चिन्ह नवे जग जवळ असल्याचा पुरावा?
“राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, आणि जागोजागी दुष्काळ, मऱ्या व भूमिकंप होतील.”—मत्तय २४:७, किंग जेम्स व्हर्शन.
पहिल्या जागतिक महायुद्धाचा कहर माजलेला असता द वॉचटावर मासिकाने एप्रिल १५, १९१७ च्या अंकात वर नमूद असणाऱ्या शब्दांचा उल्लेख करून म्हटलेः “आम्ही या विधानाची आता अंशतः पूर्णता पाहात आहोत, ज्यामध्ये प्राणघातक झुंजीत पृथ्वीवरील बहुतेक सर्व राष्ट्रे गुंतलेली आहेत. उपलब्ध असलेल्या अन्नसाठ्यामधील टंचाई अधिक होत आहे व राहणीमानाच्या किमती सतत वाढत आहेत.”
आता ७२ वर्षांनंतर हे मासिक अजूनही त्याच भविष्यवादाकडे त्याच्या वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राचीन काळच्या तीन इतिहासकारांना याच भविष्यवादाची, येशू ख्रिस्ताने दिलेल्या “चिन्ह” याचा एक भाग म्हणून नोंद केलेली आहे.—मत्तय २४:३, ७; मार्क १३:४, ८; लूक २१:७, १०, ११.
१९१४ पासून युद्धे, दुष्काळ, मऱ्या तसेच इतर आजार यांना लक्षावधी लोक बळी पडले आहेत. द न्यू एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका (१९८७) सुमारे ६३ “मोठ्या ऐतिहासिक भूकंपांची,” गेल्या १,७०० वर्षात घडल्याची, यादी देते. यांच्यापैकी २७ किंवा ४३ टक्के तर १९१४ पासून घडले. टेरा नॉन फर्मा नामे पुस्तकात याहीपेक्षा अधिक लांब मुदतीची नोंद आहे व त्यात १९१४ पासून ५४ टक्के भूकंप घडल्याचा उल्लेख केला आहे.a गतकाळचा तो इतिहास कदाचित अपुरा आहे असे जरी गृहीत धरले तरी आमच्या काळात भूकंपांनी जबरदस्त हादरे देऊन मानवजातीवर जे परिणाम घडवले ते तर आम्ही टाळू शकतच नाही.
हिरोशिमा व नागासाकी या दोन जपानी शहरांवर अणुबॉम्ब स्फोट घडवून आणल्यापासून लोकांची अंतःकरणे अधिकच भयाने घाबरी झाली आहेत. अणूशक्तीशाली राष्ट्रांजवळ आज विविध प्रकारातील अणू शस्त्रांचा एवढा प्रचंड साठा आहे की जो सबंध मानवजातच नष्ट करण्याची धमकी देतो. हे इतिहासकार लूक याने येशूच्या भविष्यवादाची नोंद केल्यानुसार आहेः “भयंकर उत्पात व मोठी चिन्हे आकाशातून होतील . . . आणि . . . राष्ट्रे पृथ्वीवर घाबरी होऊन पेचात पडतील. भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्ये मूर्च्छिंत होतील.”—लूक २१:११, २५, २६.
बलाढ्य राष्ट्रे आपल्या शस्त्रागारातील काही शस्त्रे कमी करण्यास मान्यता देऊन असले तरी हे करार मनुष्याच्या अंतर्यामीचे, हिंसाचाराचे, आर्थिक शक्तीपात अतिरेकता यांचे भयगंड कमी करू शकणार नाही. एका आफ्रिकन वर्तमानपत्रात म्हटलेः “आताच्या काळात लोकांमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबद्दलची अनिश्चितता वाढलेली आहे. . . . गुन्हेगारी बेसुमार वाढते, . . . चोहोकडे भयाचे साम्राज्य पसरले आहे.” होय, येशूने आधीच म्हटल्याप्रमाणे “अधर्म वाढल्यामुळे” हे सर्व घडते, जे चिन्हाचे आणखी एक अचूक निदान आहे.—मत्तय २४:१२.
“सुवार्ता”
तरीपण आपणास हे ऐकण्यास केवढे सुखद वाटेल की, आत्ताच उल्लेखिलेल्या भयानक उलाढालीसोबतच “सुवार्ता [हिला] सर्व जगात गाजवितील,” असे भाकित आहे. (मत्तय २४:१४) ही “सुवार्ता” देवराज्याबाबतची आहे. त्या ईश्वरी सरकारने आधीच लक्षावधी निष्ठावंत प्रजाजनास संघटित केले आहे. लवकरच ते मानवी कारभारात हस्तक्षेप करील व एक नवीन जग हवे या मानवी गरजेची पूर्तता करील.—लूक २१:२८-३२; २ पेत्र ३:१३.
अनेक आज “सुवार्ता” हिजवर अविश्वास प्रदर्शित करून तिला दूर करतात. इतर काही म्हणतात की त्यांचा तिजवर विश्वास आहे पण त्या बाबतीत काही करू शकत नाहीत. अशा या नकारात्मक प्रतिक्रियांचाही चिन्ह यात उल्लेख आहे का? अधिक महत्त्वपूर्ण म्हणजे, तुम्ही व्यक्तीगतपणे या चिन्हाकडून कसे फायदे मिळवाल?
[तळटीपा]
a द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया (१९८७) इ. स. ५२६ नंतर घडलेल्या ३७ “महत्त्वाच्या भूकंपा”ची नोंद देते. यापैकी ६५ टक्के १९१४ पासून पुढे घडलेत.