वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ४/१ पृ. १५-२०
  • नंदनवनाची पुनर्स्थापना देवास गौरविते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नंदनवनाची पुनर्स्थापना देवास गौरविते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नंदनवनाची पुनर्स्थापना करण्यातील पुनरुत्थितांचा सहभाग
  • ‘सर्व पृथ्वीवर अधिपति’
  • सहानुभूति दर्शविणाऱ्‍या अपराध्याचे स्मरण होते
  • गालार्धव्याप्त पुनर्स्थापित एदेन बागेतील जीवन
  • आनंदी, चिरकाल भवितव्य
  • नंदनवनाप्रत निरविणारा मार्ग उघडा करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • हर्मगिदोनानंतर नंदनवन झालेली पृथ्वी
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • पृथ्वीसाठी देवाचा काय संकल्प आहे?
    देवाकडून आनंदाची बातमी!
  • “पहा! मी सर्व नवे करतो”
    “पहा! मी सर्व नवे करतो”
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ४/१ पृ. १५-२०

नंदनवनाची पुनर्स्थापना देवास गौरविते

“माझे पादासन मी शोभायमान करीन.”—यशया ६०:१३.

१, २. (अ) यशया संदेष्ट्याद्वारे देवाने पृथ्वीविषयी काय भाकित केले? (ब) भविष्यकाळात हजार वर्षाच्या पुढे पाहिल्यास आपल्याला काय दिसते?

यहोवाने या पृथ्वी ग्रहाची निर्मिती त्याचे पाय ठेवण्याची जागा, त्याचे लाक्षणिक पादासन या अर्थाने केली. यशया संदेष्ट्यामार्फत देवाने भाकित केले की, तो ‘त्याचे पादासन शोभायमान करणार.’ (यशया ६०:१३) तर मग, प्रेरित पवित्र शास्त्राच्या मदतीने जणू फार शक्‍तीशाली दुर्बिणीकरवी आपण मानवी भविष्याच्या हजार वर्षापर्यंत डोकावू शकतो. किती आल्हाददायक दृश्‍य आपल्या डोळ्यांना भिडते! सबंध विश्‍वामधील सर्वथोर माळ्‌याने निर्माण केलेले अप्रतिम सौंदर्य ही पृथ्वी सर्वत्र चकाकवीत आहे. मानवजातीत पृथ्वीभर नंदनवनाची पुनर्स्थापना झाली आहे!

२ होय, नंदनवनातील बागेत मानवाच्या अस्तित्वाची सुरवात करणाऱ्‍या सार्वभौम सत्ताधारी देवाच्या विचारात मानवाचा सर्वथोर आनंद आहे. मानवजातीला हा केवढा प्रेमळ निर्माणकर्ता आहे ज्याविषयी “देव प्रीती आहे” असे म्हटल्यास ते अतिशयोक्‍तीचे मुळीच ठरणार नाही! (१ योहान ४:८, १६) पुनर्स्थापित नंदनवनात प्रौढ पुरुष व स्त्रिया निष्कलंक अशा मानवी पूर्णतेमध्ये बंधुभगिनींच्या नात्याने एकत्र राहात आहेत. (यशया ९:६) ते स्वर्ग व पृथ्वीचा वैभवी निर्माता, यहोवा देवाच्या अधीन प्रेमाने राहात आहेत.

३, ४. (अ) स्वर्ग व पृथ्वी यांची कशाबाबतीत सुसंगता होईल? (ब) पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना होईल तेव्हा देवदूत कोणता प्रतिसाद व्यक्‍त करतील?

३ याच्या हजारो वर्षे आधी आपल्या राज्याविषयी ईश्‍वरी प्रेरणेने दिलेल्या दृष्टांतात देव या विलोभनीय शब्दात आपल्या निवडलेल्या लोकांना म्हणालाः “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे.” (यशया ६६:१) तद्वत, त्याच्या “पादासना”ची शोभा म्हणजे नंदनवनमय पृथ्वी ही अदृश्‍य उर्ध्वलोकात असणाऱ्‍या त्याच्या वैभवी सिंहासनाला अत्यंत साजेशी अशीच आहे.

४ पृथ्वीची निर्मिती करण्यात आली तेव्हा वैभवी आसमंतात देवाच्या सिंहासनाभोवती सेवा करणाऱ्‍यांनी तिचे दृश्‍य हेरले. तिची दैदिप्यमानता त्यांच्या डोळ्यांसमोर प्रज्वलित झाली तेव्हा त्यांना केवढा आनंद झाला असावा! त्यांच्या तोंडून गायनाचे स्वर उत्स्फुर्ततेने निघाले असावेत यात काय नवल! (पडताळा सफन्या ३:१७, रिव्हाईज्ड स्टँडर्ड व्हर्शन; स्तोत्रसंहिता १००:२, द जरूसलेम बायबल.) आनंद व संतोष पावलेल्या निर्मात्याने आपल्या पृथ्वीवरील लेखकाला त्या स्वर्गीय दृश्‍याचे अचूक वर्णन असे लिहिण्यास प्रेरित केलेः “त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले, व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.” (ईयोब ३८:७) तर मग, जेव्हा नंदनवनाची पुनर्स्थापना केली जाईल तेव्हा हेच देवाचे स्वर्गदूत किती आनंदाने गायन करून देवाचे गौरव करतील!

५. देवाने पृथ्वीसंबंधाने राखलेल्या मूळ संकल्पाच्या पूर्णतेविषयी आपल्याला कसे वाटले पाहिजे?

५ अगदी आरंभापासूनच यहोवा देवाने पृथ्वीला नंदनवन बनविण्याचा भव्य हेतू राखला होता हे प्रेरित शास्त्रवचनांच्या माहितीकरवी आपल्याला खात्रीदायकरितीने कळाल्यामुळे आमची अंतःकरणे खरीच उबविली जातात. देवाने पृथ्वीविषयी राखलेला हा आनंदाने प्रेरित असणारा व स्तुतीपात्र उद्देश, वैभवाने मंडित असणारा आणि आपले सार्वभौमत्व दाखविण्यात कधीही अपयशी न ठरलेल्या देवापासून अगदी उचित आहे. त्याची सदा स्तुति होवो!—स्तोत्रसंहिता १५०:१, २; यशया ४५:१८; प्रकटीकरण २१:३-५.

नंदनवनाची पुनर्स्थापना करण्यातील पुनरुत्थितांचा सहभाग

६. हर्मगिदोनानंतर पृथ्वी कशी भरली जाईल?

६ हर्मगिदोनातून बचावणारे संख्येने अल्प असले तरी त्यांना होणाऱ्‍या मुलांकरवीच सर्वतोपरि ही पृथ्वी भरणार नाही. यहोवा स्मृतिकबरेत असणाऱ्‍यांना व जे ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाच्या फायद्यामध्ये बसतात अशांचे पुनरुत्थान करून आपल्या ‘पादासनाची शोभा वाढवील.’ हे देखील आमच्या पृथ्वी ग्रहाचे रुपांतर अप्रतिम सुंदर नंदनवनात करण्याच्या आनंदी कार्यात सहभागी होतील.—प्रे. कृत्ये २४:१५.

७. येशूचे कोणते शब्द हर्मगिदोनातून वाचणारे लोक आपल्या लक्षात ठेवतील?

७ हर्मगिदोनातून बचावणाऱ्‍यांना प्रभु येशू ख्रिस्ताने एका प्रसंगी जे रोमांचकारी उद्‌गार काढले होते ते नक्कीच आठवणीत राहतील. तो म्हणाला होताः “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण असा समय येत आहे की, स्मृतीकबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९)बेथानी येथील कबरेत मृत लाजराला येशूने हाक मारुन म्हटले होतेः “लाजरा, बाहेर ये!” अशीच देवाच्या पुत्राने हाक मारण्याची घटका येईल व त्यावेळी स्मृती कबरेतील मृत ती ऐकतील तेव्हा कसे वाटेल बरे! —योहान ११:४३.

८, ९. पृथ्वीवरील पुनर्नवीन जीवनासाठी कोणाचे पहिले पुनरुत्थान होण्याची शक्यता आहे, व यामुळे हर्मगिदोनातून वाचलेल्या लोकांना कसला आनंद मिळेल?

८ येशू ख्रिस्ताच्या हाकेला उत्तर देऊन त्याच्या हजार वर्षीय राज्यकिर्दीत पृथ्वीवर नव्याने जीवनप्राप्तीकरता पुनरुत्थान होऊन कोण पहिल्याप्रमथ येईल बरे? हे, सद्य व्यवस्थीकरणाच्या अंताच्या आधी “दुसरी मेंढरे” यापैकीचे जे मरतील तेच असतील असे व्यवहार्यपणे अपेक्षू शकतो. यांना आरंभाचे पुनरुत्थान मिळेल. (योहान १०:१६) यांना नवीन जगात जुळवून घेण्यास इतके प्रयास पडणार नाहीत.—पडताळा मत्तय २५:३४; योहान ६:५३, ५४.

९ “मोठे संकट” येण्याआधीच्या पिढीत वारलेल्या “दुसरी मेंढरे” वर्गाच्या लोकांना पुनरुत्थित झाल्याचे पाहून हर्मगिदोनातून बचावून आलेल्या लोकांना किती आनंद वाटेल बरे! (मत्तय २४:२१) त्यांची स्पष्ट ओळख असल्यामुळे हर्मगिदोनातून वाचलेले लोक त्यांचे आनंदाने स्वागत करतील आणि यांच्याबरोबर मिळून ते सर्वसमर्थ देवाला ऐक्याने भक्‍ती करीत राहण्याच्या कामाला पुन्हा उजाळा देतील!

१०. हर्मगिदोनातून बचावल्यास तुम्हाला काय पहायला मिळेल?

१० हर्मगिदोनातून वाचलेल्यापैकी तुम्ही असला तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच नातेवाईकांचे प्रथम पुनरुत्थान झाल्याचे पहावयास मिळेल. अशा वेळी तुमच्या भावना केवढ्या उचंबळून येतील! प्रभु येशूने १२ वर्षाच्या मुलीचे पुनरुत्थान करून तिला तिच्या आईबापाकडे सोपविले तेव्हा त्यांना जसे वाटले त्यासारखेच तुम्हाला वाटणार नाही का? “तेव्हा ते लागलीच अत्यंत आश्‍चर्यचकित झाले,” असे अहवाल म्हणतो. (मार्क ५:४२) होय, हेडिजमधून तसेच समुद्रातून मृतांचे पुनरुत्थान होताना तुमच्या आनंदाला पारावार नसणार. (प्रकटीकरण २०:१३) अहा, तो केवढा आनंदी काळ आहे! शिवाय तो लवकरच येणार!

‘सर्व पृथ्वीवर अधिपति’

११, १२. (अ) स्तोत्रसंहिता ४५:१६ कशावर जोर देते? (ब) राजा येशू ख्रिस्त कोणामधून ‘सर्व पृथ्वीवर अधिपति’ नेमील?

११ ज्यांच्यासाठी आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे खंडणी यज्ञापर्ण वाहिले त्या मृतांचे पुनरुत्थान करण्याचे सामर्थ्य दाखवून येशू स्तोत्रसंहिता ४५:१६ मधील पूर्णता प्रत्ययास आणील. हे स्तोत्र येशू ख्रिस्ताला भविष्यवादितपणे अधिष्ठित राजा या अर्थी उद्देशून म्हणतेः “तुझ्या [पार्थिव] वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील; तू सर्व पृथ्वीवर त्यांस अधिपति करशील.” हे स्तोत्र यावर जोर देते की, येशू ख्रिस्त पृथ्वीवरील मुलांसाठी जणू स्वर्गातील पित्याप्रमाणे असेल व तो यापैकीच्या काहींना “सर्व पृथ्वीवर . . . अधिपति” करील. “दावीदाचा पुत्र,” तसेच यहुदी कुमारी मरीया हिचा ज्येष्ठ पुत्र म्हणून येशूला पृथ्वीवर मागे आदामापर्यंत मानवी वाडवडील होते.—लूक ३:२३-३८.

१२ ते स्तोत्र ४५:१६ असे म्हणते का की, जे येशूचे पूर्वी स्वाभाविक वाडवडील होते ते मृतातून पुनरुत्थान झाल्यावर त्याची मुले बनतील? होय. शिवाय ते स्तोत्र ४५:१६ असेही म्हणते का की या वाडवडिलांपासून तो जन्माला आला या गोष्टीला मान देऊन तो त्यांना आपली खास बादशाही संमती व्यक्‍त करून केवळ त्यांना “सर्व पृथ्वीवर [नंदनवनमय परिस्थितीत] अधिपति” करील? नाही. भविष्यवादाची पूर्णता अशा प्रकाराने झाली तर सबंध पृथ्वीवर फारच थोडे “अधिपति” दिसतील. याशिवाय, ते सर्वच वाडवडिल हजार वर्षाच्या कारकिर्दीत खास प्राधान्य मिळण्याइतके नामांकित नव्हते. यामुळेच राजा येशू ख्रिस्त या पृथ्वीच्या वाडवडिलांशिवाय आणखी अगणित लोकांची “अधिपति” म्हणून नियुक्‍ती करील. ते, हर्मगिदोनातून बचावलेले, “दुसरी मेंढरे” यातील पुनरुत्थित, व शिवाय ख्रिस्ती युगापूर्वीचे विश्‍वासू लोक यापैकीचे लायक लोक असतील. या सर्वातील लायक जणांनाच तो पृथ्वीवरील आपले बादशाही प्रतिनिधी या पदावर नियुक्‍ती देईल.

१३, १४. हर्मगिदोनातून बचाव मिळणाऱ्‍यांना कोणाकोणाचे पुनरुत्थान होत असल्याचे आपल्या डोळ्यांनी पाहता येईल?

१३ तद्वत, मशीही राजवटीत अशा कोणाचे पुनरुत्थान होईल ते विचारात घ्या. पहा, आमच्या डोळ्यांवर विश्‍वास बसतो का? त्यामध्ये पहिला मानवी हुतात्मा हाबेल आहे, शिवाय खऱ्‍या देवासमागमे राहिलेला हनोख देखील आहे. याचप्रमाणे प्रचंड तारु बांधणारा नोहा, इस्राएल राष्ट्राचे कुलपिता अब्राहाम, इसहाक व याकोब हेही आहेत. आणखी मोशे (लेवी या याजकीय वंशातला), आणि ज्याच्यासोबत राज्याविषयीचा चिरकालिक करार करण्यात आला तो दावीदही आहे. तसेच यशया, यिर्मया, यहेज्केल, दानीएल आणि मलाखीपर्यंत पवित्र शास्त्र लिखाण करणारे सर्व इब्री संदेष्टे व अर्थातच बाप्तिस्मा करणारा योहान व येशूचा दत्तक पिता योसेफ हे सर्व आहेत.

१४ एके प्रसंगी येशूने यहुद्यांना म्हटले की, ते “अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्‍यांस देवाच्या राज्यात असलेले, पण [त्यांना स्वतःला] बाहेर टाकलेले” पाहतील. (लूक १३:२८) होय, “सर्वसत्ताधारी देवाच्या . . . मोठ्या दिवसाच्या लढाई”तून बचावून जाणारा पृथ्वीवरील “दुसरी मेंढरे” यांचा वर्ग प्रत्यक्षपणे “अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे” यांना नंदनवनमय पृथ्वीवर पुनरुत्थित झाल्याचे पाहतील व यांना “सनातन पिता” येशू ख्रिस्ताच्या वर्चस्वाखाली असलेल्या देवाच्या राज्यात बादशाही सेवा करण्याचा हक्क दिला जाईल.—प्रकटीकरण ७:९, १४; १६:१४; यशया ९:६.

१५. हर्मगिदोनातून वाचणाऱ्‍यांसाठी कोणता अतुलनीय हक्क वाट पाहून आहे?

१५ सध्याच्या दुष्ट जगाच्या नाशातून बचावलेल्या तुम्हासाठी, इ. स. पू. २३७० मध्ये गोलार्धव्याप्त जलप्रलयाकरवी घडलेल्या पहिल्या जगाच्या नाशातून बचावलेला नोहा व त्याच्या घरचे लोक, “आठ जीव” यांच्यासोबत बसून दोन्ही काळाची समांतरता लक्षात घेणे किती शिरशिरी भरविणारे ठरेल! तुम्हाला आलेल्या या अनुभवासारखा अनुभव अनंतकाळाकरता कोणालाच येणार नाही तसेच पुनरावृत्ती न होणाऱ्‍या घटनेचे साक्षीदार बनून या रुपात यहोवा देवाची सेवा करण्याची अप्रतिम संधि नंतर कोणालाही कधी अनुभवता येणार नाही.—१ पेत्र ३:२०; मार्क १३:१९; २ पेत्र ३:५-७.

सहानुभूति दर्शविणाऱ्‍या अपराध्याचे स्मरण होते

१६, १७. (अ) येशू जेव्हा त्या सहानुभूतिकारक अपराध्याचे स्मरण करील तेव्हा हर्मगिदोनातून वाचलेल्या आणि जिवंत असलेल्या बाकीच्या इतरांना कोणता हक्क मिळेल? (ब) पुनरुत्थान झालेल्या त्या अपराध्याबाबत कोणत्या आशा राखल्या जात आहेत?

१६ यावेळेपावेतो, पृथ्वीवर नंदनवनाची पुनर्स्थापना बहुतांशी पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल. कालवरी येथे येशूसोबत वधस्तंभी खिळलेला अपराधी, ज्याने येशूच्या डोक्यावर डकविण्यात आलेली पाटी वाचून त्याला म्हटले होतेः “हे येशू, तू राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर,” त्याला पुनर्स्थापित नंदनवनात परत जीवन देण्यात येईल. (लूक २३:४२) हर्मगिदोनातून वाचलेले तसेच त्या काळी जिवंत असणाऱ्‍या सर्वांना त्याचे मृतातून स्वागत करण्याचा मोठा हक्क मिळेल. ते त्याला, सध्या राज्य करीत असलेला राजा येशू ख्रिस्त, ज्याच्याबद्दल त्याने इ. स. ३३ च्या निसान १४ रोजी सहानुभूति व्यक्‍त केली होती त्याच्याविषयी पूर्ण रुपाचे शिक्षण देतील.

१७ आपल्या हजार वर्षीय राज्यकिर्दीत स्वतः प्रभु येशू ख्रिस्त त्याचे स्मरण करण्यास विसरणार नाही. हे खरे की, तो सहानुभूतिकारक, पुनरुत्थित झालेला अपराधी राज्य करणारा राजा येशू ख्रिस्ताविषयी आपली रसिकता प्रदर्शित करील, कारण त्यानेच त्याचे पुनरुत्थान घडवून आणले आहे. ही रसिकता तो विश्‍वाचा सार्वभौम यहोवा देव याला आपला विश्‍वासूपणा व्यक्‍त करण्याद्वारे प्रदर्शित करील. त्यानंतर तो इतर सर्व पुनर्स्थापित व आज्ञाधारक मानवांबरोबर नंदनवनमय नव्या जगात सदासर्वकाळ जगण्याच्या पात्रतेचा गणला जाईल.

गालार्धव्याप्त पुनर्स्थापित एदेन बागेतील जीवन

१८. पुनर्स्थापित नंदनवनातील जीवन कसे असेल?

१८ पुनर्स्थापित नंदनवनात सर्वत्र मित्रत्वाचे नाते नांदते आहे. जागतिक बंधुवर्गाचे नाते प्रत्येकाला सातत्याने जाणवत आहे. सर्वांना एकमेकांची समज आहे. ते सर्व एकच भाषा बोलत आहेत. ते जणू मानवजातीच्या आरंभासारखेच दिसते, जेव्हा की, केवळ एकच भाषा पहिल्या १,८०० वर्षे म्हणजे इ. स. पूर्वी ४०२६ मध्ये आदामाची उत्पत्ती घडली तेव्हापासून ते पेलेगच्या काळापर्यंत (इ. स. पू. २२६९ ते २०३० पर्यंत) बोलली जात होती. यानंतर “पृथ्वीची वाटणी झाली.” (उत्पत्ती १०:२५; ११:१) प्रत्येक जण जिवंत राहण्याचा हक्क पुरेपूर अनुभवीत आहे आणि दर दिवशी निर्माणकत्याचे जीवनासाठी आभार मानले जात आहेत. काळ जातो तशा शारीरिक दुर्बळता येत नाहीत. स्नायुतील शक्‍ती वाढती आहे आणि शरीरे थकतभागत नाहीत.—पडताळा ईयोब ३३:२५.

१९. पूर्वीच्या अपंग लोकांविषयी कोणता बदल झालेला दिसेल?

१९ आणखी पहा, लंगडे चालताहेत, होय ते आनंदाने उड्या मारीत आहेत! कोणाचे हातपाय आता तुटलेल्या अवस्थेत नाहीत, ते पूर्ण बरे झाले आहेत. पूर्वीचे अंधळे आता पहात आहेत, बहिरे आता ऐकत आहेत आणि मुके बोलत आहेत. ते मोठ्या आनंदाने गाणी गात आहेत. (पडताळा यशया ३५:५, ६.) मानवाची बिघडलेली मुखचर्या आणि अंगाची कुरुपता नाहीशी झाली आहे. पुरुषाचे पौरुषत्व आणि नारीचे स्त्रीत्व यात सुंदर समतोल आहे. (उत्पत्ती २:१८) मानवाठायी वास्तव्य करीत असलेली पूर्णता, परिपूर्ण मानवी शरीराचा निर्माता यहोवा देव याला गौरवीत आहे.

२०. नैसर्गिक शक्‍ती, अन्‍नसाठा, प्राणीवर्ग यांच्या बाबतीत काय दिसेल आणि या पृथ्वीचा वापर कसा केला जाईल?

२० सबंध पृथ्वी ही गालावरील तिळासारखी सुंदर दिसेल. पृथ्वीच्या कोणत्याही भागातून दुष्काळाचे किंवा अतिवृष्टीमुळे घडणाऱ्‍या विपत्तीचे वृत्त नाही. तसेच, वावटळ, प्रचंड वादळ, भयंकर तुफान व झंझावात यांचीही कसली बातमी नाही. (पडताळा मार्क ४:३७-४१.) सर्व नैसर्गिक शक्त्यांच्या असा तोल साधला आहे की, ही पृथ्वी वसाहतीस अगदी मनोरम स्थळ बनली आहे. अन्‍नटंचाई तर कोठेच नाही, कारण भूमी आपला उपज महामूर देत आहे. (स्तोत्रसंहिता ७२:१६) मानव आणि जनावरे यांजमध्ये शांती व निर्भयता पूर्ण रुपात वास करते आहे. हेच यहोवाने आधी याप्रकारे भाकित केले होतेः “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत.” (यशया ११:९; तसेच ६-८ वचने पहा.) अशाप्रकारे या पृथ्वीची सुंदरता राहील व तिजमध्ये तिचा मालक व निर्माता यहोवा देव याची भक्‍ती व सेवा करीत राहण्यात व जीवन जगण्यास आनंद वाटेल. त्याने तिची निर्मिती केली आहे म्हणून ती त्याची जहागिरी आहे, याकरता तिचा वापर त्याला संतुष्ट वाटणाऱ्‍या तसेच त्याचे गौरव होईल अशा मार्गाकरवी केला जाणे हे क्रमप्राप्त आहे.—पडताळा यशया ३५:१, २, ६, ७.

२१. उद्धरित मानवजातीला पृथ्वीवरील सर्व गोष्टी कशा दिसतील आणि तेथे कोणते संगीत ऐकावयास मिळेल?

२१ सर्व कसे उत्साहवर्धक वाटते आहे, कारण या गोष्टीचा अनुभव उद्धारित मानवजातीस पूर्वी कधी मिळाला नाही. ते वातावरण एदेनच्या नंदनवनमय उद्यानात मानवी जीवन सर्वांगसुंदरतेत सुरु झाले तेव्हा नांदत होते. (प्रकटीकरण २१:५) आता वाद्ये व सुर यांच्या मिश्रणाचे केवढे मधूर संगीत कानी पडेल—ते सर्व यहोवाच्या स्तुतीसाठी गाण्यात येईल.—१ इतिहास २३:४, ५; स्तोत्रसंहिता १५०:३-६.

२२. नव्या जगातील नंदनवनात रहावयास कसे वाटेल?

२२ तारुण्याने रसरसलेले मानवी जीवन आहे आणि आदामाच्या पापामुळे मरणाप्रत निरविणाऱ्‍या क्रमाक्रमाने घडत असलेल्या गोष्टी जेथे दिसत नाहीत तेथील जीवनाचा स्वाद अनुभवणे किती मनोरम असेल! (पडताळा योहान १०:१०.) होय, या पृथ्वीत देवाची मर्जी लाभलेला प्रत्येक माणूस, पहिला मनुष्य आदाम याची निर्मिती जशी झाली होती त्याच प्रमाणात देवाचे प्रतिरुप व त्याची सदृश्‍यता प्रवर्तित करीत राहील! (उत्पत्ती १:२६, २७) तेव्हा ही पृथ्वी स्वर्गातील सराफीम, करुब व तेजस्वी देवदूतांना डोळ्यात खुपणाऱ्‍या गोष्टीप्रमाणे वाटणार नाही. जेव्हा जेव्हा ते आपली गोड मुखे नंदनवनाच्या सुंदरतेने सुशोभित असणाऱ्‍या पृथ्वीकडे वळवतील तेव्हा तिला बघून, ज्याचे स्वरुप ते नित्याने न्याहाळत असतात त्या सार्वभौम सत्ताधीश यहोवा देवाबद्दल त्यांच्या मुखातून त्याजविषयीची स्तुती व कृतज्ञता व्यक्‍त होत राहील.—मत्तय १८:१०.

आनंदी, चिरकाल भवितव्य

२३. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या बाबतीत काय होण्याची शक्यता आहे आणि यामुळे पृथ्वीवरील नंदनवनात राहणाऱ्‍यांवर काय परिणाम घडेल?

२३ यानंतर, भविष्यकाळात एके दिवशी, ही शक्यता वाटते की, पृथ्वीवरील नंदनवनात राहणाऱ्‍या कुटुंबांच्या माहितीसाठी, ज्यांनी स्वर्गीय राज्यासाठी आपले “पाचारण व निवड” दृढ धरली व ज्यामुळे त्यांचे अप्रतिम स्वर्गीय पुनरुत्थान घडले अशा सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची नावे पूर्ण रुपात जाहीर केली जातील. (२ पेत्र १:१०; स्तोत्रसंहिता ८७:५, ६) यामुळे १,४४,००० आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या येशू ख्रिस्ताच्या शिष्यांची बऱ्‍याच काळ वाटणारी अनुपस्थिती नाहीशी होईल आणि मग सर्वांनाच एकमेकांचा मनापासून आनंद वाटेल.

२४. (अ) आपल्या “पादासना”च्या बाबतीत यहोवा काय सिद्धीस नेईल? (ब) नवे जग कधीच संपुष्टात येणार नाही हे आपल्याला कसे माहीत होते, आणि कोणत्या भविष्यवादित गीताची पूर्णता होईल?

२४ सबंध विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधीश यहोवा याच्या अतूट निष्ठेत राहणाऱ्‍या सर्वांना चिरकाल आनंदाचे भवितव्य मिळेल. सोयीस्करपणे भरलेली ही नंदनवनाची पृथ्वी देवाचे पाय जणू लाक्षणिकपणे विसावण्यासाठी सुयोग्य स्थळ, “पादासन” असेल. होय, यहोवा सदासर्वकाळासाठी ‘आपल्या पायाचे आसन’ शोभायमान ठेवील आणि सर्व मानवजात ही त्याच्या अटळ अधीन राहील! (मत्तय ५:३४, ३५; प्रे. कृत्ये ७:४९) नव्या जगाला अंत नसणार, कारण “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.” (यशया ९:७) यावेळी, स्वर्गीय दिव्यदूतांनी यहुदीयाच्या बेथलहेम नगरी इ. स. पूर्वी २ मध्ये जे भविष्यवादित गीत म्हटले होते ते पूर्ण होईलः “उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”—लूक २:१३, १४.

२५. (अ) “दुसरी मेंढरे” वर्गाच्या ‘मोठ्या लोकसमुदाया’पैकी असणाऱ्‍यांना कोणती रसिकता वाटते? (ब) आमची अंतःकरणपूर्वक इच्छा काय असावी?

२५ उत्तम मेंढपाळाची “दुसरी मेंढरे” या वर्गाचे सदस्य असणाऱ्‍या ‘मोठ्या लोकसमुदायाला’ नंदनवन पुनर्स्थापित होण्याच्या अभिवचनाच्या थरारक शब्दांची मोठी रसिकता वाटते. यासाठी देवाच्या संस्थेसोबत सहवास राखणे हा आज त्यांना हक्क आहे आणि प्रभु येशू ख्रिस्ताने भाकित केलेल्या राज्याची सुवार्ता सर्व जगात अंतिम साक्षीसाठी गाजविणे हेही त्यांना मोलाचे वाटते. (मत्तय २४:१४; मार्क १३:१०) विश्‍वाचा सार्वभौम प्रभु यहोवा देव याचे सार्वकालिक गौरव व सन्मान व्हावा आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्या बादशही राजवटीखाली रहावे यासाठी आम्हा यहोवाच्या साक्षीदारांची प्रामाणिक व अंतःपूर्वक इच्छा हीच आहे की, आम्ही आपली सचोटी कलंकित न करता सर्वकाळासाठी राखून ठेवावी. “हालेलूया!”—प्रकटीकरण १९:१, ३, ४, ६, रि.स्टँ.व्ह., न्यू इन्टरनॅशनल व्हर्शन; नीतसूत्रे १०:९.

तुम्ही काय उत्तर देणार?

◻ यहोवाने त्याचे लाक्षणिक पादासन, ही पृथ्वी याविषयी कोणते अभिवचन दिले आहे?

◻ नंदनवनाची पुनर्स्थापना करण्यात कोण मदत देईल?

◻ राजा येशू ख्रिस्त कोणाची “सर्व पृथ्वीवर अधिपति” म्हणून नेमणूक करील?

◻ पुनरुत्थान करण्याची वेळ येईल तेव्हा कोणता थरारक अनुभव घडेल?

◻ जे यहोवास अतूटपणे निष्ठावंत राहतील अशांसाठी कोणते भवितव्य थांबून आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा