वाचकांचे प्रश्न
◼ राजा शौलाने जो लढवय्या लढाई संपण्यापूर्वी काही खाईल त्यास शाप दिला त्यानंतर योनाथानने कांही मध खाल्ला तेव्हा त्याने देवाची मर्जी गमावली का?
शौलाच्या अविचारी शपथेमुळे इस्राएलांना शापाखाली आणले परंतु शापाच्या विरूद्ध गेल्यामुळे योनाथानने यहोवाची मर्जी गमावल्याचे दिसत नाही.
पहिले शमुवेल १४:२४–४५ ही घटना कथीत करते. इस्राएलांना योनाथानच्या पराक्रमाने पलीष्ट्याबरोबर लढण्यास धैर्यशील केले. राजा शौलाने म्हटले: “मला माझ्या शत्रुंचा सूड घ्यावयाचा आहे, तर संध्याकाळपूर्वी जो कोणी अन्नास स्पर्श करील त्याला शाप लागो!” (२०वे वचन) त्याच्या बापाच्या शपथेबाबत अजाण असता योनाथानने स्वतःस थोडा मध खाऊन उत्साह दिला. जे थकले भागले होते त्या इतर इस्राएली लढवय्यांनी प्राणी वधिले व त्यांचे मांस रक्त पूर्णपणे न काढता अधाशीपणे खाऊन पाप केले. शौलाने या पापासाठी वेदी बांधली पण त्यास त्याच्या पुत्राने काय केले होते हे त्याला ठाऊक नव्हते.
शौलाने लढाई जुंपावी का यासाठी देवाच्या मार्गदर्शनाचा मागोवा घेतला पण यहोवाने उत्तर दिले नाही. थुमीम (कदाचीत पवित्र चिठ्ठया) च्या साहाय्याने शौलास कळून चुकले की त्याची अव्यवहारी शपथ त्याच्या पुत्राने उल्लंघली होती. परंतु योनाथान खरोखरी दोषी होता का?
प्रथमतः, शपथ घेताना शौलाची कोणती मनोवृत्ती होती ते आठवा. पलीष्टयावरील विजयाचे गौरव देवास देण्याची इच्छा दाखविणारा पुरावा त्याने दाखविला नाही. त्या ऐवजी शौलाने उतावळीने शपथ घेतली: “मी माझ्या शत्रुंचा सूड घेई पर्यंत!” होय, शपथ अशा रितीने राज्य अधिकाराचा गैरवापर दृष्टीकोणाने किंवा फाजील आवेशाने घेतली गेली होती. त्या शपथेस देवाची अनुमती नसणार. ती शपथ इस्राएली लढवय्यांनी प्राण्यांचे रक्ताबाबत केलेल्या पापाचे कारण होते. त्यांना शपथेने बंधन घातले नसते तर त्यांना अन्न प्राप्त करणे शक्य झाले असते व यास्तव पलीष्ट्यांचा पूर्ण पाडाव करून विजय प्राप्त करीपर्यंत पाठलाग करण्यास शक्ती मिळाली असती.
देवाने थुमीमच्या मार्गी योनाथानने (अजाणपणे) शौलाची शपथ उल्लंघन केली हे ठरविण्यास परवानगी दिली, परंतु याचा अर्थ तो उतावळ्या शपथेस अनुमती देऊन होता असा होत नाही. देवाने योनाथानास अपराधी म्हणून पाहिल्याचे अहवाल कोठेही म्हणत नाही. वास्तविक पाहता योनाथान त्याच्या बापाच्या अविचारी शपथेच्या उल्लंघनाचे परिणाम स्विकारण्यास तयार होता, परंतु परिस्थिती अशी होती की योनाथानचे जीवन बचावले गेले होते, इस्राएली शिपायांनी म्हटले की योनाथानने “यहोवाच्या पक्षाने” शौर्य दाखविले व त्यांनी कसे बसे योनाथानास सोडविले. पुढील वर्षात, शौलाने एकामागोमाग एक चुका केल्या तेव्हा योनाथान असा होता की ज्यास यहोवाची संमती मिळत राहिली.
◼ शमशोन व गिदोनाप्रमाणे किती शास्ते होऊन गेले?
तुम्ही शास्त्यांची गणना करता तेव्हा जो आकडा मिळेल तो तुम्ही विशिष्ट इस्राएलाकडे कशा दृष्टीने पाहता यावर अवलंबून आहे. परंतु हे सुरक्षितपणे म्हटले जाऊ शकते की १२ पुरुषांनी यहोशवा ते शमुवेल यांच्या दरम्यान शास्ते म्हणून काम केले.
मोशे व यहोशवाच्या दिवसा दरम्यान, मंडळीतील कांही वृद्ध पुरुष, न्यायदानाची प्रकरणे ऐकणे व निवाडा करण्यास निवडीले होते या दृष्टीने शास्ते होते. (निर्गम १८:२१, २२; यहोशवा ८:३३; २३:२) यहोशवाच्या मृत्युनंतर, इस्राएल खऱ्या भक्तीपासून बहकले व इतर लोकांकडून पीडीत बनले. शास्ते २:१६ म्हणते: “यहोवा त्यांच्यात शास्ते उत्पन्न करी व ते त्यास लुटणाऱ्यांच्या हातून सोडवित.” यहोवाने प्रथमतःच शास्ता किंवा ‘सोडविणारा’ म्हणून अथनिएल नावाच्या पुरुषास सामोरे आणले. (शास्ते ३:९) त्याच्या मृत्युनंतर एहूद, शमगार, बाराक, गिदोन, तोला, याईर, इफ्ताह, इब्सान, एलोन, अब्दोन व शमशोन झाले.
या १२ ना सोडता पवित्रशास्त्र दबोरा, एली व शमुवेल यांचा उल्लेख न्याय देण्याच्या संबधाने करते. (शास्ते ४:४; १ शमुवेल ४:१६–१८; ७:१५, १६) तथापि, दबोरास सर्वप्रथम संदेष्ट्री म्हटले गेले व तिची सांगड शास्ता बाराक सोबत घालण्यात आली ज्याने खासरित्या लोकांना जुलमा खालून बाहेर काढण्यात नेतृत्व केले. त्याच प्रमाणे, एली हा मुख्यत्वेकरून महायाजक होता, ‘सोडविणारा’ नव्हता की ज्याने लोकांना लढाईतून मुक्ततेकडे नेले. (नेहम्या ९:२७) तथापि दबोरा व एलीने इस्राएलांचा न्याय करण्याची भूमिका बजावली होती खरी पण ज्या १२ पुरुषांना स्पष्टपणे व मुख्यत्वे करून शास्ते म्हणून ‘योजले’ होते त्या यादीत गणना करण्याचे कोणतेही कारण नाही. प्रेषितांची कृत्ये १३:२० म्हणते की ‘शास्ते संदेष्टा शमुवेला पर्यंत [दिले होते].” या मर्यादेस शास्त्यांचा काळ म्हणून ओळखले जाऊ शकते, व तेच शमुवेल व त्याच्या पुत्रांना बहुदा शास्त्यामध्ये का गणले नाही हे दाखविते.—१ शमुवेल ८:१.