-
“यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद कर”टेहळणी बुरूज—२००३ | डिसेंबर १
-
-
“जळफळू नको”
३, ४. स्तोत्र ३७:१ येथे लिहिल्यानुसार दावीद कोणता सल्ला देतो आणि त्याकडे लक्ष देणे आज का योग्य आहे?
३ आपण आज ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ जगत आहोत. दुष्टाई सर्वत्र माजली आहे. “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील,” या प्रेषित पौलाच्या शब्दांची पूर्णता झालेली आपण पाहिली आहे. (२ तीमथ्य ३:१, १३) दुष्ट लोकांचे यश व त्यांची भरभराट होताना आपण पाहतो, तेव्हा याचा आपल्यावर अगदी सहज परिणाम होऊ शकतो. आपण विचलित होऊ शकतो व आपली आध्यात्मिक एकाग्रता देखील भंग होऊ शकते. ३७ व्या स्तोत्राचे सुरवातीचे शब्द आपल्याला या संभाव्य धोक्याविषयी सतर्क करतात: “दुष्कर्म्यांवर जळफळू नको; अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको.”
४ जगातील विविध प्रसिद्धी माध्यमे दररोज होणाऱ्या अन्यायांच्या असंख्य घटनांचे आपल्याला सतत वृत्त देत असतात. बेईमान व्यापारी ठकबाजी करूनही निर्दोष सुटतात. गुन्हेगार असहाय्य लोकांचा गैरफायदा घेतात. खून करणारे खुलेआम फिरतात. या सर्व अन्यायांमुळे कधीकधी आपण संतापतो आणि आपले मन अस्वस्थ होते. दुष्ट कृत्ये करणारे यशस्वी होत आहेत असे भासत असल्यामुळे कधीकधी आपल्याला त्यांचा हेवा देखील वाटू शकतो. पण आपल्याला मनःस्ताप झाल्यामुळे परिस्थितीत सुधारणा होऊ शकते का? दुष्टांच्या वरकरणी भरभराटीचा हेवा केल्यामुळे त्यांचे भविष्य बदलणार आहे का? निश्चितच नाही! आपण ‘जळफळण्याचे’ खरे तर काहीच कारण नाही. का नाही?
-
-
“यहोवामध्ये पराकाष्ठेचा आनंद कर”टेहळणी बुरूज—२००३ | डिसेंबर १
-
-
६. स्तोत्र ३७:१, २ यातून आपल्याला काय शिकायला मिळते?
६ मग आपण दुष्टांच्या बेईमानीने कमवलेल्या समृद्धीमुळे अस्वस्थ व्हावे का? स्तोत्र ३७ च्या पहिल्या दोन वचनांतून आपल्याला हाच धडा मिळतो की: यहोवाची सेवा करण्याचा तुम्ही जो मार्ग निवडला आहे त्यापासून, दुष्टांचे यश पाहून विचलित होऊ नका. त्याऐवजी, आपले लक्ष आध्यात्मिक आशीर्वादांवर केंद्रित ठेवा.—नीतिसूत्रे २३:१७.
-