येशूचे जीवन व उपाध्यपण
भाकरी व खमीर
दकापलीस येथे येशूपुढे मोठा लोकसमुदाय जमला. पुष्कळ लोक या विदेश्यांची वसाहत असलेल्या प्रदेशात बरेच लांबून त्याचे ऐकण्यासाठी व आपले व्यंगत्व बरे करण्यासाठी आले आहेत. त्यांनी आपणासोबत मोठ्या टोपल्या किंवा पाट्या आणल्या आहेत. या ते साधारणतः विदेशी प्रदेशातून प्रवास करताना आपणाबरोबर शिधासामग्री नेण्यासाठी सोबत नेत.
तथापि, येशू आपल्या शिष्यांना बोलावतो व म्हणतोः “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याजवळ आहेत व त्यांच्याजवळ खावयाला काही नाही. मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.”
“येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्या?” त्याचे शिष्य विचारतात.
येशू विचारतोः “तुम्हाजवळ किती भाकरी आहेत?”
“सात,” असे ते म्हणतात, “व काही लहान मासे.”
मग, लोकांना जमिनीवर बसावयास सांगून येशू त्या भाकरी व मासे घेतो, देवाचे उपकारस्मरण करतो व त्या तोडतो आणि शिष्यांना ते देतो. मग, शिष्य ते लोकात वाटतात. लोक जेवून तृप्त होतात. मग, उरलेले सर्व गोळा केले तेव्हा सात टोपल्या पूर्ण भरतात. जेवणारे ४,००० पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले वेगळीच होती!
येशू समुदायाला निरोप देतो आणि आपल्या शिष्यांना सोबत घेऊन तो एका तारवात बसून गालील समुद्राच्या पश्चिम किनाऱ्याकडे येतो. येथे आल्यावर परुशी लोक सदुकी पंथीयाच्या सदस्यांना सोबत घेऊन येशूची परिक्षा घेतात. ते त्याच्याकडून आकाशातून एक चिन्ह दिसावे असे सांगतात.
ते आपली परिक्षा पहात आहेत हे ओळखून येशू म्हणतोः “तुम्ही संध्याकाळी म्हणता, ‘उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे.’ आणि तुम्ही सकाळी म्हणता, ‘आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ तुम्हाला आभाळाचे स्वरुप ओळखता येते, पण काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाहीत?”
यासोबत तो त्यांना दुष्ट व व्यभिचारी असे म्हणतो व त्याने आधी परुश्यांना म्हटले तसेच आताही सांगतो की, त्यांना योनाच्या चिन्हावाचून दुसरे कोणतेच चिन्ह दिले जाणार नाही. मग, तेथून तो शिष्यांसोबत निघून तारवाने गालील समुद्राच्या ईशान्य किनाऱ्याकडे असलेल्या बेथेसैदा येथे जातो. मार्गावर असता शिष्यांना आढळते की, त्यांनी आपणासोबत भाकरी घेतल्या नाहीत; त्यांच्यापाशी केवळ एकच भाकर शिल्लक होती.
परुशी तसेच हेरोदाच्या पक्षाचे सदुकी यांजसोबत जे घडले ते लक्षात असल्यामुळे येशू शिष्यांना सूचना करतोः “संभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.” आपण भाकरी घ्यावयास विसरलो यासाठी येशू हे सांगत आहे असे मानून, तसेच खमीरामुळे भाकरीची कल्पना येत असल्यामुळे ते आपसात याविषयी वाद करू लागतात. त्यांचा गैरसमज झाला आहे हे बघून येशू म्हणतोः “तुमच्याजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता?”
अगदी अलिकडेच येशूने अद्भुत चमत्कार करून हजारोंना भाकर दिली होती व हा चमत्कार एकदोन दिवसाआधीच केला होता. यासाठी त्याला भाकरीविषयीची चिंता वाटत नव्हती हे त्यांनी समजून घ्यावयास हवे होते. “तुम्हाला अजून समजत नाही काय?” असे स्मरण देऊन तो त्यांना विचारतो, “पाच हजारांना पाच भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या?”
“बारा,” असे ते उत्तर देतात.
“तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?”
“सात,” असे ते म्हणतात.
“मग, अजून तुम्हाला समजत नाही काय?” येशू विचारतो. “मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परूशी व सदूकी ह्यांच्या खमीराविषयी सावध राहा.”
शेवटी शिष्यांना तो मुद्दा समजतो. भाकरी आंबविण्यासाठी तसेच त्या फुगविण्यासाठी वापरण्यात येणारे खमीर हा असा शब्द होता जो भ्रष्टतेची सूचकता दर्शविण्यासाठी वापरत असत. आता शिष्यांना कळते की येशू येथे लाक्षणिक अर्थाचे बोलणे करीत होता. तो त्यांना “परुशी व सदूकी ह्यांच्या शिकविणीविषयी सावध राहण्यास” सांगत होता; कारण ते भ्रष्ट स्वरुपाचा परिणाम निर्मित होते. मार्क ८:१-२१; मत्तय १५:३२–१६:१२.
◆ लोक आपणासोबत मोठ्या टोपल्या का वागवीत?
◆ दकापलीस सोडल्यावर येशू तारवाने कोठे जातो?
◆ येशू खमीराविषयी जे विवेचन करतो त्याविषयी शिष्यांचा कोणता गैरसमज होतो?
◆ “परुशी व सदूकी यांचे खमीर” या येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?