-
देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कराटेहळणी बुरूज—२००१ | एप्रिल १५
-
-
३. ईयोब ३८:२२, २३, २५-२९ यात लिहिल्याप्रमाणे देवाने कोणत्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारले?
३ देवाने ईयोबाला विचारले: “तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय? ती मी संकटसमयासाठी, लढाई व युद्ध यांच्या प्रसंगासाठी राखून ठेविली आहेत.” आज जगाच्या कित्येक भागांत हिमवर्षा आणि गारा पडणे या सामान्य गोष्टी आहेत. पुढे देव म्हणतो: “पर्जन्याचा लोट खाली यावा म्हणून पाट कोण फोडितो? गर्जणाऱ्या विद्युल्लतेला मार्ग कोणी करून दिला? अशासाठी की निर्जन प्रदेशात, मनुष्यहीन अरण्यात पाऊस पडावा, उजाड व वैराण प्रदेश तृप्त करावा, कोवळी हिरवळ उगवेशी करावी. पर्जन्यास कोणी पिता आहे काय? दहिवरबिंदूस कोण जन्म देतो? हिम कोणाच्या गर्भाशयातून निघते? आकाशातील हिमकणांस कोण जन्म देतो?”—ईयोब ३८:२२, २३, २५-२९.
-
-
देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कराटेहळणी बुरूज—२००१ | एप्रिल १५
-
-
७. पावसाबद्दल मनुष्याला कितपत ज्ञान आहे?
७ पावसाविषयी काय? देवाने ईयोबाला विचारले: “पर्जन्यास कोणी पिता आहे काय? दहिवरबिंदूस कोण जन्म देतो?” त्याच विज्ञान विश्वकोशात याविषयी असे म्हटले आहे: “वातावरणातील गुंतागुंतीच्या हालचाली आणि हवेतील बाष्परूपी व कणरूपी जलांशामुळे ढगांतील बाष्प निवून द्रवीभूत होण्याची क्रिया कशी घडते याविषयी एक सर्वसामान्य सिद्धान्त मांडणे जवळजवळ अशक्यच वाटते.” सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी सविस्तर सिद्धान्त मांडले आहेत पण ते पावसाच्या क्रियेसंबंधी पूर्ण स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. आणि तरीसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे की जीवनावश्यक पाऊस पडण्याचे थांबत नाही; पृथ्वीला जलपुरवठा होतच राहतो आणि यामुळे वनस्पतीजीवन व प्राणीजीवन अस्तित्वात राहते व सुखावह होते.
-