वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 २/१ पृ. १७-१९
  • तुम्ही केवळ बाह्‍यस्वरुप बघता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही केवळ बाह्‍यस्वरुप बघता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने उदाहरण मांडले
  • तुम्ही “यथार्थ न्याय” करता का?
  • देव अपेक्षितो त्यापेक्षा अधिक अपेक्षा धरू नका
  • बाह्‌यस्वरुपा पलिकडे पाहण्याचे चांगले परिणाम
  • सर्व प्रकारच्या माणसांचे तारण होईल
    आमची राज्य सेवा—२००७
  • वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • तुम्ही केवळ बाह्‍यस्वरूप पाहता का?
    आमची राज्य सेवा—१९९९
  • बाहेरच्या रूपापेक्षा आतल्या रूपाला महत्त्व द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 २/१ पृ. १७-१९

तुम्ही केवळ बाह्‍यस्वरुप बघता का?

हेन्ज नावाच्या एका अल्पवयीन मुलाने द्वेषाने संतापून आपल्या सावत्र बापाचा खून करण्याचे योजिले होते. पण तसे करण्यास तो धजला नाही हे चांगले झाले. काही वर्षानंतर त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला पण तेही तो करू शकला नाही. पुढे तो चोऱ्‍या तसेच मादक द्रव्याची ने-आण करणाऱ्‍यांत सामील झाला. त्यामध्ये तो पकडला गेला. पुढे त्याचा संसार देखील मोडला.

आज हेन्ज पूर्वीसारखा अंमली औषधांच्या व्यसनी राहिलेला नाही. तो सभ्य जीवन जगत आहे. त्याचे वैवाहिक जीवन आनंदी आहे व सावत्र बापाशी त्याचे संबंध चांगले आहेत. हा फरक कशामुळे घडला? त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास सुरवात केली. जीवनासंबंधी त्याच्या दृष्टीकोणात हळूहळू बदल घडत गेला.

जे हेन्जला पूर्वी ओळखत होते त्यांनी त्याविषयीची आशा पार सोडली होती यात काही संशय नाही. पण याच्यासारख्या अनेक लोकांबद्दल आपण देवाचे आभार मानण्यास हवेत की, तो यांना काहीही होऊ शकत नाही या अर्थाने सोडून देत नाही. ते का बरे? कारणः “मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरुप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.”—१ शमुवेल १६:७.

मानव व देवामध्ये हाच सर्वात मोठा फरक आहे. आम्ही बाह्‌यरुपावरून चटकन निष्कर्ष काढतो. काही वेळा आपण असेही म्हणतोः “प्रथमदर्शनी दिसणारे हेच कायमचा ठसा उमटविते.” याचा अर्थ हा की, आपण प्राथमिक प्रतिक्रियेवरून माणसाचे मूल्यमापन करतो. पण देवाला अंतःकरण चाळून पाहता येत असल्यामुळे तो न्यायी व निपःक्षपाती आहे. या कारणास्तव त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त याला पृथ्वीवर अशासाठी पाठविले की, “सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:४) या संबंधात, समर्पित ख्रिश्‍चनांवर, सर्व मानवजातीला देवाच्या राज्याची सुवार्ता उत्साहाने सांगत राहून “देवाचे सहकारी” होण्याचा हक्क आहे. (१ करिंथकर ३:९) तथापि, ख्रिश्‍चनांना मर्यादा आहेत. ते लोकांच्या अंतःकरणातील गोष्टी समजू शकत नाहीत. या कारणास्तव त्यांनी निःपक्षपाती असेल पाहिजे व बाह्‌यरुपावरुन निर्णय घेऊन अहंकारी बनू नये.

आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीत अशा प्रकारचा धोका संभवत होता हे येशूचा दूधभाऊ याकोब याने जाणले होते. तो म्हणालाः “माझ्या बंधूनो, गौरवशाली प्रभु म्हणजे आपला प्रभु येशू ख्रिस्त याजवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या तुम्हामध्ये तोंड पाहून वागणे असू नये. उदाहरणार्थ, दोन पाहुणे तुमच्या भक्‍तीच्या स्थानी आले. एक सोन्याची अंगठी घातलेला व उंची कपडे नेसलेला; आणि दुसरा भिकार वस्त्रे ल्यालेला व दरिद्री दिसणारा. समजा, तुम्ही चांगले कपडे घातलेल्या गृहस्थाकडे खास लक्ष देता . . . तर तुम्हास हे दिसले का की, तुम्ही भ्रांतीत पडला आहात व खोट्या सूत्राने न्याय करता?” असेच आम्ही काही वेळा, जे पहिल्यांदाच राज्य सभागृही येत असतात त्यांच्याविषयी चुकीची धारणा करून घेतो का?—याकोब २:१-४, द न्यू इंग्लिश बायबल.

येशूने उदाहरण मांडले

येशूने लोकांकडे पाहिले ते कधीही सुधारणा न होणारे पापी या नात्याने नव्हे तर, जरुर ती मदत व योग्य समज दिल्यास कदाचित बदलण्यास तयार होऊ इच्छिणारे प्रांजळ हृदयी लोक म्हणून पाहिले. यासाठीच, त्याने “सर्वांसाठी मुक्‍तीचे मोल म्हणून स्वतःला दिले.” (१ तीमथ्य २:६) आपल्या प्रचारकार्यात त्याने सुहृदयी लोकांमध्ये कोणालाही अस्पृश्‍य, लक्ष देण्याची गरज नसलेला या दृष्टीने कधीच बघितले नाही. त्याने लोकांविषयी राखलेल्या धोरणामध्ये कधीच अभिमानाने भरलेली ढोंगी दिखावट नव्हती.—लूक ५:१२, १३.

पण तेच, परुशी लोकात केवढा फरक होता. त्यांच्याविषयी आम्ही वाचतोः “तेव्हा परुशातील शास्त्र्यांनी त्याला जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांना म्हटलेः ‘हा जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?’ हे ऐकून येशू त्यांना म्हणालाः ‘निरोग्यास वैद्याची गरज नाही, रोग्यांस आहे. मी धार्मिक जनांस नाही तर पापी जनांस बोलवावयास आलो आहे.”—मार्क २:१६, १७.

अर्थातच याचा असा अर्थ होत नाही की, या पापी आणि जकातदार लोकांनी जी बेईमानी व चुकीची वागणूक प्रदर्शित केली होती तिला येशूने मान्यता दिली होती. पण तो हे जाणून होती की लोक काही वेळा इच्छा नसताही किंवा परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यामुळे आडवळणी लागतात. यासाठीच त्याने समजूतदारपणा दाखविला, कारण “ज्या मेंढरांस मेंढपाळ नाही त्याच्यासारखे ते होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला.” (मार्क ६:३४) त्यांची दुष्कर्मे व ते सुहृदयी बनतील ही आशा यात त्याने प्रेमळपणे विभाजन केले.

आपल्या शिष्यांसोबतच्या व्यवहारात देखील येशूने नेहमी बाह्‍यरुपापलिकडे बघितले. ते देखील पापी व वेळोवेळी चुका करणारे होते; पण येशू त्यांच्या लहानसहान चुकासाठी त्यांची कानउघाडणी करीत बसला नाही. त्यांचा मनोदय चांगला होता किंवा आजच्या भाषेत बोलायचे तर त्यांचे लक्ष योग्य ठिकाणी होते; यामुळे त्यांना मदत व प्रोत्साहन देण्याची गरज होती ती देण्यात येशूने कधीही हात आकसला नाही. त्याने आपल्या शिष्यांकडे, देव लोकांना ज्या दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीने पाहिले. तर मग, त्याच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत का?

तुम्ही “यथार्थ न्याय” करता का?

एके प्रसंगी येशूने शब्बाथवारी कोणाला बरे करण्याचा चमत्कार केला म्हणून काही लोकांना बराच राग आला. ते स्व-नीतीमान व तक्रारखोर होते. यांना येशूने म्हटलेः “तोंडदेखला न्याय करू नका; तर यथार्थ न्याय करा.” खरे तर येशूने चमत्काराने “एका मनुष्याला सर्वांगी बरे केले,” हे पाहून त्यांना आनंद व्हावयास हवा होता; पण तो झाला नाही, उलटपक्षी, त्याने शब्बाथ मोडला हे सांगून ते त्याच्यावर “संतापले.” पण का? तोंडदेखला न्याय करून त्यांनी आपल्या दुष्ट हेतूंना शह दिला. याचवेळी, आपला न्यायनिवाडा स्वार्थी व अनीतीचा असल्याचे त्यांनी प्रकट केले.—योहान ७:२३, २४.

अशीच चूक आमच्या हातून देखील कशी घडू शकते? कोणी खरा पश्‍चाताप करून मंडळीकडे परततो किंवा कोणी जगीक माणूस सत्य स्वीकारीत आहे व आध्यात्मिक इलाजांतर्फे लाभ मिळवीत आहे हे पाहता आनंद प्रदर्शित करण्यात मागे पडणे. काही वेळा आम्ही लोकांचा न्याय कदाचित त्यांच्या अधार्मिक कपड्यावरून व केशरचनेवरून करतो व हा निर्णय देतो की, असे लोक कधीच साक्षीदार बनणार नाहीत. तरीही, पूर्वीचे हिप्पी तसेच जे अगदी गबाळे व असभ्य राहात तेच ओघाओघाने सुधारून यहोवाचे ख्रिश्‍चन साक्षीदार बनले. असे हे लोक स्वतःठायी बदल करण्याची हालचाल करीत असता आम्ही स्वतःला “तोंडदेखला न्याय” करण्यापासून आवरावे म्हणजे त्यांच्या सुहृदयाच्या स्थितीला आमचे डोळे आम्ही बंद करू शकणार नाही.

तेव्हा, येशूच्या उदाहरणास अनुसरून आम्हीही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी व ख्रिस्ती प्रौढत्व प्राप्त करीत राहण्यात त्यांना जरूर ती व्यावहारिक मदत द्यावी हे केवढे बरे आहे! त्यांच्यामध्ये आनंदाविषयीचे कारण शोधून पाहणे जरा कठीणच वाटेल. पण तेच जर ख्रिस्ताद्वारे यहोवा त्यांना आपल्याजवळ घेत आहे तर, आमच्या संकुचित दृष्टीकोणाआधारे त्यांचा नकार करणारे आम्ही कोण? (योहान ६:४४) आम्ही हृदयाचे पारखणे जाणत नसता तसेच परिस्थितीशी परिचित नसता एखाद्याचा ढोंगीपणाने न्याय केला तर हे आम्हास प्रतिकूल न्यायदंडास मिळवून देईल.—पडताळा मत्तय ७:१-५.

अशा नवोदितांचा एवढ्या बारकाईने न्याय करीत बसण्याऐवजी आम्ही त्यांचे साहाय्य करावे, त्यांना उत्तेजन द्यावे व उदाहरणे देऊन उपदेश करावा. तथापि, ती जगातील लोकप्रिय व्यक्‍ती असेल तर तिची तोंडपूजा करू नये. कारण तो पक्षपातीपणा असेल. याशिवाय ते आम्हामधील अप्रौढपणाचे लक्षण ठरेल. त्या व्यक्‍तीबाबत पाहता, आमची खुशामत त्याला नम्र बनविण्यात साहाय्यक ठरेल का? किंवा उलट त्याला अवघडल्यासारखे बनवील?—लेवीय १९:१५.

देव अपेक्षितो त्यापेक्षा अधिक अपेक्षा धरू नका

अंतःकरणाची पारख करणाऱ्‍या यहोवापेक्षा आमचा इतरांविषयीचा दृष्टीकोन नेहमी मर्यादित असणार. (१ इतिहास २८:९) हे लक्षात ठेवले तर मग, आम्हाला आजच्या काळातील स्व-नीतीमान परुशी बनण्यात आणि लोकांना मानवी दृष्टीकोणाच्या साच्यात ठेवण्यापासून आमचे रक्षण होईल. देव लोकांकडे ज्या दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीने आपण बघितल्यास तो त्यांच्याकडून जितके अपेक्षितो त्यापेक्षा अधिकाची अपेक्षा आपण धरणार नाही. आम्ही “शास्त्रलेखापलिकडे” जाणार नाही. (१ करिंथकर ४:६) हे खासपणे खिस्ती वडीलजनांनी आपल्या अतःकरणी साठविले पाहिजे.—१ पेत्र ५:२, ३.

हे आम्हाला पेहरावाविषयीच्या उदाहरणाकरवी स्पष्ट करता येईल. ख्रिश्‍चनांनी नीटनेटका पेहराव करावा, तो स्वच्छ असावा, तसेच ‘भिडस्तपणाचा व मर्यादशील’ असावा ही पवित्र शास्त्राची तसेच देवाकडील गरज आहे. (१ तीमथ्य २:९; ३:२) काही वर्षांपूर्वी एका मंडळीतील वडीलगटाने “शास्त्रलेखापलिकडे” जाऊन असे ठरविले होते की, मंडळीत जाहीर भाषण देणाऱ्‍या प्रत्येक वक्त्याने पांढऱ्‍या रंगाचाच शर्ट घातला पाहिजे. वस्तुतः त्या देशात फिक्कट रंगाचा शर्ट देखील चालू शकत होता. बाहेरील मंडळीतून भेट देणारा कोणी वक्‍ता रंगीत शर्ट घालून आला तर राज्य सभागृही तातडीच्या गरजेसाठी जे पांढरे शर्ट ठेवले होते त्यातून एक त्याला घालावयास देत असत. आम्ही, आपली व्यक्‍तीगत आवडनिवड दुसऱ्‍यावर लादू नये यासाठी केवढी काळजी बाळगली पाहिजे बरे! पौलाने सूचना केली होती की, “तुमची सौम्यता सर्वांस कळो,” व ती योग्यच होती!—फिलिप्पैकर ४:५.

बाह्‌यस्वरुपा पलिकडे पाहण्याचे चांगले परिणाम

आम्हाला लोकांच्या हृदयाची पारख करता येत नाही या गोष्टीने आम्हाला मंडळींत किंवा बाहेरील लोकांसोबत अधिक चांगले नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी मदत दिली पाहिजे. यामुळे आम्हाला इतरांविषयी विधायकपणे विचार करण्यास व त्यांच्या हेतूबद्दल मनात संशय न आणण्यास मदत होईल. कारण “आपणही पूर्वी निर्बुद्धि, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा यात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.” (तीतास ३:३) याची जाणीव राखून आम्ही सर्वांना, मग काही जरी बाह्‌यरुपी अपात्र आहेत असे दिसत असले तरी सर्वांना उपदेश करण्यात उत्सुक असू. कारण सत्याला स्वीकारणे किंवा त्याला नाकारणे हा निर्णय त्यांचा आहे. प्रचार सर्वांना करण्याची जबाबदारी मात्र आम्हावर आहे.

यहोवाच्या साक्षीदारातील हेन्जसारखे अनेकजन याबद्दल केवढे आनंदीत आहेत की ख्रिस्ती मंडळीतील बंधू भगिनींनी त्यांच्या बाह्‌यरुपाकडे न बघता तसेच प्रथमदर्शनी न्यायनिवाडा न करता त्यांचे आपुलकीने स्वागत केले.

आता फ्रँकचे उदाहरण घ्या, ज्याने दक्षिण जर्मनीमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाला एके रविवारी प्रथमच भेट दिली. त्यावेळी उपस्थितांनी काय पाहिले? दाढी वाढलेला, लांब केसांचा, घाण कपडे घातलेला व सभोवतालच्या दारुच्या अड्डयावर नेहमी आढळणारा, धुम्रपान सतत करणारा एक गबाळा, ज्याने आपल्या मैत्रिणीला तसेच त्यांच्या जुळ्या बालकांना त्यागले होते. असे असले तरी त्याचे राज्यसभागृही उबदार स्वागत झाले. त्यामुळे तो एवढा प्रभावीत झाला की, आठवड्यानंतर परत आला. तेव्हा त्यांना काय पहावयास मिळाले? एक नीटनेटका, स्वच्छ कपड्यातील तरूण. तिसऱ्‍या आठवडी काय दिसले की, त्याने धूम्रपान सोडून दिले आहे व सोबत त्याची मैत्रिण व त्यांची दोन मुलेही आहेत. चवथ्या रविवारी पाहता हे दिसले की, तो तरुण व ती तरूणी कायदेशीर विवाहबद्ध होऊन आले आहेत. पाचव्या आठवडी दिसले की, या तरुणाने खोट्या धर्माशी आपले सर्व संबंध तोडून टाकले आहेत. आज साधारण चार वर्षांनी त्याच्याविषयी असे दिसते व जे एका यहोवाच्या साक्षीदाराने बोलूनही दाखवले की, “त्याचे असे आदर्शनीय कुटुंब आहे की हे आपले अनेक वर्षांचे बंधू आहेत असेच आपणास वाटेल.”

कोणाही पुस्तकाची गुणवत्ता ही त्याच्या बांधणीवरून तसेच ज्या ग्रंथालयातून ते बाहेर पडले आहे त्या इमारतीच्या भव्यतेवरून ठरत नसते. याचप्रमाणे माणसाठायीची खरी गुणवत्ता त्याच्या बाह्‌यरुपावरून परावर्तित व्हावी याची गरज नाही. ज्या ख्रिश्‍चनांची लोकांकडे पाहण्याची दृष्टी देवासारखी आहे ते कधीही तोंडदेखला न्याय करणार नाहीत. देव “अंतःकरणातील गुप्त मनुष्या”कडे पाहात असतो व यासाठीच आम्ही त्याचे शतशः कृतज्ञ आहोत.—१ पेत्र ३:३, ४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा