वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ५/१५ पृ. १०-१५
  • प्रेषितांच्या काळात प्रकाशाचे चकाकणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रेषितांच्या काळात प्रकाशाचे चकाकणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्यांच्या प्रचाराच्या कामगिरीसंबंधी प्रकाश
  • सुंता नाही
  • शुभवर्तमानांमध्ये प्रकाश
  • पौलाच्या पत्रांमध्ये प्रकाशाचे चकाकणे
  • प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग दोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • प्रकाशाचे चकाकणे—प्रखर आणि सौम्य भाग एक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • जगाच्या प्रकाशाला अनुसरा
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • ज्योती वाहक—कोणत्या उद्देशास्तव?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ५/१५ पृ. १०-१५

प्रेषितांच्या काळात प्रकाशाचे चकाकणे

“नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरिला आहे.”—स्तोत्र ९७:११.

१. यहोवाचे साक्षीदार आज आरंभीच्या ख्रिश्‍चनांशी कसे जुळतात?

आपण, खरे ख्रिस्ती या नात्याने, स्तोत्र ९७:११ च्या शब्दांची किती गुणग्राहकता बाळगतो! आपल्यासाठी वारंवार ‘प्रकाश चकाकला आहे.’ खरे म्हणजे, आपल्यापैकी काहींनी दशकांपासून यहोवाची चकाकणारी रोशनाई पाहिली आहे. या सर्व गोष्टी आपल्याला नीतीसूत्रे ४:१८ ची आठवण करून देतात, जे म्हणते: “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासारखा आहे.” सांप्रदायापेक्षा शास्त्रवचनांबद्दल गुणग्राहकता दाखवणारे आपण यहोवाचे साक्षीदार आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे आहोत. त्यांची मनोवृत्ती, ईश्‍वरी प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या व त्यामधील पत्रांच्या ऐतिहासिक पुस्तकांवरून स्पष्टरित्या दिसून येऊ शकते.

२. येशूच्या अनुयायांना मिळालेल्या प्रथम प्रकाशाच्या चकाकण्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या?

२ येशू ख्रिस्ताच्या प्रारंभीच्या अनुयायांना प्रथम प्राप्त झालेले प्रकाशाचे चकाकणे मशीहाविषयी होते. आंद्रियाने आपला भाऊ शिमोन पेत्र याला म्हटले: “मशीहा . . . आम्हाला सापडला आहे.” (योहान १:४१) काही काळानंतर, प्रेषित पेत्राने येशू ख्रिस्ताला, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा,” असे म्हटले तेव्हा, या गोष्टीला पुष्टी देण्यास स्वर्गातील पित्याने त्यास समर्थ केले.—मत्तय १६:१६, १७; योहान ६:६८, ६९.

त्यांच्या प्रचाराच्या कामगिरीसंबंधी प्रकाश

३, ४. येशूच्या पुनरुत्थानानंतर, आपल्या अनुयायांना त्यांच्या भवितव्यातील कार्यहालचालींविषयी त्याने कोणता प्रज्वलितपणा दिला?

३ येशू ख्रिस्ताने त्याच्या पुनरुत्थानानंतर, त्याच्या सर्व अनुयायांच्या कर्तव्यावर प्रकाश पाडला. बहुधा, गालीलात एकत्रित झालेल्या त्याच्या ५०० शिष्यांना तो असे म्हणाला: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०; १ करिंथकर १५:६) तेव्हापासून ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांना प्रचारक व्हावयाचे होते, आणि त्यांच्या प्रचाराची कामगिरी ‘इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांपुरतीच’ सीमित नव्हती. (मत्तय १०:६) त्याशिवाय, योहानाचा बाप्तिस्मा त्यांना पापांची क्षमा होण्यासाठी पश्‍चात्तापाचे प्रतीक म्हणून देखील घ्यावयाचा नव्हता. त्याउलट, त्यांनी लोकांना “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा द्यावयाचा होता.

४ येशूचे स्वर्गारोहण होण्याच्या काही काळाआधीच, त्याच्या ११ विश्‍वासू प्रेषितांनी विचारले: “प्रभुजी, ह्‍याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” त्या प्रश्‍नाचे उत्तर देण्याऐवजी, येशूने त्यांना त्यांच्या प्रचाराच्या कामगिरीबद्दल अधिक सूचना दिल्या, तो म्हणाला: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” तोपर्यंत ते केवळ यहोवाचेच साक्षी होते, परंतु आता ते ख्रिस्ताचे देखील साक्षी होणार होते.—प्रेषितांची कृत्ये १:६-८.

५, ६. येशूच्या अनुयायांना पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रकाशाचे कोणते चकाकणे प्राप्त झाले?

५ दहा दिवसांनंतरच, येशूच्या अनुयायांना किती तेजस्वी प्रकाश प्राप्त झाला! सा. यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या दिवशी, प्रथमच त्यांना योएल २:२८, २९ ची समज प्राप्त झाली: “मी [यहोवा] मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. तुमचे दास व दासी यावरहि त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.” येशूच्या शिष्यांनी जेरूसलेममध्ये एकत्रित झालेल्या सर्वांच्या—सुमारे १२० पुरुष आणि स्त्रियांच्या डोक्यावर—अग्नीच्या जिभांच्या रुपात पवित्र आत्मा बसलेला पाहिला.—प्रेषितांची कृत्ये १:१२-१५; २:१-४.

६ तसेच पेन्टेकॉस्टच्या दिवशी, स्तोत्र १६:१० चे शब्द पुनरुत्थित येशू ख्रिस्ताला लागू होतात असे त्याच्या शिष्यांना प्रथम समजले. स्तोत्रकर्त्याने म्हटले होते: “तू [यहोवा देव] माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्‍तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.” ते शब्द राजा दाविदाला लागू होऊ शकत नाहीत हे शिष्यांनी ओळखले कारण त्यांच्या दिवसापर्यंत त्याची कबर अस्तित्वात होती. यात काहीच आश्‍चर्य नाही की, सुमारे ३,००० जणांनी या नवीन प्रकाशाचे स्पष्टीकरण दिलेले ऐकल्यावर त्यांची इतकी खात्री पटली की, त्यांनी त्याच दिवशी बाप्तिस्मा घेतला!—प्रेषितांची कृत्ये २:१४-४१.

७. रोमी सेना अधिकारी कर्नेल्य याला भेट देत असताना प्रेषित पेत्राला कोणता तेजस्वी प्रकाश प्राप्त झाला?

७ पुष्कळ शतकांपासून, देवाने इस्राएलांबद्दल जे म्हटले होते त्याची गुणग्राहकता त्यांनी बाळगली: “भूतलावरील सर्व कुळात केवळ तुमच्याबरोबरच मी परिचय केला.” (आमोस ३:२) यास्तव, सुंता न झालेल्या परराष्ट्रीय विश्‍वासू लोकांवर पहिल्याच वेळी पवित्र आत्मा उतरला तेव्हा, कर्नेल्य या रोमी सेना अधिकाऱ्‍याच्या घरी प्रेषित पेत्र व त्यासोबत गेलेल्या लोकांवर खरोखरच तेजस्वी प्रकाश पडला. केवळ याच वेळी, पवित्र आत्मा बाप्तिस्म्याच्या आधी देण्यात आला ही गोष्ट लक्षणीय आहे. परंतु ते असेच असावयास हवे होते. नाहीतर, हे बेसुंती परराष्ट्रीय बाप्तिस्म्यासाठी पात्र होते हे पेत्राला कळाले नसते. या घटनेचे महत्त्व पूर्णपणे समजून, पेत्राने विचारले: “आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना [विदेशी] मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये म्हणून कोणाच्याने पाण्याची मनाई करवेल?” अर्थात, उपस्थित असलेल्यांपैकी कोणीही थेट आक्षेप घेऊ शकला नाही. यास्तव, या परराष्ट्रीयांचा बाप्तिस्मा झाला.—प्रेषितांची कृत्ये १०:४४-४८; पडताळा प्रेषितांची कृत्ये ८:१४-१७.

सुंता नाही

८. काही आरंभीच्या ख्रिश्‍चनांना सुंता करण्याचे सोडून देणे इतके कठीण का वाटले?

८ सुंतेच्या प्रश्‍नाशी संबंधीत आणखी सत्याचा लख्ख प्रकाश चकाकला. सुंता करण्याची रीत, यहोवाने अब्राहामाशी केलेल्या करारासोबत सा. यु. पू. १९१९ मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी देवाने अब्राहामाला आज्ञापिले की, त्याने व त्याच्या घराण्यातील इतर सर्व पुरुषांनी सुंता करावयाची होती. (उत्पत्ती १७:९-१४, २३-२७) अशाप्रकारे सुंता ही, अब्राहामाच्या वंशजांचे एक ओळख चिन्ह ठरले. तसेच त्यांना या रीतीचा किती अभिमान वाटत होता! परिणामतः “बेसुंती” ही तिरस्काराची अभिव्यक्‍ती बनली. (यशया ५२:१; १ शमुवेल १७:२६, २७) काही विशिष्ट प्रारंभिक यहुदी ख्रिश्‍चनांना हे प्रतीक का ठेवायचे होते हे पाहणे सोपे आहे. काहींनी, याविषयावर पौल व बर्णबा यांच्याशी बरीच चर्चा केली. ते सोडवण्यासाठी, पौल व इतरजण ख्रिस्ती नियमन मंडळाशी या संबंधी चर्चा करावयास जेरूसलेमला गेले.—प्रेषितांची कृत्ये १५:१, २.

९. प्रेषितांची कृत्ये अध्याय १५ मध्ये नोंदल्याप्रमाणे प्रारंभिक नियमन मंडळाला प्रकाशाचे कोणते चकाकणे प्रकट करण्यात आले?

९ या वेळी, यहोवाच्या सेवकांना आता सुंतेची गरज नाही याविषयी आरंभीच्या ख्रिश्‍चनांना जो प्रकाश मिळाला तो एखाद्या स्पष्ट चमत्काराद्वारे मिळाला नव्हता. त्याउलट, त्यांना हा वाढता प्रकाश, शास्त्रवचनांमध्ये शोधल्याने, मार्गदर्शनासाठी पवित्र आत्म्यावर विसंबून राहिल्याने आणि बेसुंती परराष्ट्रीयांच्या मतांतराविषयी पेत्र व पौल यांचे अनुभव ऐकल्याने मिळाला होता. (प्रेषितांची कृत्ये १५:६-२१) त्याचा निर्णय एका पत्रात नंतर पाठवण्यात आला, त्याचा काही भाग असा होता: “पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले; त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्‍त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी.” (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) अशाप्रकारे, आरंभीच्या ख्रिश्‍चनांना सुंता करण्याच्या आज्ञेपासून तसेच मोशेच्या नियमशास्त्राच्या इतर गरजांपासून मुक्‍त करण्यात आले. यास्तव, पौल गलती येथील ख्रिश्‍चनांना सांगू शकला: “ह्‍या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्‍त केले आहे.”—गलतीकर ५:१.

शुभवर्तमानांमध्ये प्रकाश

१०. मत्तयाच्या शुभवर्तमानात प्रकट केलेले प्रकाशाचे काही चकाकणे कोणते होते?

१० सा. यु. ४१ च्या सुमारास लिहिलेल्या मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये त्याच्या वाचकांच्या लाभास्तव प्रकाशाचे पुष्कळ चकाकणे आहे यात काही शंका नाही. पहिल्या शतकातील तुलनात्मकरित्या अल्प ख्रिश्‍चनांनी व्यक्‍तिशः येशूला त्याच्या शिकवणींचे स्पष्टीकरण देत असताना ऐकले. विशेषतः, मत्तयाच्या शुभवर्तमानाने यावर जोर दिला की, येशूच्या प्रचाराचे शीर्षक देवाचे राज्य होते. तसेच योग्य हेतू बाळगण्याच्या महत्त्वावर येशूने किती तीव्रतेने जोर दिला! त्याच्या डोंगरावरील प्रवचनात, त्याच्या दाखल्यांमध्ये (अध्याय १३ मध्ये दिल्याप्रमाणे) आणि अध्याय २४ व २५ मधील त्याच्या मोठ्या भविष्यवाणीत प्रकाशाचे किती चकाकणे होते! केवळ सा. यु. ३३ पेन्टेकॉस्टनंतर आठ वर्षांतच लिहिलेल्या मत्तयाच्या शुभवर्तमानात या सर्व गोष्टी आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या लक्षात आणून दिल्या.

११. लूक आणि मार्क शुभवर्तमानांमधील गोष्टींविषयी काय म्हटले जाऊ शकते?

११ सुमारे १५ वर्षांनंतर, लूकने आपले शुभवर्तमान लिहिले. पुष्कळ गोष्टी मत्तयाच्या अहवालासारख्याच असल्या, तरीही त्यात ५९ टक्के भर घातली आहे. लूकने येशूच्या सहा चमत्कारांची नोंद केली आणि इतर शुभवर्तमानांच्या लेखकांनी नोंदवले नाहीत असे त्याचे दोन पटीने अधिक दाखले त्याने नोंदवले. स्पष्टतः, काही वर्षांनंतरच, मार्कने त्याचे शुभवर्तमान लिहिले व येशू ख्रिस्तावर कर्तृत्वशील व चमत्कार करणारा या नात्याने जोर दिला. मार्कने बहुधा मत्तय व लूकने नोंदलेल्या घटना सांगितल्या तरी त्यांनी नोंदवला नाही असा एक दाखला त्याने नोंदवला. त्या दाखल्यात, येशूने देवाच्या राज्याची तुलना एका बीजाशी केली ज्याला अंकुर फुटतो, वाढतो आणि कालांतराने फळ येते.a—मार्क ४:२६-२९.

१२. योहानाच्या शुभवर्तमानाने कितपत रोशनाई पुरवली?

१२ त्यानंतर, योहानाचे शुभवर्तमान होते, मार्कने त्याचा अहवाल लिहिण्याच्या ३० पेक्षा अधिक वर्षांनंतर ते लिहिण्यात आले. योहानाने येशूच्या सेवेवर, विशेषतः त्याच्या मानव पूर्व अस्तित्वाच्या पुष्कळ संदर्भांकरवी प्रकाशाचा केवढा किरण पाडला! केवळ योहानच लाजारच्या पुनरुत्थानाचा अहवाल पुरवतो, तसेच येशूने त्याच्या विश्‍वासू प्रेषितांना दिलेले पुष्कळ उत्तम शेरे त्याचप्रमाणे अध्याय १३ ते १७ मध्ये त्याचा विश्‍वासघात झालेल्या रात्री त्याने म्हटलेली हृदयद्रावक प्रार्थना यांचा अहवालही केवळ तोच देतो. वास्तविकतेत असे म्हटले जाते की, योहानाच्या शुभवर्तमानाचा ९२ टक्के भाग अद्वितीय आहे.

पौलाच्या पत्रांमध्ये प्रकाशाचे चकाकणे

१३. रोमी लोकांना पौलाने लिहिलेले पत्र जणू शुभवर्तमानच होते असे काहींनी का लेखले?

१३ विशेषतः प्रेषितांच्या काळातील ख्रिश्‍चनांना सत्याचे चकाकणे देण्यात पौलाचा उपयोग करण्यात आला. उदाहरणार्थ, सुमारे सा. यु. ५६ मध्ये पौलाने रोमी लोकांना पत्र लिहिले—अंदाजे याच काळात लूकने त्याचे शुभवर्तमान लिहिले. त्याच्या पत्रामध्ये पौल या वस्तुस्थितीला ठळकपणे मांडतो की, देवाच्या अपात्री कृपेमुळे आणि येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्याने नीतिमत्ता ठरवण्यात येते. सुवार्तेच्या या पैलूवर पौलाने दिलेल्या जोरामुळे त्याने रोमकरांस लिहिलेले हे पत्र पाचवे शुभवर्तमानच असावे असा पुष्कळांचा दृष्टिकोन झाला.

१४-१६. (अ) करिंथमधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौलाने एकतेच्या आवश्‍यकतेवर कोणता प्रकाश पाडला? (ब) करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये वर्तनाविषयी कोणता अधिक प्रकाश आहे?

१४ करिंथमधील ख्रिश्‍चनांना त्रास देणाऱ्‍या विशिष्ट बाबींविषयी पौलाने लिहिले. करिंथकरांस लिहिलेल्या त्याच्या पत्रात अधिक प्रेरित सल्ला आहे आणि त्याचा आजपर्यंत ख्रिश्‍चनांना लाभ झाला आहे. प्रथम, करिंथकर काही विशिष्ट व्यक्‍तींवर केंद्रित असणारी व्यक्‍तीपूजा करण्यात चूक करत होते याबद्दलचे स्पष्टीकरण त्याला द्यावे लागले. प्रेषिताने त्यांची धारणा सुधारली व धैर्याने त्यांना म्हटले: “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या नावाने मी तुम्हास विनंती करितो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.”—१ करिंथकर १:१०-१५.

१५ घोर अनैतिकतेला करिंथमधील ख्रिस्ती मंडळीत सहन केले जात होते. तेथील एका पुरुषाने आपल्या बापाची बायको ठेवली होती, अशाप्रकारे तो ‘असले जारकर्म करत होता की जे परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नव्हते.’ पौलाने स्पष्टपणे लिहिले: “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” (१ करिंथकर ५:१, ११-१३) बहिष्कृत करणे, ख्रिस्ती मंडळीकरता नवीन गोष्ट होती. करिंथकरांच्या मंडळीला आणखी एका गोष्टीची समज द्यावयाची होती आणि ती म्हणजे तिच्यातील काही सदस्य भांडणे सोडवण्यासाठी त्यांच्या आध्यात्मिक बांधवांना जगीक न्यायालयांमध्ये नेत होते. असे केल्याबद्दल पौलाने त्यांना जोरदारपणे खडसावले.—१ करिंथकर ६:५-८.

१६ करिंथमधील मंडळीत आणखी एक चिंतेची गोष्ट म्हणजे लैंगिक संबंधांविषयी होती. लैंगिक अनैतिकता प्रचलित असल्यामुळे प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असणे आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असणे उत्तम असेल असे १ करिंथकर अध्याय ७ मध्ये पौलाने दाखवून दिले. पौलाने हे देखील दाखवले की, सडे असलेल्या व्यक्‍ती यहोवाची सेवा जास्त विचलित न होता करू शकतात; तरीही सर्वांनाच सडेपणाचे दान मिळालेले नव्हते. तसेच, एखाद्या स्त्रीचा पती मेला तर ती “केवळ प्रभूमध्ये” परत विवाह करावयास मुक्‍त होईल.—१ करिंथकर ७:३९.

१७. पुनरुत्थानाच्या शिकवणीवर पौलाने कोणता प्रकाश पाडला?

१७ पुनरुत्थानावर केवढा प्रकाश चकाकविण्यास प्रभूने पौलाचा उपयोग केला! अभिषिक्‍त ख्रिस्ती कोणत्या प्रकारच्या शरीरासह उठवले जातील? “प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते,” असे पौलाने लिहिले. कोणतीही रक्‍तमांसाची शरीरे स्वर्गात घेतली जाणार नाहीत कारण “मांस व रक्‍त ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही.” पौलाने पुढे म्हटले की, सर्व अभिषिक्‍त जण मरणार नाहीत, परंतु येशूच्या उपस्थितीच्या दरम्यान काहींना मेल्यावर तत्काळ अमर जीवनात उठविले जाईल.—१ करिंथकर १५:४३-५३.

१८. थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पौलाच्या पहिल्या पत्रात भवितव्याविषयीचा कोणता प्रकाश समाविष्ट होता?

१८ थेस्सलनीकामधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात पौलाचा भवितव्यावर प्रकाश टाकण्यासाठी उपयोग करण्यात आला. यहोवाचा दिवस रात्री येणाऱ्‍या चोरासमान होता. पौलाने असे देखील स्पष्टीकरण दिले: “शांति आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो; आणि ते निभावणारच नाहीत.”—१ थेस्सलनीकाकर ५:२, ३.

१९, २०. इब्रीयांना पौलाने लिहिलेल्या पत्रात जेरूसलेम तसेच यहुदामधील ख्रिश्‍चनांना प्रकाशाचे कोणते चकाकणे प्राप्त झाले?

१९ इब्रीयांना त्याचे पत्र लिहून, पौलाने जेरूसलेम आणि यहुदीयामधील आरंभीच्या ख्रिश्‍चनांना हा प्रकाश दिला. मोशेच्या उपासनेच्या व्यवस्थेपेक्षा ख्रिस्ती उपासनेची व्यवस्था श्रेष्ठ असल्याचे त्याने केवढ्या जोरदारपणे दाखवून दिले! देवदूतांद्वारे पाठवलेल्या नियमशास्त्राचे पालन करण्याऐवजी, जो अशा देवदूतीय संदेश वाहकांपेक्षा अतिशय श्रेष्ठ आहे त्या देवाच्या पुत्राने प्रथम सांगितलेल्या तारणावर ख्रिश्‍चनांचा विश्‍वास आहे. (इब्रीयांस २:२-४) मोशे देवाच्या घरातील केवळ एक सेवक होता. तथापि, येशू ख्रिस्त त्या सबंध घराची देखरेख करतो. मलकीसदेकच्या क्रमानंतर ख्रिस्त महायाजक आहे, त्याचे स्थान अहरोनच्या याजकपदापेक्षाही फार श्रेष्ठ आहे. इस्राएल लोक, विश्‍वास आणि आज्ञेच्या अभावामुळे देवाच्या सान्‍निध्यात येऊ शकले नाहीत परंतु ख्रिस्ती त्यांच्या विश्‍वासूपणामुळे व आज्ञाधारकतेमुळे त्याच्या सान्‍निध्यात येतात हे देखील पौलाने दाखवून दिले.—इब्रीयांस ३:१–४:११.

२० त्यानंतर, नवा करारसुद्धा नियमशास्त्राच्या करारापेक्षा फार श्रेष्ठ आहे. यिर्मया ३१:३१-३४ मध्ये ६०० वर्षांआधी भाकीत केल्याप्रमाणे, नव्या करारातील लोक देवाच्या नियमाला त्यांच्या अंतःकरणांवर लिहितात आणि पापांची खरी क्षमा अनुभवतात. वर्षातून एकदा स्वतःच्या तसेच लोकांच्या पापांसाठी बलिदान अर्पण करणारा महायाजक असण्याऐवजी, ख्रिश्‍चनांना येशू ख्रिस्त हा त्यांचा असा महायाजक आहे की, जो निष्पाप आहे आणि ज्याने पापांसाठी एकदाच बलिदान अर्पिले. हातांनी बनवलेल्या पवित्रस्थानात आपले अर्पण सादर करावयास जाण्याऐवजी तो, खुद्द यहोवासमोर उपस्थित राहण्यास स्वर्गात गेला. त्याशिवाय, मोशेच्या नियमशास्त्रातील कराराप्रमाणे पशुंची अर्पणे पूर्णपणे पातके काढून टाकू शकत नव्हती किंवा वार्षिकरित्या त्यांचे अर्पण करण्यात आले नसते. परंतु, ख्रिस्ताचे एकदाच दिलेले बलिदान पातके कायमची काढून टाकते. या सर्व गोष्टी, थोर आध्यात्मिक मंदिरावर प्रकाश पाडतात ज्याच्या अंगणात आज अभिषिक्‍त शेष आणि “दुसरी मेंढरे” सेवा करत आहेत.—योहान १०:१६; इब्रीयांस ९:२४-२८.

२१. या चर्चेने स्तोत्र ९७:११ आणि नीतीसूत्रे ४:१८ च्या प्रेषितांच्या काळातील पूर्णतेविषयी काय दाखवून दिले आहे?

२१ प्रेषित पेत्र आणि याकोब व यहूदा या शिष्यांच्या पत्रांमध्ये आढळणारे प्रकाशाचे चकाकणे, अशा अधिक उदाहरणांविषयी सांगण्यास जागा अनुमती देत नाही. परंतु प्रेषितांच्या काळात स्तोत्र ९७:११ व नीतीसूत्रे ४:१८ यांची लक्षणीय पूर्णता झाली हे दाखवण्यासाठी वरील गोष्टी पुरेशा असल्या पाहिजेत. प्रती नमुने आणि आगाऊ चिन्हांपासून, सत्याची प्रगती पूर्णता आणि वास्तविकता यात होऊ लागली.—गलतीकर ३:२३-२५; ४:२१-२६.

२२. प्रेषितांच्या मृत्यूनंतर काय घडले आणि पुढील लेख काय दाखवून देईल?

२२ येशूच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर आणि भाकीत केलेल्या धर्मत्यागाची सुरवात झाल्यापासून, सत्याचा प्रकाश फारच मंदरितीने प्रकाशत होता. (२ थेस्सलनीकाकर २:१-११) तथापि, येशूच्या भविष्यवाणीच्या एकवाक्यतेत, पुष्कळ शतकांनंतर धनी परतला आणि त्याला ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास, परिवाराला’ यथाकाळी अन्‍न देत असल्याचे आढळले. परिणामतः, येशू ख्रिस्ताने त्या दासाला “आपल्या सर्वस्वावर” नेमले. (मत्तय २४:४५-४७) त्यानंतर कोणते प्रकाशाचे चकाकणे झाले? याची चर्चा पुढील लेखात केली जाईल.

[तळटीपा]

a येथे सांगितलेली जमीन, अशा वातावरणाला सूचित करते, ज्यामध्ये एखादा ख्रिस्ती व्यक्‍तिमत्वाचे गुण विकसित करण्याचे ठरवतो.—टेहळणी बुरुज, जून १५, १९८०, पृष्ठे १८-१९ पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ सत्याची समज प्रगतीशील आहे हे बायबलची कोणती वचने दाखवतात?

◻ प्रेषितांची कृत्ये पुस्तकात नोंदलेले प्रकाशाचे काही चकाकणे कोणते आहे?

◻ शुभवर्तमानांमध्ये कोणता प्रकाश आढळून येतो?

◻ पौलाच्या पत्रांमध्ये प्रकाशाच्या कोणत्या चकाकण्याचा समावेश आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा