वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १२/१ पृ. १७-२२
  • यहोवावर भाव ठेवा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवावर भाव ठेवा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पित्याप्रमाणे बोध
  • स्थायी भाव
  • यहोवावर विसंबून राहा
  • “आपल्या सर्व मार्गात . . .”
  • यहोवाच्या जवळ या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवावरील तुमचा भरवसा भक्कम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • आनंदी जीवनाकरता भरवसा अत्यावश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवाला आपला भावविषय बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १२/१ पृ. १७-२२

यहोवावर भाव ठेवा!

“संपूर्ण अंतःकरणाने यहोवावर भाव ठेव.”—नीतीसूत्रे ३:५, न्यूव.

१. एका युवकावर नीतीसूत्रे ३:५ चा कसा प्रभाव पडला, आणि कोणत्या दीर्घकालिन परिणामासह?

दीर्घकाळापासून मिशनरी सेवा करत असलेले एक मिशनरी लिहितात: “‘तू मनापासून प्रभूवर भाव ठेव; स्वतःच्या अकलेवर विसंबून राहू नकोस.’ मी भेट देत असलेल्या घरातील भिंतीवर, चौकटीत बसवून [फ्रेम करून] अडकवलेल्या पवित्र शास्त्रातील त्या शब्दांनी माझे लक्ष वेधले. त्यानंतर, पूर्ण दिवसभर मी त्यावर मनन केले. मी संपूर्ण अंतःकरणाने देवावर भाव ठेवतो असे स्वतःला विचारू शकतो का?” ही व्यक्‍ती तेव्हा २१ वर्षाची होती. आता ९० वर्षाची असून, अजूनही विश्‍वासूपणे ऑस्ट्रेलियातील पर्थ्‌ येथे वडील या नात्याने सेवा करत आहे. सिलोन (आता श्रीलंका), बर्मा (आता म्यानमार), मलेया, थायलंड, भारत, व पाकिस्तान या नव्या मिशनरी क्षेत्रातील २६ खडतर वर्षांच्या पायनियरींगसोबत, यहोवावर संपूर्ण अंतःकरणाने भाव ठेवल्याने मिळालेल्या फळामुळे जीवन कसे अधिक समृद्ध झाले याचे, ही व्यक्‍ती अवलोकन करु शकते.a

२. नीतीसूत्रे ३:५ ने आमच्यामध्ये कोणता आत्मविश्‍वास निर्माण करावा?

२ “संपूर्ण अंतःकरणाने यहोवावर भाव ठेव”—नीतीसूत्रे ३:५, मधील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनने भाषांतरीत केलेले शब्द, डोंगरासमान अडखळणे आली तरी त्यांच्यावर मात करण्यासाठी तो आमचा विश्‍वास दृढ करील हा आत्मविश्‍वास ठेवून यहोवा देवाला सातत्याने आमचे जीवन अर्पित करत राहण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतात. (मत्तय १७:२०) आता आपण नीतीसूत्रे ३:५ चे त्या संदर्भात परीक्षण करू या.

पित्याप्रमाणे बोध

३. (अ) नीतीसूत्राच्या पहिल्या नऊ अध्यायांमध्ये कोणते उत्तेजन मिळते? (ब) आम्ही नीतीसूत्रे ३:१, २ वर, अधिक बारकाईने का लक्ष दिले पाहिजे?

३ पवित्र शास्त्रातील नीतीसूत्राच्या पुस्तकातील सुरवातीचे नऊ अध्याय, स्वर्गामध्ये पुत्रत्त्वाचा आनंद घेण्याची, किंवा पृथ्वीवरील नंदनवनात, “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळण्याची वाट पाहून असलेल्या सर्वांसाठी, यहोवाकडून पित्यासमान बोधाने व सुज्ञ सल्ल्याने भरलेली आहेत. (रोमकर ८:१८-२१, २३) पालक आपल्या मुला-मुलींना वाढवण्यासाठी येथील सुज्ञ सल्ल्याचा वापर करू शकतात. नीतीसूत्राच्या ३ऱ्‍या अध्यायातील सल्ला उल्लेखनीय आहे, त्याचा आरंभ या दक्षतेसह ते करते: “माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात [“अंतःकरणात”, न्यूव.] माझ्या आज्ञा वागोत.” सैतानाच्या दुष्ट जगाचे शेवटचे दिवस त्यांच्या अंतास पोहचत असता, आम्ही यहोवाच्या सूचनांकडे अधिक लक्ष देऊ या. हा मार्ग जणू लांबचा वाटत असेल, परंतु धीराने टिकून राहणाऱ्‍या सर्वांसाठी असे अभिवचन आहे की, “त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील,” म्हणजे यहोवाच्या नवीन जगातील अनंतकाळचे जीवन होय.—नीतीसूत्रे ३:१, २.

४, ५. (अ) योहान ५:१९, २० मध्ये कोणत्या आनंदाच्या संबंधाचे वर्णन केले आहे? (ब) आमच्या दिवसापर्यंत, अनुवाद ११:१८-२१ मधील सल्ला कसा लागू होतो?

४ पिता व पुत्रामधील आनंदी नातेसंबंध अधिक मोलाचा असू शकतो. आमच्या निर्माणकर्त्या, यहोवा देवाने त्याची व्यवस्था अशाच रितीने केली आहे. ख्रिस्त येशूने यहोवासोबत असलेल्या त्याच्या सलगीविषयी असे म्हटले: “पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो, त्यावाचून काहीही त्याला स्वतः होऊन करता येत नाही. कारण जे काही तो करतो, ते पुत्रही तसेच करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो.” (योहान ५:१९, २०) अशाचप्रकारची सलगी यहोवा व पृथ्वीवरील त्याच्या सर्व कुटुंबामध्ये, तसेच मानवी पिता व त्यांच्या मुलामध्ये असण्याचे त्याने उद्देशिले आहे.

५ प्राचीन इस्राएलात, भरवसादायक कौटुंबिक नातेसंबंधाला प्रोत्साहन दिले होते. यहोवाने तेथे पित्यांना असा सल्ला दिला: “तुम्ही माझी वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हादाखल आपल्या हातास बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा, आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा. ती आपल्या दारांच्या बाह्‍यांवर आणि फाटकांवर लिहा. म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्‍वराने [यहोवा, न्यूव.] त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यांत तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील.” (अनुवाद ११:१८-२१) आमच्या महान शिक्षक, यहोवा देवाचे प्रेरीत वचन, पालकांसोबत व त्यांच्या मुलांसोबत तसेच ख्रिश्‍चन मंडळीत सेवा करत असलेल्या सर्वांसोबत सलगीचे संबंध जोडण्यास मदत करू शकते.—यशया ३०:२०, २१.

६. आम्हाला, देव आणि मानवासोबत कृपापसंती कशी मिळेल?

६ देवाच्या तरूण व वयस्कर लोकांसाठी पित्याचा तो सुज्ञ सल्ला, नीतीसूत्राच्या ३ऱ्‍या अध्यायातील ३ आणि ४ वचनात पुढे सांगतो: “दया व सत्य ही तुला न सोडोत. त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव. त्यास हृत्पटलावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव व मनुष्य याजकडून अनुग्रह व सुर्कीती ही प्राप्त होतील.” यहोवा, स्वतः प्रेमळ-दया व सत्य दाखवण्यात श्रेष्ठ आहे. स्तोत्रसंहिता २५:१० असे म्हणते की, “त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय [प्रेमळ-कृपा] व सत्यपूर्ण आहेत.” यहोवाचे अनुकरण करून, आम्ही या गुणांना व त्यांच्या संरक्षक सामर्थ्याला जोपासण्यास हवे, व बहुमोल कंठमालेला समजतो त्याप्रमाणे त्याला मोलाचे समजून आमच्या अंतःकरणावरून पुसता न येण्यासारखे त्यांना ठसवले पाहिजे. यास्तव, आम्ही कळकळीने प्रार्थना करू शकतो: “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यूव.] . . . तुझे वात्सल्य [प्रेमळ-कृपा] व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करो.”—स्तोत्रसंहिता ४०:११.

स्थायी भाव

७. यहोवाने कोणत्या मार्गाने त्याचा विश्‍वासूपणा दाखवला आहे?

७ भाव याची परिभाषा, वेबस्टरर्स्‌ नाईन्थ न्यू कॉलिजिएट डिक्शनरी, “स्वभाव, पात्रता, शक्‍ती वरील खात्रीदायक भरवसा किंवा एखाद्याविषयी व एखाद्या गोष्टीची सत्यता” अशी करते. यहोवाचा स्वभाव त्याच्या प्रेमळ-कृपा यावर पूर्णपणे दृढपणे आधारित आहे. व त्याने ज्याचे अभिवचन दिले आहे ते तो करील यावर आमचा संपूर्ण आत्मविश्‍वास ठेवू शकतो, कारण त्याचे यहोवा हे नावच, तो एक महान उद्देशकर्ता असल्याची ओळख करून देते. (निर्गम ३:१४; ६:२-८) निर्माणकर्ता असल्यामुळे, तो शक्‍तीचा व महासामर्थ्याचा उगम आहे. (यशया ४०:२६, २९) तो सत्याचा सार आहे, कारण “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.” (इब्रीयांस ६:१८) अशाप्रकारे, सर्व सत्याचा महान उगम असणारा आमचा देव यहोवा, त्यावर भाव ठेवणाऱ्‍यांच्या रक्षणासाठी तसेच त्याच्या सर्व महान उद्देशांची महिमायुक्‍त पूर्णता सफल करण्यासाठी त्याच्याकडे महान शक्‍ती असल्यामुळे, आमचा पूर्ण भाव त्याच्यावर ठेवण्यास आम्हाला उत्तेजन दिले आहे.—स्तोत्रसंहिता ९१:१, २; यशया ५५:८-११.

८, ९. जगामध्ये आज भरवशाचा अभाव शोचनियरित्या का दिसून येतो, आणि कशाप्रकारे यहोवाचे लोक यापेक्षा वेगळे आहेत?

८ आमच्या सभोवतालच्या अधःपतित झालेल्या जगात, भरवशाचा शोचनीयरित्या अभाव दिसून येतो. उलटपक्षी, आम्ही सर्वत्र लोभ आणि भ्रष्टाचार पाहतो. वर्ल्ड प्रेस रिव्हियू मासिकाच्या मे १९९३च्या अंकातील मुखपृष्ठावर हा संदेश सुशोभित केला होता: “आर्थिक नफ्यासाठी भ्रष्ट व्यवहारातील वाढ—नव्या जगाच्या व्यवस्थेत बेकायदेशीर माध्यमाद्वारे मिळवलेला पैसा. भ्रष्टाचारी लोक तसेच ते करत असलेले व्यवहार, ब्राझीलपासून ते जर्मनीपर्यंत, अमेरिकेपासून ते अर्जेंटिनापर्यंत, स्पेनपासून ते पेरूपर्यंत, इटलीपासून ते मेक्सिकोपर्यंत, व्हॅटिकनपासून ते रशियापर्यंत पसरलेले आहे.” मानवाची तथाकथित नव्या जगाची व्यवस्था, द्वेष, लोभ आणि बेभरवसा यावर आधारित असून, तिला फळ तर काहीच मिळत नाही परंतु ती मानवजातीची दुर्दशा वाढवत आहे.

९ राजकीय राष्ट्रांच्या विरूद्धतेत पाहता, यहोवाचे साक्षीदार, “ज्या राष्ट्राचा देव परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] आहे” ते राष्ट्र बनण्यास ते आनंदी लोक आहेत. तेच केवळ भरवशाने म्हणू शकतात की, “देवावर आम्ही भरवसा ठेवतो.” त्यांच्यातील प्रत्येक जण हर्षाने जयघोष करू शकतो: “देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन. . . . देवावर मी भरवसा ठेवला आहे. मी भिणार नाही.”—स्तोत्रसंहिता ३३:१२; ५६:४, ११.

१०. सत्त्व टिकवण्यासाठी अनेक तरूण ख्रिश्‍चनांना कोणत्या गोष्टीने दृढ केले आहे?

१० आशियातील देशात हजारो युवक साक्षीदारांनी अतिशय मार व तुरुंगवास सहन केला, यहोवावर भाव ठेवल्यामुळे त्यातील अनेक जण धीराने टिकून राहिले. तुरुंगात असताना एके रात्री, असह्‍य छळ सहन केलेल्या एका युवक साक्षीदाराला वाटले की तो आता यापेक्षा अधिक धीर धरू शकणार नाही. परंतु अंधारातून स्वतःला लपवत दुसरा एक युवक त्याकडे आला. तो कुजबुजला: “[धीर] सोडू नको; मी हातमिळवणी केली, आणि तेव्हापासून मला मनाची शांती नाही.” पहिल्या युवकाने दृढ राहण्याच्या निश्‍चयाला पुनः नवे केले. आमचे सत्त्व कमी करण्याच्या सैतानाच्या कोणत्याही व प्रत्येक प्रयत्नावर मात करण्यासाठी, यहोवा आम्हाला मदत करील असा संपूर्ण भाव आम्ही ठेवू शकतो.—यिर्मया ७:३-७; १७:१-८; ३८:६-१३, १५-१७.

११. यहोवावर भाव ठेवण्यासाठी आम्ही कसे उत्तेजित होतो?

११ पहिल्या आज्ञेचा काही भाग असा वाचला जातो: “तू आपला देव परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, [अंतःकरणाने] . . . प्रीती कर.” (मार्क १२:३०) देवाच्या वचनावर आम्ही मनन करतो तेव्हा, शिकत असलेली महान सत्ये आमच्या अंतःकरणात खोलवर जातात, ज्यामुळे आम्ही आमचा अद्‌भुत देव, सार्वभौम प्रभू यहोवाच्या सेवेत आमचे सर्वस्व खर्च करण्यासाठी प्रवृत्त होतो. त्याने आम्हाला जे शिकवलेले आहे, आमच्यासाठी जे काही केले आहे, व पुढे जे काही तो करील, या गुणग्राहकतेने भरलेले अंतःकरण, त्याच्याकडील तारणावर संपूर्ण भाव ठेवण्यास आम्हाला प्रवृत्त करते.—यशया १२:२.

१२. वर्षानुवर्षांपासून अनेक ख्रिश्‍चनांनी त्यांचा यहोवावर असलेला भाव कशाप्रकारे प्रदर्शित केला आहे?

१२ हा भाव वर्षानुवर्षे वाढवला जाऊ शकतो. वॉचटावर संस्थेच्या ब्रुकलिन येथील मुख्यालयात ५० वर्षे विश्‍वासूपणे सेवा केलेल्या, एका लीन यहोवाच्या साक्षीदाराने मुख्यालयात त्याच्या सेवेचा आरंभ एप्रिल १९२७ मध्ये केला, त्यांनी लिहिले: “त्या महिन्याच्या शेवटी मला, नीतीसूत्रे ३:५, ६ हे पवित्र शास्त्रातील वचन लिहिलेल्या एका सुंदर लिफाफ्यात ५ डॉलर मिळाले . . . यहोवावर भाव ठेवण्याचे प्रत्येक कारण होते, मुख्यालयात असताना, यहोवाचे, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ पृथ्वीवर विश्‍वासूपणे राज्याच्या आस्थेची काळजी घेत असल्याबद्दल मी त्याविषयी लवकरच गुणग्राहकता बाळगली.—मत्तय २४:४५-४७.”b या ख्रिश्‍चनाचे अंतःकरण पैशाची हाव यावर नव्हे तर “स्वर्गातील कधीही न संपणाऱ्‍या धना”वर होते. अशाचरीतीने, आतादेखील, पृथ्वीभरात, वॉचटावर संस्थेच्या सर्व बेथेल गृहांमध्ये हजारो जण विपन्‍नतेच्या अधिकृत शपथेवर सेवा करतात. त्यांच्या दररोजच्या गरजा पुरवण्यासाठी ते यहोवावर भाव ठेवतात.—लूक १२:२९-३१, ३३, ३४.

यहोवावर विसंबून राहा

१३, १४. (अ) प्रौढ सल्ला, केवळ कोठे मिळू शकतो? (ब) छळातून बचावण्यासाठी कशाला टाळले पाहिजे?

१३ आमचा स्वर्गीय पिता आम्हाला इशारा देतो: “स्वतःच्या अकलेवर विसंबून राहू नकोस.” (नीतीसूत्रे ३:५, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर) यहोवा देत असलेली बुद्धी आणि समज याप्रत, जगातील सल्ला मसलत देणारे व मानसशास्त्रज्ञ कधीही पोहोंचण्याची आशा करू शकत नाहीत. “त्याची बुद्धी अमर्याद आहे.” (स्तोत्रसंहिता १४७:५) जगातील प्रसिद्ध लोकांच्या बुद्धीवर किंवा आमच्या स्वतःच्या अजाण भावनांवर विसंबून राहण्याऐवजी, प्रौढ सल्ल्यासाठी आम्ही यहोवा, त्याचे वचन व ख्रिस्ती मंडळीतील वडिलांवर विसंबून राहू या.—स्तोत्रसंहिता ५५:२२; १ करिंथकर २:५.

१४ मानवी बुद्धी किंवा उच्च स्थान, आम्हाला जलद-रीतीने येत असलेल्या दिवसातील तीव्र परीक्षेत कोठेही निरवणार नाही. (यशया २९:१४; १ करिंथकर २:१४) जपानमध्ये, दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी, कार्यक्षम परंतु गर्विष्ठ असलेल्या मेंढपाळाने देवाच्या लोकांचे मेंढपाळकत्त्व करण्यासाठी स्वतःच्या अकलेवर विसंबून राहण्याची निवड केली. तणावाखाली असताना तो धर्मत्यागी बनला, व छळ होत असताना कळपातील बहुतेकांनी कार्य थांबवले. तुरुंगातील लहान कप्पा असलेल्या घाणेरड्या खोलीतील भयंकर वागणूकीतून धैर्याने वाचलेल्या एका निष्ठावंत जपानी भगिनीने असे म्हटले: “विश्‍वासू राहणाऱ्‍यांजवळ खास सामर्थ्य नव्हते व ते सहसा नजरेस न येणारे होते. तेव्हा नक्कीच आपण सर्वांनीच आमच्या अंतःकरणापासून यहोवावर भाव ठेवला पाहिजे.”c

१५. यहोवाला खूष करण्यासाठी कोणत्या ईश्‍वरी गुणाची आवश्‍यकता आहे?

१५ आमच्या अकलेवर विसंबून राहण्याऐवजी, यहोवावर भाव ठेवण्यामध्ये लीनता समाविष्ट आहे. यहोवाला खूष करण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी हा किती महत्त्वपूर्ण गुण आहे! आमचा देव, विश्‍वाचा सार्वभौम प्रभू असताना देखील, त्याच्या बुद्धिमान सृष्टीसोबत व्यवहार करताना तो लीनता प्रदर्शित करतो. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ असू शकतो. “जो आकाश व पृथ्वी ह्‍यांचे अवलोकन करण्यास लवतो, . . .तो कंगालास धुळीतून उठवतो.” (स्तोत्रसंहिता ११३:६, ७) त्याच्या महान दयेमुळे, मानवजातीला दिलेल्या महान देणगीच्या, म्हणजे त्याचा प्रिय पुत्र, येशू ख्रिस्ताच्या बहुमोल खंडणी यज्ञार्पणाच्या आधारावर तो आमच्या कमकुवतपणाला क्षमा करतो. या अपात्री कृपेबद्दल आम्ही किती कृतज्ञ असले पाहिजे!

१६. बांधव, मंडळीतील विशेषाधिकारांना कसे प्राप्त करू शकतात?

१६ येशू स्वतः आम्हाला याची आठवण करून देतो: “जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.” (मत्तय २३:१२) लीनतेने बाप्तिस्माप्राप्त बांधवांनी ख्रिस्ती मंडळीतील जबाबदाऱ्‍या मिळवल्या पाहिजेत. तथापि, पर्यवेक्षकांनी त्यांच्या नियुक्‍तीकडे, प्रतिष्ठेचे चिन्ह या दृष्टीने पाहू नये, तर येशू प्रमाणे त्यांनी, कार्य करण्याच्या सुसंधीसारखे, लीनतेने, गुणग्राहकतेसह, आवेशाने पाहिले पाहिजे, येशूने म्हटले: “माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे.”—योहान ५:१७; १ पेत्र ५:२, ३.

१७. आम्ही सर्वांनी कशाची गुणग्राहकता बाळगली पाहिजे व कोणत्या कार्याकडे निरवले गेले पाहिजे?

१७ आम्ही, यहोवाच्या दृष्टीत मातीपेक्षा अधिक नाहीत, याविषयी नेहमी लीनतेने व प्रार्थनापूर्वक गुणग्राहकता बाळगू या. मग आम्ही किती आनंदी असले पाहिजे की, “परमेश्‍वराची [यहोवा, न्यूव.] दया त्याचे भय धरणाऱ्‍यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो”! (स्तोत्रसंहिता १०३:१४, १७) यास्तव आम्ही सर्वांनीच देवाच्या वचनाचे उत्सुक विद्यार्थी असले पाहिजे. वैयक्‍तिक व कौटुंबिक अभ्यासात तसेच मंडळीच्या सभांमध्ये व्यतित केलेला वेळ, प्रत्येक आठवड्यात खर्च केलेल्या वेळेमधील तो खास बहुमोलाचा असला पाहिजे. याप्रकारे आम्ही, ‘परम पवित्राविषयीच्या ज्ञानात’ वाढ करतो. हीच ‘समज’ होय.—नीतीसूत्रे ९:१०.

“आपल्या सर्व मार्गात . . .”

१८, १९. आम्ही आमच्या जीवनात नीतीसूत्रे ३:६ चा अवलंब कसा करू शकतो, आणि कोणत्या परिणामासह?

१८ आम्हाला, ईश्‍वरी समजेचा उगम, यहोवाकडे निर्देशित करताना नीतीसूत्रे ३:६ पुढे सांगते: “तू आपल्या सर्व मार्गांत त्याला ओळख, म्हणजे तो तुझ्या वाटा नीट करील.” (पं. रमाबाई भाषांतर) यहोवाला ओळखण्यामध्ये, प्रार्थनेत त्याच्या निकट राहण्याचा समावेश होतो. आम्ही कोठेही असलो व कोणतीही परिस्थिती उद्‌भवली तरी, प्रार्थनेद्वारे आम्ही लगेच त्याच्याजवळ जाऊ शकतो. आम्ही आमचे नित्याचे काम करताना, क्षेत्र सेवेची तयारी करताना, घरोघरी जाऊन त्याच्या राज्याची घोषणा करतो तेव्हा, आमच्या कार्यावर तो आशीर्वाद देईल ही आमची सातत्याने प्रार्थना असू शकते. यास्तव, आम्हाला अंदाज करता न येण्याजोगे विशेषाधिकार व ‘देवाबरोबर चालण्याचा’ आनंद मिळू शकतो, व देवभीरू हनोख, नोहा, आणि यहोशवा व दानिएलासारख्या विश्‍वासू इस्राएलांप्रमाणे, तो ‘आमच्या वाटा नीट करील’ हा आम्हाला आत्मविश्‍वास असू शकतो.—उत्पत्ती ५:२२; ६:९; अनुवाद ८:६; यहोशवा २२:५; दानीएल ६:२३; तसेच याकोब ४:८, १० हेही पाहा.

१९ आम्ही आमच्या विनवण्या यहोवाला सांगतो तेव्हा, आम्हाला हा आत्मविश्‍वास आहे की, ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.’ (फिलिप्पैकर ४:७) देवाने दिलेली ही शांती, आनंदी उत्तेजनाद्वारे प्रदर्शित होत असल्यामुळे, आमचा संदेश, प्रचारकार्यात भेटलेल्या घरमालकाच्या आवडीचा बनवू शकते. (कलस्सैकर ४:५, ६) आजच्या जगात असलेला सर्वसाधारण तणाव किंवा अन्यायामुळे पीडित झालेल्या लोकांना देखील तो उत्तेजन देऊ शकतो, हे खालील अहवालावरून दिसू शकते.d

२०, २१. (अ) यहोवाच्या साक्षीदारांच्या सचोटीमुळे, नाझी दहशतीच्या दरम्यान, इतरांना कसे उत्तेजन मिळाले? (ब) यहोवाच्या आवाजाने आम्हामध्ये कोणता निश्‍चय जागृत केला पाहिजे?

२० स्वाभाविक यहुदी असलेले मॉक्स्‌ लिबस्टर, संपूर्ण नाशातून जणू चमत्कारीकरित्या बचावले, त्यांनी नाझी निर्मूलन छावण्याकडील प्रवासाचे वर्णन या शब्दांमध्ये केले: “आगगाडीला असलेल्या उतारुंच्या डब्यांचे रुपांतर दोन व्यक्‍तींसाठी केलेल्या अनेक लहान लहान कप्प्यांच्या खोल्यांमध्ये आम्हाला बंद केले होते. लाथेचा प्रहार बसून मी त्यापैकीच्या एकात आलो तेव्हा, एका कैद्याच्या डोळ्यातील प्रसन्‍नता पाहिली. देवाच्या नियमाला आदर दाखवल्यामुळे व इतर लोकांचे रक्‍त सांडण्यापेक्षा, तुरूंग व संभवनीय मरण त्याने पत्करले होते. तो यहोवाचा एक साक्षीदार होता. त्याच्याकडून त्याच्या मुलांना हिरावून घेतले होते तसेच पत्नीला शिक्षा ठोठावली होती. व त्यालाही शिक्षा दिली जाईल अशी तो अपेक्षा करत होता. १४-दिवसांच्या प्रवासानंतर माझ्या प्रार्थनांना उत्तर मिळाले, मृत्यूकडे नेणाऱ्‍या या प्रवासामध्येच मला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली.”

२१ त्याने “सिंहाची गुहा,” अशी उपमा दिलेल्या नाझी छळ-छावणीचा अनुभव घेतल्यावर तसेच त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर त्याने पूर्वी तुरुंगामध्ये असलेल्या एका बहिणीसोबत विवाह केला. तिच्या वडिलांना डॉकाव येथील छळ-छावण्यात त्रास सहन करावा लागला होता. तिचे वडील तेथे असताना, त्याच्या पत्नी व मुलीला देखील अटक केल्याचे त्यांनी ऐकले. त्यांच्या प्रतिक्रियेचे वर्णन त्यांनी केले: “मी फारच काळजीत पडलो. मग एके दिवशी, अंघोळीसाठी असलेल्या रांगेमध्ये थांबलो असताना, नीतीसूत्रे ३:५, ६ . . . वचन उद्धृत करताना मी ऐकले. ते स्वर्गातून आलेल्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकल्यासारखे होते. माझा तोल सांभाळण्यासाठी त्याचीच तर मला आवश्‍यकता होती.” त्या वचनाला उद्धृत करणारा तो आवाज दुसऱ्‍या एका कैद्याचा होता, परंतु ती घटना, देवाचे वचन आमच्यावर किती प्रभाव पाडते हे स्पष्ट करते. (इब्रीयांस ४:१२) आज, आमच्या १९९४ च्या वार्षिक वचनाद्वारे यहोवाचा आवाज अधिक जोरदारपणे बोलो: “संपूर्ण अंतःकरणाने यहोवावर भाव ठेव”!

[तळटीपा]

a “ट्रस्टींग जेहोवा विथ ऑल माय हार्ट,” हे क्लॉड एस. गुडमॅन यांनी केलेले कथन, द वॉचटावर, डिसेंबर १५, १९७३, पृष्ठे ७६०-५ वर पाहा.

b “डिटरमाइन्ड टू प्रेज जेहोवा,” हा वॉचटावर जुलै १५, १९६८ च्या ४३७-४० पृष्ठांवरील हॅरी पीटरसन यांनी कथन केलेला लेख पहा.

c “जेहोवा डज नॉट फोरसेक हिज सर्व्हंट्‌स,” मॉटस्वू इश्‍ही यांचे वॉचटावर मे १, १९८८ च्या २१-५ पृष्ठांवरील कथन पहा.

d “डिलिव्हरन्स! प्रुर्व्हिग आवरसेल्वस्‌ ग्रेटफूल,” वॉचटावर ऑक्टोबर १, १९७८ च्या २०-४ पृष्ठांवरील मॉक्स्‌ लिबस्टर यांचे कथन पाहा.

सारांशात

▫ नीतीसूत्रात कोणत्या प्रकारचा सल्ला प्रस्तुत केला आहे?

▫ आम्हाला, यहोवावरील भावाचा लाभ कसा होतो?

▫ यहोवावर विसंबून राहण्यात काय गोवलेले आहे?

▫ आमच्या सर्व मार्गात आम्ही, यहोवाला का ओळखले पाहिजे?

▫ यहोवा आमच्या वाटा कशा नीट करतो?

[२१ पानांवरील चित्रं]

प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना, आनंददायक राज्याचा संदेश आकर्षित करतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा