तुम्ही आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करता का?
“प्रिय बंधूनो: तुम्ही कसे आहात? मी मोठी होईल तेव्हा मिशनरी होईन. मी सोबत हा एक डॉलर पाठवीत आहे तो मिशनऱ्यांच्या मदतीसाठी कृपया पोचता करा.” असे हे पत्र तीन वर्षाच्या शेले हिने लिहिले. आपल्या सुकुमार हातांनी तिने पत्रात जे लिहिले होते त्याचे स्पष्टीकरण तिच्या आईने खाली लिहिले होते.
स्तेफनने आपल्या पत्रात अधिक औपचारिकपणे हे लिहिले होते: “प्रिय बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी. मी आठ वर्षांचा आहे. मी ७९ स्ट्रीट येथे राहतो. तुम्ही मजेत आहात अशी मी आशा करतो. मी तुम्हाला सोबत पाठविलेला एक डॉलर राज्य सभागृह निधिसाठी पाठवीत आहे. मला या विषयीची पोच लवकर पाठवा.”
या लेकरांनी वॉचटॉवर संस्थेच्या मुख्यालयाला असे पत्र का लिहिले? कारण यहोवाच्या स्तुतीमध्ये वाढ व्हावी या करता आपल्या पाशी जे होते त्याकरवी त्यांची, यहोवाचा सन्मान करण्याची इच्छा होती. ते पवित्र शास्त्राचा हा उपदेश अनुसरीत होते: “तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने यहोवाचा सन्मान कर.”—नीतीसूत्रे ३:९.
यहोवा अशा या सन्मानास निश्चितच पात्र आहे. त्याची बरोबरी कोणाबरोबरही होऊ शकत नाही. प्रकटीकरण ४:११ म्हणते: “हे यहोवा आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्विकार करावयास तू योग्य आहेस. कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” “त्याच्यामुळे आपण जगतो, वागतो व आहो” तरी सर्वोत्तम असे सारे काही त्याने आपल्याला देऊ केले आहे. (प्रे. कृत्ये १७:२८) पवित्र शास्त्र लेखक याकोब आम्हाला स्मरण देतो त्याप्रमाणे देव हा “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” यांचा दाता आहे.—याकोब १:१७.
तरीपण यहोवाची स्तुती सन्मान करण्याविषयीची रसिकता सर्वांठायी नाही. खरे तर लाखो लोकांना त्याचे नावसुद्धा माहीत नाही! कित्येक “निर्माणकर्त्याऐवजी” निर्मिलेल्या वस्तुंची भक्ति करतात. (रोमकर १:२५) या विषयी प्रांजळ अंतःकरणाच्या लोकांना प्रज्वलित करण्यास हवे. यहोवा लवकरच आपली कृति आरंभ करील याची त्यांना माहिती होणे जरूरीचे आहे. आपल्या पुत्राच्या अधिपत्याद्वारे तो या पृथ्वीतून सर्व जाचक व त्यांचा जाचजुलूम नष्ट करील आणि सर्व गोष्टी पूर्ण समतोलात आणून नंदनवनाची पुनर्स्थापना करील आणि परिपूर्ण आरोग्यात चिरकाल जगण्याची मानवाची क्षमता परत त्याला देईल. (दानीएल २:४४; प्रकटीकरण २१:१, ३, ४) धार्मिकतेचा शोध घेणाऱ्यांचे जीवन खरेपणाने असे हे ज्ञान प्राप्त करून त्यानुरुपची कृति करण्यावर अवलंबून आहे.–सफन्या २:३; योहान १७:३.
स्वेच्छा व रसिकता यांची गरज आहे
या जीवन वाचविणाऱ्या कार्यात तुमची सहभागी होण्याची इच्छा आहे का? त्या राज्याची “सुवार्ता” “सर्व जगात” प्रसारीत करण्यामध्ये पुष्कळ गोष्टींचा समावेश आहे. (मत्तय २४:१४) स्वेच्छापूर्ण कामकऱ्यांना तालीम द्यावी लागते व त्यांना प्रचारासाठी बाहेर पाठवावे लागते. सबंध जगभरात राज्याच्या सुवार्तेचा प्रसार ३० लाखापेक्षा अधिक लोक करीत असून याकरवी ते यहोवाचा सन्मान करीत आहे हे पाहणे केवढे धन्यतेचे आहे बरे? यापैकीचे बरेच जण हे कार्य पूर्ण वेळेच्या आधारावर, गरज आहे त्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याची इच्छा प्रदर्शित करून करीत आहेत. इतर देशात प्रचारकार्यास बढती मिळावी याकरता हजारो मिशनऱ्यांना आधीच पाठविले आहे आणि आता त्यांच्या संख्येत अधिक येऊन मिळत आहेत.
या सर्व कारभाराची देखरेख, व्यवस्था पाहण्यासाठी मोठ्या संघटनेची आवश्यकता आहे. सबंध गोलार्धभर नव्या शाखा दप्तरांच्या सोयी आणि मिशनरी गृह बांधून विस्तारीत करावी लागली आहेत. राज्य सभागृहे व संमेलन सभागृहे या भर्क्तिच्या स्थानिक जागांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी यहोवाच्या लोकांनी त्याच्या कार्यात आपणापाशी आहे ते सर्व उदारपणे व स्वेच्छेने वापरण्याची जी तत्परता दाखवली ती मोठी प्रशंसनीय आहे. (स्तोत्रसंहिता ११०:३) तरीपण या शेवटल्या काळी भाकित असणाऱ्या संग्रहाच्या ‘त्वरे’च्या कामाकरता स्वेच्छा वाढवून आपल्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करण्याची हाक आहे. (यशया ६०:२२) तर मग, आम्हाकडून काय अपेक्षा आहेत?
रसिकता—यहोवाने जे सर्व काही आम्हाला दिले आहे त्याविषयीची रसिकता ही त्यापैकीची एक गोष्ट आहे. होय, आम्हापाशी असणारा द्रव्यलाभ ही खरेपणाने यहोवाकडिल देणगी आहे. “जे तुला दिलेले नाही,” प्रेषित पौल विचारतो, “असे तुझ्याजवळ काय आहे?” (१ करिंथकर ४:७) पण कोणत्या उद्देशास्तव देवाने हे सर्व आम्हाला दिले बरे! ते याचकरता की या देणग्यांद्वारे आम्ही त्याचा सन्मान करावा?—१ पेत्र ४:१०, ११.
या देणग्यात आमची शारिरीक, मानसिक, आध्यात्मिक व भौतिक संपदा, म्हणजे आमचे जीवनच समाविष्ठ आहे. यहोवा आम्हा प्रत्येकाच्या बाबतीत केवढा उदार राहिला आहे बरे? औदार्याबद्दलचे केवढे सुंदर उदाहरण त्याने मांडले आहे बरे! यहोवाच्या समृध्दीतून आम्हास जे उदारपणे लाभले आहे त्याकरवी त्याच्या तरतूदींविषयीची रसिकता व्यक्त करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली पाहिजे. तसे झालेच तर मग आम्ही आम्हापाशी असणाऱ्या गोष्टींकरवी यहोवाचा सन्मान करणार नाही का?
परंतु, मला तर जास्त काही करता येणार नाही असे तुम्हाला वाटत असेल. वास्तविकपणे प्रत्येकाला दूर देशी जाऊन मिशनरी कार्य करता येणे व पूर्ण वेळेच्या कार्यातील एखाद्या प्रकारात समाविष्ठ होणे शक्य नसते. याप्रमाणेच बहुतेकांठायी इमारतींच्या प्रकल्पामध्ये जाऊन व्यक्तिशः मदत करण्याची क्षमता आणि साधने नाहीत. तसेच या मासिकासारख्या प्रकाशनांचे जेथे मुद्रण व छपाई होते त्या शाखा दप्तरामध्ये सेवा करण्यास्तव आपले जीवन देण्यासाठी विशिष्ठांना त्यांच्या वैयक्तिक परिस्थिती बांध घालीत असतील. तरीसुद्धा दान करण्याकरवी जो आगळा आनंद मिळत असतो त्याचा अनुभव आम्हा प्रत्येकास जरूर घेता येईल. (प्रे. कृत्ये २०:३५) या शिवाय देवास संतुष्ट करणारे तसेच त्याचा सन्मान व स्तुति वदविणारे बोल बोलून तसे जीवनाक्रमण आम्हाला नक्कीच आचरता येईल.—कलस्सैकर ३:२३.
ते कसे करता येईल
कोवळ्या वयातच शेले व स्तेफन यांना तो मार्ग सापडला. आपण पाठवीत असलेले अनुदान वॉचटॉवर संस्था जागतिक प्रचाराच्या कामाची वाढ करण्याकरता वापरतील याची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच त्यांनी दिलेले अर्थसहाय्य, मग ते कितीही असेना, त्याचे खरेच मोल वाटते. स्तेफनला त्याच्या अनुदानाची पोच मिळाली व त्याप्रमाणे लहान्या शेलेला सुद्धा. अनुदान किती आहे ते नव्हे तर त्या मागील हेतू महत्वाचा आहे, कारण दान स्वेच्छेचे असेल तरच ते स्वीकारणीय बनते. (२ करिंथकर ९:७) आम्ही करीत असलेले आर्थिक सहाय्य, लहान असो की मोठे, आम्ही त्याला दाखवीत असलेल्या पूर्ण जिवाच्या निष्ठेचे प्रतीक असल्यास यहोवा त्याबद्दल आपली पसंती व्यक्त करतो.—लूक २१:१–४.
रसिकता आहे तेथे कृतीची जोडही आहे. ज्याकरवी आम्ही यहोवाचा सन्मान करू शकू त्या आम्हापाशी असणाऱ्या द्रव्याचा आम्ही कधी अंदाज घेतला आहे का? उत्साह व शक्ति यांनी युक्त असणारे आमचे जीवन हे अर्थातच मौल्यवान आहे व ते वायफळ गोष्टींकरता वापरले जाऊ नये. यहोवाबरोबरचे घनिष्ठ व्यक्तिगत नातेसंबंध वाढविणे व दृढ करणे याकरता आम्ही हवा तेवढा वेळ देत आहोत का? त्याचे नाव, त्याचा संदेश आमच्या ओठाद्वारे घोषित करून आम्ही त्याचा सन्मान करतो का? (इब्रीयांस १३:१५, १६) लहान मुले हा देखील यहोवाकडील बहुमोल ठेवा आहे. (स्तोत्रसंहिता १२७:३) तर मग त्यांना देवाच्या सेवेकरता त्यांच्या जीवनाचे समर्पण करण्याठी आम्ही आवश्यक ते प्रोत्साहन देतो का?
यासोबत आम्हापाशी असणारे सोने, चांदी व इतर धननिधीचा ठेवाही आहे. हे आर्थिक अनुदान आमची स्थानिक मंडळी, तिचे राज्य सभागृह व शिवाय संमेलन सभागृहे या ठिकाणी ज्या पवित्र शास्त्रीय सूचना दिल्या जातात व जी आमच्या वसाहतीत प्रचार कार्याची केन्द्रे बनली आहेत त्या या ठिकाणांची डागडुजी इत्यादि गोष्टींच्या कामी येते. जेव्हा हे अनुदान वॉटॉवर संस्थेचे मुख्यालय किंवा त्याच्या शाखा दप्तरांना पाठविले जाते तेव्हा ते जागतिक राज्य प्रचाराच्या कामाची वाढ करण्यासाठी वापरण्यात येते. अशी ही अनुदाने ज्याकरता वापरली जावी अशी आमची इच्छा असते त्याकरता खूपच मदतगार ठरू शकतात. शेले या लहानग्या मुलीने आपल्या मनी मिशनरी होण्याचे ध्येय बाळगले होते म्हणून तिला मिशनऱ्यांना मदत करण्याची इच्छा होती. स्तेफनने शेकडो अधिक राज्य सभागृहे उभारण्याची निकड व त्यासाठी लागणारा प्रचंड खर्च याविषयी ऐकले होते म्हणूनच आपले अनुदान संस्थेच्या राज्य सभागृह निधीस जोडले जावे अशी त्याची इच्छा झाली. इतर काही जण संकट काळामध्ये सुटकेची मदत उपलब्ध होण्यासाठी अनुदान पाठवितात.
तरीपण वेळोवेळी काही विशिष्ठांतर्फे शाखा दप्तरांना जे अनुदान पाठविले जाते त्याचे पैसे कसे वापरावे हे शाखा दप्तरांनीच ठरविणे असे त्यांना बरे वाटते. याचे कारण असे की ज्यादा गरज कोठे आहे हे शाखा दप्तरातील बांधवांना चांगले ठाऊक असते. एका अनुदान देणाऱ्याने लिहिले: “यासोबत मी संस्थेला एक चेक पाठवीत आहे. त्याचे पैसे, प्रचार कार्याची वाढ करण्यात कोठे वापरावे हे संस्थेला चांगले ठाऊक आहे त्यामुळे तिनेच ते ठरवावे. यहोवाच्या सर्व लोकांचे प्रयत्न आणि यहोवा कार्यावर जे आशीर्वाद पाठवीत आहे त्यामुळे जी सुंदर वाढ दिसते त्याद्वारे आम्हाला खूप आनंद होत आहे.” दुसऱ्या एका पत्राने म्हटले: “नुकताच मी आपल्या नोकरीतून सेवा निवृत्त झालो आहे व जेथे काम करीत होतो त्या कंपनीकडून मला मोठी रक्कम प्राप्त झाली. तेव्हा माझी व माझ्या बायकोची ही प्रामाणिक इच्छा झाली की या पैशातील काही भाग राज्याच्या घोषणेत वाढ करता यावी म्हणून वापरला जावा. यासाठी आम्ही हा चेक आमच्यातर्फे व मुलांतर्फे तुम्हाला पाठवीत आहोत. या पैशांचा योग्य वापर कसा करावा ते ठरवीत असताना यहोवा तुम्हावर आशीर्वाद पाठवो.”
आपल्या द्रव्याकरवी त्याचा सन्मान करण्याची स्वेच्छा पाहून यहोवाला खूप आनंद होतो. त्यामुळेच तो आपले अभिवचन देतो: “तुझी कोठारे समृद्धीने भरतील. तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील.” प्राचीन इस्राएलात केले त्याप्रमाणेच आजही तो उदार आत्म्यास समृद्धपणे प्रतिफळ देत आहे. आपल्या द्रव्याकरवी यहोवाचा सन्मान करणे याचा अर्थ त्याची परतफेड करणे असा नव्हे उलट यहोवाच्या आशीर्वादाकरवी दात्याच्या समृद्धीत वाढच होते!—नीतीसूत्रे ३:९, १०.
यहोवाचा सन्मान करण्याची आणि “कुटील व विपरीत पिढीत” वेगळेच आहोत हे प्रदर्शित करण्याचा केवढा भव्य हक्क आम्हाला आहे! शिवाय सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण समाप्त होण्याआधी जे काम देवाने नेमून दिले त्या राज्याच्या घोषणेत सहभागी होण्याचा हक्कसुद्धा केवढा विलोभनीय आहे! (फिलिप्पैकर २:१५; मत्तय २४:१४; २८:१९, २०) लवकरच प्रेरित दृष्टांत पूर्ण होईल तेव्हा “प्रत्येक प्राणी” मग तो कोठेही असो, यहोवाला सार्वकालिकरित्या सन्मान, वैभव, बळ याचे श्रेय देऊन स्तुती करील. (प्रकटीकरण ५:१३; ७:१२) तर मग आत्ताच होता होईल तेवढ्या प्रमाणात आपण आपल्या द्रव्याकरवी यहोवाचा सन्मान करू या.