-
यहोवा आपला मेंढपाळ आहेटेहळणी बुरूज—२००५ | नोव्हेंबर १
-
-
“मी . . . कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही कारण तू माझ्याबरोबर आहेस”
१३. स्तोत्र २३:४ यात दावीद कशाप्रकारे आणखी आपुलकीने यहोवाला संबोधतो आणि यात काही नवल का नाही?
१३ दावीद आपल्या आत्मविश्वासाचे आणखी एक कारण सांगतो: यहोवा आपल्या मेंढरांचे संरक्षण करतो. दावीद लिहितो: “मृत्युच्छायेच्या दरीतूनहि मी जात असलो तरी कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आंकडी व तुझी काठी मला धीर देतात.” (स्तोत्र २३:४) दावीद आता आणखी आपुलकीने आपल्या भावना व्यक्त करतो आणि यहोवाला “तू” या सर्वनामाने संबोधतो. यात नवल काही नाही कारण देवाने त्याला संकटांत कशाप्रकारे धीर धरण्यास मदत केली याविषयी दावीद येथे सांगत आहे. दावीद आपल्या जीवनात अनेक संकटमय दऱ्यांतून गेला होता—कित्येकदा त्याचा जीव धोक्यात होता. पण त्याने कधीही स्वतःला भीतीने गाफील होऊ दिले नाही कारण देव आपल्याबरोबर आहे, त्याची “आकडी” व “काठी” आपली मदत करण्यासाठी सुसज्ज आहे याची त्याला जाणीव होती. या संरक्षणाच्या जाणिवेने दाविदाला सांत्वन दिले आणि साहजिकच यामुळे तो यहोवाच्या आणखी जवळ आला.b
१४. यहोवा देत असलेल्या संरक्षणासंबंधी बायबल कोणते आश्वासन आपल्याला देते पण याचा काय अर्थ होत नाही?
१४ आज यहोवा आपल्या मेंढरांचे कशाप्रकारे संरक्षण करतो? बायबल आपल्याला आश्वासन देते की कोणतेही विरोधी मग ते पिशाच्च असोत वा मानव ते कधीही त्याच्या मेंढरांना या पृथ्वीवरून नाहीसे करण्यात यशस्वी होऊ शकणार नाहीत. यहोवा कधीही असे घडू देणार नाही. (यशया ५४:१७; २ पेत्र २:९) पण आपला मेंढपाळ सर्व संकटांपासून आपले रक्षण करेल असा याचा अर्थ होत नाही. मानवांना सर्वसामान्यपणे ज्या परीक्षांना तोंड द्यावे लागते त्या परीक्षा आपल्यालाही अनुभवाव्या लागू शकतात आणि सर्व खऱ्या ख्रिश्चनांप्रमाणे आपल्यालाही विरोधाला तोंड द्यावे लागते. (२ तीमथ्य ३:१२; याकोब १:२) काही प्रसंग आपल्यावर असे येतात जेव्हा आपण जणू ‘मृत्यूछायेच्या दरीतून’ जात असतो. उदाहरणार्थ, छळामुळे किंवा आजारपणामुळे आपण मृत्यूच्या अगदी दाराशी येऊन पोचू शकतो. किंवा कदाचित आपली एखादी प्रिय व्यक्ती मृत्यूच्या अगदी समोरासमोर येते, आणि कदाचित मृत्यूला बळीही पडू शकते. जीवनातल्या त्या सर्वात अंधाऱ्या क्षणांत आपला मेंढपाळ आपल्याजवळ असतो आणि तो आपले संरक्षण करतो. कसे?
१५, १६. (क) आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यास यहोवा आपली कशी मदत करतो? (ख) परीक्षांना तोंड देताना यहोवा आपल्याला मदत करतो हे दाखवण्याकरता एक अनुभव सांगा.
१५ यहोवा चमत्कारिकरित्या आपल्या वतीने कार्य करण्याचे आश्वासन आपल्याला देत नाही.c पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे: आपल्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा तो त्यांच्यावर मात करण्यास आपल्याला मदत करेल. तो “नाना प्रकारच्या परीक्षांना” तोंड देण्याकरता आपल्याला सुबुद्धी देऊ शकतो. (याकोब १:२-५) मेंढपाळ फक्त हिंस्र प्राण्यांना पिटाळून लावण्यासाठीच आपल्या आकडीचा किंवा काठीचा उपयोग करत नाही; तर कधीकधी आपल्या मेंढरांना योग्य दिशेने नेण्याकरता त्यांना तो हळूच काठीने ढोसणी देतो. यहोवा पण आपल्या विशिष्ट परिस्थितीत मदतदायी ठरू शकेल अशा बायबल आधारित सल्ल्याचे पालन करण्याकरता कदाचित एखाद्या सहविश्वासू भावाच्या अथवा बहिणीच्या माध्यमाने अशीच “ढोसणी” देऊ शकतो. शिवाय यहोवा आपल्याला धीर धरण्याकरता ताकद देऊ शकतो. (फिलिप्पैकर ४:१३) त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊ शकतो. (२ करिंथकर ४:७) देवाचा आत्मा आपल्याला सैतानाने आपल्यावर आणलेल्या कोणत्याही परीक्षेत धीर धरण्यास समर्थ बनवू शकतो. (१ करिंथकर १०:१३) यहोवा सदोदीत आपली मदत करण्यास तयार आहे हे जाणून आपल्याला सांत्वन मिळत नाही का?
१६ होय, आपल्याला कोणत्याही अंधाऱ्या दरीतून जावे लागले तरीही आपल्याला एकटे चालण्याची गरज नाही. आपला मेंढपाळ आपल्यासोबत आहे आणि आपल्याला सुरुवातीला समजणारही नाही अशा मार्गांनी तो आपल्याला मदत करतो. मेंदूचा कर्करोग झालेल्या एका ख्रिस्ती वडिलांचा अनुभव पाहा: “सुरुवातीला, यहोवा मला कशाचीतरी शिक्षा देतोय, त्याचे माझ्यावर प्रेम नाही असे मला वाटू लागले हे मी कबूल करतो. तरीपण मी ठरवले, काही झाले तरी यहोवाकडे पाठ फिरवायची नाही. त्याऐवजी मी आपल्या सर्व काळज्या-चिंता यहोवाजवळ बोलून दाखवल्या. आणि खरोखरच यहोवाने मला मदत केली. कित्येकदा माझ्या भावाबहिणींच्या माध्यमाने त्याने माझे सांत्वन केले. बऱ्याच बांधवांनी गंभीर आजारपणाला तोंड देण्यासंबंधी त्यांचे अनुभव सांगितले व उपयोगी सल्ला दिला. अशाप्रकारच्या टिपण्या ऐकल्यावर मला जाणवायचे की आपण ज्या अनुभवातून जात आहोत तो काही असामान्य नाही. बांधवांनी दिलेली व्यावहारिक मदत, कधीकधी मनाला स्पर्शून जाणारी त्यांची दयाळू कृत्ये या सर्वांवरून मला खात्री पटली की यहोवा माझ्यावर नाराज नाही. अर्थात मला या आजारपणाशी झुंजत राहावे लागणार आणि याचा शेवट काय होणार हे मला माहीत नाही. पण मला खात्री आहे की यहोवा माझ्याबरोबर आहे आणि या परीक्षेतून जाण्यास तो शेवटपर्यंत मला मदत करत राहील.”
-