वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 २/१ पृ. २६-२७
  • अलंकार योहानच्या शुभवर्तमानातील

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अलंकार योहानच्या शुभवर्तमानातील
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बहुतांशी पुरवणी
  • नम्रता व आनंद
  • येशूचा लोकांविषयीचा कळवळा
  • उत्तम मेंढपाळ काळजी घेतो!
  • देवाचा सदा विश्‍वासू पुत्र
  • मेंढवाडे व मेंढपाळ
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 २/१ पृ. २६-२७

अलंकार योहानच्या शुभवर्तमानातील

यहोवाच्या आत्म्याने वृद्ध प्रेषित योहानाला येशू ख्रिस्ताचे जीवन व त्याचे उपाध्यपण याविषयीचा हेलावणारा अहवाल लिहिण्याची प्रेरणा दिली. हे शुभवर्तमान इफिसमध्ये किंवा त्याच्या आसपास सुमारे इ. स. ९८ मध्ये लिहिण्यात आले. पण या अहवालाचे एकंदर स्वरुप काय आहे? शिवाय त्यात कोणते अलंकार सापडतात?

बहुतांशी पुरवणी

मत्तय, मार्क व योहानाने जे लिहिले ते पाहता योहान लिखाणाच्या बाबतीत निवडक होता व त्याने थोडेफार पुनर्लिखाण केले. खरे म्हणजे त्याने प्रत्यक्षात पाहिलेल्या घटना या बहुतांशी पुरवणीवजा आहेत पण ज्यापैकीचा साधारण ९० टक्के भाग असा आहे की जो इतर शुभवर्तमानात मिळत नाही. उदाहरणादाखल पाहता, केवळ त्यानेच येशूच्या मानवीप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वाविषयी सांगितले व म्हटले की, “शब्द देही झाला.” (१:१-१४) येशूने मंदिराच्या केलेल्या सफाईविषयी सांगताना इतर शुभवर्तमानकार सांगतात की ते त्याने आपल्या उपाध्यपणाच्या शेवटी केले, पण योहान असे सांगतो की, हीच गोष्ट येशूने आपल्या उपाध्यपणाच्या आरंभाला देखील केली. (योहान २:१३-१७) हा वृद्ध प्रेषितच आपल्याला येशूने पाण्याचा द्राक्षारस केला, लाजाराचे पुनरुत्थान केले आणि स्वतःच्या पुनरुत्थानानंतर अद्‌भूतपणे माशांचा मोठा घोळका जाळ्यात पकडला या विशिष्ट चमत्कारांविषयी सांगतो.—२:१-११; ११:३८-४४; २१:४-१४.

येशूने आपल्या मृत्युच्या स्मारकदिनाची कशी स्थापना केली ते सर्वच शुभवर्तमान लेखक सांगतात, पण केवळ योहानच आपल्याला, येशूने त्या रात्री आपल्या शिष्यांचे पाय धुऊन त्यांना नम्रतेचा धडा शिकविल्याचे कळवतो. याशिवाय, याच वेळी त्यांच्यामध्ये येशूने जे निकट संभाषण केले आणि प्रार्थना केली ते केवळ योहानच सांगतो.—१३:१–१७:२६.

या शुभवर्तमानात योहान असा ज्याविषयीचा नावाने उल्लेख आहे तो बाप्तिस्मा करणारा आहे, पण लेखक स्वतःची ओळख येथे ‘येशूची प्रीती असलेला शिष्य’ अशी देतो. (१३:२३) प्रेषिताने येशूवर खचितच प्रीती केली, शिवाय आम्हालाही ख्रिस्ताविषयी वाटणारी प्रीती, आम्ही योहानाने त्याचे वर्णन शब्द, जीवनाची भाकर, जगाचा प्रकाश, उत्तम मेंढपाळ, मार्ग, सत्य व जीवन या शब्दांनी केल्याचे वाचतो तेव्हा अधिक उंचावते. (१:१-३, १४; ६:३५; ८:१२; १०:११; १४:६) यामुळे योहानाच्या लिखाणाचा उद्देश सफळ होतोः “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्‍वास ठेवावा, आणि विश्‍वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून” या गोष्टी लिहिल्या आहेत.—२०:३१.

नम्रता व आनंद

योहानाचे शुभवर्तमान येशूची प्रस्तावना शब्द, पापे हरण करणारा कोकरा अशी करते आणि त्याने केलेल्या चिन्हाद्वारे तो “देवाचा पवित्र” जन आहे हे सिद्ध करते. (१:१–९:४१) इतर लिखाणासमवेत हे शुभवर्तमान बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाची नम्रता व आनंद ठळकपण उल्लेखते. तो ख्रिस्ताचा वाटाड्या होता, पण स्वतः म्हणालाः “त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही.” (१:२७) पायतणे कातड्याचा दोर किंवा बंद लावून बांधीत. कोणी दास आलेल्या माणसाच्या पायतणाचे बंद काढून ते पायतणे तो वाहून नेई; हे मेहनतीचे काम होते. तद्वत, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने वक्‍तव्याद्वारे आपल्याठायीची नम्रता आणि धन्याच्या तुलनेतील आपली क्षुद्रता प्रदर्शित केली. हा सुंदर धडा आहे, कारण यहोवा व त्याच्या मशीही राजाच्या सेवेसाठी केवळ नम्रजन साजेसे ठरतात!—स्तोत्रसंहिता १३८:६; नीतीसूत्रे २१:४.

येशूविषयी गर्वाने द्वेष दाखविण्याऐवजी, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने म्हटलेः “उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.” (३:२९) वराचा प्रतिनिधी या नात्याने वराचा मित्र लग्नाच्या वाटाघाटी, कधीकधी स्थळ जुळविणे आणि वधूला देणगी तसेच वधूपित्याला हुंडा देणे या गोष्टी करीत असे. आपले काम संपन्‍न झाल्यावर या प्रतिनिधीला आनंद होत असे. याचप्रमाणे जेव्हा योहानाने येशूला त्याच्या वधूवर्गाचे पहिले सदस्य स्वाधीन केले तेव्हा त्याचा आनंद देखील द्विगुणित झाला. (प्रकटीकरण २१:२, ९) वराच्या मित्राचे काम जसे लवकर संपत असे त्याप्रमाणेच योहानाचे कार्यही लवकर संपुष्टात आले. त्याचा ऱ्‍हास होत गेला व येशूची वृद्धी होत गेली.—योहान ३:३०.

येशूचा लोकांविषयीचा कळवळा

सुखार या शहराच्या जवळ असलेल्या एका विहिरीपाशी येशूने एका शमरोनी स्त्रीला सार्वकालिक जीवन देणाऱ्‍या लाक्षणिक पाण्याविषयी सांगितले. त्याचे शिष्य तेथे आल्यावर “तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्‍याचे त्यांना आश्‍चर्य वाटले.” (४:२७) अशी ही प्रतिक्रिया का झाली? कारण यहुदी शमरोन्यांना तुच्छ मानीत व त्यांच्याशी कसलाही व्यवहार करीत नव्हते. (४:९; ८:४८) याशिवाय कोणा यहुदी शिक्षकाने चार लोकात एखाद्या स्त्रीबरोबर बोलणे सर्वसाधारण नव्हते. पण येशूठायी लोकांविषयीचा कळवळा होता व त्यामुळे भारावून त्याने ती साक्ष त्या स्त्रीला दिली. यामुळे तेथील शहराचे लोक “नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.”—४:२८-३०.

लोकांविषयीच्या कळवळ्यानेच येशूने म्हटलेः “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.” (७:३७) येथे त्याने आठ दिवस चालणाऱ्‍या मंडपाच्या सणाच्या शेवटल्या दिवसाच्या प्रथेला अनुलक्षून बोलणी केली. सात दिवस, दररोज सकाळी एक याजक शिलोम येथील तळ्यातून पाणी घेऊन ते मंदिराच्या वेदीवर ओतीत असे. त्याचे असे करणे हे इतर गोष्टींसमवेत पवित्र आत्मा ओतीला जात आहे असे समजण्यात येई. इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टच्या आरंभाला देवाच्या आत्म्याने येशूच्या शिष्यांना जीवनप्रदायक पाणी पृथ्वीभरातील लोकांना देण्यास उद्युक्‍त केले. “जिवंत पाण्याचा झरा” यहोवा याच्याकडून केवळ ख्रिस्ताद्वारे एखाद्याला सार्वकालिक जीवन मिळू शकते.—यिर्मया २:१३; यशया १२:३; योहान १७:३.

उत्तम मेंढपाळ काळजी घेतो!

येशूठायी लोकांविषयी असणारा कळवळा हा त्याच्या उत्तम मेंढपाळाच्या, आपल्या मेंढरासमान असणाऱ्‍या अनुयायांची काळजी वाहण्याच्या भूमिकेत दिसून येतो. मृत्यु समीप येत असताही येशूने आपल्या शिष्यांना प्रेमळ सूचना दिल्या व त्यांच्यासाठी प्रार्थना केली. (१०:१–१७:२६) चोर किंवा मेंढरांची दाणादाण करणाऱ्‍यांप्रमाणे आडमार्गाने न येता तो मेंढवाड्यात प्रवेशद्वाराने येतो. (१०:१-५) मेंढवाडा असा होता जेथे मेंढरांना चोर व हिंस्त्र प्राण्यापासून रक्षण व्हावे म्हणून रात्रभर ठेवले जाई. त्याची भिंत दगडाची असून साधारणपण वरील अंगास काटेरी झुडुपे ठेवीत आणि प्रवेशद्वाराजवळ द्वारपाल असे.

या मेंढवाड्यात निरनिराळे कळप राहात, पण मेंढरु मात्र त्याच्या मेंढपाळ मालकाच्या हाकेलाच प्रतिसाद देई. मॅनर्स ॲण्ड कस्टम्स्‌ ऑफ द बायबल लँडस्‌ या पुस्तकात फ्रेड एच. वीट्‌ म्हणतातः “जेव्हा कळप वेगळे करण्याची वेळ येई तेव्हा एकेक मेंढपाळ आळीपाळीने येऊन ‘ताहू! ताहू!’ किंवा त्याच्या परिचयाचा आवाज देई. मेंढरे आपले डोके उंचावून बघत आणि साधारण ओरडण्याचा आवाज काढून प्रत्येक मेंढरु आपापल्या मालकाच्या मागे जाई. ती आपल्या मेंढपाळाच्या आवाजाच्या सुराबरोबर चांगली परिचित होती. अनोळखी लोकांनी तोच आवाज काढून पाहिला पण मेंढरे आपल्यामागे आणण्याचे त्यांचे श्रम फोल ठरले.” तेव्हा येशूने जे म्हटले ते अगदीच वास्तविक होते की, “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो.” (१०:२७, २८) “लहान कळप” व “दुसरी मेंढरे” दोघेही येशूच्या आवाजाला प्रतिसाद देतात, त्याच्या मागे जातात व त्याच्या कोमल काळजीचा अनुभव घेतात.—लूक १२:३२; योहान १०:१६.

देवाचा सदा विश्‍वासू पुत्र

ख्रिस्त हा नेहमीच देवाचा विश्‍वासू पुत्र होता आणि आपल्या पृथ्वीवरील उपाध्यपणात तो प्रेमळ मेंढपाळ ठरला. त्याचे पुनरुत्थान झाल्यानंतर देखील त्याने आपला कळवळा दाखविण्याचे चालू ठेवले. इतरांविषयी त्याला वाटणाऱ्‍या कळवळ्यामुळेच त्याने पेत्राला त्याच्या मेंढरांना भरविण्याची विनवणी केली.—१८:१–२१:२५.

वधस्तंभावरील बळी होऊन येशूने मरणापर्यंत विश्‍वासू राहण्याचे सर्वोच्च उदाहरण प्रदर्शित केले. भविष्यवादाच्या पूर्णतेला अनुलक्षून जी लाजिरवाणी गोष्ट त्याला बघावयास मिळाली ती ही होती की, शिपायांनी ‘त्याची वस्त्रे आपसात वाटून घेतली.’ (स्तोत्रसंहिता २२:१८) बिनशिवणीचे विणलेले त्याचे सुंदर अंतर्वस्त्र (ग्रीक, खिटोनʹ) कोणाच्या वाट्याला येते ते पाहण्यासाठी शिपायांनी चिठ्ठया टाकल्या. (१९:२३, २४) हा आखूड झगा लोकर किंवा तलम वस्त्राच्या एकाच तुकड्यातून विणता येतो व तो पांढरा किंवा विविध रंगाचा असू शकतो. तो बिनबाह्‍याचा असून तो अंगात घालीत. तो गुडघ्यापर्यंत तर कधी घोट्यापर्यंतही असे. येशू हा जडवादी नव्हता पण त्याने चांगल्या कापडाचा आतील झगा परिधान केला होता.

येशूचे पुनरुत्थान झाल्यावर एके प्रसंगी त्याने आपल्या शिष्यांना दर्शन देऊन म्हटलेः “तुम्हास शांती असो.” (२०:१९) यहुद्यांमध्ये हा सर्वसाधारण अभिवादन करण्याचा प्रकार होता. (मत्तय १०:१२, १३) पुष्कळांना या शब्दांचा तेवढा अर्थ वाटत नाही. पण येशूकरता तसे नव्हते. कारण आधी त्याने आपल्या शिष्यांना म्हटले होतेः “मी तुम्हास शांती देऊन ठेवतो.” (योहान १४:२७) जी शांती येशूने आपल्या शिष्यांना प्रदान केली ती, त्यांचा त्याजवर देवाचा पुत्र हा जो विश्‍वास होता त्यावर आधारलेली होती व या शांतीमुळेच त्यांची मने व अंतःकरणे स्थिर राहू शकली.

याचप्रमाणे, आपल्याला “देवाकडील शांती”चा अनुभव येऊ शकतो. यहोवा देवाशी त्याच्या प्रिय पुत्राकरवी साधलेल्या निकट नातेसंबंधाकरवी निर्माण होणारी ही अतुलनीय शांती आपण जोपासत राहू या.—फिलिप्पैकर ४:६, ७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा