-
बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार कराटेहळणी बुरूज—१९९९ | सप्टेंबर १५
-
-
नीतिसूत्र पुस्तकाचा उद्देश, त्याच्या सुरवातीच्या शब्दांतून दिसतो: “इस्राएलाचा राजा दावीद याचा मुलगा शलमोन याच्या म्हणी [नीतिसूत्रे]: ज्ञान [बुद्धी] व विद्या जाणण्यासाठी, बुद्धीची वचने समजण्यासाठी, सुज्ञतेची वर्तणूक, न्यायीपण, न्याय व सरळपण यांविषयी शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी, भोळ्यांस चातुर्य, तरुणाला ज्ञान व विवेक देण्यासाठी ह्या म्हणी लिहिल्या आहेत.”—नीतिसूत्रे १:१-४, पं.र.भा.
-
-
बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार कराटेहळणी बुरूज—१९९९ | सप्टेंबर १५
-
-
समज, सूक्ष्मदृष्टी, चातुर्य आणि विचार करण्याची क्षमता असलेल्या मनुष्याला बुद्धिमान म्हटले जाते. समज याचा अर्थ, एखादी गोष्ट जवळून पाहणे व तिच्यात असलेल्या भागांचा आणि संपूर्ण गोष्टीचा संबंध काय ते ग्रहण करण्याद्वारे त्या गोष्टीची रचना व तिचा अर्थ समजून घेणे, असा होतो. सूक्ष्मदृष्टी, यासाठी कारणांचे ज्ञान व एखादे विशिष्ट काम बरोबर किंवा चूक का आहे ते समजून घ्यावे लागते. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य चुकीच्या मार्गाने चालला आहे हे समज असलेल्या मनुष्याला कळते व तो लागलीच त्या मनुष्याला सावध करतो. परंतु, तो मनुष्य चुकीच्या मार्गाने का वाहवत आहे व तो त्याला सर्वात प्रभावशाली मार्गाने कसा वाचवू शकेल हे समजण्यासाठी त्याच्याकडे सूक्ष्मदृष्टी असावयास हवी.
-