्रयस्थान असेल पण सोबत ते तुम्हाला नंदनवनात सदासर्वदा जगण्याची बहुमूल्य आशाही देईल. कारण येथेच तुम्हाला “उदंड शांती सुखाचा उपभोग” घेण्यास मिळेल.—स्तोत्रसंहिता ३७:११, २९.
[तळटीपा]
a तालमूदच्या मते प्राचीन रब्बींनी एका प्रामाण्यास, त्याने “रस्त्यावर स्त्रीसोबत संभाषण करू नये” असे बजावले. ही प्रथा येशूच्या काळात अस्तित्वात होती तर “तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे [त्याच्या शिष्यांना] आश्चर्य [का] वाटले” ते समजू शकेल.—योहान ४:२७.
तुम्हाला आठवते का?
◻ देव व येशूविषयीचे अचूक ज्ञान संपादण्याचे कोणते मार्ग आहेत?
◻ देव आणि येशूचे अनुकरण केल्यामुळे आम्ही काय करू शकू?
◻ वाईटाविषयी असलेल्या देवाच्या द्वेषाचे आम्हाला कसे अनुकरण करता येईल?
◻ अडचणी उद्भवल्या तरी आम्हाला शांती कशी राखता येईल?
[२३ पानांवरील चित्रं]
येशूने वसाहतीतील पूर्वग्रह कलुषिततेस इतरांना साक्ष देण्यातील अडथळा बनू दिले नाही. प्रचारकार्याविषयीच्या त्याच्या आवेशाचे तुम्ही अनुकरण करता का?
[२४ पानांवरील चित्रं]
गंभीर समस्येचा सामना करावा लागला तेव्हा दावीदाने यहोवाची याचना केली . . .
. . . आणि बचावा प्रीत्यर्थ आपली चालचर्या बदलली. यहोवाने दावीदाची प्रार्थना ऐकली