वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • द्राक्षमळ्यातील कामकरी
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • येशू पुढे सांगतोः “[घरधन्याने] कामकऱ्‍यांना रोजचा एक दिनार ठरवून, त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले. मग, तो तिसऱ्‍या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणालाः ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन.’ आणि ते गेले. पुन्हा सहाव्या व नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग, अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा, आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, ‘तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहा?’ ते त्याला म्हणाले, ‘आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून.’ त्याने त्यांस म्हटलेः ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा.’

      तो घरधनी अथवा द्राक्षमळ्याचा मालक यहोवा देव आहे आणि इस्राएलाचे राष्ट्र द्राक्षमळा आहे. द्राक्षमळ्यातील कामकरी, नियमशास्त्राच्या करारात घेतलेले लोक आहेत. ते, निःसंदिग्धपणे, प्रेषितांच्या काळात हयात असलेले यहुदी आहेत. केवळ संपूर्ण दिवसाच्या कामकऱ्‍यांसोबतच मजुरीचा वायदा झालेला आहे. एका दिवसाच्या कामाची मजुरी एक दिनार आहे. सकाळच्या ९ वाजता तिसरा तास असल्याने ३ऱ्‍या, ६व्या, ९व्या व ११ व्या तासाला बोलावलेले लोक अनुक्रमे ९, ६, ३, व १ तास काम करतात.

      १२ तास वा संपूर्ण दिवसाचे कामकरी सतत आध्यात्मिक सेवेत गढलेल्या यहुदी नेत्यांचे प्रतिनिधित्व करतात. मासेमारी वा इतर लौकिक धंद्यात बरेचसे आयुष्य घालवलेल्या येशूच्या शिष्यांपेक्षा ते अगदी वेगळे आहेत. आपले शिष्य म्हणून त्यांना एकत्रित करण्यासाठी “घरधन्याने” इ. स. २९ पर्यंत येशूला पाठवले नाही. अशा रितीने ते शिष्य, “शेवटले” वा ११ व्या तासाला बोलावलेले द्राक्षमळ्यातील कामकरी बनले.

  • द्राक्षमळ्यातील कामकरी
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • ती पहिल्या शतकातील पूर्णता, येशूच्या दाखल्यातील एकमेव पूर्णता आहे का? नाही. या २०व्या शतकात ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक, त्यांचे स्थान व जबाबदाऱ्‍या लक्षात घेता, देवाच्या लाक्षणिक मळ्यात कामावर घेतले जाण्यात “पहिले” आहेत. वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीशी संलग्न असलेल्या समर्पित प्रचारकांना, देवाच्या सेवेत कोणतेही हक्काचे काम करण्यात, ते “शेवटले” समजत. पण वस्तुतः देवाच्या स्वर्गीय राज्याचे अभिषिक्‍त प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याचा मान म्हणजेच दिनार, पाळकांनी तुच्छ लेखलेल्या याच लोकांना मिळाला. मत्तय १९:३०–२०:१६.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा