वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w02 ९/१५ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • सैतान एक खरी व्यक्‍ती आहे का?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • देव दाविदाची निवड करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • पहिला इतिहास पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
w02 ९/१५ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

• बायबलमध्ये लूसिफर हे नाव सैतानासाठी वापरण्यात आले आहे का?

शास्त्रवचनांमध्ये लूसिफर हे नाव केवळ एकदाच आले आहे आणि तेही केवळ काही अनुवादांत. जसे की, मराठीतले सुबोध भाषांतर यांत यशया १४:१२ असे म्हणते: “अरे पहाटच्या ताऱ्‍या, लुसिफरा, तू स्वर्गातून कसा पडलास!”

“लूसिफर” असे भाषांतरीत करण्यात आलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “चकाकणारा” असा होतो. सेप्टुअजिंट भाषांतरात ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे ज्याचा अर्थ “उदय” असा होतो. म्हणूनच काही भाषांतरात, “प्रभात तारा” किंवा “पहाट तारा” हे मूळ इब्री शब्दच वापरण्यात आले आहेत. पण जेरोम यांच्या लॅटिन व्हल्गेटमध्ये “लूसिफर” (ज्योतीधारक) म्हटले आहे आणि त्यावरून बायबलच्या विविध भाषांतरात हा शब्द का वापरण्यात आला आहे हे समजते.

हा लूसिफर कोण आहे? ‘बाबेलच्या राजासंबंधाने म्हणावयाचे कवन’ उच्चारण्यास यशयाने भविष्यसूचकपणे इस्राएली लोकांना आज्ञा दिली त्यात “चकाकणारा” किंवा “लूसिफर” हा शब्द येतो. त्यामुळे हा शब्द, बॅबिलोनी राजघराण्याला खासकरून उद्देशून म्हटलेल्या कवनाचा भाग आहे. पुढे, “त्या तुला अधोलोकांत, गर्तेच्या अधोभागात टाकिले आहे,” या वाक्यावरून देखील कळते, की “चकाकणारा” हे वर्णन आत्मिक प्राण्यासाठी नव्हे तर मनुष्यासाठी वापरण्यात आले आहे. अधोलोक मानवजातीची सर्वसाधारण कबर आहे; हे दियाबल सैतानाचे ठिकाण नव्हे. शिवाय, ज्यांनी लूसिफराला या अवस्थेत आल्याचे पाहिले ते विचारतात: “ज्याने पृथ्वी थरथर कापविली . . . तो हाच का पुरूष?” (तिरपे वळण आमचे.) स्पष्टतः मग, “लूसिफर” हे आत्मिक प्राण्याला नव्हे तर एका मानवाला सूचित करते.—यशया १४:४, १५, १६.

पण बॅबिलोन साम्राज्याचे इतक्या ठळक शब्दांत वर्णन का करण्यात आले? आपण हे समजले पाहिजे, की बॅबिलोनच्या राजाचे पतन झाल्यावर त्याला, अरे चकाकणाऱ्‍या, असा टोमणा मारण्यात आला आहे. (यशया १४:३) मगरूरीमुळे बॅबिलोनचे राजे स्वतःला इतर राजांपेक्षा श्रेष्ठ समजायचे. या साम्राज्याचा इतका ताठरपणा होता, की ते अशी बढाई मारत असल्याचे चित्रित करण्यात आले आहे: “मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन; . . . मी परात्परासमान होईन.”—यशया १४:१३, १४.

‘देवाचे तारांगण’ म्हणजे, दाविदाच्या राजसी वंशावळीतले राजे. (गणना २४:१७) दाविदापासून पुढे या ‘ताऱ्‍यांनी’ सियोन पर्वताहून राज्य केले. शलमोनाने जेरुसलेममध्ये मंदिर बांधल्यानंतर सियोन हे नाव संपूर्ण शहराला लागू होऊ लागले. नियमशास्त्र करारानुसार, सर्व इस्राएली पुरूषांना वर्षातून एकदा सियोनेस जाण्यास आज्ञापिले होते. यामुळे सियोन ‘देवसभेचा पर्वत’ बनले. यहुदी राजांवर विजय मिळवून त्यांना त्या पर्वतावरून हटवण्याचा चंग बांधणारा नबुखद्‌नेस्सर या ‘ताऱ्‍यांपेक्षा’ वरचढ होण्याची आपली मनिषा व्यक्‍त करतो. त्यांच्यावर विजय मिळवल्याचे श्रेय यहोवाला देण्याऐवजी तो गर्विष्ठपणे स्वतःला यहोवाच्या जागी असल्यासारखे समजतो. म्हणूनच, बॅबिलोन साम्राज्याचे पतन झाल्यावर त्याला थट्टेच्या सूरात “चकाकणारा” असे संबोधण्यात आले आहे.

बॅबिलोनच्या राजांच्या ताठरपणावरून, ‘ह्‍या युगाचे दैवत,’ दियाबल सैतान, याची मनोवृत्ती दिसून येते. (२ करिंथकर ४:४) सैतानाला सत्तेची हाव आहे आणि तोही स्वतःला यहोवा देवाच्या जागी ठेवण्याचे स्वप्न पाहतो आहे. पण शास्त्रवचनांत लूसिफर हे नाव सैतानाला लागू होत नाही.

• १ इतिहास २:१३-१५ मध्ये दाविदाला इशायाचा सातवा पुत्र म्हटले आहे आणि १ शमुवेल १६:१०, ११ मध्ये त्याला इशायाचा आठवा पुत्र म्हटले आहे, असे का?

प्राचीन इस्राएलचा शौल राजा खऱ्‍या उपासनेपासून मागे फिरल्यानंतर यहोवा देवाने संदेष्टा शमुवेलाला इशायाच्या पुत्रांपैकी एकाला राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यास पाठवले. या ऐतिहासिक घटनेचा हा ईश्‍वरप्रेरित अहवाल स्वतः शमुवेलाने सा.यु.पू. ११ व्या शतकात लिहिला; त्यात त्याने दाविदाला इशायाचा आठवा पुत्र म्हटले आहे. (१ शमुवेल १६:१०-१३) पण, ६०० वर्षांनंतर एज्रा याजकाने लिहिलेल्या अहवालात असे म्हटले आहे: “इशायाचा ज्येष्ठ पुत्र अलीयाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमा, चवथा नथनेल, पाचवा रदाय, सहावा ओसेम व सातवा दावीद हे पुत्र झाले.” (१ इतिहास २:१३-१५) दाविदाच्या एका भावाचे काय झाले व एज्राने त्याचे नाव का दिले नाही?

शास्त्रवचनांत म्हटले आहे, की इशायाला “आठ पुत्र होते.” (१ शमुवेल १७:१२) पण त्यातला एक पुत्र जास्त दिवस न जगल्यामुळे त्याचे लग्न होऊन त्याला मुले झाली नाहीत. त्याची संतती नसल्यामुळे तो वंशावळीतल्या वारशाचा दावा करू शकत नव्हता किंवा इशायाच्या वंशाशी त्याचा कसलाही संबंध राहिला नाही.

आता आपण एज्राच्या दिवसांचा विचार करू. त्याने कोणत्या परिस्थितीत बायबलमधील इतिहास या पुस्तकांची जुळवणी केली ते आपण पाहू या. बॅबिलोनमधील बंदिवास जवळजवळ ७७ वर्षांपूर्वी समाप्त झाला होता आणि यहुदी लोक पुन्हा आपल्या देशी जाऊन वसले होते. पर्शियाच्या राजाने एज्राला न्यायाधीशांची व देवाच्या नियमशास्त्राचे शिक्षण देणाऱ्‍या शिक्षकांची नियुक्‍ती करण्याचा आणि यहोवाच्या घराचे सुशोभीकरण करण्याचा अधिकार सोपवला होता. वंशावळीची खात्री करण्यासाठी तसेच याजकपद स्वीकारण्याचा ज्यांना अधिकार होता केवळ त्यांनाच ते मिळावे म्हणून अचूक वंशावळींच्या यादीची आवश्‍यकता होती. त्यामुळे एज्राने इस्राएलच्या इतिहासाचा आणि यहुदा व दावीद यांच्या वंशावळीचा स्पष्ट व विश्‍वसनीय अहवाल तयार केला. जो निपुत्रिक होऊन मरण पावला त्या इशायाच्या पुत्राचे नाव लिहिणे व्यर्थ होते. म्हणूनच एज्राने त्याचे नाव वगळले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा