ईश्वरी भय उत्पादित करणे
“यहोवाचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर जा.”—नीतीसूत्रे ३:७, पं. रमाबाई भाषांतर.
१. नीतीसूत्रे कोणासाठी लिहिली होती?
पवित्र शास्त्रातील नीतीसूत्राच्या पुस्तकात आध्यात्मिक सल्ल्याची संपत्ती भरलेली आहे. सुरवातीला, यहोवाने हे मार्गदर्शक पुस्तक त्याच्या नमुनेदार इस्राएली राष्ट्राला शिकवण्यासाठी पुरवले होते. आज, ते त्याच्या पवित्र ख्रिस्ती राष्ट्राला, सुज्ञ नीतीसूत्रे पुरवते, ‘जे ह्या युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचले’ आहेत.—१ करिंथकर १०:११; नीतीसूत्रे १:१-५; १ पेत्र २:९.
२. नीतीसूत्रे ३:७ मधील इशारा आज समयोचित का आहे?
२ नीतीसूत्रे ३:७ कडे वळल्यावर, आम्ही वाचतो: “तू आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नको, परमेश्वराचे [यहोवा, न्यूव.] भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.” सर्पाने हव्वेला “बरे वाईट जाणणारे व्हाल” असे आश्वासन देऊन फसवले होते, त्या आमच्या पहिल्या पालकांपासून, केवळ मानवी बुद्धी, मानवजातीच्या गरजांना उत्तर देण्यासाठी अपयशी झाली. (उत्पत्ती ३:४, ५; १ करिंथकर ३:१९, २०) इतिहासातील कोणताही काळ, या २० व्या शतकासारखा दिसून येणारा नव्हता, कारण या ‘शेवटल्या दिवसात’ नास्तिकता व उत्क्रांतीच्या विचारसरणीच्या फळांची कापणी करणारी मानवजात, जातीयवाद, हिंसाचार, आणि प्रत्येक प्रकारच्या अनैतिकतेद्वारे पीडित झालेली आहे. (२ तीमथ्य ३:१-५, १३; २ पेत्र ३:३, ४) संयुक्त राष्ट्रसंघ किंवा अर्धवट तुकडे झालेले जगातील धर्म, या ‘नव्या जगातील अव्यवस्था,’ गुंतागुंतीला सोडवू शकत नाही.
३. आमच्या दिवसातील कोणत्या घटनांबद्दलचे भाकीत केले होते?
३ देवाचे भविष्यवादित वचन आम्हाला सांगते की ते भूतांचे आत्मे “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांस एकत्र करावयास . . . इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी गेले.” (प्रकटीकरण १६:१४, १६) लवकरच त्या राजांना किंवा शासकांना यहोवाकडील दहशतीने घेरले जाईल. यहोशवा आणि इस्राएली लोक कनानी लोकांवर न्यायदंड बजावण्यासाठी आल्यावर त्यांना ज्याप्रमाणे वचक बसली त्याप्रमाणेच ती असेल. (यहोशवा २:९-११) परंतु आज, यहोशवाला चित्रित करणारा एक जण, ख्रिस्त येशू—“राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु”—‘सर्वसमर्थ देवाच्या क्रोधाला’ व्यक्त करण्यासाठी तो, ‘राष्ट्रांना मारून, त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील.’—प्रकटीकरण १९:१५, १६.
४, ५. कोणाला तारण मिळेल, आणि का?
४ त्या वेळी कोणाचे तारण होईल? मुक्तता केले जाणारे, भयाने भयभीत झालेले नव्हे, तर यहोवाचे आदरयुक्त भय उत्पादित केलेले असतील. स्वतःच्या दृष्टीत बुद्धिमान होण्याऐवजी, ते “दुष्कर्मापासून दूर” झालेले आहेत. लीनतेला धारण करून, चांगल्या गोष्टींनी मन भरल्यामुळे त्यांनी वाईटाला त्यांच्या विचारसरणीतून काढून टाकले आहे. “सर्व जगाचा न्यायाधीश,” सार्वभौम प्रभू यहोवाने सदोमच्या कुमार्गाला लागलेल्या लोकांचा संहार केला, त्याप्रकारे दुष्टाईला चिकटून राहणाऱ्या प्रत्येकांचा संहार करणार असल्यामुळे, ते हितकारक आदराला प्रिय मानतात. (उत्पत्ती १८:२५) खरेच, देवाच्या स्वतःच्या लोकांसाठी “परमेश्वराचे [यहोवा, न्यूव.] भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते.”—नीतीसूत्रे १४:२७.
५ ईश्वरी न्यायदंडाच्या या दिवसात, यहोवाला कधीही असंतुष्ट न करण्याच्या भयाने ज्यांनी संपूर्ण समर्पण केलेले आहे अशा सर्वांना, नीतीसूत्रे ३:८ मध्ये उद्धृत केलेल्या सत्याची जाणीव होईल: “हे [यहोवाचे भय] तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल.”
यहोवाचा सन्मान करणे
६. नीतीसूत्रे ३:९ ऐकण्यासाठी कशाने आम्हाला प्रेरणा दिली पाहिजे?
६ आमच्या भावनायुक्त प्रीतीसह, गुणग्राहकत्त्व दाखवणाऱ्या यहोवाच्या भयाने, आम्हाला नीतीसूत्रे ३:९ ऐकण्यासाठी प्रवृत्त करायला हवे: “तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा [यहोवा, न्यूव.] सन्मान कर.” आमच्या अर्पणाद्वारे यहोवाचा सन्मान करण्यासाठी आम्हावर दबाव आणला जात नाही. प्राचीन इस्राएलात केल्या जाणाऱ्या बलिदानाविषयी निर्गम ३५:२९ ते अनुवाद २३:२३ मध्ये १२ वेळा सूचित केल्यानुसार, स्वेच्छेने हे केले पाहिजे. यहोवाच्या चांगुलपणाला व त्याच्या हातून आनंद घेतलेल्या प्रेमळ-कृपेला ओळखून त्याला देत असलेली ही प्रथम फळाची भेट, अतिउत्तम असली पाहिजे. (स्तोत्रसंहिता २३:६) “प्रथम त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा [झटत राहा]” या आमच्या दृढ निश्चयाला ते प्रतिबिंबित करणारे ठरले पाहिजे. (मत्तय ६:३३) आमच्या द्रव्याने यहोवाचा सन्मान करण्याचा परिणाम काय होतो? “म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.”—नीतीसूत्रे ३:१०.
७. यहोवाला आम्ही कोणते प्रथम फळ अर्पण केले पाहिजे, आणि त्याचा कोणता परिणाम असेल?
७ आम्हाला आशीर्वाद देण्याचा यहोवाचा प्रमुख मार्ग आध्यात्मिक स्वरुपाचा आहे. (मलाखी ३:१०) या कारणास्तव, आपण त्याला अर्पण करत असलेले प्रथम फळ प्रामुख्याने आध्यात्मिक असले पाहिजेत. आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे करताना, आमचा वेळ, शक्ती, आणि आवश्यक सामर्थ्याचा वापर केला पाहिजे. येशूकरता, जसे हे कार्य दृढ करणारे “अन्न” होते तसेच यामुळे आमचेही पोषण केले जाईल. (योहान ४:३४) आमची आध्यात्मिक कोठारे भरून जातील, व नव्या द्राक्षरसाद्वारे सूचित होत असलेला आमचा आनंद, भरून वाहू लागेल. त्या व्यतिरिक्त, प्रत्येक दिवशी पुरेसे भौतिक अन्न मिळण्यासाठी आम्ही भरवशाने प्रार्थना करतो तेव्हा, जगव्याप्त राज्याच्या कार्यासाठी आम्ही सातत्याने उदार वर्गण्या देऊ शकतो. (मत्तय ६:११) आमच्याजवळ भौतिक ठेव्यासहीत असलेल्या सर्व गोष्टी, आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्याकडून आम्हाला मिळाल्या आहेत. त्याच्या स्तुतीसाठी या द्रव्याचा अधिक वापर केल्यास तो आणखी आशीर्वाद देईल.—नीतीसूत्रे ११:४; १ करिंथकर ४:७.
प्रीतीचा वाग्दंड
८, ९. आम्ही वाग्दंड आणि शिक्षेविषयी कसा विचार केला पाहिजे?
८ नीतीसूत्राच्या ३ ऱ्या अध्यायातील ११ आणि १२ वचने पुन्हा, ईश्वरी कुटुंबातील पिता-व-पुत्राचा तसेच यहोवा आणि पृथ्वीवरील त्याच्या प्रिय आध्यात्मिक मुलांच्या आनंदी नातेसंबंधाविषयी सांगतात. आम्ही वाचतो: “माझ्या मुला, परमेश्वराचे [यहोवा, न्यूव.] शिक्षण तुच्छ मानू नको; आणि त्याच्या शासनाला [वाग्दंडाला] कंटाळू कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर [यहोवा, न्यूव.] ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन [वाग्दंड देतो] करतो.” जगातील लोक वाग्दंडाचा तिरस्कार करतात. पण यहोवाच्या लोकांनी त्याला स्वीकारले पाहिजे. प्रेषित पौल या शब्दांना नीतीसूत्रातून घेऊन, अवतरीत करताना म्हणतो: “माझ्या मुला परमेश्वराच्या [यहोवा, न्यूव.] शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको; कारण ज्याच्यावर परमेश्वर [यहोवा, न्यूव.] प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो . . . कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतीकारक फळ देते.”—इब्रीयांस १२:५, ६, ११.
९ होय, आम्हाला वाग्दंड आणि शिक्षा पालकांकडून, ख्रिश्चन मंडळीद्वारे किंवा वैयक्तिक अभ्यासाच्यावेळी शास्त्रवचनावर मनन करतो तेव्हा मिळत असली तरी ती, आम्हा प्रत्येकाला शिक्षण देण्यासाठी आवश्यक भाग आहेत. शिक्षेकडे लक्ष देणे ही जीवन आणि मरणाची बाब आहे हेच नीतीसूत्रे ४:१, १३ देखील सांगते: “मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नको. ते जवळ राख, कारण ते तुझे जीवन आहे.”
महान धन्यता
१०, ११. नीतीसूत्रे ३:१३-१८ मधील मनोहर वचनांचे काही पैलू कोणते आहेत?
१० खरेच, ‘सत्य व मनोहर वचनांचे’ ते किती सुंदर वाक्प्रचार आता दिलेले आहेत! (उपदेशक १२:१०) शलमोनाची ती प्रेरित वचने खऱ्या धन्यतेचे वर्णन करतात. ते असे शब्द आहेत ज्यांना आम्ही आमच्या हृदयावर कोरून लिहिले पाहिजे. आम्ही वाचतो:
११ “ज्याला ज्ञान [बुद्धी, न्यूव.] प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करतो तो मनुष्य धन्य होय, कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे, आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तू त्याच्याशी तूल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत. त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतीमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यांस ते जीवनवृक्षरूप आहे, जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.”—नीतीसूत्रे ३:१३-१८.
१२. आम्हाला बुद्धी आणि समजबुद्धीचा कसा लाभ झाला पाहिजे?
१२ बुद्धीचा उल्लेख, नीतीसूत्राच्या पुस्तकात अनेकदा म्हणजे, एकूण ४६ वेळा केला आहे. “यहोवाचे भय बुद्धीचा आरंभ होय.” ही देववचनाच्या ज्ञानावर आधारित असलेली ईश्वरी, व्यावहारिक बुद्धी, सैतानाच्या जगातील खवळलेल्या घातक वादळातून जाण्यासाठी त्याच्या लोकांना मदत करते. (नीतीसूत्रे ९:१०, न्यूव.) नीतीसूत्रामध्ये समजबुद्धीचा उल्लेख १९ वेळा आलेला आहे, ती सैतानाच्या योजनांबरोबर लढाई करण्यासाठी आम्हाला बुद्धीच्या परिचारिकेसारखी मदत करते. थोर विरोधकाठायी, त्याची कावेबाज कृत्ये करण्यामध्ये मागील हजारो वर्षांपासूनचा अनुभव आहे. परंतु शिक्षक या नात्याने अनुभवापेक्षाही ईश्वरी समजबुद्धी अतिशय मौल्यवान अशी गोष्ट आम्हाकडे आहे, हे बरोबर आणि चूक यातील फरक ओळखून उचित मार्ग निवडून कार्य करण्याचे चातुर्य आहे. यहोवा आम्हाला त्याच्या वचनाद्वारे हेच शिकवतो.—नीतीसूत्रे २:१०-१३; इफिसकर ६:११.
१३. आम्हाला आर्थिकतेच्या खडतर काळात काय सुरक्षित ठेवू शकते, आणि कशाप्रकारे?
१३ आजच्या जगातील आर्थिक गोंधळ, यहेज्केल ७:१९ मधील भविष्यवाणीच्या पूर्णतेचा आगमन-सूचक आहे: “ते आपले रुपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांस आपले सोने अमंगळ वाटेल. परमेश्वराच्या [यहोवा, न्यूव.] कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारूप्याने त्यांचा बचाव होणार नाही.” पृथ्वीवरील सर्व भौतिक संपत्तीची तुलना, बचाव करणारी बुद्धी व समजबुद्धीच्या सामर्थ्याबरोबर करता येणार नाही. बुद्धिमान राजा शलमोन, दुसऱ्या एका प्रसंगी असे सांगतो: “ज्ञान [बुद्धी, न्यूव.] आश्रय देणारी आहे व पैसाही आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते ते त्याच्या जीविताचे रक्षण करते.” (उपदेशक ७:१२) आज, यहोवाच्या शांतीमय मार्गांनी चालणारे तसेच येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवनाच्या बक्षीसाला, ‘दीर्घ आयुष्याला’ बुद्धीने निवडणारे सर्वजन धन्य आहेत!—नीतीसूत्रे ३:१६; योहान ३:१६; १७:३.
खरी बुद्धी उत्पादित करणे
१४. यहोवाने कोणत्या मार्गांनी उदाहरणशील बुद्धी प्रदर्शित केली आहे?
१४ स्वतः यहोवाने निर्मितीची अद्भुत कृत्ये करताना, बुद्धी आणि समजबुद्धी दाखवल्यामुळे, त्याच्या स्वरुपाप्रमाणे निर्माण केलेल्या आम्ही मानवांनी या गुणांना उत्पादित करण्याचा आटोकाट प्रयत्न करणे अगदी यथायोग्य आहे. “यहोवाने पृथ्वीचा पाया बुद्धीने घातला. त्याने समजबुद्धीने आकाश निर्माण केले.” (नीतीसूत्रे ३:१९, २०, न्यूव.) त्याने जीवधारी प्राण्यांना पौराणिक कथेप्रमाणे, उत्क्रांतीच्या स्पष्टीकरण देता न येण्याजोग्या प्रक्रियेद्वारे निर्माण करण्यास सुरवात केली नाही, तर निर्मितीच्या थेट कृत्याद्वारे प्रत्येकाला “त्यांच्या त्यांच्या जातीप्रमाणे” व सुज्ञ उद्देशाकरता निर्माण केले. (उत्पत्ती १:२५, पं. रमाबाई भाषांतर) शेवटी मनुष्याची बुद्धिमत्तेसह आणि प्राण्यांपेक्षाही अधिक श्रेष्ठ योग्यतेत निर्मिती केली तेव्हा, स्वर्गातून देवकुमारांनी केलेल्या जयजयकाराचे पडसाद पुनःपुन्हा उठले असावेत. (पडताळा ईयोब ३८:१, ४, ७.) यहोवाची पारख करण्याची दूरदृष्टी, त्याची बुद्धी, व प्रीती, पृथ्वीवरील त्याच्या सर्व निर्मितीवरून स्पष्टपणे दिसत आहे.—स्तोत्रसंहिता १०४:२४.
१५. (अ) केवळ बुद्धी उत्पादित करणे पुरसे का नाही? (ब) नीतीसूत्रे ३:२५, २६ ने आम्हामध्ये कोणता भरवसा जागृत केला पाहिजे?
१५ आम्ही यहोवाची बुद्धी व समजबुद्धीच्या गुणांनाच केवळ उत्पादित करु नये तर, त्यांना दृढ धरून देखील राहिले पाहिजे, व त्याच्या वचनाच्या अभ्यासात आम्ही कधीही कुचराई करता कामा नये. तो आम्हाला सल्ला देतो: “माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्याआड होऊ देऊ नको. तू चातुर्य व विवेक सांभाळून ठेव, म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील.” (नीतीसूत्रे ३:२१, २२) अशाप्रकारे, सैतानाच्या जगावर चोरासारख्या येणाऱ्या ‘अकस्मात नाशाच्या’ दिवसामध्ये देखील आम्ही सुरक्षिततेत आणि मनाच्या शांतीत वावरू शकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:२, ३) महासंकटाच्या काळात देखील, “अकस्मात झालेल्या भयामुळे, किंवा दुष्टांचा नाश होतेवेळी, त्यामुळेही तू भिऊ नको. कारण यहोवा तुझा भरवसा होईल, आणि तो तुझा पाय पाशांत अडकण्यापासून राखील.”—नीतीसूत्रे ३:२३-२६, पं. रमाबाई भाषांतर.
चांगले करण्यासाठी आवड
१६. सेवेतील आवेशाव्यतिरिक्त, ख्रिश्चनांमध्ये कोणत्या कार्याची आवश्यकता आहे?
१६ हे दिवस, सर्व राष्ट्रातील लोकांना साक्षीसाठी राज्याच्या सुवार्तेचा प्रचारात आवेश दाखवण्याचे आहेत. परंतु नीतीसूत्रे ३:२७, २८ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे या साक्षकार्याला इतर ख्रिस्ती गुणांची पुष्टी मिळाली पाहिजे: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको. एखादी वस्तू तुजजवळ असता आपल्या शेजाऱ्याला असे सांगू नको की: ‘तू जा, आणि उद्या परत ये म्हणजे ती मी तुला देईन.’” (पडताळा याकोब २:१४-१७.) जगामध्ये, दारिद्य्र आणि दुष्काळाची अधिक पकड असताना, आमच्या शेजाऱ्याला, विशेषपणे आमच्या आध्यात्मिक बांधवांना मदत करण्यासाठी आम्हाला निकडीची हाक आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी कसा प्रतिसाद दिला?
१७-१९. (अ) कोणती निकडीची गरज १९९३ मध्ये पूर्ण केली होती व कोणत्या प्रतिसादासह? (ब) आमचे वेढलेले बांधव, “सर्व गोष्टीत महाविजयी” ठरल्याचे कशाने प्रदर्शित होते?
१७ एका उदाहरणाचा विचार करा: गत वर्षामध्ये, आधीच्या युगोस्लाव्हियातून निकडीच्या मदतीसाठी एक हाक आली. शेजारच्या देशातील बांधवांनी आश्चर्यकारकपणे प्रतिसाद दिला. गत हिवाळ्यातील अतिथंड महिन्यात, युद्ध क्षेत्रात जाऊन, गरजवंत साक्षीदारांना चालू प्रकाशने, गरम कपडे, अन्न आणि औषधाची मदत करणे शक्य झाले. एके प्रसंगी, बांधवांनी १५ टन मदतीचे साहित्य घेऊन जाता यावे यासाठी विनंती केली, परंतु त्यांना परवाना मिळाला तो ३० टन घेऊन जाण्याचा! ऑस्ट्रियाच्या बांधवांनी लगेच आणखी तीन लॉऱ्या रवाना केल्या. योजना केलेल्या ठिकाणी एकूण २५ टन साहित्य पोहचले. आमच्या बांधवांना मिळालेल्या या आध्यात्मिक आणि आर्थिक विपुल तरतुदींबद्दल किती हर्ष झाला होता!
१८ तेथील प्राप्तकर्त्यांनी कसा प्रतिसाद दर्शवला? ह्या वर्षाच्या सुरवातीला, एका वडिलाने लिहिले: “सराजीवो येथील बंधू आणि बहिणी, तग धरून असून निरोगी आहेत, आणि अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या असमंजस युद्धात आम्ही अजूनही आध्यात्मिकतेत दृढ आहोत. अन्नाच्या बाबतीत परिस्थिती फारच हलाखीची होती. आमच्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले त्याबद्दल यहोवा तुम्हाला आशीर्वाद व मोबदला देवो. यहोवाच्या साक्षीदारांचा उदाहरणशील जीवनाचा मार्ग व अधिकाऱ्यांना ते देत असलेला आदर यामुळे, अधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल खास आदर आहे. तुम्ही पुरवत असलेल्या आध्यात्मिक अन्नाबद्दल देखील आम्ही तुमचे फार ऋणी आहोत.”—पडताळा स्तोत्रसंहिता १४५:१८.
१९ संकटात असलेल्या या बांधवांनी, त्यांच्या आवेशी क्षेत्रसेवेद्वारे देखील गुणग्राहकता बाळगली आहे. अनेक शेजारी त्यांच्याकडे गृह पवित्र शास्त्र अभ्यासाची विनंती करण्यासाठी येतात. अन्नाची पाच टन मदत पुरवली होती त्या तुझलॉ शहरात, मंडळीतील नऊ पायनियरांच्या उत्तम सहयोगामुळे ४० प्रचारकांनी त्या महिन्यासाठी सरासरी, प्रत्येकी २५ तास असा सेवेचा अहवाल दिला. तेथे येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीसाठी २४३ श्रोत्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. खरोखर, हे प्रिय बांधव, ‘ज्याने आपणांवर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत महाविजयी ठरले.’—रोमकर ८:३७.
२०. आधीच्या सोविएत संघराज्यात कोणत्या ‘समानतेने’ जागा घेतली?
२० आधीच्या सोविएत संघराज्यात अन्न आणि गरम कपड्यांची मदत देण्याद्वारे प्रदर्शित केलेली उदारता देखील, तेथील बांधवांच्या आवेशासारखीच आहे. उदाहरणार्थ, मॉस्कोत स्मारक विधीसाठी मागील वर्षी उपस्थितीत असलेल्या ३,५०० च्या तुलनेत पाहता, या वर्षाची उपस्थिती ७,५४९ होती. याच काळादरम्यान, त्या शहरातील मंडळ्यात १२ वरून ते १६ पर्यंत वाढ झाली. संपूर्ण सोविएत संघराज्यात, (बाल्टिक राष्ट्रांना वगळून) मंडळ्यात १४ टक्के वाढ झाली, राज्य घोषकांमध्ये २५ टक्के व पायनियरांत ७४ टक्क्यांनी वाढ झाली. आवेश आणि स्वार्थ-त्यागाचा कसा तो आत्मा! ते आम्हाला पहिल्या शतकात असलेली “समानता” याची आठवण करून देते. आध्यात्मिक आणि भौतिक ठेवा असलेल्या ख्रिश्चनांनी कमी अनुकूल असलेल्या ठिकाणी उदारतेने देणग्या दिल्या, व यामुळे पीडित जणांच्या आवेशाने, देणगी देणाऱ्यांना आनंद व उत्तेजन मिळाले.—२ करिंथकर ८:१४.
वाईटाचा द्वेष करा!
२१. नीतीसूत्राच्या ३ ऱ्या अध्यायातील समारोपाच्या शब्दात, सुज्ञांची आणि मूर्खांची तफावत कशी केली आहे?
२१ पुढे नीतीसूत्राचा तिसरा अध्याय, तफावतीच्या शृंखलेचा या सल्ल्याने समारोप करतो: “तू जुलूम करणाऱ्याचा हेवा करू नको, आणि त्याचा कोणताही मार्ग पसंत करू नको. कारण यहोवाला कुटिलाचा वीट वाटतो, पण त्याची गुप्त मसलत सरळांपाशी आहे. यहोवाचा शाप दुष्टांच्या घरात आहे, पण न्यायींच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. खचित तो निंदकाचा उपहास करतो, पण नम्रांस तो कृपा देतो. ज्ञानी गौरवाचे वतन पावतील, परंतु मूर्ख लज्जित होऊन जातील.”—नीतीसूत्रे ३:२९-३५, पं. रमाबाई भाषांतर.
२२. (अ) आमची गणती मूर्खात न केली जाण्याचे आम्ही कसे टाळू शकतो? (ब) सुज्ञ लोक कशाचा द्वेष करतात, आणि ते काय उत्पादित करतात, व कोणत्या प्रतिफळास्तव?
२२ आमची मूर्ख लोकांत गणती होण्यापासून आम्ही कसे टाळू शकतो? आम्ही वाईटाचा द्वेष करण्याचे शिकले पाहिजे, होय, यहोवा ज्याची घृणा करतो, त्या हिंसाचारी व रक्तपाती जगाच्या सर्व भरकटणाऱ्या मार्गांची घृणा आम्ही केली पाहिजे. (नीतीसूत्रे ६:१६-१९ हेही पाहा.) याच्या विरूद्धतेत, जे चांगले आहे ते—प्रामाणिकपणा, धार्मिकता, आणि नम्रता—उत्पादित केले पाहिजे, जेणेकडून लीनता आणि यहोवाच्या भयाने आम्ही “धन, सन्मान व जीवन” प्राप्त करू शकू. (नीतीसूत्रे २२:४) “संपूर्ण अंतःकरणाने यहोवावर भाव ठेव,” या सल्ल्याचा निष्ठावंतपणे अवलंब करणाऱ्यांसाठी हे बक्षीस असेल.
तुमचे विवेचन काय आहे?
▫ या अभ्यासाच्या शीर्षक वचनाचा अवलंब आज कसा होतो?
▫ आम्ही यहोवाचा सन्मान कसा करू शकतो?
▫ शिस्तीकडे आम्ही क्षुल्लक दृष्टीने का पाहू नये?
▫ महान धन्यता कोठे मिळू शकते?
▫ आम्ही चांगल्यावर प्रेम करून वाईटाचा द्वेष कसा करू शकतो?
[२४ पानांवरील चित्रं]
यहोवाला, उत्तम गोष्टीचे अर्पण करणाऱ्यांना अमाप आशीर्वाद मिळतील