-
चिन्ह आपण त्याकडे लक्ष देत आहात का?टेहळणी बुरूज—१९९० | फेब्रुवारी १
-
-
ज्यावेळी ती निर्णायक वेळ येईल त्यावेळी तुमचे स्थान कोणते असेल? तुम्हाला नाशासाठी सोडले जाईल की, बचावासाठी निवडून घेण्यात येईल? तुमचे यथार्थ मार्गदर्शन व्हावे म्हणून येशूने दिलेल्या दृष्टांताचे परत एकदा सिंहावलोकन कराः “जेथे प्रेत असेल तेथे गरुड जमतील.”—लूक १७:३४-३७; मत्तय २४:२८.
अशाप्रकारे येशू येथे दूरदर्शीपणा व संघटीत हालचालीवर जोर देत होता. ज्या सर्वांस बचावासाठी निवडून घेण्यात येईल त्यांनी, देव जो आध्यात्मिक पौष्टीक आहार देत आहे तो नियमितपणे गोळा करण्यास व त्याकडून फायदा मिळविण्यास एकत्र जमा झालेच पाहिजे. अशाप्रकारची आध्यात्मिक भरवणूक केवळ यहोवाच्या साक्षीदारांच्या ६०,००० पेक्षा अधिक मंडळ्यांशी निकट संबंध राखल्याने व आपण वाचत आहात असले हे शास्त्राधारित प्रकाशन अभ्यासून प्राप्त होते हे आज लक्षावधी लोकांच्या अनुभवास आले आहे.
-
-
गरुड पक्षी किंवा गिधाडेटेहळणी बुरूज—१९९० | फेब्रुवारी १
-
-
गरुड पक्षी किंवा गिधाडे
चिन्ह
जेथे प्रेत असतील तेथे गरुड जमतील.” (मत्तय २४:२८, न्यू.व.) या दृष्टांतातून काही शिकण्याऐवजी काहींना त्यात चूक असल्याचे आढळते. त्यांचे म्हणणे आहे की, गरुड हे एकट्याने शिकार करणारे पक्षी आहेत व ते मृतांना नव्हे तर जिवंतांना आपले सावज बनवीत असतात. या कारणास्तव काही पवित्र शास्त्र प्रतींनी “गीध” हा शब्द उपयोगात आणला आहे. पण जो ग्रीक शब्द येथे प्रश्नार्थक वाटतो तो ए․ई․टोसʹ आहे व ज्याचे “गरुड” हे भाषांतर अचूक आहे.
इस्राएल देशात या गरुडाची एक जात आढळते व तिला नगरी गरुड असे म्हणतात. जॉन सिंक्लेअर व जॉन मेंडलसन यांच्या पाहणीनुसार “इतर अनेक शिकारी पक्ष्याप्रमाणे नगरी गरुड कुजक्या शवाबद्दल मागे राहात नाहीत, उलट शिकार होताच ताज्या सावजावर प्रथम तेच झडप घालतात.” दुसऱ्या एका निरिक्षकाने आफ्रिकेतील कलहारी येथे ६० पक्षांना एकत्र होताना पाहिले, ज्यांच्यामध्ये बेटलूअर आणि नगरी गरुड होते. हा निरिक्षक म्हणतोः “जेव्हा ते एखाद्या कुजक्या मांसासभोवताली जमतात तेव्हा नगरी गरुड हे पुढाकार घेणारे असतात. अनेक वेळा दोन पक्षी, बहुतेक जे जोडपेच असते, ते त्या शिकारीला वाटून घेताना दिसतात.”
भूमध्य समुद्राच्या प्रदेशात सागरी गरुड हे सर्वसाधारण आहेत. “गेल्या काही शतकात समुद्रावरील गरुड तसेच जमिनीवरील गरुड लढाईत ठार झालेल्या घोड्यांच्या प्रेतांवर पोसले गेल्याचे आढळून आले आहे. . . . यासाठीच, ते नेहमी लष्कराच्या मागोमाग जात असतात हे सुपरिचित आहे,” असे मॅक्लीनटॉक ॲण्ड स्ट्राँग यांचा सायक्लोपिडीआ म्हणतो.
अगदी चपळ व तीक्ष्ण दूरदृष्टीमुळे ताज्या शवाजवळ प्रथम येणारे पक्षी गरुडच असतात. येशू त्या वर्णनाशी परिचित होता ज्यात यहोवा देवाने ईयोबास हा नमविणारा प्रश्न विचारला होताः “गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय? तो खडकात . . . खडकाच्या सुळक्यावर दुर्गमस्थानी आपले कोटे करतो. तेथून तो आपले भक्ष्य निरखितो, त्याच्या नेत्रास ते दूरवर दिसते . . . जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो.”—ईयोब ३९:२७-३०.
अशा रितीने एका योग्य दाखल्याद्वारे येशूने हे दर्शविले की, ज्यांना लाक्षणिक रितीने ही गरुडाची तीक्ष्ण नजर लाभली आहे त्यांनाच फक्त या चिन्हापासून फायदा होणार आहे.
-