तुम्हाला आठवते का?
अलीकडील टेहळणी बुरूज अंक तुम्हाला व्यावहारिक वाटले आहेत का? मग पुढील प्रश्न स्वतःला विचारून आपल्या स्मरणशक्तीची चाचणी घेऊ या:
◻ नोकरीविषयक निर्णय घेताना कोणत्या दोन प्रश्नांनी ख्रिश्चनांना व्यक्तिगत निर्णय घेण्यास मदत केली आहे?
पहिला मुख्य प्रश्न आहे: सर्वच प्रापंचिक कामाबद्दल बायबल नापसंती व्यक्त करते का? दुसरा प्रश्न आहे: अशी कामे केल्याने एखादा, निंद्य चालीरीतीमध्ये साथीदार होऊ शकतो का?—४/१५, पृष्ठ २८.
◻ कोणत्या अर्थाने ‘मानव सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली होती?’ (रोमकर ८:२०)
आपले मूळ पालक, आदाम आणि हव्वा यांच्या कार्यामुळे आपण “व्यर्थतेच्या स्वाधीन” झालो होतो. “आपखुशीने” किंवा व्यक्तिगत निर्णयामुळे आपण व्यर्थतेच्या स्वाधीन झालो नाही. वारशाने आपल्यावर ही परिस्थिती आली आहे. आपले मूळ पालक, अपरिपूर्णता, पाप आणि मृत्यू केवळ हाच वारसा आपल्या हवाली करू शकत होते तरीदेखील यहोवाने त्यांच्यावर दया दाखवून त्यांना मुले होऊ दिली. मृत्यू सर्व मानवांमध्ये पसरले; या अर्थाने देवाने ‘सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन’ केले.—५/१, पृष्ठ ५.
◻ “अमंगळ पदार्थ” भवितव्यामध्ये “पवित्रस्थानात उभा” राहील असे म्हणणे तर्कशुद्ध का आहे? (मत्तय २४:१५)
प्राचीन नमुन्यात, ‘पवित्रस्थानात उभा असलेला अमंगळ पदार्थ’ याचा संबंध सा.यु. ६६ मध्ये जनरल गॅलसच्या नेतृत्त्वाखाली रोमनांनी केलेल्या हल्ल्याशी होता. त्या हल्ल्याचे आधुनिक दिवसांतील समांतर—‘मोठ्या संकटाचा’ उद्रेक—अजून पुढे आहे. (मत्तय २४:२१) तेव्हा, ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ अद्याप पवित्रस्थानात उभा राहायचा आहे.—५/१, पृष्ठे १६, १७.
◻ नोकरी करणाऱ्या पित्याला व मातेला आपल्या मुलांबरोबर वेळ कसा घालवता येईल?
दिवसभर बाहेर काम करून थकलेली माता आपल्या मुलांना स्वयंपाकात हातभार लावयाला सांगू शकते. शनिवारी-रविवारी पुष्कळ कामे आटपून घ्यायची असतील तर पिता काही कामे आपल्या मुलांबरोबर करू शकतो.—५/१५, पृष्ठ ६.
◻ ‘यहोवाच्या मार्गात चालणाऱ्यांनी’ काय करणे आवश्यक आहे? (यिर्मया ७:२३)
यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता एकनिष्ठेची—केवळ त्याचीच सेवा करण्याचा दृढनिश्चयी होण्याची गरज आहे. त्यासाठी यहोवावर भरवसा ठेवण्याची आवश्यकता आहे—यहोवाची अभिवचने विश्वासयोग्य आहेत आणि ती पूर्ण होतीलच असा पूर्ण विश्वास बाळगण्याची आवश्यकता आहे. यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता आज्ञाधारकतेची गरज आहे—विचलित न होता त्याच्या नियमांचे पालन करणे आणि त्याच्या उच्च दर्जांनुसार चालणे आवश्यक आहे. (स्तोत्र ११:७)—५/१५, पृष्ठ १४.
◻ ‘मनुष्यांतील दाने’ पूर्ण करू शकतील अशा चार महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? (इफिसकर ४:८, NW)
ते सौम्यपणे आपल्यामध्ये सुधारणा करू शकतात, प्रेमळपणे आपली उभारणी करू शकतात, मंडळीसोबत आपले ऐक्य टिकवण्यास नेहमी हातभार लावू शकतात आणि धैर्याने आपले संरक्षण करू शकतात. (इफिसकर ४:१२-१४)—६/१, पृष्ठ १४.
◻ प्रेषितांची कृत्ये आणि पौलाच्या काही पत्रांमध्ये, त्याने ज्या शेकडो लोकांबरोबर संगत केल्याचे म्हटले आहे त्यावरून आपण काय शिकू शकतो?
आपण सदैव देवाच्या संघटनेसोबत, आपल्या स्थानिक मंडळीसोबत आणि आपल्या सहविश्वासू बांधवांसोबत कार्य केले पाहिजे. आपल्या सुखदुःखात आपल्याला त्यांच्या मदतीची, आधाराची आणि सांत्वनाची गरज आहे.—६/१, पृष्ठ ३१.
◻ इतरांना निर्माणकर्त्याबद्दल विचार करण्यास मदत करताना आपण कोणत्या तीन युक्तिवादांचा उपयोग करू शकतो?
प्रचंड विश्वात दिसून येणारा ताळमेळ, पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम आणि विविध क्षमतांनी युक्त असलेल्या मानवी मेंदूचा नाकारता न येणारा अद्वितीयपणा.—६/१५, पृष्ठ १८.
◻ निर्माणकर्त्याच्या व्यक्तिगत नावाचा अर्थ समजून घेणे इतके महत्त्वाचे का आहे?
देवाच्या नावाचा अर्थ, “तो व्हावयास कारणीभूत ठरतो” असा होतो आणि हे, देव उद्देशितो आणि घडवून आणतो यावर जोर देते. त्याचे नाव जाणून त्याचा वापर केल्याने, तो आपली अभिवचने पूर्ण करतो आणि सतत आपला उद्देश खरा करून दाखवत असतो हे आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो.—६/१५, पृष्ठ २१.
◻ कौटुंबिक बायबल अभ्यासात मुलांना कसे सामील केले जाऊ शकते?
शक्य असल्यास, प्रत्येक मुलाजवळ त्याचे स्वतःचे बायबल आणि अभ्यासाचे प्रकाशन असावे. अभ्यासल्या जाणाऱ्या माहितीमध्ये एखादे चित्र असल्यास, त्या चित्राविषयी काही सांगण्याची संधी घरातील सर्वात लहान मुलाला देता येऊ शकते व त्याच्यापेक्षा जरा मोठ्याला विशिष्ट शास्त्रवचन वाचण्यास सांगितले जाऊ शकते. आणि मोठ्या मुलाला अभ्यासत असलेली माहिती व्यवहारात कशी लागू करता येईल यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आधीच सांगितले जाऊ शकते.—७/१, पृष्ठ १५.
◻ मंडळीच्या सभांची तयारी करताना एक कुटुंब कोणती उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करू शकते?
(१) कुटुंबातील प्रत्येकाने मंडळीच्या सभांमध्ये उत्तरे देण्यास तयार असणे; (२) प्रत्येकाने स्वतःच्या शब्दांत उत्तरे देण्याचा प्रयत्न करणे; (३) उत्तरांमध्ये शास्त्रवचनांचा उपयोग करणे; आणि (४) वैयक्तिकपणे लागू करण्याच्या दृष्टिकोनातून साहित्याचे परीक्षण करणे.—७/१, पृष्ठ २०.
◻ यशस्वी विवाहाची गुरुकिल्ली काय आहे?
एखाद्याला यशस्वी विवाहाचा मौल्यवान आनंद अनुभवायचा असेल तर त्यासाठी हितकारक दळणवळणाची आवश्यकता आहे. यामध्ये, भावना व कल्पना यांची देवाणघेवाण गोवली आहे. आणि हितकारक दळणवळणात उभारणीकारक, तजेला देणाऱ्या, सद्गुणी, प्रशंसनीय व सांत्वनदायक गोष्टींचा समावेश असतो. (इफिसकर ४:२९-३२; फिलिप्पैकर ४:८)—७/१५, पृष्ठ २१.
◻ ‘यहोवाचा मार्ग’ काय आहे? (स्तोत्र २५:८, ९, १२)
तो, प्रेमाचा मार्ग आहे. देवाच्या दर्जांनुसार जे योग्य ते करणे हे या मार्गाचे मूलतत्त्व आहे. बायबलनुसार या तत्त्वबद्ध प्रेमाला व्यवहारात उतरवणे म्हणजे “सर्वोत्कृष्ट मार्ग” होय. (१ करिंथकर १२:३१)—८/१, पृष्ठ १२.