‘सर्व राष्ट्र द्वेष करतील’
१ अलिकडील वर्षात, यहोवाच्या लोकांनी जगभरात अनुभवलेल्या अद्भुत आशीर्वादांचे रोमांचक अहवाल ऐकण्यामुळे सर्वांना आनंद झाला. मलावी मध्ये २६ वर्षांच्या क्रूर छळवणुकीनंतर, तेथील कार्याला कायद्याने योग्य ठरवल्यामुळे आमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर पडले. पूर्व युरोपातील अभक्त कम्युनिस्ट मतप्रणालीचा पाडाव झाल्यामुळे, तिच्या छळणाऱ्या बंधनातून प्रत्यक्षात आमच्या हजारो बांधवांची मुक्ती झाल्यावर, आम्ही सुटकेचा दीर्घ निःश्वास सोडला. ग्रीसमध्ये आमच्या उपासनेच्या स्वातंत्र्याला आव्हान दिले तेव्हा आम्ही चिंतातूर काळजीने पाहात होतो; पण युरोपच्या सर्वोच्च न्यायालयात दणदणीत विजय मिळाल्यावर आम्ही आनंदित झालो. सत्य शोधकांसाठी भरमसाट साहित्याचे उत्पादन करून देणाऱ्या संस्थेच्या शाखांच्या मोठ्या प्रमाणातील वाढीबद्दलचे अहवाल ऐकून आम्हाला आनंद झाला आहे. कीव्ह, युक्रेन येथील अधिवेशनात ७,४०० पेक्षा अधिक जणांचा बाप्तिस्मा झाल्याचे ऐकल्यावर आम्हाला आश्चर्य वाटले. होय, राज्य कार्यातील या नाट्यमय वाढींमुळे आमचा आनंद अधिक वाढला आहे!
२ आनंद करण्यासाठी मोठे कारण असले तरी, आम्हाला फाजीलपणे हर्षित होण्यापासून सावध राहायचे आहे. एका पाठोपाठ एक अनुकूल अहवालांमुळे, आम्ही असा निष्कर्ष काढू की, सुवार्तेचा विरोध हळूहळू कमी होत चालला आहे आणि यहोवाचे लोक जगात मान्यता मिळवत आहेत. अशा प्रकारचा विचार फसवा असू शकतो. आम्ही काही समाधानकारक विजय मिळवले असतील आणि काही देशात सुवार्तेसाठी अडथळे कमी करण्यात थोड्या प्रमाणात यश मिळवले असेल तरी, जगाबरोबरचा आमचा मूळ संबंध बदललेला नाही, हे आम्ही विसरू नये. येशूचे अनुयायी या नात्याने, आम्ही “जगाचे नाही.” त्यामुळे, “सर्व राष्ट्रे” आमचा नक्कीच “द्वेष करतील.” (योहान १५:१९; मत्त. २४:९) हे व्यवस्थीकरण जोपर्यंत राहील तोपर्यंत, “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल,” या मूळ नियमाला कोणतीही गोष्ट बदलवणार नाही.—२ तीम. ३:१२.
३ या इशाऱ्याच्या सत्यतेला इतिहासाची पाने साक्ष देतात. ख्रिस्ती धर्माचा संस्थापक, येशू ख्रिस्ताने बलवान राज्यकर्ते आणि त्यांच्या प्रजेसमोर आश्चर्यकारक साक्ष दिली तरी, त्याने दररोज गैरवागणूक सहन केली आणि तो सतत जीवे मारल्या जाण्याच्या धोक्यात होता. त्याच्या प्रेषितांनी, शिष्य होण्यास पुष्कळांना मदत केली, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने लिहिण्यात सहभाग घेतला आणि आत्म्याच्या आश्चर्यकर्माची दाने प्रकट केली तरी, त्यांचासुद्धा त्याचप्रमाणे द्वेष केला आणि गैरवागणूक दिली गेली. त्यांचे चांगले वर्तन आणि शेजाऱ्यासाठी प्रेम असताना देखील, सर्व ख्रिश्चनांकडे, बहुतांश लोक ‘ज्याविरुद्ध सर्वत्र बोलले जाते’ असा तिरस्करणीय ‘पंथ,’ या दृष्टिने पाहात होते. (प्रे. कृत्ये २८:२२) यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास जागतिक ख्रिस्ती मंडळीचा वापर आश्चर्यकारकपणे केला जात असला तरी, या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या प्रत्येक घटकामुळे तिचा सतत विरोध आणि निंदा केली जाते. तो विरोध निवळण्याची अपेक्षा करण्यासाठी कोणतेही कारण नाही.
४ पहिल्या शतकात, सैतानाने येशूच्या शिष्यांना पुष्कळ प्रकारे छळले. द्वेषी विरोधकांनी त्यांच्याबद्दल विपर्यास करणारे खोटे उघडपणे सांगितले. (प्रे. कृत्ये १४:२) त्यांना घाबरवण्याच्या प्रयत्नात द्वेषयुक्त धमक्या दिल्या. (प्रे. कृत्ये ४:१७, १८) क्रोधिष्ट समुदायांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. (प्रे. कृत्ये १९:२९-३४) त्यांना काही कारण नसताना तुरुंगात टाकले. (प्रे. कृत्ये १२:४, ५) छळ करणाऱ्यांनी बहुतेकदा शारीरिक हिंसेचा अवलंब केला. (प्रे. कृत्ये १४:१९) काही बाबतीत, निर्दोष जणांचे मुद्दाम खून केले गेले. (प्रे. कृत्ये ७:५४-६०) प्रेषित पौलाने या सर्व गैरवागणुकींना प्रत्यक्षात सहन केले. (२ करिं. ११:२३-२७) प्रचार कार्याच्या आड येणाऱ्या कोणत्याही संधीचा अयोग्य फायदा घेण्यास आणि या विश्वासू कार्यकर्त्यांवर दुःख लादण्यास विरोधक लागलीच तयार होते.
५ आज सैतान अशाच प्रकारच्या युक्तींचा वापर करत आहे. आम्हाला, दिशाभूल झालेला पंथ किंवा तत्त्वप्रणालि, असे खोटेपणाने चित्रित करणारी उघड लबाडी केली गेली आहे. काही देशात, अधिकाऱ्यांनी आमचे साहित्य, फूट घडवून आणणारे आहे, असे सांगून त्यावर बंदी आणली आहे. रक्ताच्या पवित्रतेच्या आमच्या आदराचा जाहीरपणे उपहास केला गेला आणि त्याला आव्हान दिले गेले. १९४०-४५ च्या दरम्यान झेंडावंदनाच्या बाबतीत क्रोधिष्ट जमावाने संतप्त होऊन, आपल्या बांधवांवर हल्ला केला, त्यांना इजा पोहोंचवली आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले. तटस्थतेच्या विषयामुळे हजारोंना तुरुंगात पाठवण्यात आले. एक पक्षीय शासन पद्धतीच्या देशांमध्ये, आमच्या बांधवांवर विध्वंसक असल्याचे खोटे आरोप घालण्यात आले आणि त्यामुळे शेकडो लोकांची, क्रूरतेने छळवणूक झाली, व तुरुंगात आणि छळछावण्यांमध्ये त्यांना ठार मारण्यात आले. हा दबाव निष्ठुर आहे आणि यावरून, आमचा बिनकारणी द्वेष होत आहे, हे स्पष्टपणे दाखवले जाते.—जेहोवाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉडस् किंग्डम या पुस्तकातील अध्याय २९ पाहा.
६ भविष्यात काय आहे? जगाच्या काही भागात, दबाव हलका होण्यासाठी यहोवाच्या लोकांना वेळोवेळी सुटका मिळत असली तरी, एकूण परिस्थिती तशीच आहे. दियाबल, १९१४ मध्ये झालेल्या त्याच्या हिणकसपणावर क्रोधिष्ट आहेच. त्याचा वेळ कमी असल्याचे त्याला ठाऊक आहे. मोठे संकट जवळ येते तसा, त्याचा क्रोध नक्कीच तीव्र बनेल. त्याने संपूर्णतः स्वतःला, राजासनाधिष्ठ राजा, येशू ख्रिस्ताविरुद्ध, लढाईसाठी अंगीकारले आहे आणि तो शेवटपर्यंत लढत देण्यासाठी निश्चित आहे. तो आणि त्याचे दुरात्मे, विश्वासूपणे “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष” देणाऱ्या पृथ्वीवरील यहोवाच्या लोकांवरच त्यांचा क्रोध व्यक्त करू शकतात.—प्रकटी. १२:१२, १७.
७ यासाठी आम्ही भविष्याकडे पाहतो तसे, कशाची अपेक्षा करावी याबद्दल आम्ही व्यवहारी असायला हवे. दियाबल माघार घेईल किंवा तो सोडून देईल असा विचार करण्यास कोणतेही कारण नाही. त्याने ह्या जगात आमच्याबद्दल जो द्वेष बिंबवला आहे, त्याचा कधीही आणि कोठेही स्फोट होऊ शकतो. पुष्कळ देशात, दीर्घ काळाच्या झटापटीनंतरच आमचे प्रचार करण्याचे स्वातंत्र्य मिळवले गेले आहे. ते स्वातंत्र्य नाजूक असू शकते व कोणा सहानुभूती दाखवणाऱ्या राज्यकर्त्याद्वारे किंवा अप्रसिद्ध नियमाद्वारे टिकले असेल. गोंधळ आणि मानवी हक्कांचा दुरुपयोग करणाऱ्या नाट्यमय उलाढाली अचानक उद्भवू शकतात.
८ काही देशांमध्ये आम्ही लुटत असलेला उत्कर्ष आणि स्वातंत्र्य अचानकपणे संपेल व भूतकाळात ज्याप्रमाणे झाले, त्याचप्रमाणे आमच्या बांधवांना गैरवागणूक दिली जाईल. आमच्या शत्रूंवर विजय मिळवला आहे असे समजून, आम्ही उदासीन वृत्तीचे किंवा बेपर्वा अवस्थेत स्वतःला लोटून देऊ नये. जगाचा द्वेष नेहमीच प्रकट होणार नाही परंतु, त्याची तीव्रता तशीच राहते. देव वचनातील सर्व गोष्टी दाखवतात की, अंत समीप येत असता, जगाचा विरोध कमी होण्यापेक्षा अधिक तीव्र होत जाईल. यासाठी आम्हाला सावध राहिले पाहिजे व स्वतःला “सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी” दाखवले पाहिजे. (मत्त. १०:१६) आम्हाला शेवटपर्यंत “फार झटावे” लागेल, हे आम्ही जाणले पाहिजे आणि धीरच आमच्या बचावाची किल्ली आहे.—यहूदा ३, पं. रमाबाई भाषांतर; मत्त. २४:१३.
९ आम्ही जगाच्या ज्या भागात राहात आहोत तेथे, विरोधकांकडून लक्षात येण्याजोगा अडथळा नसून, कार्याचा उत्कर्ष होत असेल. यामुळे गंभीर विचार करण्याविषयी आपण संशयखोर होऊ शकतो. तरीसुद्धा, आम्हाला दक्ष असण्याची गरज आहे. परिस्थिती लगेचच बदलू शकतात. इशाऱ्याविना कोणत्याही विषयाचा गैरफायदा घेऊन विरोधक आमच्या विरुद्ध त्याचा उपयोग करू शकतात. धर्मत्यागी, तक्रारीच्या काही कारणाच्या सतत शोधात असतात. आपल्या कार्याने भीती वाटत असल्यामुळे, क्रुद्ध झालेले पाळक आम्हाला जाहीरपणे धिक्कारतील. आपल्या समाजात, राज्य सभागृह बांधण्याच्या आमच्या योजनेमुळे एखादा वादविवाद होईल व सर्व शेजारी आमच्यावर बिघडतील. क्षोभकारक वाक्ये छापली गेल्यामुळे, आमचे नाव वाईट होईल. प्रसिद्ध स्थानिक व्यक्ती, मुद्दाम आमच्याबद्दल विपर्यास करून सांगतील व त्यामुळे आम्ही आमच्या शेजाऱ्यांना भेटी देऊ तेव्हा, ते विरोध करतील. आपल्या घराण्यातील प्रिय व्यक्ती देखील रागावतील व आमचा छळ करतील. यासाठी, जगाचे शत्रुत्व जिवंत आहे व ते कधीही उद्भवू शकते, हे जाणून आम्हाला सावध राहण्याची गरज आहे.
१० याचा आम्हावर काय परिणाम व्हावा? या सर्व गोष्टी आमच्या विचारावर आणि भविष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम करतात. कशाप्रकारे? यामुळे, आम्हाला जे सहन करावे लागेल त्याबद्दल आम्ही चिंतातुर किंवा भयभीत व्हायला हवे का? आमच्या समाजातील काही लोक त्रस्त होतील, यासाठी प्रचार कार्यामध्ये आपण मंद व्हावे का? आमची अन्यायीपणे निंदा केली जाते म्हणून, व्याकूळ होण्यासाठी काही योग्य कारण आहे का? क्रूर वागणूक आम्हाला यहोवाची सेवा करण्याच्या हर्षापासून लुबाडेल, हे अपरिहार्य आहे का? परिणामाबद्दल काही अनिश्चितता आहे का? नाही, मुळीच नाही! का नाही बरे?
११ आम्ही घोषित करत असलेला संदेश आम्हाकडून नव्हे तर, यहोवाकडून आहे ही वास्तविकता आम्ही कधीही विसरू नये. (यिर्म. १:९) ‘त्याच्या नामाचा जयघोष करा, सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा,’ या आर्जवण्याकडे लक्ष देण्याच्या बंधनाखाली आम्ही सर्वजण आहोत. (यश. १२:४, ५) ‘त्याचे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगट व्हावे,’ या विशिष्ट उद्देशानेच तो त्याच्या लोकांची केलेली गैरवागणूक सहन करत आहे. (निर्ग. ९:१६) यहोवाने आज्ञापिलेले कार्य आम्ही करत आहोत आणि धीटपणे बोलण्यासाठी तोच आम्हाला धैर्य देतो. (प्रे. कृत्ये ४:२९-३१) जुन्या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसातील, हे सर्वात महत्त्वाचे, लाभदायक तसेच निकडीचे कार्य आहे.
१२ हे ज्ञान आम्हाला, सैतानाविरुद्ध आणि ह्या जगाविरुद्ध खंबीर भूमिका घेण्यासाठी धैर्य देते. (१ पेत्र ५:८, ९) यहोवा आम्हासोबत आहे, हे जाणल्यामुळे आम्ही “खंबीर आणि हिंमती’ बनतो व त्यामुळे आम्हाला छळणाऱ्यांबद्दलचे कोणतेही भय नाहीसे होते. (अनु. ३१:६; इब्री. १३:६) विरोधकांकडून धमकावले गेल्यावर आम्ही चतुर, समंजस आणि बुद्धिमान असण्याचा प्रयत्न करत असताना, आमच्या उपासनेला आव्हान दिले जाते तेव्हा, आम्ही हे स्पष्ट केले पाहिजे की आम्ही, “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा” मानण्यास निश्चित आहोत. (प्रे. कृत्ये ५:२९) आमच्या बाजूने बोलण्यास योग्य संधी असल्यास आम्ही तसे करू. (१ पेत्र ३:१५) तथापि, आमची अपकिर्ती करण्यास इच्छिणाऱ्या कठोर विरोधकांशी वाद घालून, आम्ही आमचा वेळ वाया घालवणार नाही. ते आमची निंदा करतात किंवा खोटेपणाने आम्हाला दोष देतात तेव्हा, संतापणे किंवा बदला घेण्याऐवजी आम्ही केवळ ‘त्यांना असू देतो.’—मत्त. १५:१४.
१३ परीक्षांमध्ये दाखवलेला आमचा धीर यहोवाला प्रसन्न करणारा आहे. (१ पेत्र २:१९) त्या मान्यतेसाठी आम्ही कोणती किंमत द्यावी? आमचा द्वेष किंवा विरोध केला जातो म्हणून आम्ही नाखूषीने सेवा करत राहावे का? मुळीच नाही! यहोवा आम्हाला “आनंदाने व शांतीने” आमच्या आज्ञाधारकतेचे बक्षीस देण्याचे अभिवचन देतो. (रोम. १५:१३) तीव्र दुःखात असताना देखील, येशू “जो आनंद त्याच्यापुढे होता,” त्यामुळे आनंदित राहिला. (इब्री. १२:२) आमच्याबाबतीतही तेच खरे आहे. आमच्या धीराचे बक्षीस एवढे मोठे असल्याने, गंभीर परीक्षा सहन करत असताना सुद्धा, ‘आनंद व उल्हास करण्यास’ आम्ही प्रवृत्त होतो. (मत्त. ५:११, १२) संकटसमयी देखील, तो स्वतःमध्येच एक आनंद आहे व राज्य संदेशाला पाठिंबा देण्यासाठी यहोवाला स्तुती आणि आदर देण्याचे हे एक कारण आहे.
१४ शेवटल्या परिणामाबद्दल अनिश्चितता आहे का, की ज्यामुळे आपल्याला भयभीत किंवा अनिश्चयी होण्यास कारण मिळते? नाही, यहोवाची संघटना आणि सैतानाचे जग यातील संघर्षाच्या परिणामाचा निर्णय बऱ्याच काळाआधी केला होता. (१ योहान २:१५-१७) विरोधाची तीव्रता किंवा त्याचे प्रमाण कितीही मोठे असले तरी, यहोवा आम्हाला विजय देईल. (यश. ५४:१७; रोम. ८:३१, ३७) आमची पूर्णपणे परीक्षा घेतली गेली तरी, बक्षीस मिळवण्यापासून आम्हाला कोणतीही गोष्ट थांबवू शकत नाही. आम्हाला “कशाविषयीही चिंताक्रांत” होण्याचे कारण नाही कारण, आमच्या विनंत्यांच्या प्रत्युत्तरात यहोवाने आम्हाला शांती दिली आहे.—फिली. ४:६, ७.
१५ यासाठी, आमच्या बांधवांना छळातून सुटका मिळते किंवा भूतकाळात बंदी असलेल्या भागांमध्ये प्रचार करण्याचे स्वातंत्र्य मिळते, असे अहवाल आम्ही ऐकतो त्या प्रत्येक वेळी आम्ही यहोवाचे आभार मानतो. बदलत्या परिस्थितींमुळे, राज्य संदेशाच्या संपर्कात येणाऱ्या हजारो प्रामाणिक लोकांना नवीन संधी उपलब्ध होतात तेव्हा, आम्ही आनंद करतो. द्वेषयुक्त विरोधकांच्या सामन्यात आम्हाला विजय देण्याची निवड यहोवाने केल्यावर आम्ही खरोखरीच त्यासाठी आभारी असतो. खऱ्या उपासनेच्या त्याच्या घराला उंचावण्यासाठी आणि सर्व राष्ट्रातील “निवडक” लोकांना प्रवेश देण्याची संधी देण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही मार्गाने तो आमचे कार्य आशीर्वादित करील किंवा वाढवील, हे आम्हाला माहीत आहे.—हाग्ग. २:७; यश. २:२-४.
१६ त्याचवेळी, आमचा शत्रू सैतान फारच शक्तीशाली आहे आणि तो शेवटपर्यंत आम्हाला जोमदारपणे विरोध करील या गोष्टींबद्दल आम्ही पूर्णपणे जाणून आहोत. त्याचे हल्ले उघड आणि निंद्य किंवा लबाड आणि फसवे असू शकतात. भूतकाळात केवळ शांती असलेल्या भागांमध्ये छळ अचानकपणे उद्भवू शकतो. आम्हाला अन्यायीपणे छळण्यास दुष्ट विरोधक, दुर्गुणी आणि तीव्रपणा बिलकुलही कमी न करणारे असतील. योग्य समयी, सर्वांना हे स्पष्ट केले जाईल की, ते प्रत्यक्षात “देवाचे विरोधी” आहेत आणि तो त्यांचा नाश करील. (प्रे. कृत्ये ५:३८, ३९; २ थेस्स. १:६-९) त्या दरम्यान, आम्हाला काहीही सहन करावे लागत असले तरी, यहोवाला विश्वासूपणे सेवा करण्यात आणि राज्य संदेशाचा प्रचार करण्यात खंबीर राहण्यास आम्ही निश्चित आहोत. ‘जीवनाचा मुगुट परीक्षेत उतरल्यावर आम्हाला मिळेल,’ हे जाणून असल्यामुळे, आम्ही पृथ्वीवरील सर्वात आंनदी लोक आहोत.—याकोब १:१२.