धीर—ख्रिश्चनांसाठी आवश्यक
“आपल्या विश्वासात . . . धीराची भर घाला.”—२ पेत्र १:५, ६.
१, २. आम्ही सर्वच जण शेवटपर्यंत का धीराने टिकून राहिले पाहिजे?
फिरते पर्यवेक्षक आणि त्यांची पत्नी एका ९० वर्षांच्या त्यांच्या समविश्वासू ख्रिश्चनाला भेट देत होते. त्याने पूर्ण वेळेची सेवा अनेक दशके केली होती. ते बोलत असताना, या वयस्कर बांधवाला अनेक वर्षे त्याने विशेषाधिकारांचा जो आनंद घेतला होता त्याच्या आठवणी आल्या. “परंतु आता मला इतके जमत नाही,” असे दुःखाने बोलत असताना त्याच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. फिरत्या पर्यवेक्षकांनी त्यांचे पवित्र शास्त्र उघडून मत्तय २४:१३ वाचले, तेथे येशू ख्रिस्ताने म्हटले की: “जो शेवटपर्यंत टिकून राहील [धीर धरेल] तोच तरेल.” मग पर्यवेक्षकांनी त्या प्रिय बांधवाकडे पाहिले व म्हटले: “आम्हा सर्वांसाठी शेवटची नेमणूक, म्हणजे आम्ही त्याची सेवा किती अधिक किंवा किती कमी करु शकतो, यापेक्षा शेवटपर्यंत धीर धरणे ही आहे.”
२ होय, ख्रिश्चन या नात्याने आम्ही सर्व या व्यवस्थिकरणाच्या अंतापर्यंत किंवा आमच्या जीवनाच्या अंतापर्यंत धीराने टिकून राहिले पाहिजे. तारण मिळण्यासाठी यहोवाची मर्जी संपादण्यास दुसरा कोणताही मार्ग नाही. आम्ही जीवनाच्या शर्यतीत आहोत, म्हणून समाप्तीची रेषा ओलांडूपर्यंत “धीराने धावा”यला हवे. (इब्रीयांस १२:१) समविश्वासू ख्रिश्चनांना आर्जविताना प्रेषित पेत्राने या गुणाचे महत्त्व ओळखले. “आपल्या विश्वासात . . . धीराची भर घाला” असे तो म्हणाला. (२ पेत्र १:५, ६) परंतु धीर खरेपणाने काय आहे?
धीर—याचा काय अर्थ होतो
३, ४. धीर धरणे याचा काय अर्थ होतो?
३ धीर धरला पाहिजे याचा काय अर्थ होतो? “धीर” (हाय․पो․मिʹनो) यासाठी असलेल्या ग्रीक क्रियापदाचा अर्थ “टिकून राहणे किंवा आहे त्या स्थितीत राहणे” असा आहे. पवित्र शास्त्रात त्याचा उल्लेख १७ वेळा आलेला आहे. शब्दकोशकार बाऊर, एफ. डब्ल्यू. गिंगरिच आणि एफ. डँकर यांच्यानुसार, याचा अर्थ “पळून जाण्यापेक्षा टिकून राहणे . . . निश्चल, टिकाव धरणे” हा होतो. “धीर” (हाय․पो․मो․नेʹ) यासाठी असलेले नाम ३० पेक्षा अधिक वेळा आढळते. याविषयी, विल्यम बार्कले यांनी लिहिलेले अ न्यू टेस्टमेंट वर्डबुक असे म्हणते: “धीर हा मनाचा कल आहे जो केवळ शरणागतीने नव्हे तर उज्ज्वल आशेमुळे गोष्टी सहन करु शकतो . . . हा असा गुण आहे जो मनुष्याला वाऱ्याचा सामना करताना टिकवून ठेवतो. तसेच हा सद्गुण कठीण परीक्षाचे रुपांतर महिमेत करतो, व दुःखापेक्षा ध्येयाकडे त्याचे लक्ष असते.”
४ यास्तव, धीर आम्हाला, अडखळणे किंवा त्रासाला तोंड देत असताना आमची आशा न गमावण्यासाठी मदत करतो. (रोमकर ५:३-५) तो सद्य त्रासापेक्षा ध्येयाकडे—म्हणजे स्वर्गात किंवा पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचे बक्षीस, किंवा देणगी मिळण्याकडे पाहत असतो.—याकोब १:१२.
धीर—का?
५. (अ) सर्व ख्रिश्चनांना ‘धीराचे अगत्य का आहे’? (ब) आमच्या परीक्षा कोणत्या दोन वर्गांमध्ये विभागता येतील?
५ ख्रिश्चन या नात्याने, आम्हा सर्वांना “सहनशक्तीचे (धीराचे) अगत्य आहे.” (इब्रीयांस १०:३६) का बरे? कारण मूलभूतपणे आम्हाला “नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते.” याकोब १:२ मधील हे ग्रीक शास्त्रवचन, एखादी व्यक्ती चोराच्या सामोरी जाताना अनपेक्षित किंवा अनिश्चित गाठ पडल्याचे सुचविते. (पडताळा लूक १०:३०.) आम्ही ज्या समस्यांचा सामना करतो त्यांना दोन वर्गात विभाजित केले जाऊ शकते: सर्वसामान्यपणे मानवांना वारशाने मिळालेल्या पापाच्या परीक्षा आणि आमच्या ईश्वरी भक्तीमुळे उद्भवणाऱ्या परीक्षा. (१ करिंथकर १०:१३; २ तीमथ्य ३:१२) यातील काही परीक्षा कोणत्या आहेत?
६. दुःखदायक आजाराला तोंड देत असताना एक साक्षीदार कसा धीराने टिकून राहिला?
६ गंभीर आजारपण. तीमथ्याप्रमाणेच काही ख्रिश्चनांनी ‘वारंवार होणाऱ्या दुखण्यात’ टिकून राहिले पाहिजे. (१ तीमथ्य ५:२३) विशेषकरून अति दुःखदायक अशा जुन्या आजाराचा सामना करताना, आजारपणात देवाच्या मदतीने स्थिर राहून आम्ही आमच्या ख्रिस्ती आशेची दृष्टी न गमावण्यासाठी आजारपणात टिकून राहण्याची आवश्यकता आहे. पन्नाशीत असणाऱ्या एका साक्षीदाराच्या उदाहरणाचा विचार करा, ज्याने जलद वाढणाऱ्या अतिशय विषारी गांठीबरोबर बऱ्याच अवधीपर्यंत कठीण लढत दिली. रक्तसंक्रमणाचा स्वीकार न करण्याविषयी दोन्ही शस्त्रक्रियेत त्याने खंबीर भूमिका घेतली होती. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) परंतु ही गांठ पुनः त्याच्या पोटात वाढली व ती त्याच्या पाठीच्या कण्याजवळ वाढू लागली. त्याने अनुभव केल्याप्रमाणे, कल्पना करता न येणारा शारीरिक त्रास त्याने सहन केला, ज्याला कोणतेही औषध कमी करु शकत नव्हते. तथापि, त्याने अद्ययावत असलेल्या दुःखापेक्षा नवीन जगातील जीवनाच्या बक्षीसाकडे पाहिले. तो त्याच्या ज्वलंत आशेची सहभागिता वैद्यांबरोबर, परिचारिकांसोबत आणि भेटायला येणाऱ्या लोकांसोबत करीत राहिला. तो शेवटपर्यंत—त्याच्या जीवनाचा अंत होईपर्यंत टिकून राहिला. तुमची आरोग्याची समस्या जीवनाला-धोकेदायक नसेल किंवा त्या प्रिय बंधू सारखी दुःखदायकही नसेल, परंतु यात देखील धीराची परीक्षा होऊ शकते.
७. आमच्या काही आध्यात्मिक बंधू आणि बहिणीच्या धीरात कोणत्या दुःखाचा समावेश होता?
७ भावनात्मक त्रास. वेळोवेळी यहोवाच्या लोकांना ‘आत्म्याच्या व्याकूळतेमुळे’ ‘हृदयाच्या क्लेशाच्या’ सामोरे जावे लागते. (नीतीसूत्रे १५:१३) या “शेवटल्या कठीण दिवसात” तीव्र निराशा असामान्य नाही. (२ तीमथ्य ३:१) डिसेंबर ५, १९९२ च्या सायन्स न्यूजने अहवाल दिला: “१९१५ पासूनच्या पुढील प्रत्येक पिढीत अति तीव्रतेच्या प्रमाणात व अनेकदा असमर्थ खिन्नतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे.” शरीरविज्ञान शास्त्रविषयक घटकापासून ते दुःखदायक निराशेच्या अनुभवापर्यंत अशा निराशेची विविध कारणे असू शकतात. काही ख्रिश्चनांसाठी, धीरामध्ये भावनात्मक त्रासाला तोंड देणे स्थिर राहण्यासाठी दैनंदिन झगडणे याचा समावेश होतो. तथापि, ते हार मानत नाहीत. दुःखी असतानाही ते यहोवाला विश्वासू राहतात.—पडताळा स्तोत्रसंहिता १२६:५, ६.
८. आम्हाला कोणत्या आर्थिक परीक्षेला सामोरे जावे लागेल?
८ आम्ही विविध परीक्षांना सामोरे जात असता त्यामध्ये गंभीर आर्थिक कष्टाचा देखील समावेश असू शकतो. अमेरिकेतील, न्यू जर्सी येथील एक बांधव बेरोजगार असताना, त्याच्या कुटुंबाच्या भरणपोषणाची व त्याच्या घराला वंचित न करण्याविषयीची त्याला काळजी लागली. तथापि, राज्याच्या आशेपासून तो विचलित झाला नाही. काम शोधत असताना, त्याने सहाय्यक पायनियर या नात्याने सेवा करण्याच्या सुसंधीचा फायदा घेतला. शेवटी, त्याला काम मिळाले.—मत्तय ६:२५-३४.
९. (अ) प्रियजनाला मृत्यूत गमावल्यामुळे धीराची गरज कशी दिसून येते? (ब) कोणती शास्त्रवचने दाखवतात की दुःखाने रडण्यात काही चूक नाही?
९ जर तुम्ही प्रिय जनांना मृत्युमुळे गमावले असल्यास, तुम्हाला तुमच्या सभोवती असणारे नित्याचे काम पुन्हा सुरु करुपर्यंत धीर टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वर्षी ती वेळ की जेव्हा तुमच्या प्रियजनाचा मृत्यू झाला होता येते तेव्हा विशेषेकरून तुमच्यासाठी दुःखाचे असू शकते. धीराने टिकून राहण्याचा अर्थ, त्यांना गमावल्यामुळे दुःखाने रडणे चुकीचे आहे असा होत नाही. ज्यांच्यावर आम्ही प्रीती करतो त्यांच्या मृत्युमुळे शोक करणे स्वाभाविकच आहे, व यामुळे पुनरूत्थानाच्या आशेवर आमचा विश्वास नाही हे सूचित होत नाही. (उत्पत्ती २३:२; पडताळा इब्रीयांस ११:१९.) लाजारचा मृत्यू झाल्यावर जरी त्याने खात्रीने मार्थाला सांगितले होते की: “तुझा भाऊ पुन्हा उठेल,” तरी “येशू रडला” आणि लाजार पुन्हा उठला!—योहान ११:२३, ३२-३५, ४१-४४.
१०. यहोवाच्या लोकांना धीराची अद्वितीय गरज का आहे?
१० सर्व मानवांना सामान्य असणाऱ्या धीरात टिकून राहणाऱ्या परीक्षांव्यतिरिक्त, यहोवाच्या लोकांना अद्वितीय धीराची गरज आहे. येशूने इशारा दिला: “माझ्या नावामुळे सर्व रा तुमचा द्वेष करतील.” (मत्तय २४:९) त्याने हे देखील म्हटले: “ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील.” (योहान १५:२०) इतका द्वेष आणि छळ का बरे? कारण देवाचे सेवक पृथ्वीवर कोठेही राहात असले तरी, यहोवा देवासोबत असलेले आमचे सत्व सैतान तोडू पाहत आहे. (१ पेत्र ५:८; पडताळा प्रकटीकरण १२:१७.) या कारणास्तव, आतापर्यंत सैतानाने तीव्र छळ आणला आहे ज्यामुळे आमच्या धीराला कठीण परीक्षेत टाकले आहे.
११, १२. (अ) यहोवाचे साक्षीदार आणि त्यांच्या मुलांना १९३० मध्ये १९४० च्या आरंभाला धीराच्या कोणत्या परीक्षेला तोंड द्यावे लागले? (ब) यहोवाचे साक्षीदार राष्ट्रीय बोधचिन्हाला वंदन का करीत नाहीत?
११ उदाहरणार्थ, १९३० मध्ये आणि १९४० च्या आरंभाला अमेरिका आणि कॅनडातील यहोवाचे साक्षीदार आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या विवेकामुळे राष्ट्रीय बोधचिन्हांना वंदन करण्याचे नाकारल्यामुळे ते तीव्र छळाचे शिकार बनले. साक्षीदार राहात असलेल्या राष्ट्राच्या बोधचिन्हाला आदर देतात, परंतु निर्गम २०:४, ५ मध्ये दिलेल्या देवाच्या नियमाच्या तत्त्वाला ते मान्य करतात: “आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करु नको; कारण मी तुझा देव [यहोवा, न्यू.व.] ईर्ष्यावान् देव आहे.” शाळेत जाणाऱ्या साक्षीदारांच्या काही मुलांनी केवळ यहोवा देवाला त्यांची भक्ती देण्याची इच्छा प्रकट केल्यावर त्यांना शाळेतून काढून टाकले, तेव्हा साक्षीदारांनी त्यांच्या शिक्षणासाठी राज्य शाळा काढल्या. आज जसे सुसंस्कृत रा करीत आहेत त्याप्रमाणे अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने त्यांची धार्मिक भूमिका मान्य केल्यावर हे विद्यार्थी पुन्हा सार्वजनिक शाळांमध्ये परतले. तथापि, त्या युवकांनी दाखवलेला साहसी धीर, आता पवित्र शास्त्रीय दर्जांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करताना थट्टेचा सामना करत असलेल्या ख्रिश्चन युवकांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण सादर करतो.—१ योहान ५:२१.
१२ मानवांना सामान्य असणाऱ्या आणि आमच्या ख्रिस्ती विश्वासामुळे आम्ही सामना करीत असलेल्या—विविध परीक्षांच्या सामोरे आम्ही जातो—ज्या दाखवतात की आम्हाला धीराची आवश्यकता का आहे. परंतु आम्ही धीर कसा धरू शकतो?
शेवटपर्यंत धीर धरणे—कशाप्रकारे?
१३. यहोवा धीर कसा पुरवितो?
१३ यहोवाची भक्ती न करणाऱ्यांपेक्षा देवाच्या लोकांना निश्चित असा फायदा आहे. मदतीसाठी आम्ही “धीर . . . देणारा देव” याकडे विनंती करु शकतो. (रोमकर १५:५) तरी पण, कशाप्रकारे यहोवा आम्हाला धीर पुरवितो? एक मार्ग म्हणजे, त्याचे वचन, पवित्र शास्त्रात उद्धृत केलेल्या धीराच्या उदाहरणाद्वारे तो हे करतो. (रोमकर १५:४) यावर आम्ही मनन केले असता, केवळ धीर धरण्यासाठीच आम्हाला उत्तेजन मिळणार नाही तर, धीर कसा धरावा याविषयी बरेच काही आम्ही शिकू शकतो. दोन उल्लेखणीय उदाहरणांचा विचार करा—ईयोबाचे साहसी उदाहरण आणि येशू ख्रिस्ताचा निर्दोष धीर.—इब्रीयांस १२:१-३; याकोब ५:११.
१४, १५. (अ) ईयोबाने कोणत्या परीक्षा धीराने सहन केल्या? (ब) ईयोबाने ज्या परीक्षांचा सामना केला त्यात तो कसा धीराने टिकून राहिला?
१४ कोणत्या परिस्थितीने ईयोबाच्या धीराला परीक्षेत टाकले? जेव्हा त्याने त्याची सर्वच मालमत्ता गमावली तेव्हा आर्थिक संकटाला त्याला सहन करावे लागले. (ईयोब १:१४-१७; पडताळा ईयोब १:३) ईयोबाच्या दहाही पुत्रांवर चक्री वादळामुळे मृत्यू ओढवला तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. (ईयोब १:१८-२१) त्याने अतिशय गंभीर, दुःखदायक आजाराचा अनुभव घेतला. (ईयोब २:७, ८; ७:४, ५) देवाला सोडून देण्याविषयी त्याच्या स्वतःच्या पत्नीने त्याच्यावर दबाब आणला. (ईयोब २:९) निकटच्या सोबत्यांनी अपायकारक, निर्दयी आणि असत्य असलेल्या गोष्टी सांगितल्या. (पडताळा ईयोब १६:१-३ आणि ईयोब ४२:७.) तथापि, या सर्वांमध्ये ईयोब सत्व टिकवून स्थिर राहिला. (ईयोब २७:५) तो ज्या गोष्टीत धीराने टिकवून राहिला त्याप्रमाणे यहोवाचे साक्षीदार आज परीक्षांच्या सामोरे जात आहेत.
१५ या सर्व परीक्षांत ईयोब धीराने कसा टिकून राहिला? धीराने टिकून राहण्यासाठी ईयोबाला खासपणे एका गोष्टीने मदत दिली व ती होती आशा. त्याने म्हटले “वृक्षाची काही तरी आशा असते. तो तोडला तरी पुनः फुटतो, त्याला धुमारा फुटावयाचा राहात नाही.” (ईयोब १४:७) ईयोबाला कोणती आशा होती? नंतरच्या काही वचनात उद्धृत केल्यानुसार त्याने म्हटले: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय? . . . तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृती त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” (ईयोब १४:१४, १५) होय, ईयोबाने तो अनुभवीत असलेल्या दुःखापेक्षा अधिक काही पाहिले. त्याला माहीत होते की त्याची परीक्षा कायमची टिकणार नाही. जास्तीत जास्त त्याला मरणापर्यंत धीर धरायचा होता. त्याची आशादायी अपेक्षा होती की, मृतांना पुनः उठवण्याची प्रेमळ इच्छा राखणारा यहोवा देव त्याला पुनः जीवन देईल.—प्रे. कृत्ये २४:१५.
१६. (अ) धीराविषयी ईयोबाने दाखवलेल्या उदाहरणापासून आम्ही काय शिकतो? (ब) राज्याची आशा आमच्यासाठी किती वास्तविक असली पाहिजे, आणि का बरे?
१६ ईयोबाच्या धीरापासून आम्ही काय शिकतो? शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आम्ही आमच्या विश्वासाची दृष्टी गमावता कामा नये. राज्याच्या आशेच्या खात्रीचा अर्थ आम्ही सामोरे जात असलेला कोणताही त्रास “क्षणिक” आहे याची देखील आठवण ठेवावी. (२ करिंथकर ४:१६-१८) आमची मूल्यवान आशा नजिकच्या भवितव्यातील वेळेच्या यहोवाच्या अभिवचनावर आधारलेली आहे जेव्हा “तो [आमच्या] डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील, ह्यापुढे मरण नाही; शोक रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:३, ४) ती आशा, जी “आम्हाला लाजवीत नाही,” तिने आमच्या विचारांचे रक्षण केले पाहिजे. (रोमकर ५:४, ५; १ थेस्सलनीकाकर ५:८) ती आम्हाला वास्तविक वाटली पाहिजे—ती इतकी वास्तविक असली पाहिजे की आम्ही आमच्या विश्वासाच्या डोळ्यांनी, स्वतःला नवीन जगात पाहिले पाहिजे—आजारपण आणि निराशेबरोबर झगडण्याऐवजी प्रत्येक दिवशी चांगले आरोग्य आणि शुद्ध मनाने उठणे आहे; आर्थिक दबावांची काळजी करण्याऐवजी सुरक्षिततेत राहणे; मृत प्रियजनांसाठी येथून पुढे शोक केला जाणार नाही परंतु पुनरूत्थान होत असल्याचे पाहण्याचे शिरशिरी भरविणारे अनुभव घेणे होय. (इब्रीयांस ११:१) या आशेविना आम्ही आमच्या सद्याच्या परीक्षेत इतके चिरडून जाऊ शकतो की, त्यात टिकून राहण्याचे सोडून देऊ. आमच्या आशेसोबत, सतत लढत देत राहण्यासाठी व शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आमच्याजवळ किती जबर उत्तेजन आहे!
१७. (अ) येशूने कोणत्या परीक्षा धीराने सहन केल्या? (ब) येशूने तीव्र त्रास सहन केला हे कोणत्या वास्तविकतेवरून दिसून येते? (तळटीप पहा.)
१७ पवित्र शास्त्र आम्हाला येशूकडे “पाहत असावे” यासाठी व ‘त्याच्याविषयी विचार करण्यास’ आर्जविते. कोणत्या परीक्षांत तो धीराने टिकून राहिला? त्यातील काही इतरांच्या पाप आणि अपरिपूर्णतेमुळे आल्या होत्या. येशू केवळ “पातक्यांनी केलेला विरोध” यातच टिकून राहिला नाही तर, त्याच्या शिष्यांमध्ये ज्या समस्या होत्या व ज्यात त्यांच्यामध्ये कोण मोठा आहे ही अनेकदा उद्भवलेली समस्याही होती. याही पेक्षा अधिक म्हणजे, तो अतुलनीय विश्वासाच्या परीक्षेला सामोरा गेला. त्याने “वधस्तंभ सहन केला.” (इब्रीयांस १२:१-३; लूक ९:४६; २२:२४) वधस्तंभावर छळ सहन करीत असताना झालेले मानसिक आणि शारीरिक दुःख तसेच देवनिंदात्मक असा कलंक लावून त्याला मृत्यूदंड देणे याची केवळ कल्पना करणे देखील मुश्किलीचे वाटते.a
१८. प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे, कोणत्या दोन गोष्टींनी येशूला टिकून राहण्यात मदत केली?
१८ मग, शेवटपर्यंत धीरात टिकून राहण्यासाठी येशूला कशामुळे मदत मिळाली? प्रेषित पौल दोन गोष्टींचा उल्लेख करतो ज्यामुळे येशूला मदत मिळाली त्या आहेत: ‘प्रार्थना व विनवणी’ तसेच “जो आनंद त्याच्यापुढे होता.” देवाचा परिपूर्ण पुत्र, येशूला मदत मागण्यासाठी लाज वाटली नाही. त्याने “मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत” प्रार्थना केली. (इब्रीयांस ५:७; १२:२) विशेषपणे त्याची मोठी परीक्षा जवळ आली असता, त्याने सामर्थ्य मिळण्यासाठी वारंवार आणि कळकळीने प्रार्थना केली. (लूक २२:३९-४४) येशूच्या विनवणीला प्रतिसाद म्हणून यहोवाने परीक्षेला दूर केले नाही, परंतु धीराने सहन करण्यासाठी त्याने येशूला सामर्थ्य दिले. येशू धीराने टिकून राहिला कारण वधस्तंभाच्या पलिकडे असलेले बक्षीस—यहोवा देवाचे नाव पवित्रीकरण करण्यामध्ये असलेला त्याचा सहभाग आणि मानवजातीला मृत्युपासून सोडविण्याचा आनंद याकडे त्याने पाहिले.—मत्तय ६:९; २०:२८.
१९, २०. धीरामध्ये काय समाविष्ट आहे, त्याविषयी यथार्थ दृष्टिकोन असण्यासाठी येशूचे उदाहरण आमची मदत कशी करते?
१९ येशूच्या उदाहरणावरून, धीरामध्ये काय सामाविष्ट आहे त्याविषयी यथार्थ दृष्टिकोन ठेवण्यास मदत करणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही शिकतो. धीराचे हे कार्य एवढे सोपे नाही. एखाद्या विशिष्ट परीक्षेत धीर धरणे आमच्यासाठी कठीण वाटल्यास, येशूच्या बाबतीत देखील असेच होते हे जाणणे सांत्वनदायक आहे. शेवटपर्यंत धीराने टिकून राहण्यास बळ मिळण्यासाठी आम्ही वारंवार प्रार्थना केली पाहिजे. परीक्षेत असताना प्रार्थना करण्यास कधी कधी आम्ही अपात्र आहोत असे आम्हाला वाटू लागेल. परंतु आम्ही आमची हृदये त्याच्यापुढे मोकळी करण्यास यहोवा आम्हाला निमंत्रण देतो ‘कारण तो आमची काळजी घेतो.’ (१ पेत्र ५:७) आणि यहोवाने त्याच्या वचनात जे अभिवचन दिले आहे त्या कारणामुळे, जे विश्वासाने त्याचा धावा करतील त्यांना “सामर्थ्याची पराकोटी” देण्याचे कर्तव्य त्याच्या स्वतःवर आले आहे.—२ करिंथकर ४:७-९.
२० कधीकधी आम्ही अश्रू गाळून धीराने टिकून राहिले पाहिजे. येशूसाठी वधस्तंभावरील दुःख, आनंद करण्याचे कारण नव्हते. उलटपक्षी, त्याच्यासमोर असलेल्या बक्षीसामध्ये त्याचा आनंद ठेवला होता. आमच्या बाबतीत पाहता, आमची परीक्षा होत असताना आम्ही सर्वदा आनंदी आणि उत्साही असण्याची अपेक्षा करणे यथार्थ नसणार. (पडताळा इब्रीयांस १२:११.) तथापि, बक्षीसाकडे पुढे पाहून, आम्ही जरी अनेक खडतर अशा परीक्षेला तोंड देऊ तरी त्यात “आनंदच मान”ण्यास समर्थ होऊ शकू. (याकोब १:२-४; प्रे. कृत्ये ५:४१) महत्त्वाची ही गोष्ट आहे की, अश्रू गाळण्यासारखी परीक्षा असली तरी आम्ही त्यात स्थिर टिकून राहू. आणि येशूने असे म्हटले नव्हते की, ‘जो कमी अश्रू गाळतो तोच तरेल’ परंतु, “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.”—मत्तय २४:१३.
२१. (अ) आमच्या धीरात २ पेत्र १:५, ६ कशाची भर घालण्यास आम्हाला आर्जविते? (ब) पुढील लेखात कोणत्या प्रश्नांचा विचार केला जाईल?
२१ अशाप्रकारे तारणासाठी धीर आवश्यक आहे. तथापि, २ पेत्र १:५, ६ मध्ये आम्हाला धीरात ईश्वरी भक्तीची भर घालण्यास आर्जविले आहे. ईश्वरी भक्ती काय आहे? तिचा संबंध धीराबरोबर कसा येतो आणि तुम्ही ती कशी प्राप्त करु शकता? या प्रश्नांचा विचार पुढील लेखात केला जाईल.
[तळटीपा]
a येशूने सहन केलेला तीव्र त्रास त्याचे परिपूर्ण शरीर वधस्तंभावर काही तासातच मृत झाले या वास्तविकतेवरून दिसून येतो, परंतु त्याच्या बाजूला वधस्तंभावर चढविलेल्या चोरांना त्वरीत मृत्यू येण्यासाठी त्यांचे पाय तोडावे लागले. (योहान १९:३१-३३) वधस्तंभावर खिळण्याआधीच्या रात्री, पूर्ण रात्र त्याने झोपेविना घालवली व त्या दरम्यान त्याला झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास, कदाचित त्यामुळे त्याला त्याचा वधस्तंभ वाहून नेणे कठीण झाले होते या सर्व गोष्टींचा अनुभव त्या चोरांनी घेतला नसेल.—मार्क १५:१५, २१.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ धीराने टिकून राहण्याचा अर्थ काय होतो?
▫ यहोवाच्या लोकांना धीराची अद्वितीय गरज का आहे?
▫ धीर धरण्यासाठी ईयोबाला कशामुळे मदत मिळाली?
▫ धीराविषयी आमचा यथार्थ दृष्टिकोन असण्यासाठी येशूचे उदाहरण आमची मदत कशी करते?
[२२ पानांवरील चित्रं]
त्यांची भक्ती केवळ यहोवाला देत असल्यामुळे शाळेतून काढून टाकलेल्या ख्रिश्चन मुलांना शिकवण्यासाठी राज्य शाळा स्थापित करण्यात आल्या
[२४ पानांवरील चित्रं]
येशूने त्याच्या पित्याचा आदर करण्याच्या निश्चयाने, धीराने टिकून राहण्यासाठी प्रार्थना केली