खोट्या संदेशवाहकांना शांती नाही!
“दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:९, ११.
१. ‘अंतसमयात’ खरे आणि खोटे असे दोन्ही प्रकारचे संदेशवाहक आढळण्याची आपण अपेक्षा का केली पाहिजे?
संदेशवाहक—खोटे की खरे? बायबल काळात दोन्ही प्रकारचे संदेशवाहक होते. आणि आपल्या दिवसांमध्ये? दानीएल १२:९, १० [NW] मध्ये आपण वाचतो की एका स्वर्गीय संदेशवाहकाने देवाच्या संदेष्ट्यांस असे सांगितले: “अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करितील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करितील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण सूक्ष्मदृष्टी असलेल्यांना ते समजेल.” आपण आता ‘अंतसमयात’ जगत आहोत. “दुर्जन” आणि “सूक्ष्मदृष्टी” यांमध्ये आपल्याला स्पष्ट फरक दिसतो का? होय, दिसतो!
२. आज यशया ५७:२०, २१ ची पूर्णता कशी होत आहे?
२ यशया अध्याय ५७ च्या २० आणि २१ वचनात आपण देवाचा संदेशवाहक यशयाचे शब्द वाचतो: “दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत; त्यांच्याने स्थिर राहवत नाही, त्याच्या लाटा [सागरी शैवाळ] व गाळ बाहेर टाकितात. दुर्जनांस शांति नाही असे माझा देव म्हणतो.” किती योग्य प्रकारे हे शब्द, २१ व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या जगाचे वर्णन करतात! काही तर असेही विचारतात, ‘आपण त्या शतकापर्यंत तरी पोहंचू का?’ सूक्ष्मदृष्टी असलेल्या संदेशवाहकांना याबद्दल आपल्याला काय सांगायचे आहे?
३. (अ) १ योहान ५:१९ मध्ये कोणत्या विपरित गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत? (ब) प्रकटीकरण ७ व्या अध्यायात “सूक्ष्मदृष्टी” असलेल्या व्यक्तींचे वर्णन कसे करण्यात आले आहे?
३ प्रेषित योहानाकडे ईश्वरप्रेरित सूक्ष्मदृष्टी होती. १ योहान ५:१९ मध्ये असे म्हटले आहे: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” या जगापासून वेगळे, १,४४,००० आध्यात्मिक इस्राएली आहेत, त्यांपैकी वृद्ध होत चाललेला शेष पृथ्वीवर अजूनही हयात आहे. यांना, ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारा मोठा लोकसमुदाय’ सामील झाला आहे ज्याची संख्या आज ५० लाखापेक्षा अधिक आहे व त्याच्याकडे देखील सूक्ष्मदृष्टी आहे. हा समुदाय “मोठ्या संकटातून” आलेला आहे. त्यांना प्रतिफळ का दिले जाते बरे? कारण त्यांनी देखील येशूच्या खंडणीवर विश्वास प्रकट करून “आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” प्रकाशाचे संदेशवाहक या नात्याने तेही ‘अहोरात्र देवाची पवित्र सेवा करत आहेत.’—प्रकटीकरण ७:४, ९, १४, १५.
शांतीचे तथाकथित संदेशवाहक
४. (अ) सैतानी जगातील तथाकथित शांतीचे संदेशवाहक अपयशीच ठरतील असे का? (ब) इफिसकर ४:१८, १९ आज कसे लागू होते?
४ परंतु, सैतानाच्या जगिक व्यवस्थेतील शांतीच्या तथाकथित संदेशवाहकांबद्दल काय? यशयाच्या ३३ अध्यायाच्या ७ व्या वचनात आपण वाचतो: “पाहा, त्यांचे वीर बाहेर रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे स्फुंदून स्फुंदून रडत आहेत.” शांती आणण्याच्या प्रयत्नात या सरकाराकडून त्या सरकाराकडे धडपड करणाऱ्यांच्या बाबतीत हे किती खरे आहे! किती निष्फळ प्रयत्न! का बरे? कारण ते त्रस्त जगाची मूळ कारणे शोधण्याऐवजी लक्षणांशी झटापट करत असतात. पहिली गोष्ट म्हणजे, ‘युगाचे दैवत’ असे प्रेषित पौलाने ज्याचे वर्णन केले त्या सैतानाचे अस्तित्व त्यांना दिसत नाही. (२ करिंथकर ४:४) सैतानाने मानवजातीमध्ये दुष्टाईचे बी पेरले आहेत ज्यामुळे पुष्कळशा लोकांना तसेच अनेक शासकांना इफिसकर ४:१८, १९ मधील वर्णन लागू होते: “त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत, ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वत:ला कामातुरपणास वाहून घेतले आहे.”
५. (अ) मानवी संघटना समेट घडवून आणण्यात अपयशी का ठरत आहेत? (ब) स्तोत्र ३७ कोणता सांत्वनदायक संदेश देते?
५ अपूर्ण मानवांची कोणतीही एजेन्सी मानवी हृदयांतून, आज सर्वत्र दिसणारा लोभ, स्वार्थीपणा आणि द्वेष यांचे उच्चाटन करू शकत नाही. केवळ आपला सृष्टीकर्ता, सार्वभौम प्रभू यहोवाच करू शकतो! याशिवाय, मानवजातीपैकी फार कमी नम्र लोकच त्याच्या मार्गदर्शनाच्या अधीन होऊ इच्छितात. अशांना व जगाच्या दुष्ट लोकांना कोणते प्रतिफळ मिळेल त्यातील फरक स्तोत्र ३७:९-११ मध्ये दाखवण्यात आला आहे: “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”
६, ७. जगाच्या धर्मांचा कोणता रेकॉर्ड दाखवून देतो की ते शांतीचे संदेशवाहक म्हणून अपयशी ठरले आहेत?
६ मग, या त्रस्त जगाच्या धर्मांमध्ये आपल्याला शांतीचे संदेशवाहक सापडतील का? आजपर्यंत धर्माने कोणते नाव कमावले आहे? इतिहास दाखवतो, की धर्माने अनेक शतकांपासून रक्तपातात भाग घेतला आहे, एवढेच नव्हे तर रक्तपात घडविण्यास प्रोत्साहन देखील दिले आहे. उदाहरणार्थ, भूतपूर्व युगोस्लाव्हियातील दंगलीचा अहवाल देणाऱ्या ख्रिस्ती शतक (इंग्रजी) नामक ऑगस्ट ३०, १९९५ च्या साप्ताहिकाने म्हटले: “सर्बांचा कब्जा असलेल्या बोस्नियात, पाळक लोक स्वयंरचित संसदेच्या पहिल्या रांगेत बसतात तसेच, तुकड्यांवर आणि युद्धे सुरु होण्याआधी शस्त्रांवर आशीर्वाद दिला जातो त्या दर्शनी भागातही ते असतात.”
७ र्वांडा, ८० टक्के कॅथलिक असा नावलौकिक असलेल्या या ठिकाणी दिसले त्यावरून म्हणता येते, की आफ्रिकेतील एका शतकापासूनच्या ख्रिस्ती धर्मजगताच्या मिशनरी कार्यामुळे काहीच चांगले प्रतिफळ मिळालेले नाही. जुलै ७, १९९५ च्या द न्यूयॉर्क टाइम्सने असा अहवाल दिला: “लिआँ [फ्रान्स] येथे प्रकाशित केले जाणारे गोल्यॉ नामक एका खुल्या मनाचे, सामान्य कॅथलिकांचे मासिक, आणखी २७ र्वांडन पाळकांची व चार नन्सची नावे सांगू इच्छिते ज्यांनी या नियतकालिकाच्या म्हणण्याप्रमाणे गत वर्षी र्वांडात घडलेल्या संहारात भाग घेतला अथवा त्याला प्रोत्साहन दिले.” लंडनमधील आफ्रिकन राईट्स नामक मानवी हक्कांच्या एका संघटनेने म्हटले: “शांत राहिल्याबद्दल जबाबदार असण्याव्यतिरिक्त, जातियसंहारात काही पाळकांनी, धर्मोपदेशकांनी व नन्सनी घेतलेल्या सक्रिय भागाबद्दलही चर्चेस आणखी जबाबदार आहेत.” हे इस्राएलमधील परिस्थितीच्या साम्यतेत आहे जेव्हा यहोवाच्या खऱ्या संदेशवाहकाने अर्थात यिर्मयाने इस्राएल, तिचे शासक, याजक आणि संदेष्टे, यांच्या ‘लज्जेचे’ वर्णन करीत म्हटले: “निर्दोष, दीन जनांच्या जिवांचे रक्त तुझ्या अंगावरील वस्त्रात सापडले आहे.”—यिर्मया २:२६, ३४.
८. यिर्मया शांतीचा संदेशवाहक होता असे का म्हणता येऊ शकते?
८ यिर्मयास बहुतेक वेळा नाशाचा संदेष्टा संबोधण्यात आले आहे पण त्याला देवाचा शांतीचा संदेशवाहकही संबोधण्यात येऊ शकते. त्याच्या आधी यशयाने जितक्यांदा शांतीचा उल्लेख केला तितक्यांदा त्यानेही केला. जेरुसलेमवर न्यायदंड घोषित करण्यासाठी यहोवाने यिर्मयाद्वारे म्हटले: “हे नगर त्यांनी बांधिले तेव्हापासून आजवर माझा क्रोध व संताप चेतविण्यास हे कारण झाले, येथवर की ते मी आपल्या दृष्टीसमोरून काढून टाकावे. इस्राएलाचे वंशज व यहूदाचे वंशज म्हणजे ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे, यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी यांनी मला चिडवावे म्हणून जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे मी असे करीन.” (यिर्मया ३२:३१, ३२) हे आज शासकांवरील तसेच ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांवरील यहोवाच्या न्यायदंडाला पूर्वसूचित करते. सर्वत्र खरी शांती टिकून राहण्याकरता दुष्टाई व हिंसा भडकवणाऱ्यांना काढणे आवश्यक आहे! ते मुळीच शांतीचे संदेशवाहक नाहीत.
युएन समेट घडवून आणणार?
९. कशाप्रकारे युएनने शांतीचा संदेशवाहक होण्याचा दावा केला आहे?
९ संयुक्त राष्ट्रसंघ शांतीचा खरा संदेशवाहक होऊ शकेल का? नाहीतरी, जून १९४५ मध्ये सनदेत सादर केलेल्या प्रस्तावनेत, अणु बॉम्बद्वारे हिरोशिमाला उद्ध्वस्त करण्याच्या केवळ ४१ दिवसांआधी, “येणाऱ्या पिढ्यांना युद्धाच्या अरिष्टांतून वाचवणे,” हा आपला उद्देश व्यक्त केला होता.” संयुक्त राष्ट्रसंघाच्या ५० भावी सदस्यांना “आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्याकरता [आपली] शक्ती एकवटायची होती.” आज, युएनमध्ये १८५ सदस्य राष्ट्रे आहेत आणि ह्या सर्वांचा एकच उद्देश आहे.
१०, ११. (अ) धार्मिक नेत्यांनी युएनला आपला पाठिंबा कसा दर्शवला आहे? (ब) पोपने ‘देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा’ विपर्यास कसा केला आहे?
१० अनेक वर्षांपासून, युएनची वाहवा केली जाते खासकरून धार्मिक नेत्यांकडून. एप्रिल ११, १९६३ रोजी, पोप जॉन २३ वे यांनी, “पॉकेम इन टेरीस” (पृथ्वीवर शांती) नामक आपल्या विश्वपत्रावर सही केली ज्यात त्यांनी असे म्हटले होते: “संयुक्त राष्ट्र संघटना—घडण आणि साधन यांच्यासह—आपले महत्त्व व आपली थोरवी टिकवून ठेवण्यास समर्थ होवो अशी आमची उत्कट इच्छा आहे.” त्यानंतर, जून १९६५ मध्ये, जणू काय जगाच्या एक द्वितीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या धार्मिक नेत्यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोत युएनचा २० वा वर्धापन दिन साजरा केला. तसेच, १९६५ मध्ये, युएनला भेट देताना पोप पॉल ६ वे यांनी, “शांती व समेटाची शेवटची आशा” असे युएनचे वर्णन केले. १९८६ मध्ये, पोप जॉन पॉल २ रे यांनी, युएन आंतरराष्ट्रीय शांती वर्ष म्हणून घोषित करण्यासाठी सहकार्य दिले.
११ पुन्हा एकदा, ऑक्टोबर १९९५ मध्ये पोप यांनी आपल्या भेटीदरम्यान असे जाहीर केले: “आज आपण देवाच्या राज्याची सुवार्ता साजरी करीत आहोत.” पण, ते खरोखरच राज्य सुवार्तेचे देवाचे संदेशवाहक आहेत का? जगिक समस्यांबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले: “या प्रचंड आव्हानांना आपण सामोरे जात असताना, संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका कबूल करण्याचे आपण टाळू शकतो का?” पोपने देवाच्या राज्याऐवजी युएनला निवडले.
‘स्फुंदून स्फुंदून रडण्याची’ कारणे
१२, १३. (अ) युएन यिर्मया ६:१४ मध्ये सांगितल्याप्रमाणे कसे वागले आहे? (ब) यशया ३३:७ मधील वर्णनामध्ये युएनच्या नेतृत्वाचा समावेश का केला जातो?
१२ युएनची ५० वी जयंती साजरी केल्यामुळे ‘पृथ्वीवर शांती’ येण्याची कोणतीही खरी आशा प्रकट झाली नाही. कॅनडाच्या द टोरान्टो स्टार च्या लेखकाने एक कारण सूचित केले, त्याने लिहिले: “यु.एन. एका बोळक्या सिंहासारखे आहे, मानवी रानटीपणा समोर येतो तेव्हा ते गर्जना करते पण चावण्याआधी, आपल्या सदस्यांकडून आपली बचाळी लावून घेईपर्यंत त्याला थांबावे लागते.” बहुतेक वेळा तो चावा इतका कडकडून नसतो व उशिरा असतो. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील आणि खासकरून ख्रिस्ती धर्मजगतातील शांतीचे संदेशवाहक यिर्मया ६:१४ मधील शब्दांना पुनः उच्चारत आहेत: “शांतीचे नाव नसता शांति शांति असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करितात.”
१३ युएनचे अनुक्रमे सेक्रेटरी जनरल यांनी युएनला यशस्वी होण्याकरता प्रामाणिकपणे खूप कष्ट घेतले आहेत यात काही शंका नाही. परंतु, युद्धावर नियंत्रण कसे ठेवावे, धोरण कसे योजावे व पैशांची हाताळणी कशी करावी यावर १८५ बहुउद्देशीय सदस्यांमध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे यश मिळण्याची आशाच दिसत नाही. १९९५ च्या आपल्या वार्षिक अहवालात, भूतपूर्व सेक्रेटरी जनरलने, “विश्वव्यापी आण्विक विनाशाची घोर चिंता” कमी होत चालली आहे याचाच अर्थ, “राष्ट्रांनी एकत्र मिळून संपूर्ण मानवजातीच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी” मार्ग खुला होत आहे असे लिहिले. परंतु, ते पुढे म्हणाले: “दुःखाची गोष्ट अशी, की गेल्या काही वर्षांच्या जागतिक व्यवस्थेच्या अहवालाने या आशावादी अपेक्षांना मोठ्या प्रमाणात खोटे ठरवले आहे.” खरेच, शांतीचे तथाकथित संदेशवाहक ‘स्फुंदून स्फुंदून रडत’ आहेत.
१४. (अ) युएन आर्थिकरीत्या आणि नैतिकरीत्या दिवाळखोर आहे असे का म्हणता येते? (ब) यिर्मया ८:१५ ची कशी पूर्तता होत आहे?
१४ कॅलिफोर्नियाच्या द ऑरेंज काउन्टी रेजिस्टर मधील ठळक मथळा असा होता: “यु.एन. आर्थिकरीत्या, नैतिकरीत्या दिवाळखोर आहे.” त्या लेखाने म्हटले, की १९४५ व १९९० च्या दरम्यान ८० युद्धे झाली ज्याने तीन कोटी लोकांचे प्राण घेतले. त्याने रिडर्स डायजेस्ट ऑक्टोबर १९९५ अंकाच्या एका लेखकाचे बोल उद्धृत केले ज्याने “यु.एन. सैनिकी कार्याचे वर्णन, ‘अक्षम कमांडर्स, बेशिस्त सैनिक, आक्रमकांसोबत सख्यसंबंध, अत्याचार टाळण्यात अपयशी आणि काही वेळा तर भयानकतेला हातभार लावणारे’ अशी गुणलक्षणे असणारे केले. याशिवाय, ‘उधळण, लबाडी आणि दुरुपयोग यांचे प्रमाण जबरदस्त आहे.’” द न्यूयॉर्क टाइम्स मधील “५० वर्षांचे यु.एन.” या शीर्षकाखालील एका विभागात, “गैरव्यवस्था आणि उधळण यु.एन.च्या चांगल्या हेतूंना संपुष्टात आणतात” हा ठळक मथळा होता. इंग्लंड, लंडनच्या द टाइम्स मधील एका लेखाचा हा मथळा होता, “पन्नासाव्या वर्षात अशक्त—आपला डौल पुन्हा प्राप्त करण्याकरता युएनला फिटनेस प्रोग्रॅमची आवश्यकता आहे.” वास्तविक पाहता, ते यिर्मया ८ व्या अध्यायाच्या १५ व्या वचनात आपण जे वाचतो त्याप्रमाणे आहे: “शांतीची अपेक्षा करितो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी.” तसेच, आण्विक नाशाच्या भीतीची टांगती तलवार अजूनही मानवजातीच्या डोक्यावर लटकत आहे. स्पष्टपणे, युएन मानवजातीला हवा असलेल्या शांतीचा संदेशवाहक नाही.
१५. प्राचीन बॅबिलोन आणि त्याची धार्मिक संतती नाशकारक आणि गुंगी आणणारे कसे शाबीत झाले आहे?
१५ या सर्वाचा परिणाम काय होईल? यहोवाचे भविष्यसूचक वचन याविषयी अगदी स्पष्ट आहे. युएनच्या गळ्यात गळा घालणाऱ्या जगाच्या खोट्या धर्मांचे काय होणार आहे बरे? ते सर्व प्राचीन बॅबिलोन अर्थात एकाच मूर्तिपूजक उगमापासून आलेले आहेत. अगदी उचितपणे प्रकटीकरण १७:५ मध्ये त्यांचे वर्णन, “मोठी बाबेल, कलावंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” असे केले आहे. यिर्मयाने या एकूण दांभिकतेच्या न्यायदंडाचे वर्णन दिले. वेश्येसारखे त्यांनी पृथ्वीच्या राजकारण्यांना फसवले आहे, युएनची खोटी स्तुती केली आहे व सदस्य राजकीय सत्तांसोबत बेकायदेशीर नातेसंबंध प्रस्थापित केले आहेत. इतिहासातील युद्धांमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. भारतातील धार्मिक युद्धासंबंधाने एका विवेचनकर्त्याने म्हटले: “कार्ल मार्क्स यांनी धर्माला लोकांचा अफू असे म्हटले आहे. परंतु, हे विधान अगदीच बरोबर आहे असे म्हणता येणार नाही कारण अफू कमजोर करणारा आहे व लोकांना गुंगी आणतो. उलट, धर्म क्रॅक कोकेन सारखा आहे. तो प्रचंड प्रमाणात हिंसेला वाट करून देतो व त्यामध्ये खूपच नाशकारक शक्ती आहे.” या लेखकाचेही बरोबर नाही. खोटा धर्म गुंगी आणणारा आणि नाशकारक दोन्ही आहे.
१६. प्रामाणिक अंतःकरण असलेल्या लोकांनी आता मोठ्या बाबेलमधून पळ का काढला पाहिजे? (प्रकटीकरण १८:४, ५ सुद्धा पाहा.)
१६ तेव्हा, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी काय करावे? देवाचा संदेशवाहक यिर्मया आपल्याला त्याचे उत्तर देतो: “बाबेलातून पळून जा, तुम्ही आपआपले जीव वाचवा; . . . कारण परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे.” खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, मोठी बाबेल हिच्या बंदिवासातून लाखोंनी पळ काढल्यामुळे आपण खूष आहोत. तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का? मग, तुम्हाला मोठ्या बाबेलीने पृथ्वीवरील राष्ट्रांवर आपला प्रभाव कसा पाडला ते समजेल: “राष्ट्रे [तिच्याकडील] द्राक्षारस प्याली म्हणून ती वेडी झाली आहेत.”—यिर्मया ५१:६, ७.
१७. मोठ्या बाबेलवर कोणता न्यायदंड बजावला जाणार आहे व त्यानंतर काय घडणार आहे?
१७ लवकरच, खोट्या धर्मावर हल्ला करण्यासाठी यहोवा युएनच्या ‘वेड्या’ सदस्यांचा चतुराईने उपयोग कसा करील याबद्दलचे वर्णन प्रकटीकरण १७:१६ अशाप्रकारे करते: “ती कलावंतिणीचा द्वेष करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” हे, मत्तय २४:२१ मध्ये वर्णिलेल्या मोठ्या संकटाच्या प्रारंभाला चिन्हित करेल व हे संकट हर्मगिदोनात, म्हणजेच सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईत कळसास पोहंचेल. प्राचीन बॅबिलोनप्रमाणे, मोठ्या बाबेलवर देखील यिर्मया ५१:१३, २५ मध्ये घोषित करण्यात आलेला न्यायदंड बजावला जाईल: “हे बहुत जलप्रवाहांजवळ राहणाऱ्या, समृद्ध भांडारे असलेल्या, तुझा अंतसमय आला आहे, तुझ्या मिळकतीस आळा बसला आहे. हे सर्व पृथ्वीचा नाश करणाऱ्या विध्वंसगिरी पाहा, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर उगारीन, तुझा कडेलोट करीन, जळून कोळ झालेल्या पर्वतासमान मी तुला करीन.” यहोवाच्या सूड उगवण्याच्या दिवशी खोट्या धर्माच्या नाशानंतर, भ्रष्ट, युद्धखोर राष्ट्रांचाही नाश केला जाईल.
१८. यशया ४८:२२ ची पूर्णता कधी व कशी व्हायची आहे?
१८ दुष्टांबद्दल १ थेस्सलनीकाकर ५:३ मध्ये असे म्हटले आहे: “शांति आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात् वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात् नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.” यांच्याविषयीच यशयाने लिहिले होते: “पाहा, . . . शांतीचा संदेश आणणारे स्फुंदून स्फुंदून रडत आहेत.” (यशया ३३:७) होय, यशया ४८:२२ मध्ये आपण वाचतो त्याप्रमाणे, “परमेश्वर म्हणतो, दुर्जनास शांती नसते.” पण, ईश्वरी शांतीच्या खऱ्या संदेशवाहकांसाठी कोणते भवितव्य राखून ठेवले आहे? आमचा पुढील लेख ते सांगेल.
उजळणीकरता प्रश्न
◻ देवाच्या संदेष्ट्यांनी कोणत्या कडक शब्दांनी खोट्या संदेशवाहकांचे बिंग बाहेर काढले?
◻ मानवी संघटना कायमची शांती आणण्याच्या प्रयत्नात अपयशी का ठरत आहेत?
◻ शांतीचे खरे संदेशवाहक युएनच्या समर्थकांच्या विरोधात कसे आहेत?
◻ यहोवाने अभिवचन दिलेल्या शांतीचा आनंद उपभोगण्याकरता नम्र लोकांनी काय करणे आवश्यक आहे?
[१५ पानांवरील चित्र]
यशया, यिर्मया आणि दानीएल या सर्वांनी शांती आणण्याचे मानवी प्रयत्न अपयशी ठरतील याविषयी भाकीत केले होते
[१६ पानांवरील चित्र]
“सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”—प्रेषित योहान
[१७ पानांवरील चित्र]
“त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे.” —प्रेषित पौल