वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ११/१५ पृ. १०-१४
  • ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एक ज्वलंत वादविषय
  • सैतान हल्ला करतो!
  • अतिदुःखद प्रसंग हल्ला करतो
  • वादविषय आणखी चिघळतो
  • तीन उद्धट भोंदू
  • ईयोबाच्या विरोधकांचा हल्ला
  • आम्ही सहन करु शकतो
  • इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ११/१५ पृ. १०-१४

ईयोबाने सहन केले—आपणही करू शकतो!

“पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.”—याकोब ५:११.

१. एका वयस्कर ख्रिश्‍चनाने आपल्या परीक्षांबद्दल काय म्हटले?

‘दियाबल माझ्यामागे आहे! मला ईयोबाप्रमाणेच वाटते!’ यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात ए. एच. मॅकमिलन यांनी आपल्या जिवलग मित्राला, या शब्दात स्वतःची भावना व्यक्‍त केली. बंधू मॅकमिलन यांनी ऑगस्ट २६, १९६६ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी आपले पार्थिव जीवन संपवले. त्यांच्यासारख्या इतर अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या विश्‍वासू सेवेबद्दल मिळणारा सन्मान ‘त्यांच्याबरोबर जातो,’ याची त्यांना जाणीव होती. (प्रकटीकरण १४:१३) खरे म्हणजे, अभिषिक्‍त ख्रिस्ती स्वर्गात, अमर जीवनाच्या पुनरुत्थानानंतरही यहोवाची सेवा चालू ठेवतील. बंधू मॅकमिलन यांनी ते बक्षीस प्राप्त केल्याबद्दल त्यांच्या मित्रांना आनंद वाटला. परंतु पृथ्वीवर असताना त्यांच्या उतारवयात त्यांना, विविध परीक्षांनी घेरले होते, यामध्ये आरोग्याच्या समस्यांचा देखील समावेश होता, ज्यामुळे देवाबरोबर असलेली त्यांची सचोटी तोडण्यासाठी सैतानाच्या प्रयत्नांची जाणीव त्यांना चांगल्याप्रकारे करुन दिली.

२, ३. ईयोब कोण होता?

२ बंधू मॅकमिलन यांनी ईयोबाप्रमाणेच वाटल्याचे म्हटले तेव्हा, ते विश्‍वासाच्या मोठ्या परीक्षांना सहन केलेल्या एका पुरुषाचा उल्लेख करीत होते. ईयोब, “ऊस देशात” राहत होता, हा प्रदेश कदाचित अरेबियाच्या उत्तरेकडील असावा. तो नोहाचा पुत्र शेम याचा वंशज तसेच यहोवाचा एक उपासक होता. असे दिसते की ईयोबाच्या परीक्षा, योसेफाचा मृत्यू व मोशेने स्वतःला सात्त्विक शाबीत केले त्या काळादरम्यान झाल्या असाव्यात. त्या काळी ईश्‍वरी भक्‍ती दाखविण्यात ईयोबाच्या तोडीचा दुसरा कोणी पृथ्वीवर नव्हता. यहोवाने ईयोबाकडे, सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा या दृष्टीने पाहिले.—ईयोब १:१, ८.

३ “पूर्व देशातल्या सर्व लोकांत” थोर असल्यामुळे, ईयोबाकडे पुष्कळ नोकरचाकर होते व त्याच्या गुराढोरांची संख्या ११,५०० होती. पण त्याला आध्यात्मिक संपत्ती अधिक महत्त्वाची होती. आजच्या ईश्‍वरी पित्यांप्रमाणेच, ईयोबाने आपल्या सात मुलांना व तीन मुलींना यहोवाबद्दल शिकवले असावे. त्यांनी दुसरीकडे स्थलांतर केले होते, तरी त्यांनी कदाचित पाप केले असेल असे समजून त्याने कौटुंबिक याजक या नात्याने त्यांच्यासाठी अर्पणे वाहिली.—ईयोब १:२-५.

४. (अ) छळ झालेल्या ख्रिश्‍चनांनी ईयोब या मनुष्याचा विचार का केला पाहिजे? (ब) ईयोबासंबंधी, आपण कोणत्या प्रश्‍नांचा विचार करणार आहोत?

४ धीराने टिकून राहण्यात बळकटी मिळावी म्हणून छळ झालेल्या ख्रिश्‍चनांना ईयोबाचे उदारहण विचार करण्याजोगे आहे. शिष्य याकोबाने लिहिले, “पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो, तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा [यहोवा, NW] जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्‍यावरुन प्रभु [यहोवा] फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले आहे.” (याकोब ५:११) ईयोबाप्रमाणे, विश्‍वासाच्या परीक्षांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी येशूचे अभिषिक्‍त अनुयायी व आधुनिक दिवसातील “मोठा लोकसमुदाय” यांना धीराची गरज आहे. (प्रकटीकरण ७:१-९) यास्तव, ईयोबाने कोणत्या परीक्षा सहन केल्या? त्या का आल्या? व आपल्याला त्याच्या अनुभवांपासून कसा फायदा होऊ शकतो?

एक ज्वलंत वादविषय

५. ईयोबाला माहीत नसताना, स्वर्गात काय घडत होते?

५ ईयोबाला माहीत नसलेला एक मोठा वादविषय स्वर्गात लवकरच उद्‌भवणार होता. एके दिवशी, “देवपुत्र परमेश्‍वरापुढे [यहोवा, NW] येऊन उभे राहिले.” (ईयोब १:६) देवाचा एकुलता एक पुत्र, शब्द म्हटलेला तोही तेथे उपस्थित होता. (योहान १:१-३) त्याचप्रमाणे, धार्मिक देवदूत व आज्ञाभंजक दूत ‘देवपुत्र’ देखील होते. (उत्पत्ती ६:१-३) सैतानही तेथे होता, कारण १९१४ मध्ये राज्याची स्थापना होईपर्यंत स्वर्गातून त्याची हकालपट्टी होणार नव्हती. (प्रकटीकरण १२:१-१२) ईयोबाच्या दिवसात, सैतान एक ज्वलंत वादविषय उभा करणार होता. तो यहोवाच्या सर्व सृष्टीवर यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या न्याय्यपणाबद्दल प्रश्‍न विचारण्याच्याच बेतात होता.

६. सैतान काय करण्याचा प्रयत्न करीत होता व त्याने यहोवाची निंदा कशी केली?

६ यहोवाने विचारले, “तू आता कोठून आलास?” सैतानाने उत्तर दिले: “मी पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडून फिरुन आलो आहे.” (ईयोब १:७) तो कोणाला तरी गिळंकृत करण्याच्या शोधात होता. (१ पेत्र ५:८, ९) यहोवाची सेवा करीत असलेल्या वैयक्‍तिकांची सचोटी तोडून, प्रेमापायी देवाचे पूर्णपणे आज्ञापालन कोणीही करणार नाही, ही गोष्ट शाबीत करण्याचा प्रयत्न सैतान करणार होता. या वादविषयाला संबोधून यहोवाने सैतानाला विचारले: “माझा सेवक ईयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” (ईयोब १:८) ईयोबाने त्याच्या अपरिपूर्णतेला सवलत दिलेल्या ईश्‍वरी दर्जांची पूर्ती केली होती. (स्तोत्र १०३:१०-१४) परंतु सैतानाने उलट आरोप केला: “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्यांचे धन वृद्धि पावत आहे ना?” (ईयोब १:९, १०) यहोवाच्या स्थानामुळे व गुणांमुळे कोणी त्याच्यावर खरी प्रीती करत नाही किंवा त्याची उपासना करीत नाही तर आपली सेवा करावी म्हणून तो निर्मितीला लाच देत असतो असे ध्वनित करण्याद्वारे दियाबलाने त्याची निंदा केली. ईयोब देवाची सेवा प्रेमापोटी नव्हे, तर स्वार्थी लाभास्तव करत असल्याचा आरोप सैतानाने केला.

सैतान हल्ला करतो!

७. दियाबलाने देवाला कोणत्या मार्गाने आव्हान दिले आणि यहोवाने त्याचे प्रत्युत्तर कसे दिले?

७ ‘परंतु,’ सैतानाने म्हटले, “तू आपला हात पुढे करुन त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” देव अशा अपमान करणाऱ्‍या आव्हानाचा सामना कसा करील? यहोवाने म्हटले, “पाहा!” “त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको.” दियाबलाने म्हटले होते की, ईयोबाजवळ जे काही होते त्यात त्याला यश दिले होते, त्यात वाढ केली होती व त्याभोवती कुंपण घातले होते. ईयोबाच्या शरीराला जरी स्पर्श करावयाचा नव्हता, तरी देव त्याच्यावर त्रास येऊ देण्यास अनुमती देणार होता. वाईट करण्याच्या दृढनिश्‍चयाने सैतान तेथून निघून गेला.—ईयोब १:११, १२.

८. (अ) ईयोबाने कोणत्या भौतिक तोट्यांचा अनुभव केला? (ब) “दैवी अग्नी” याबद्दलचे सत्य काय होते?

८ लवकरच, सैतानी हल्ले सुरु झाले. ईयोबाच्या एका सेवकाने ही वाईट बातमी त्याला दिली: “बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या. तेव्हा शेबाई लोक घाला घालून त्यांस घेऊन गेले; त्यांनी तरवारीच्या धारेने गड्यांना वधिले.” (ईयोब १:१३-१५) ईयोबाच्या संपत्तीभोवतालच्या कुंपणाला काढून टाकण्यात आले. त्यानंतर लगेच दुरात्मिक सामर्थ्याने कार्य केले, कारण दुसऱ्‍या एका सेवकाने येऊन सांगितले: “दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला; त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले.” (ईयोब १:१६) देव आपल्या सेवकांवर अशी विपत्ती आणण्यास जबाबदार असल्याचे दाखवणे किती अघोरीपणाचे होते! वीज आकाशातूनच पडत असल्यामुळे यहोवावर सहजपणे दोष लावला जाऊ शकत होता; पण अग्नी दुरात्मिक उगमाकडून होता.

९. आर्थिक विध्वंसाचा परिणाम, ईयोबाचा देवाबरोबर असलेला नातेसंबंध यावर कसा झाला?

९ सैतानाचा हा हल्ला चालू होता तेवढ्यात आणखी एका सेवकाने येऊन त्याला सांगितले, की खास्द्यांनी येऊन उंटावर घाला घातला होता व त्यांनी तरवारीच्या धारेने गड्यांचा वध केला होता. (ईयोब १:१७) अशाप्रकारे ईयोबाला आर्थिक संकटांना अनुभवावे लागले, तरी या गोष्टीने देवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधाला तोडले नाही. तुम्ही देखील यहोवाबरोबर राखलेली सचोटी न तोडता, मोठी भौतिक हानी सहन करु शकता का?

अतिदुःखद प्रसंग हल्ला करतो

१०, ११. (अ) ईयोबाच्या दहा मुलांचे काय झाले? (ब) ईयोबाच्या मुलांच्या दयनीय मृत्यूनंतर, यहोवाकडे त्याने कोणत्या दृष्टीने पाहिले?

१० दियाबलाने ईयोबावर हल्ला करण्याचे थांबवले नव्हते. आणखी एका सेवकाने त्याला सांगितले: “तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत होती, तो रानाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्‍याच्या सोसाट्याने त्या घराचे चाऱ्‍ही कोपरे हादरले; त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरुन गेली; हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे.” (ईयोब १:१८, १९) माहिती नसणारा कोणीएक कदाचित असे म्हणू शकतो की, वाऱ्‍यामुळे झालेला हा नाश ‘देवाचे कृत्य’ असेल. तथापि, दुरात्मिक शक्‍तीने ईयोबाच्या कमजोर भावनांवर आघात केला.

११ दुःखग्रस्त झालेल्या ईयोबाने ‘आपला बिनबाह्‍यांचा झगा फाडला, आपले डोके मुंडले, व भूईवर पालथा पडला.’ तरीपण त्याचे शब्द ऐका. “परमेश्‍वराने [यहोवा, NW] दिले आणि परमेश्‍वराने [यहोवा] नेले; धन्य परमेश्‍वराचे [यहोवा] नाम!” हा अहवाल पुढे सांगतो: “ह्‍या सर्व प्रसंगात ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.” (ईयोब १:२०-२२) पुन्हा एकदा सैतानाचा पराजय झाला. देवाचे सेवक या नात्याने जर आपल्याला मृत्युमुळे झालेली हानी व दुःख अनुभवावे लागले तर काय? ईयोबाप्रमाणेच, आपण करत असलेली यहोवाची निःस्वार्थ भक्‍ती व त्याच्यावरील भरवसा, सचोटी रक्षक म्हणून सहन करण्यास आपणाला मदत करु शकतो. अभिषिक्‍त जन व पार्थिव आशा असलेले त्यांचे सहकारी ईयोबाच्या सहनशक्‍तीच्या अहवालापासून नक्कीच सांत्वन व सामर्थ्य मिळवू शकतात.

वादविषय आणखी चिघळतो

१२, १३. स्वर्गातील दुसऱ्‍या सभेत, सैतानाने कशाची मागणी केली व त्याला देवाने कसा प्रतिसाद दिला?

१२ यहोवाने लगेच स्वर्गीय न्यायालयात आणखी एक सभा बोलावली. ईयोब निपुत्रिक झाला होता, देवाने त्याला शक्‍तीहीन व पीडित केल्यासारखे वाटत होते, पण त्याची सचोटी शाबूत होती. अर्थातच, देवाविरुद्ध व ईयोबाविरुद्ध केलेले आरोप खोटे असल्याचे सैतान मान्य करणार नव्हता. आता, यहोवाने या वादविषयाचा निर्णायक मुकाबला करण्यासाठी दियाबलाला चतुराईने हाताळले तेव्हा ‘देवपुत्र’ हा वाद व त्याचे प्रत्युत्तर ऐकण्याच्या बेतात होते.

१३ सैतानाला जाब विचारुन, यहोवाने म्हटले: “तू कोठून आलास?” याचे उत्तर काय होते? “पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडून फिरुन आलो आहे.” यहोवाने पुन्हा एकदा आपली सचोटी दृढ धरुन राहिलेल्या त्याच्या ईयोब या सेवकाच्या सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणाऱ्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. दियाबलाने प्रत्युत्तर दिले: “त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करुन त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” यास्तव देवाने म्हटले: “पाहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानि मात्र करु नको!” (ईयोब २:२-६) यहोवाने अजूनही सर्व संरक्षक कुंपणाला काढून टाकले नाही असे दर्शवत सैतानाने ईयोबाच्या हाडामांसास हात लावण्याविषयी मागणी केली. ईयोबास मारुन टाकण्याची अनुमती दियाबलास दिली जाणार नाही; परंतु सैतानाला हे माहीत होते, की शारीरिक आजारामुळे त्याला यातना होतील व गुप्त अपराधांची शिक्षा तो देवाकडून भोगत असल्याचे भासवले जाईल.

१४. सैतानाने ईयोबावर कशाने प्रहार केला आणि त्रास सहन करीत असलेल्याची सुटका कोणीही मानव का करु शकत नाही?

१४ सभेतून घालवून दिल्यावर, सैतान अघोरी आनंदाने पुढे सरसावला. त्याने ईयोबाला “मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत अतिशय पीडिले.” ईयोब राखेत जाऊन बसला व एका खापरीने अंग खाजविताना किती विपन्‍नावस्था त्याने सहन केली! (ईयोब २:७, ८) या अत्यंत दुःखदायक, किळसवाण्या व मानखंडणा करणाऱ्‍या पीडेतून कोणीही मानवी वैद्य त्याची सुटका करु शकत नव्हता कारण त्या सैतानाच्या शक्‍तीने आणल्या होत्या. केवळ यहोवाच ईयोबाला बरे करु शकत होता. तुम्ही देवाचे आजारी सेवक असल्यास देव तुम्हाला सहन करण्यास मदत करु शकतो व आजार नसलेल्या नव्या जगात जीवन देऊ शकतो हे कधीही विसरु नका.—स्तोत्र ४१:१-३; यशया ३३:२४.

१५. ईयोबाच्या पत्नीने त्याला काय करण्याचे आर्जवले व त्याची प्रतिक्रिया काय होती?

१५ शेवटी, ईयोबाच्या पत्नीने म्हटले: “तुम्ही अजून सत्व धरुन राहिला आहां काय? देवाचे नाव सोडून द्या [शाप देऊन] आणि मरुन जा.” “सत्व” याचा अर्थ, निष्कलंक भक्‍ती असा होतो. ईयोबाने देवाला शाप द्यावा म्हणून ती झोंबणाऱ्‍या पद्धतीने बोलली असावी. परंतु त्याने उत्तर दिले: “तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे, आणि दुःख घेऊ नये काय?” सैतानाची ही युक्‍ती देखील चालली नाही, कारण आपल्याला सांगितले आहे: “ह्‍या सर्व प्रसंगी ईयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही.” (ईयोब २:९, १०) समजा, विरोध करणाऱ्‍या कौटुंबिक सदस्यांनी, आपण ख्रिस्ती कार्यात स्वतःला मूर्खपणे दमवून टाकत आहोत व यहोवाला सोडून देण्याविषयी गळ घातली असेल. ईयोबाप्रमाणे, आपणही अशा परीक्षा सहन करु शकतो कारण आपण यहोवावर प्रीती करतो व त्याच्या पवित्र नावाची स्तुती करण्याची आमची इच्छा आहे.—स्तोत्र १४५:१, २; इब्रीयांस १३:१५.

तीन उद्धट भोंदू

१६. ईयोबाचे सांत्वन करण्याच्या उद्देशास्तव कोण आले व सैतानाने त्यांचा कुशलतेने वापर कसा केला?

१६ आता सैतानाची आणखी एक योजना दिसून आली. ईयोबाचे तिघे “मित्र” आहेत, असा दावा करुन त्याला सांत्वन देण्यासाठी आले. एक अलीफज होता, तो कदाचित एसावाकडून आलेला अब्राहामाचा वंशज असावा. अलीफज बोलण्यासाठी पुढाकार घेत असल्यामुळे तो कदाचित वयस्कर असावा. तसेच अब्राहामाला कटूरा हिच्याकडून झालेला पुत्र, शुह याच्या वंशजातून आलेला बिल्दद देखील तेथे हजर होता. तिसरा मनुष्य त्याचे कुटुंब किंवा कदाचित वायव्य अरेबियात राहण्याची जागा ओळखता यावी म्हणून नामाथी म्हटलेला, सोफर होता. (ईयोब २:११; उत्पत्ती २५:१, २; ३६:४, ११) आज यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या देवाचा त्याग करावा म्हणून प्रयत्न करणाऱ्‍यांप्रमाणे, सैतानाने खोट्या आरोपाबद्दल ईयोब दोषी असल्याचे कबूल करावे व त्याने आपली सचोटी तोडावी यासाठी कुशलतेने या त्रिकूटाचा वापर केला होता.

१७. भेट देणाऱ्‍या त्रिकूटांने काय केले व त्यांनी सात दिवस व सात रात्री काय केले नाही?

१७ या त्रिकूटाने मोठ्याने रडून, आपले झगे फाडून व डोक्यावर धूळ उडवून सहानुभूतीचे मोठे प्रदर्शन केले. पण त्यानंतर सांत्वनाचा एकही शब्द न बोलता ते सात दिवस व सात रात्री ईयोबाबरोबर बसले! (ईयोब २:१२, १३; लूक १८:१०-१४) या तीन उद्धट भोंदूंमध्ये आध्यात्मिकतेचा इतका अभाव होता, की यहोवा व त्याच्या अभिवचनांविषयी सांत्वनदायक बोलण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नव्हते. तरीही, ते चुकीचे निष्कर्ष काढत होते व त्यांचा वापर सार्वजनिक दुःखवट्याचा शिष्टाचार पूर्ण झाल्यावर लगेच ईयोबाविरुद्ध करण्यास तयार झाले. परंतु सात दिवसाचे मौन संपण्यापूर्वीच, ऐकू येऊ शकेल अशा ठिकाणी एक तरुण मनुष्य, अलीहू येऊन बसला.

१८. मृत्युमुळे शांती मिळेल असा ईयोबाने विचार का केला?

१८ सरतेशेवटी, ईयोबाने मौन तोडले. भेट देणाऱ्‍या या त्रिकूटाकडून कसलेही सांत्वन न मिळाल्याने, त्याने आपल्या जन्मदिवसाला शाप दिला व त्याचे दुःखदायक जीवन का लांबत चालले होते याचे नवल केले. त्याला मृत्युमुळे शांती मिळेल असे वाटले व मरणापूर्वी त्याला खरा आनंद मिळेल याची त्याने कल्पना देखील केली नाही, कारण आता तो, कंगाल, मृत्युमुळे हानी झालेला, व गंभीर आजारी पडला होता. पण देव, ईयोबाला मरणापर्यंत इजा होऊ देणार नव्हता.—ईयोब ३:१-२६.

ईयोबाच्या विरोधकांचा हल्ला

१९. अलीफजने ईयोबावर कोणत्या बाबतीत खोटा आरोप केला?

१९ ईयोबाच्या सचोटीची आणखी परीक्षा घेण्याच्या वादविवादाच्या तिन्ही फेऱ्‍यांत अलीफज नेहमी प्रथम बोलला. पहिल्या भाष्यात, अलीफजने विचारले: “धार्मिक कधी विलयास गेले आहेत काय?” ईयोबाने काहीतरी वाईट केले असावे व त्यामुळेच देवाकडून त्याला शिक्षा मिळाली आहे असा त्याने निष्कर्ष काढला. (ईयोब, अध्याय ४, ५) दुसऱ्‍या फेरीत अलीफजने ईयोबाच्या सुज्ञतेची थट्टा केली व विचारले: “आम्हाला कळत नाही असे तुला काय ठाऊक आहे?” ईयोब स्वतःला सर्वशक्‍तीमानापेक्षा श्रेष्ठ समजत आहे असे अलीफजने सूचित केले. आपल्या दुसऱ्‍या हल्ल्याच्या समाप्तीस त्याने ईयोब धर्मत्याग, लाच, फसवणूक यांचा दोषी असल्याबद्दलचे शब्दचित्र रेखाटले. (ईयोब, अध्याय १५) आपल्या समारोपाच्या भाष्यात अलीफजने ईयोबावर पिळवणूक, गरजूंना अन्‍नपाणी न देणे व विधवा आणि पोरक्यांवर जुलूम करणे, असे अनेक आरोप लावले.—ईयोब, अध्याय २२.

२०. ईयोबावर बिल्ददच्या हल्ल्याचे स्वरुप काय होते?

२० वादाच्या प्रत्येक तीन फेऱ्‍यात, अलीफजने मांडलेल्या सामान्य विषयालाच पुढे घेऊन बोलण्यात दुसरा असलेला बिल्दद याने सुरवात केली. बिल्ददचे बोलणे कमी पण अधिक झोंबणारे होते. ईयोबाच्या मुलांनी काही तरी वाईट केले व यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असाही त्याने त्याच्यावर आरोप लावला. खोट्या तर्काने त्याने या दाखल्याचा वापर केला: लव्हाळा व बोरु जसे पाण्यावाचून सुकून मरुन जातात, त्याचप्रमाणे, “देवास विसरुन जाणाऱ्‍यांची” गती होते. हे विधान खरे आहे पण ते ईयोबाला लागू होत नव्हते. (ईयोब, अध्याय ८) बिल्ददने ईयोबाच्या पीडांचे वर्गीकरण दुष्टांवर येणाऱ्‍या पीडांसारखे केले. (ईयोब, अध्याय १८) आपल्या तिसऱ्‍या भाष्यात बिल्ददने असा दावा मांडला, की मानव “कीटक” व “कृमि” असल्यामुळे देवासमोर अशुद्ध आहेत.—ईयोब, अध्याय २५.

२१. सोफरने ईयोबावर कशाचा आरोप लावला?

२१ वादात तिसरा बोलणारा सोफर होता. सामान्यपणे यानेही अलीफज व बिल्ददप्रमाणेच वादविवाद केला. सोफरने ईयोबावर दुष्टतेचा आरोप लावला व पापी मार्गांपासून दूर होण्याचे आर्जवले. (ईयोब, अध्याय ११, २०) दोन फेऱ्‍यांनंतर सोफरने बोलण्याचे थांबवले. तिसऱ्‍या फेरीत सांगण्यासाठी त्याच्याकडे काहीही नव्हते. तथापि, या सर्व वादविषयाच्या दरम्यान ईयोबाने आपल्यावर आरोप करणाऱ्‍यांना धैर्याने उत्तर दिले. उदाहरणार्थ, एके प्रसंगी त्याने म्हटले: “तुम्ही सर्व भिकार सांत्वनकर्ते आहा! असल्या वायफळ शब्दांचा कधी शेवट होईल?”—ईयोब १६:२, ३.

आम्ही सहन करु शकतो

२२, २३. (अ) ईयोबाच्या बाबतीत घडले त्याप्रमाणे, यहोवा देवासोबत असलेली आपली सचोटी तोडण्याचा प्रयत्न दियाबल कशा रीतीने करू शकतो? (ब) ईयोब विविध परीक्षा सहन करीत होता, तरी त्याच्या मनोवृत्तीबद्दल आपण स्वतःला काय विचारु शकतो?

२२ ईयोबाप्रमाणे, आपल्याला देखील एकापेक्षा अनेक परीक्षांचा सामना करावा लागेल तसेच आमची सचोटी तोडण्यासाठी सैतान त्याच्या प्रयत्नांमध्ये नैराश्‍य किंवा इतर गोष्टींचा वापर करु शकतो. आपल्याला आर्थिक समस्या असल्या तर यहोवाच्या विरूद्ध उभे राहण्याचा तो प्रयत्न करू शकतो. प्रियजनांचा मृत्यू होतो तेव्हा किंवा आपण आजारी पडतो तेव्हा, देवाला दोष देण्यास सैतान आपल्याला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करु शकतो. ईयोबाच्या सहकाऱ्‍यांप्रमाणे, आपल्यावर कोणीतरी खोटा आरोपही लावू शकतो. बंधू मॅकमिलन यांनी सांगितल्याप्रमाणे, सैतान ‘आपल्या मागे असेल,’ तरीही आपण सहन करु शकतो.

२३ आतापर्यंत आपण पाहिले, की ईयोब त्याच्या परीक्षा सहन करीत होता. तथापि, तो केवळ सहनच करीत होता का? त्याच्याकडे खरोखर भग्न आत्मा होता का? ईयोबाने खरोखर सर्व आशा सोडून दिल्या का, याविषयी आता आपण पाहूया.

तुम्ही प्रतिसाद कसा देणार?

▫ ईयोबाच्या दिवसात सैतानाने कोणता मोठा वादविषय उपस्थित केला?

▫ ईयोबाची परीक्षा कोणत्या माध्यमाने पूर्णपणे घेतली गेली?

▫ ईयोबाच्या तीन “मित्रांनी” कोणत्या गोष्टींबद्दल त्याच्यावर आरोप लावला?

▫ ईयोबाच्या बाबतीत घडले त्याप्रमाणे, यहोवा देवासोबत असलेली आपली सचोटी तोडण्याचा प्रयत्न सैतान कसा करु शकतो?

[१० पानांवरील चित्रं]

ए. एच. मॅकमिलन

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा