राजाच्या आज्ञा काळजीपूर्वक अनुसरणे
“मी तुझ्या विधींचे मनन करीन तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन. मी तुझे वचन विसरावयाचा नाही.”—स्तोत्रसंहिता ११९:१५, १६.
१. प्रत्येकजण व प्रत्येक वस्तु यहोवाच्या आज्ञेखाली का आहे?
सर्वसमर्थ देव, सार्वकाळचा राजा यहोवा याच्या आज्ञेखाली प्रत्येकजण व प्रत्येक गोष्ट येते. त्यानेच विश्वाची निर्मिती केली आहे. तो सर्व जीवनाचा उगम आहे. त्यानेच पृथ्वीची रचना करून तिला वस्तीसाठी योग्य बनविली. तो सुव्यवस्थेचा देव आहे आणि आपले निर्बंध लागू करण्याद्वारे त्याच्या सर्व निर्मितीत सुव्यवस्था राखण्यात येईल.—स्तोत्रसंहिता ३६:९; यशया ४५:१८; प्रकटीकरण १५:३.
२. चांदण्याच्या प्रकाशाने युक्त असणाऱ्या आकाशावर कोण ताबा ठेऊन आहे व कसा?
२ यहोवा देवानेच, चांदण्याच्या प्रकाशाने युक्त असणाऱ्या आकाशाला पृथ्वीच्या वर तंबूच्या छताप्रमाणे पसरण्याची आज्ञा केली. त्याने आपल्या लोकांना हे निमंत्रण देऊन म्हटले: “आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वांस नावांनी हाका मारितो.” यहोवानेच इयोबाला असे विचारले होते: “आकाश मंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय? पृथ्वीवर त्याची सत्ता तुला नेमून देता येईल काय?” गुरुत्वाकर्षण व गति या विषयी त्याने घालून दिलेल्या नियमामुळेच लाखो आकाशगंगा व त्यातील करोडो तारे संघटीत ठेवण्यात आले आहेत आणि तोच नियम, पृथ्वी अंतराळातून भ्रमण करीत असता तिच्यावर प्रभुत्व राखून आहे.—यशया ४०:२६; इयोब ३८:३३.
३. कोणाच्या आज्ञेमुळे प्राणी बचावून राहतात, पण त्यांनी आज्ञा मानली नाही तर काय होईल?
३ पृथ्वीवर हिरव्या गालीचाचे आच्छादन करण्यासाठी तोच हिरव्या वनस्पती फुलवितो. त्याच्याच आज्ञेमुळे बीजांना अंकुर फुटतो त्याची वाढ होते व पुनर्निमिती देखील होते. सबंध पृथ्वीभरात—ध्रुवप्रदेश ते उष्णकटिबंधातील वने, वातावरणात अगदी उंचीत ते जमिनीत खोल खाली, समुद्राचा पृष्ठभाग ते त्याचा अंधारी तळ—या सर्व ठिकाणी पशुजीवन हे मुबलकपणे व विविधतेत आढळते. जिवंत राहण्यासाठी अमर्याद अशा विविध जातींनी यहोवाने आज्ञापिले तसे राहावयास हवे. उपजत बुद्धीकरवी त्याने त्या मध्ये आपल्या बचावाकरता त्याचे नियम घालून दिले. “ते उपजतरित्या अत्यंत शहाणे आहेत.” (नीतीसूत्रे ३०:२४) पण तेच अलास्का येथील छोट्या काळ्या पक्ष्याने स्वतःला म्हटले: ‘मी दक्षिण अमेरिकेचा हजारो मैल पल्ल्याचा प्रवास करणार नाही. कशाला करायचा एवढा प्रवास?’ तर काय होईल? तो छोटा पक्षी तेथे गारठून मरून जाईल. पण तो तसे म्हणून दाखविणार नाही. बचावासाठी देशान्तर करण्याचा कार्यक्रम त्यामध्ये आधीच आखून देण्यात आला आहे. हेच इतर सर्व प्राण्यांबाबत घडते. यहोवा या त्यांच्या निर्मात्याने ज्या आज्ञा त्यांच्यामध्ये रूजविल्या आहेत त्यांचे हे प्राणी उपजतरित्या पालन करतात. त्यांना दुसरी अशी निवड नसतेच.
४. लोकांपुढे कोणती निवड आहे व त्याचा कोणता परिणाम घडतो?
४ परंतु मानवाची स्थिती वेगळी आहे. आमची निर्मिती देवाच्या स्वरूपात झालेली आहे त्यामुळे आम्हाला निवड आहे. यहोवाने आमच्या बुद्धीत उपजतरित्या सूज्ञपणे वागण्याचा कार्यक्रम बसविलेला नसला तरी त्याने आम्हाला अजाण सोडले नाही. पवित्रशास्त्र या आपल्या वचनाकरवी तो आम्हाला जीवनप्राप्तीकरता आपल्या आज्ञ कळवितो. राजाच्या या आज्ञा आम्ही काळजीपूर्वक अनुसरल्या तर आम्ही जिवंत राहू शकू. आम्हाला लाभलेल्या स्वातंत्र्याच्या आधारावर आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व आपल्याला मुक्त वाटणाऱ्या मार्गाची निवड केली तर आम्ही मरू. बचावासाठी आपल्यालाच स्वतःला कार्यक्रम योजिला पाहिजे. इतके हे सोपे आहे. “तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे,” असे स्तोत्रकर्त्याने म्हटले. पण तेच दुसऱ्या बाजूस, “मनुष्याला एक [दुसरा] मार्ग सरळ दिसतो पण तो शेवटी त्याला मृत्यूच्या वाटेला नेतो.” (स्तोत्रसंहिता ११९:१०५; नीतीसूत्रे १४:१२; द न्यू इंग्लीश बायबल) या समाप्तीच्या काळात, स्तोत्रसंहिता ११९:१५, १६ मधील यहोवाला अनुलक्षून काढलेले उद्गार आम्ही स्वतःचे बनवावे हे अत्यंत जरूरीचे आहे. ते म्हणतात: “मी तुझ्या विधींचे मनन करीन; तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरावयाचा नाही.”
यहोवा, आपल्या लोकांचा संघटक
५. यहोवा कोणत्या अर्थी इस्राएलांचा न्यायधीश, नियमदाता व राजा होता?
५ यहोवाने सीनाय डोंगरावर मोशेसोबत संभाषण करून इस्राएलांच्या मार्गदर्शनार्थ आज्ञा देऊ केल्या. या पैकीच्या उल्लेखनीय अशा दहा आज्ञा होत्या, त्या देवाच्या बोटाने दगडी पाट्यांवर लिहिण्यात आल्या होत्या. (निर्गम २०:१–१७; ३१:१८) इस्राएलांचा नियमदाता यासोबत यहोवा त्यांचा न्यायाधीश होता व त्याने मोशे व वडील जनांमार्फत आपली हालचाल केली. मोशाने त्या वडीलजणांना हे आठवणीत ठेवण्यास सांगितले होते: “न्याय करताना पक्षपात करू नका. लहान मोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या. कोणाचे तोंड पाहून भिऊ नका. कारण न्याय करणे देवाचे काम आहे.” (अनुवाद १:१७) यहोवा त्यांचा राजाहि होता. त्याने या लाखो लोकांना आपली वागणूक चोख ठेवण्यासाठी संघटित केले. या सर्व गोष्टीमुळेच त्याच्या एका संदेष्ट्याने नंतर हे जाहीर केले: “यहोवा आमचा न्यायाधीश आहे. यहोवा आमचा नियमदाता आहे. यहोवा आमचा राजा आहे.”—यशया ३३:२२.
६. यहोवा अरण्यामध्ये इस्राएलांचा संघटक व मार्गदर्शक असल्याचे कसे सिद्ध केले?
६ इस्राएल राष्ट्राचे वंश, कुटुंबे व घराणे यात संघटन करण्यात आले होते. अरण्यातील प्रवासात आगेकूच करताना यहोवाने प्रत्येक वंशाला त्याची जागा नेमून दिली होती. निवासमंडपाभोवती तळ देत तेव्हा प्रत्येक वंशाला त्याची नियुक्त केलेली जागा असे. (गणना २:१–३४; यहोशवा ७:१४) मेघाद्वारे यहोवा त्यांना कूच करण्याची आज्ञा देई. “जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्राएल लोक कूच करीत; आणि तो मेघ जेथे जेथे थांबे तेथे ते तळ देत. यहोवाच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोक कूच करीत व यहोवाच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत.”—गणना ९:१७, १८.
७. इस्राएलांच्या संघटनेमध्ये कोण बदल करू शकत होता व कोणी ते केले?
७ जेव्हा संघटनात्मक बदल जरूरीचे वाटले तेव्हा यहोवाने ते केले. मोशाने तक्रार केली: “मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही. ते मला फारच जड जात आहे.” तेव्हा यहोवाने प्रतिसाद दिला: “तुझ्या माहितीतले इस्राएल लोकांचे जे वडील व अमलदार आहेत त्यांच्यातून सत्तर जण निवडून [घे] . . . तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.” (गणना ११:१४, १६, १७) नंतर लोकांनीच जेव्हा एका मानवी राजाची मागणी केली त्यावेळी सार्वकाळच्या राजाने त्याना धुडकावून लाविले नाही. मानवी राजापाशी यहोवाच्या नियमाची एक प्रत असे. संदेष्ट्यांनी यहोवाचा न्यायदंड घोषित केला. विश्वासू राजे “यहोवाच्या सिंहासनावर” बसत तेव्हा ते देवाकडील कारभारी या अर्थी स्वतःला वागवीत.—१ इतिहास २९:२३; अनुवाद १७:१८; २ राजे १७:१३; यिर्मया ७:२५.
राजाच्या आज्ञेचे अनुकरण करण्याचे परिपूर्ण उदाहरण
८. येशूने यहोवाचे राज्य येण्याविषयीची घोषणा कोठे व कोणत्या परिणामासह केली?
८ वचनयुक्त मसीहा या नात्याने येशूचे आगमन झाले त्यावेळी त्याने आपल्या स्वर्गातील पित्याच्या आज्ञांचे पालन मोठ्या आवेशाने केले. गालीलात मोठ्या उपाध्यपणाचा आरंभ करून तो “घोषणा करीत सांगू लागला की, ‘पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’ नंतर येशू यहुदी लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला. मग गालील, दकापलीस, यरूशलेम, यहुदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यातून लोकांच्या थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले.” (मत्तय ४:१७, २३, २५; योहान २:१७) त्याने सभास्थानापुरते आपले प्रचारकार्य मर्यादित राखले नाही. त्याने राज्याच्या सुवार्तेची घोषणा जेथे जेथे लोक ऐकून घेण्यासाठी सापडत तेथे म्हणजे, मंदीर, समुद्रकिनारा, डोंगराच्या कडा, उघडे माळरान, शहर, खेडी व लोकांची घरे येथे केली. लोक थव्याने त्याच्यापाशी गोळा झाले व त्याचे ‘हर्षाने ऐकत राहिले.’ ते “त्याचे मन लावून ऐकत असत.”—मार्क १२:३७; लूक १९:४८.
९. प्रचार कार्य वाढविण्यासाठी येशूने काय केले व त्याने कोणत्या सूचना दिल्या?
९ आपल्या प्रेषितांना त्याने अधिक कामकऱ्यांची गरज लक्षात आणून दिली. त्यामुळेच त्याने “ह्या बारा जणांस . . . अशी आज्ञा देऊन पाठविले की, ‘परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका; व शोमरोन्यांच्या कोणत्याहि नगरात प्रवेश करू नका. तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा, जात असताना अशी घोषणा करीत जा की, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा व तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. आणि घरात जाताना, “तुम्हाला शांती असो” असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो. ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो.” (मत्तय १०:५–७, ११–१३) त्याने नंतर आणखी ७० जणांना अशाच सूचना देऊन पाठविले. त्या आज्ञांचे काळजीपूर्वक अनुकरण केल्यामुळे त्यांना यशप्राप्ती व मोठा आनंद लाभला.—लूक १०:१, १७.
१०. (अ) पुनरुत्थानानंतर येशूने आणखी कोणती आज्ञा दिली व त्याचा कोणता परिणाम दिसला? (ब) काही पुरुषांची नियुक्ति करणे का जरूरीचे भासले व त्यांनी कोणत्या गरजा पूर्ण करावयाच्या होत्या?
१० आपल्या मृत्यु व पुनरूत्थानानंतर ख्रिस्त येशूने त्याच्या अनुयायांच्या क्षेत्राचा विस्तार वाढविला व त्यांना म्हटले: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१८–२०) स्वर्गारोहण होते वेळी त्याने या सारखीच आज्ञा दिली: “यरूशलेमेत, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रे. कृत्ये १:८) त्याच्या अनुयायांनी राज्य संदेशाचा प्रसार केला तेव्हा हजारो त्यांना येऊन मिळाले. (प्रे. कृत्ये २:४१; ४:४; ५:१४; ६:७) सर्वत्र मंडळ्या फुलू लागल्या. पुरुष व स्त्रियांच्या या कळपावर देखरेख करण्यासाठी, विशिष्ठ अशा शास्त्रवचनीय गुणवत्तेची पूर्ति करणाऱ्या देखरेख्यांची व उपाध्य सेवकांची नियुक्ति झाली. मंडळ्या बहरू लागल्या व त्यांची संख्येनेही वाढ झाली.—१ तिमथ्यी ३:२–१०, १२, १३; तीत १:५–९.
११. आज यहोवाच्या साक्षीदारांचे कोणत्या प्रकारचे संघटन आहे व ते तितकेच परिणामकारक असण्याची का गरज आहे?
११ आज यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांनी प्रचारा विषयीचे येशूचे उदहारण अनुसरण्यचे खास महत्व आहे. हे प्रभावीपणे करण्यासाठी ते, प्रेषितांच्या दिवसात जो संघटनात्मक नमुना प्रस्थापित करण्यात आला त्यास अनुसरतात. आम्ही आज अंतसमयात आहोत, ज्यावेळी जागतिक स्वरूपाचे प्रचारकार्य घडणार असे येशूने भाकित केले होते: “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील. तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) पहिल्या जागतिक महायुद्धानंतर काही हजारोंनी ही राज्याची सुवार्ता घोषित करण्याचे आरंभिले, आज त्यांची ही संख्या तीस लाखाच्या पुढे जाऊन पोहचली आहे! आज सार्वकाळचा राजा यहोवा देव व राजांचा राजा ख्रिस्त येशू यांच्या आज्ञा काळजीपूर्वक अनुसरण्याचा हा तातडीचा समय आहे.
वडीलांना तुमचा आदर व पाठबळ यांची गरज आहे
१२. आज वडीलांकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा असते, आणि त्यांची सेवा कशी आनंदी केली जाऊ शकते?
१२ राजाच्या आज्ञांचे अनुकरण करण्यात मंडळीतील वडील प्रमुख भूमिका पार पाडतात. त्यांना कित्ता व्हावयाचे असते: “तुम्हाला सोपविलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे तर स्वेच्छेने, द्रव्य लोभाने नव्हे तर उत्सुकतेने, देवाच्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्ते व्हाल असे करा.” (१ पेत्र ५:१–३) तो देवाचा कळप आहे. तो वडीलांना जबाबदार धरून आहे तरीपण प्रत्येकाच्या आज्ञाधारकतेमुळे व सहकार्यामुळे त्यांचे हे काम आनंदी होऊ शकते. “तुम्हामध्ये पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा. कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे असे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.”—इब्रीयांस १३:१७.
१३. वडील दुप्पट सन्मानाच्या का योग्यतेचे आहेत?
१३ मंडळीतील सर्वांचाच सन्मान करणे जरूरीचे आहे पण कष्टाळूपणे काम करणाऱ्या वडीलांना तो खासपणे दाखविला पाहिजे: “जे वडील चांगल्या प्रकारे देखरेख ठेवतात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्याबाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे.” (१ तिमथ्यी ५:१७; रोमकर १२:१०) वडीलांना हा “दुप्पट सन्मान” का बरे? त्यांच्या चांगल्या कामामुळे. त्यांच्याबाबतीत असे लिखित आहे: “पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले, त्या . . . देवाची . . . मंडळी . . . तिचे पालन करावे.” (प्रे. कृत्ये २०:२८) तुमची व इतरांची सेवा करण्यात ते मोठे परिश्रम घेतात. राजाच्या आज्ञांचे कोणी उल्लंघन करतो वा त्याकडे दुर्लक्ष करतो त्याला यांना शिस्त लावावी लागते—असे हे काम आनंदाचे नसते व कधी कधी तर मन दुखविणारेही असते. पेहराव व वागणूक या विषयीच्या सूचना देण्याची गरज पडते पण त्याचा प्रतिकार केला जातो. तरीपण हे सर्व मंडळीच्या आध्यात्मिक कल्याणास्तव केले जाते. वडीलांचा आदर व सन्मान केला जाण्यास हवा.
१४. (अ) याकोब ४:१२च्या दृष्टीकोणात बघता वडीलांकरवी दिला जाणारा न्याय योग्यच का ठरतो? (ब) न्यायाची बजावणी केव्हा होते आणि दया न्यायावर केव्हा प्रभुत्व करते?
१४ वडीलांना वेळोवेळी न्यायदानाच्या समितीवर बसून न्याय करावा लागतो—तो कधी कधी अप्रियही वाटतो. हा न्याय याकोब ४:१२शी कसा बरोबरीचा ठरतो? ते वचन म्हणते: “निर्माणकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे. तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्यास दोषी ठरविणारा तू कोण?” होय. कोणा विशिष्ठाने दुसऱ्या वैयक्तिकाचा न्याय करता कामा नये. तरीपण वडील जो न्याय देतात तो त्यांच्या स्वतःच्या मतावर नव्हे तर यहोवाच्या वचनाच्या अनुषंगाने करण्यास हवा. यहोशाफाट राजाने न्यायाधिशांची नियुक्ति केली तेव्हा त्यांना त्याने कोणती ताकीद दिली होती त्याकडे लक्ष द्या: “तुम्ही न्याय कराल तो मानवासाठी नाही तर यहोवासाठी करावयाचा आहे . . . तर यहोवाची भीती तुमच्याठायी असू द्या. तुम्ही जे कराल ते संभाळून करा. कारण आपला देव यहोवा याच्याकडे काही अधर्म नाही. तो कोणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही की लाच घेत नाही.” (२ इतिहास १९:६, ७) संस्थेला शुद्ध ठेवलेच पाहिजे. तथापि वडिलांनी निष्ठुर, ‘मारके’ नसावे. जेव्हा दुःख हे खोल असते व पश्चाताप अस्सल असतो अशा वेळी दया व क्षमा दाखवली जावी. त्यावेळी, ‘दया न्यायावर श्रेष्ठता मिळवून ती विजयी हाते.’—१ तिमथ्यी ३:३; याकोब २:१३; पहा रेफरन्स बायबल तळटीप.
१५. वडीलांकरवी केल्या जाणाऱ्या सेवेमुळे त्यांना आदर व सन्मान का प्राप्त होण्यास हवा?
१५ या प्रकारे वडीलांची कर्तव्ये ही बहुधा कठीण आणि आग्रही असतात; पण जे वडील या जबाबदाऱ्या विश्वासूपणे व प्रेमळपणे हाताळतात ते आध्यात्मिक तजेला व संरक्षणाचा उगम ठरतात. “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा [तो] मनुष्य होईल. रूक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा तो होईल.” (यशया ३२:२) कोणी निष्ठुर निंदक किंवा कडकपणे शिस्त बजावणारा नव्हे तर दयावंत व प्रेमळ संरक्षण देणारा सर्वांना आनंद देतो, सर्वाचा आदर व सन्मान मिळवितो आणि यहोवाकडील पसंती प्राप्त करतो.
एकमेकांबरोबर सहनशील व्हा
१६. (अ) इतरांच्या चुकांविषयी काही कशी प्रतिक्रिया दाखवितात, तरीपण कशामुळे त्यांना कमी टिकाखोर व अधिक समंजस होता येईल? (ब) हातून चुका घडत असल्या तरी यहोवा आपल्या विश्वासू सेवकांकडे कोणत्या दृष्टीने बघतो?
१६ लोक एकत्र मिळून काम करतात तेव्हा समस्या उद्भवू शकतात. चुका घडतात. असे होते तेव्हा काही जण खूप चिडतात. काही तर दुसऱ्यांच्या चुकांची सबब घेऊन सर्वात मोठी असणारी चूक म्हणजे यहोवाची सेवा करणे थांबविणे हे करतात. तथापि यांनी स्वतःच्या चुका, ते ज्या प्रमाणे इतरांच्या चुकांकडे बारकाईने बघतात त्याप्रमाणे पाहिल्यास त्यांना कमी टिकाखोर व अधिक समंजस बनवले जाईल. मोशाने चुका केल्या, दावीदानेही केल्या आणि पेत्रानेही केल्या. याचप्रमाणे आम्हीही करतो. तरीपण यहोवाने त्या प्राचीन विश्वासू माणसांचा वापर करवून घेतला तसाच तो आज आमचाहि करीत आहे. तर मग, “दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला स्थिर करण्यात येईल, कारण त्याला स्थिर करण्यात यहोवा समर्थ आहे.”—रोमकर १४:४.
१७. चुका करणे व इतरांबद्दलचा न्याय करण्याचा दृष्टीकोण करणे या विषयी आणखी कोणते मुद्दे आम्ही लक्षात ठेवण्यास हवेत?
१७ शिवाय आम्ही हे सुद्धा ध्यानात ठेवावे की, सध्या या पृथ्वीवर यहोवा अपूर्ण लोकांचा वापर करून घेत आहे—हे सध्यापुरते पुरेसे आहे. यामुळे खरेतर यहोवाची स्तुति प्रवर्तित हाते. इतक्या छोट्या गोष्टींद्वारे तो केवढे साध्य करून दाखवितो! आमची दुर्बळता त्याचे सामर्थ्य भव्य बनविते: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते.” (२ करिंथकर १२:९) जागतिक स्वरूपाचे साक्षीकार्य वाढीस का लागले आहे याचे कारण देताना यहोवा स्वतःच म्हणतो: “बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने.” (जखर्या ४:६) यासाठीच आपण इतरांच्या चुका व अपूर्णता यांच्याबाबतीत क्षमाशीलता राखू या म्हणजे आमच्या चुकांचीहि क्षमा होईल. हे ध्यानात ठेवा: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील.”—मत्तय ६:१४, १५.
प्रचार करण्याविषयीच्या राजाज्ञेस अनुसरण्यासाठी संघटित करण्यात आले
१८. मंडळ्याकरवीच्या प्रचार कार्यात एकतेचे मार्गदर्शन द्यावे याकरता प्रेषितांच्या काळी कोणती व्यवस्था अस्तित्वात होती व आज आमच्या काळी कोणती व्यवस्था अस्तित्वात आहे?
१८ यरूशलेमात असणारे प्रेषित आणि वडीलवर्ग यांचे मिळून नियमन मंडळ बनले होते व ते आरंभीच्या ख्रिस्ती मंडळ्यास एकीचे मार्गदर्शन देणारे निर्णय ठरवीत हाते. (प्रे. कृत्ये १५:१–३१; १६:१–५) आज यहोवाचे अभिषिक्त साक्षीदार, “विश्वासू व बुद्धीमान दास” याचे नियमन मंडळ ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे त्यांच्या मुख्यालयात राहते. (मत्तय २४:४५–४७) यहोवाच्या राज्याची सुवार्ता घोषित व्हावी या आज्ञेच्या पूर्णतेस अनुसरून जगभरात जे भव्य राज्याचे साक्षीकार्य उरकले जात आहे त्याचे मागदर्शन ते मंडळ देते. (मत्तय २४:१४) हे काम संघटनेविना होऊच शकले नसते. कोणा विशिष्ठाला त्याच्या बळावर हे उरकता आलेच नसते.
१९. राजाच्या आज्ञा काळजीपूर्वक अनुसरल्यामुळे असे कोणते कार्य यहोवाचे साक्षीदार यशस्वीरित्या तडीस नेत आहेत, जे काही विशिष्ठांना कधीच उरकता आले नसते?
१९ कोणा वैयक्तिकाला किवा संघटित नसलेल्या विशिष्ठांच्या विखुरलेल्या गटाला २०५ देशात १९० भाषेत प्रचार करणे, बावीस लाख पन्नास हजारापेक्षा अधिक घरगुती पवित्रशास्त्र अभ्यास चालविणे व दरवर्षी राज्याची सुवार्ता घोषित करणाऱ्या १,९०,००० उपाध्यायांचा बाप्तिस्मा करणे कधीच जमले नसते. तीस लाखपेक्षा अधिक साक्षीदारांनी १९८५ मध्ये एवढे कार्य करायला सुमारे साठ कोटी तास खर्च करावे लागले. त्यांना सुमारे ५०,००० मंडळ्यात एकाच नियमन मंडळाच्या दृश्य मार्गदर्शनाखाली कार्यक्षमरित्या संघटित करण्यात आल्यामुळे एवढे कार्य उरकता आले. वस्तुतः नियमन मंडळ, ९४ शाखा, ५०,००० मंडळ्या व ३०,००,००० साक्षीदार हे सर्व राजाच्या आज्ञा काळजीपूर्वक अनुसरण्यात एक होते म्हणून इतके कार्य घडू शकले.
तुम्हाला आठवते का?
◻ यहोवाने इस्राएल राष्ट्राला कशाप्रकारे संघटित केले होते?
◻ यहोवाच्या राज्याची घोषणा करण्याचे काम पूर्ण करण्यासंबंधाने येशूने कोणते पूर्ण उदाहरण राखले?
◻ वडीलांकरवी सादर केल्या जाणाऱ्या कोणत्या सेवांमुळे ते आमच्या आदरास पात्र ठरतात?
◻ स्वतंत्र अशा गटाला वा वैयक्तिकाला साक्षीकार्याचा उरक का होऊ शकणार नाही?
[१३ पानांवरील चित्रं]
निर्माणकर्त्याने सर्व प्राण्यांच्या बचावासाठी कार्यक्रम आखून दिला आहे
लोकांनी यहोवाच्या आज्ञांचा अभ्यास करून बचावासाठी स्वतःच कार्यक्रम योजला पाहिजे