पवित्र शास्त्र आणि तुमचे भवितव्य
जे मनुष्य सांगू शकत नाही ते भविष्य पवित्रशास्त्राचा लेखक यहोवा देव अचूकपणे का वर्तवू शकतो? दोन कारणास्तव, यहोवा सर्वशक्तीमान आहे. तसेच तो सर्वज्ञ आहे, मनुष्य तसा नाही.
“मी सर्वसमर्थ आहे,” असे यहोवा अब्रामाला (अब्राहाम) ४,००० वर्षापूर्वी म्हणाला.a “माझ्या समोर वाग व स्वतःस निर्दोष शाबीत कर. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुझा मी अपरिमित विस्तार करीन.” अब्राहाम ९९ वर्षाचा म्हातारा व त्याची वांझ पत्नी त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असता, यहोवाने वर्तविले की अब्राहाम “राष्ट्र समुहाचा जनक” बनेल. (उत्पत्ती १७:१–४) सर्वसमर्थ सर्वशक्तीमान असण्याने यहोवाने अब्राहामास दिलेल्या अभिवचनाच्या पूर्णतेआड येऊ शकेल अशा गोष्टीवर मात करण्यास त्याच्या सामर्थ्याचा उपयोग केला व त्या कुलपित्यास इसहाकाचा बाप बनण्यास समर्थ केले. कालान्तराने अब्राहाम खरोखरीच इस्राएलांचा व इतरांचा पूर्वज बनला.—उत्पत्ती २१:१–३; २५:१–४.
यहोवा सर्व–ज्ञाता, सर्वसूज्ञ–सर्वज्ञ ही आहे. तो इच्छितो ते अगोदरच पाहू शकतो. त्याजबाबत असे म्हटले आहे: “त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीच निर्मिती नाही, त्याच्या दृष्टीला सर्व उघडे वाघडे व प्रगट असे आहे त्याजपुढे आम्हास हिशेब देणे आहे.”—इब्रीकर ४:१३.
देवाचा सर्वशक्तीमानपणा व सर्वज्ञता ही त्याला अपयशी बनणे अशक्य कोटीतील बनविते. तो नेहमीच भविष्य अचूकपणे वर्तवितो. यास्तव तो म्हणू शकला: “मी कल्पिले तसे होईलच; मी योजीले तसे घडेलच.” (यशया १४:२४) यास्तव, आपण पवित्रशास्त्रातील सत्य ठरलेल्या पुष्कळ भविष्यवादापैकीच्या थोडक्यांचे परिक्षण करू या.
गत काळात पूर्ण झालेले भविष्यवाद
बाबेलोन हे अश्शुर सत्तेचे निव्वळ बगलबच्चे होते. तरीपण इ.स.पू. सातव्या शतकात ते शहर अजिंक्य वाटणाऱ्या बाबेलोनची राजधानी बनले. परंतु त्याचे काय होणार होते? “बाबेलची . . . सदोम व गमोरा यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्या सारखी स्थिती होईल. त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही.” यास्तव बाबेल जागतिक सत्ता बनण्यापूर्वी सुमारे १०० वर्षाअगोदर व तिचा मेद–पारस यांच्या कडून नाश होण्याच्या २०० वर्षाआधी देवाच्या वचनाने हे भविष्य कथिले होते. आज कोणीही त्या शब्दाची पूर्णता झालेली धुडकावू शकत नाही. पुष्कळ वर्षे बाबेल शहर मातीच्या ढिगाऱ्यापेक्षा अधिक असे नव्हते. बाबेल अस्तित्वविरहीत झाले.—यशया १३:१९, २०.
इ.स. पहिल्या शतकातील यरूशलेम हे यहोवाच्या भक्तीसाठी उभारलेल्या गौरवी मंदीराचे स्थळ होते. तथापि पवित्रशास्त्रात, यरूशलेम व त्याचे शब्द एकत होते त्या पीढीविषयी येशूने बोललेले हे शब्द लिखित करून आहे की: “पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढितील व तुझा चहूंकडून कोंडमारा करतील. तुला व तुझ्या मुला बाळांना धुळीस मिळवितील, आणि तुझ्यामध्ये दगडावर दगड राहू देणार नाहीत.” (लूक १९:४३, ४४) येशू हे इ.स. ३३ मध्ये म्हणाला पण इ.स. ६६ पर्यंत रोमी सैन्याने येरूशलेम विरूद्ध आगेकूच करीपर्यंत काहींच झाले नव्हते. विजयश्री हाती येत असताही अनपेक्षितपणे रोमी माघारे परतले. इ.स. ७० मध्ये मात्र वल्हांडण सण पाळण्यास आलेल्या लोकांच्या तुडूंब भरलेल्या शहरास रोमी सैन्याने पुन्हा वेढा देऊन तिच्या भोवती मेढेकोट उभारला. पाच महिन्याच्या कालावधीनंतर यरूशलेम त्याच्या ११,००,००० नागरिकांच्या मृत्यूसोबत उद्ध्वस्त झाले.
सध्या पूर्ण होणारे भविष्यवाद
तुम्ही सध्याच्या दिवसात पूर्ण होणारी भाकिते पसंत कराल का? बरे तर, येशूने “शेवटले दिवस” म्हणून ज्ञात असणाऱ्या काळास ओळखण्यास घटना भाकित केल्या. (२ तिमथ्यी ३:१) या भविष्यवादांनी संयुक्तीक “चिन्हां”चे, या दुष्ट व्यवस्थीकरणाचे शेवटल्या दिवसाची चिन्हे यांचे स्वरूप घेतले. (मत्तय २४:३) येशूच्या भविष्यवादाच्या पूर्णतेचा पुरावा १९१४ पासून भरपूर दिसत आहे. वास्तविक, तुम्ही त्याची व्यक्तीगत पूर्णता पाहिली आहे. पुढे दर्शविलेली “चिन्हां”ची थोडी उल्लेखनिय स्वरूपे आहेत.
पृथ्वीचे भवितव्य—तुम्ही तेथे असणार का?
पुढे काय ठाकले आहे? पवित्रशास्त्र अद्याप पूर्ण होणारे आणखी भविष्यवाद आपणात सामावून आहे. त्यामध्ये, दुष्टापासून पृथ्वी स्वच्छ केली जाईल व नीतिमत्वतेने शुभ्र चकाकली जाईल हे आहेत. हे भवितव्य तुम्हास आर्जव करीत नाही का? यहोवा देवाजवळ या ग्रहावरील गोष्टी यथास्थित करण्याचे सुज्ञान व सामर्थ्य आहे असा तुम्ही विश्वास करता का? होय तर, पवित्रशास्त्र पृथ्वीच्या भवितव्याबद्दल काय वर्तविते त्याचा तुम्ही विचार करण्याची इच्छा कराल.
यास तुमचे भवितव्य बनवा
हे तुमचे भवितव्य होण्यासाठी तुम्हास आताच हालचाल केली पाहिजे. या भविष्यवादांची संपूर्ण पूर्णता होण्यापूर्वी यहोवा “पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करील.” (प्रकटीकरण ११:१८) सफन्या २:३ मध्ये पवित्र शास्त्र उपदेश करते: “पृथ्वीवरील नम्र जनांनो त्याच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो यहोवास शोधा. धार्मिकता व नम्रता याचे अवलंबन करा म्हणजे कदाचित यहोवाच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.” यास्तव स्वतः व तुमच्या प्रियजनास लाभ होण्यासाठी तुमचा समय सुज्ञपणे पवित्रशास्त्राचे व त्याच्या भविष्यवादांचे अचूक ज्ञान मिळविण्यासाठी खर्च करा. यहोवाचे साक्षीदार तुम्हास देवाचे वचन पवित्रशास्त्र यात प्रकट केलेल्या भवितव्याबाबत यापुढे ज्ञान प्राप्तीसाठी मदत करण्यास सदोदीत सज्ज आहेत.
[तळटीपा]
a इब्री शास्त्रवचनात यहोवास “सर्वसमर्थ” (शाद्दाय) असे ४८ वेळा संदर्भित केले आहे ज्यात ७ वेळा “सवसमर्थ देव” (एल–शाद्दाय) म्हणून व ग्रीक शास्त्रवचनात १० वेळेस “सर्व समर्थ” (पॅन्टोक्राटोर) म्हणून उल्लेखीले आहे.
[५ पानांवरील चौकट/चित्रं]
“राष्ट्र राष्ट्राविरूद्ध व राज्य राज्याविरूद्ध उठेल.” (मत्तय २४:७) पहिले जागतिक महायुद्ध १९१४ला सुरु झाले व त्याने सरतेशेवटी जगाच्या लोकसंख्येच्या अंदाजे ९३ टक्के लोकांना समाविष्ट करून घेतले. सध्या जगाचे लष्करी वळ १०,६०,००,००० किंवा ४३ लोकामागे एक सैनिक असे आहे. एक अहवाल म्हणतो: “सध्याच्या जगातील विनाशकारी सामर्थ्य व त्यात सामावलेला मानवजातीसाठीच्या धोक्याची तुलना गत काळातील कोणत्याच गोष्टी सोबत करता येणार नाही.”—वर्ल्ड मिलीटरी ॲन्ड सोशीअल एक्स्पेन्डीचर १९८५.
[चित्राचे श्रेय]
U.S. Army photo
“जागोजागी . . . अन्नटंचाई होईल.” (मत्तय २४:७) दुष्काळाबाबत १९८५ या अंतरराष्ट्रीय मानवतावादी स्वतंत्र कमिशनचा अहवाल म्हणतो: “१९७०री च्या सुरुवातीस अफ्रिकेतील गेल्या भव्य दुष्काळात, असे म्हटले जात होते की या संसर्गित भूकेस व अर्धपोटी राहाण्यात ८० दशलक्ष अफ्रिकन नियमितपणे होते. सध्या तो आकडा १०० दशलक्ष आहे.”
[चित्राचे श्रेय]
FAO photo/B. Imevbore
“मोठे भूकंप होतील.” (लूक २१:११) निश्चीतपणे हे १९१४ पासून सत्य असे शाबीत झाले. उदाहरणार्थ, जपान मधिल कॅन्टो भूकंपाने १,४२,८०० जीव १९२३ मध्ये घेतले, १९३५ मध्ये पाकिस्तान मधील क्वेटा येथील कंपाचे बळी ६०,००० होते. १९७० मध्ये उत्तर पेरू मध्ये भूकंपातील मृतांची संख्या ६६,७०० होती. टांगशान, चिन मध्ये १९७६ मध्ये सुमारे ८,००,००० लोक हाताहत झाले.
“सर्व राष्ट्रात प्रथम सुवार्ता गाजविली गेली पाहिजे.” (मार्क १३:१०) १९८५ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी देव राज्याची सुवार्ता २०५ राष्ट्रे व बेटे यात गाजविण्यात ५९,००,००,००० याहून अधिक तास खर्च केले. त्यांनी २३,७९,००० इतके घरगुती पवित्रशास्त्राभ्यास चालविले व आस्थेवाईक लोकांजवळ ३५,००,००,००० इतकी पवित्रशास्त्रे व पवित्रशास्त्र समजावणारी प्रकाशने दिली.
[६ पानांवरील चौकट/चित्रं]
“ते आपल्या तरवारी मोडून त्याचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही, ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यशया २:४) देवाचे स्वर्गिय सरकार पृथ्वी शस्त्रास्त्र संन्यासास पूर्ण पार्श्वभूमी पुरविल. शांती प्रस्थापिली जाईल!
“सेनाधीश यहोवा . . . निश्चीतपणे सर्व लोकासाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी, उत्कृष्ट मिष्टान्नाची मेजवानी करीत आहे.” (यशया २५:६) देवाचे मार्गदर्शन व आशीर्वादाखाली, पृथ्वी सकस निपज देईल. भूकेला कोणीही राहाणार नाही!
“तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो व सार्वभौम प्रभू यहोवा सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसितो.” “कोणीही रहिवासी: ‘मी आजारी आहे’ असे म्हणणार नाही.” (यशया २५:८; ३३:२४) कोणताही आजार अगर शारीरिक समस्या देव करणाऱ्या रोगमुक्तेस प्रतिविरोध करणार नाही. त्याने कबरांचे सावज झालेल्यांना उठवून त्या रिकाम्या करण्याचे उद्देशिले आहे. पुनरूत्थित प्रियजनांचे स्वागत करणे केवढे आनंददायी असेल!