वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 २/१५ पृ. २९
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • देव कार्य करील तेव्हा तुमचा बचाव होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • “ह्‍या गोष्टी केव्हा होतील ते आम्हास सांगा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मोठ्या संकटातून जिवंत वाचवलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 २/१५ पृ. २९

वाचकांचे प्रश्‍न

ऑगस्ट १५, १९९६ च्या “टेहळणी बुरूज” नियतकालिकाने म्हटले: “संकटाच्या शेवटल्या टप्प्यानंतर, यहोवाच्या बाजूने आलेल्या ‘मनुष्यांचा’ निभाव लागेल.” यावरून, मोठ्या संकटाच्या पहिल्या टप्प्यात पुष्कळ नवीन लोक देवाच्या बाजूने येतील, असे सूचित होते का?

तेथे तसे सांगण्यात आलेले नाही.

मत्तय २४:२२ मधील येशूच्या शब्दांची पूर्णता भवितव्यात पहिल्यांदा, येणाऱ्‍या मोठ्या संकटाच्या पहिल्या टप्प्याद्वारे, जेव्हा धर्मावर हल्ला केला जाईल तेव्हा होणाऱ्‍या तारणाद्वारा पूर्ण होईल. त्या लेखाने म्हटले: “संकटाच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या बाबेलचा त्वरित व पूर्णपणे नाश होईल तेव्हा अभिषिक्‍त शेषांतील आणि ‘मोठ्या लोकसमुदायातील’ ‘मनुष्यांचा,’ निभाव आधीच लागलेला असेल याची आठवण करा.”

येशू आणि त्याची स्वर्गीय सेना संकटाच्या शेवटल्या टप्प्यात कार्य करील तेव्हा हे या विश्‍वासू जनांना धोका नसेल. पण, संकटाच्या त्या टप्प्यातून कोणाचा निभाव लागेल? पार्थिव आशा असलेल्या मोठ्या लोकसमुदायाचा निभाव लागेल असे प्रकटीकरण ७:९, १४ दाखवून देते. आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्यांबद्दल काय? अभिषिक्‍त जनांतील शेषांना स्वर्गात केव्हा घेतले जाईल याविषयी आपण ठाम का असू शकत नाही याची चर्चा, ऑगस्ट १५, १९९० च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी), नियतकालिकातील “वाचकांचे प्रश्‍न” या लेखाने केली होती. म्हणूनच अलीकडील अंकाने (ऑगस्ट १५, १९९६) “त्याचप्रमाणे, संकटाच्या शेवटल्या टप्प्यात, यहोवाच्या बाजूने आलेल्या ‘मनुष्यांचा’ निभाव लागेल,” असे सर्वसाधारण विधान करून ती बाब अनिश्‍चितपणे मांडली.

मोठ्या संकटाची सुरवात झाल्यावर नवीन लोक सत्य शिकून देवाच्या बाजूने येऊ शकतील याच्या संबंधाने, मत्तय २४:२९-३१ मधील येशूच्या शब्दांची नोंद घ्या. संकटाचा उद्रेक झाल्यावर मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह प्रकट होईल. येशूने म्हटले, की पृथ्वीवरील सर्व जाती शोक करतील. तेव्हा लोक परिस्थितीविषयी जागरूक होतील, पश्‍चात्ताप करतील, देवाची बाजू घेतील व खरे शिष्य होतील याबद्दल तो काहीही बोलला नाही.

तसेच, शेरडे आणि मेंढरे यांच्या दाखल्यात, मनुष्याचा पुत्र प्रकट होतो व गतकाळात त्यांनी जे काही केले व केले नाही त्यावर आधारित न्यायिकपणे त्यांना वेगळे करतो. पुष्कळ दिवसांपर्यंत शेरडांसारखे गुण प्रदर्शित करून अचानक मागे वळून मेंढरांसारखे होणाऱ्‍या लोकांबद्दल येशूने काहीच म्हटले नाही. लोक आधीच जे काही शाबीत झाले होते त्या आधारावर तो न्याय करण्यात येतो.—मत्तय २५:३१-४६.

परंतु, या मुद्द्‌यावरही आपण ठाम असू नये. अभिषिक्‍त आणि मोठ्या लोकसमुदायातील देवाच्या लोकांना आता काय करायचे आहे म्हणजेच, प्रचार व शिष्य बनवायचे आहे ते माहीत आहे. (मत्तय २८:१९, २०; मार्क १३:१०) आत्ता आपल्याला या आर्जवाकडे लक्ष दिले पाहिजे: “आम्ही त्याच्यासह कार्य करिता करिता विनंती करितो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये; कारण तो म्हणतो: अनुकूलसमयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले; पाहा, आताच समय अनुकूल आहे; पाहा आताच तारणाचा दिवस आहे.”—२ करिंथकर ६:१, २.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा