वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ४/१ पृ. १४-१८
  • मुक्‍तता मिळवून नवीन जगात प्रवेश

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुक्‍तता मिळवून नवीन जगात प्रवेश
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “मोठे संकट”
  • देवाच्या सेवकांवर हल्ला
  • “तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे”
  • नवे जग
  • यहोवा इतका वेळ का थांबून राहिला?
  • काही तरी वेगळी साध्यता
  • देवाच्या राज्याद्वारे लवकरच आपली सुटका होणार!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • देवाचे राज्य काय साध्य करील
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • मोठ्या संकटादरम्यान विश्‍वासू राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • मुक्‍तता निकट येते तसे धीर धरा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ४/१ पृ. १४-१८

मुक्‍तता मिळवून नवीन जगात प्रवेश

“ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११.

१, २. (अ) आपल्या काळात यहोवा घडवून आणणाऱ्‍या मुक्‍ततेच्या कृतींमध्ये आणि प्राचीन काळी त्याने घडवून आणलेल्या मुक्‍ततेच्या कृतींमध्ये कसा फरक असेल? (ब) यहोवा आपल्या लोकांना कोणत्या प्रकारच्या जगात नेईल?

यहोवा, मुक्‍तता देणारा देव आहे. प्राचीन काळी, त्याने आपल्या लोकांना अनेक प्रसंगी सोडवले. ती मुक्‍तता तात्पुरती होती, कारण यहोवाने त्यातील एकाही प्रसंगी सैतानाच्या संपूर्ण जगाविरुद्ध कायमचा न्यायदंड बजावला नव्हता. परंतु, आपल्या दिवसांमध्ये यहोवा लवकरच त्याच्या सर्व सेवकांची भव्य मुक्‍तता करणार आहे. यावेळी तो पृथ्वीतलावरून सैतानाच्या सर्व लवलेशांचा नाश करील व आपल्या सेवकांना एका कायमस्वरूपी, धार्मिक नवीन जगात आणील.—२ पेत्र २:९; ३:१०-१३.

२ यहोवा अभिवचन देतो: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:१०, ११) किती काळासाठी? “नीतिमान्‌ पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९; मत्तय ५:५) परंतु, हे घडण्याआधी, कधी पाहिले नाही अशा सर्वात त्रस्तमय काळातून या जगाला गुजरावे लागेल.

“मोठे संकट”

३. येशूने ‘मोठ्या संकटाचे’ वर्णन कसे केले?

३ सन १९१४ मध्ये या जगाने ‘शेवटल्या काळामध्ये’ पदार्पण केले. (२ तीमथ्य ३:१-५, १३) तेव्हापासून आजपर्यंत, ८३ वर्षे पूर्ण झाली आहेत व त्याचा अंत अत्यंत निकट आहे. त्यावेळी येशूने भाकीत केल्याप्रमाणे घडेल: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्तय २४:२१) होय, पाच कोटी मनुष्यहानी झालेल्या दुसऱ्‍या महायुद्धापेक्षाही ते बिकट असेल. जगास हादरवून टाकणारा काळ किती जलदगतीने येत आहे!

४. देव ‘मोठ्या बाबेलवर’ न्यायदंड का बजावतो?

४ ते “मोठे संकट,” थक्क करून टाकील अशा अचानकपणे, “एका घटकेत” येईल. (प्रकटीकरण १८:१०) त्या मोठ्या संकटाचा उद्रेक देवाचे वचन ज्याला “मोठी बाबेल” संबोधते त्या सर्व खोट्या धर्मांवर देवाच्या न्यायदंडाने होईल. (प्रकटीकरण १७:१-६, १५) प्राचीन बॅबिलोनचे प्रमुख वैशिष्ट्य खोटा धर्म होते. आधुनिक बॅबिलोन प्राचीन बॅबिलोनच्या प्रतिरूपाप्रमाणेच आहे व ती खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचे प्रतिनिधीत्व करते. राजनैतिक घटकांसोबत हातमिळवणी करून तिने वेश्‍यागिरी केली आहे. तिने त्यांच्या युद्धांना पाठिंबा दिला व दोन्ही बाजूच्या सैन्यांना आशीर्वाद दिला, ज्यामुळे एकाच धर्माच्या लोकांनी एकमेकांचे रक्‍त वाहिले. (मत्तय २६:५१, ५२; १ योहान ४:२०, २१) तिने आपल्या अनुयायांच्या भ्रष्ट कृतींकडे दुर्लक्ष केले आहे व खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा छळ केला आहे.—प्रकटीकरण १८:५, २४.

५. ‘मोठ्या संकटाची’ सुरवात कशी होते?

५ राजनैतिक घटक ‘मोठ्या बाबेलवर’ अचानक हल्ला करतात तेव्हा ‘मोठ्या संकटाची’ सुरवात होते. ते “कलावंतिणीचा द्वेष करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” (प्रकटीकरण १७:१६) त्यानंतर, आधी तिला पाठिंबा देणारे “रडतील व ऊर बडवून घेतील.” (प्रकटीकरण १८:९-१९) पण यहोवाच्या साक्षीदारांना याची आधीच अपेक्षा असल्यामुळे ते म्हणतील: “हालेलूया, . . . ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या दासांच्या रक्‍ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”—प्रकटीकरण १९:१, २.

देवाच्या सेवकांवर हल्ला

६, ७. ‘मोठ्या संकटादरम्यान’ यहोवाच्या सेवकांवर हल्ला केला जाईल तेव्हा ते निश्‍चिंत का राहू शकतात?

६ खोट्या धर्माचा नाश केल्यानंतर, राजनैतिक घटक यहोवाच्या सेवकांकडे वळतात. भविष्यवाणीत “मागोग देशातील गोग” अर्थात, सैतान असे म्हणतो: “जे स्वस्थपणे निर्भय राहत आहेत, . . . त्यांजवर मी चालून जाईन.” बेसावध सावज समजून ‘मोठा दळभार बरोबर घेऊन अभ्राने देश झाकावा तसा’ तो त्यांच्यावर हल्ला करतो. (यहेज्केल ३८:२, १०-१६) यहोवाचे लोक यहोवावर भरवसा ठेवत असल्यामुळे हा हल्ला निकामी ठरेल हे त्यांना माहीत आहे.

७ तांबड्या समुद्राजवळ देवाच्या सेवकांना आपण सापळ्यात पकडले असे फारो आणि त्याच्या सैन्याला वाटले तेव्हा यहोवाने चमत्कारिकरीत्या आपल्या लोकांची सुटका केली आणि इजिप्तच्या सैन्याचा नाश केला. (निर्गम १४:२६-२८) ‘मोठ्या संकटादरम्यान,’ राष्ट्रांना यहोवाच्या लोकांना सापळ्यात पकडले असे वाटेल तेव्हा तो पुन्हा एकदा त्यांच्या मदतीला धावून येईल: ‘त्या दिवशी माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील. मला ईर्ष्येने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोलावे लागेल.’ (यहेज्केल ३८:१८, १९) तेव्हा ‘मोठ्या संकटाचा’ त्वरित कळस गाठला जाईल!

८. यहोवा दुष्टांवर न्यायदंड बजावण्याआधी कोणत्या अलौकिक घटना घडतील व त्याचा परिणाम काय होईल?

८ ‘मोठ्या संकटाची’ सुरवात झाल्यानंतर एका विशिष्ट टप्प्यात, पण यहोवाने बाकीच्या जगावर आपला न्यायदंड बजावण्याआधी, अलौकिक घटना घडतील. त्यामुळे कोणते परिणाम होतील ते पाहा. “तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे [ख्रिस्ताचे] चिन्ह आकाशात प्रगट होईल; मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करितील, आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.” (मत्तय २४:२९, ३०) “तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्‍यांत चिन्हे घडून येतील, . . . भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील.”—लूक २१:२५, २६.

“तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे”

९. अलौकिक घटना घडतील तेव्हा यहोवाचे सेवक ‘आपली डोकी वर’ का करू शकतात?

९ त्या विशिष्ट समयी, लूक २१:२८ ची भविष्यवाणी लागू होते. येशूने म्हटले: “ह्‍या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तिसमय जवळ आला आहे.” देवाचे शत्रू भयाने थरथर कापतील कारण या अलौकिक घटना यहोवाकडून होत आहेत हे त्यांना माहीत होईल. परंतु, यहोवाचे सेवक आनंद करतील कारण आपला मुक्‍तिसमय जवळ आला आहे हे त्यांना माहीत होईल.

१०. ‘मोठ्या संकटाच्या’ कळसाचे वर्णन देवाचे वचन कसे करते?

१० त्यानंतर यहोवा, सैतानाच्या व्यवस्थेला मृत्यूचा तडाखा देतो: ‘मरी व रक्‍तपात यांनी मी त्यांजबरोबर [गोग] वाद मांडीन; त्याजवर, त्याच्या सैन्यांवर पाऊस, मोठ्या गारा, अग्नि व गंधक यांची धो धो वृष्टि करीन. तेव्हा त्यांस समजेल की मी यहोवा आहे.’ (यहेज्केल ३८:२२, २३) सैतानी व्यवस्थेच्या सर्व खुणांचा नाश करण्यात येतो. देवाकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या सर्व मानवी समाजाचे उच्चाटन करण्यात येते. हाच ‘मोठ्या संकटाचा’ हर्मगिदोन कळस आहे.—यिर्मया २५:३१-३३; २ थेस्सलनीकाकर १:६-८; प्रकटीकरण १६:१४, १६; १९:११-२१.

११. यहोवाच्या सेवकांना ‘मोठ्या संकटातून’ का वाचवले जाते?

११ मोठ्या संकटातून संपूर्ण पृथ्वीवरील यहोवाच्या लाखो उपासकांना मुक्‍तता मिळेल. हे लोक, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा” यांच्यातून आलेले आहेत व “मोठा लोकसमुदाय” या लोकांचाच मिळून बनला आहे. त्यांना इतक्या भयप्रेरित मार्गाने का सोडवले जाते बरे? कारण, ते “अहोरात्र” यहोवाची सेवा करतात. म्हणूनच, या जगाच्या अंतापासून त्यांचा बचाव होतो व एका धार्मिक नवीन जगात त्यांना नेण्यात येते. (प्रकटीकरण ७:९-१५) अशाप्रकारे ते, “परमेश्‍वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्‍नति करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील,” या यहोवाच्या अभिवचनाची पूर्णता पाहतात.—स्तोत्र ३७:३४.

नवे जग

१२. हर्मगिदोनातून बचावलेले कशाची वाट पाहू शकतात?

१२ दुष्टाईचे उच्चाटन आणि सर्व मानवी इतिहासातील सर्वात भव्य शकाचा उदय होईल तो समय किती रोमांचकारी असेल! (प्रकटीकरण २०:१-४) पृथ्वीवर परादीसमध्ये रूपांतर झालेल्या एका उज्ज्वल, देवाने निर्मिलेल्या एका स्वच्छ संस्कृतीत, एका नवीन जगात प्रवेश दिल्याबद्दल हर्मगिदोनातून बचावलेले जण यहोवाचे किती कृतज्ञ असतील! (लूक २३:४३) शिवाय, त्यांना कधीच मरावे लागणार नाही! (योहान ११:२६) होय, त्या क्षणापासून पुढे त्यांना यहोवा जितका काळ जिवंत आहे तितका काळ जिवंत राहण्याची आश्‍चर्यकारक, सर्वोत्कृष्ट आशा लाभेल!

१३. येशूने पृथ्वीवर असताना बरे करण्याचे जे कार्य केले तेच तो पुन्हा कसे चालू करतो?

१३ यहोवाने स्वर्गीय राजा या नात्याने नियुक्‍त केलेला येशू, मुक्‍त झालेले लोक लुटत असलेल्या आश्‍चर्यकारक आशीर्वादांवर निगराणी ठेवील. पृथ्वीवर असताना त्याने अंधांचे नेत्र आणि बहिऱ्‍यांचे कान उघडले व “सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी” केली. (मत्तय ९:३५; १५:३०, ३१) नव्या जगात तो तेच बरे करण्याचे काम पुन्हा सुरू करील पण आता मात्र विश्‍वव्यापी प्रमाणावर. देवाचा प्रतिनिधी या नात्याने तो पुढील अभिवचन पूर्ण करील: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) पुन्हा कधीच वैद्यांची अथवा अंत्यसंस्कार व्यवस्था करणाऱ्‍यांची गरज भासणार नाही!—यशया २५:८; ३३:२४.

१४. मरण पावलेल्या यहोवाच्या सेवकांना कोणत्या प्रकारे सुटका मिळेल?

१४ मरण पावलेल्या गत काळातील देवाच्या सर्व विश्‍वासू जनांची देखील सुटका होईल. नवीन जगात, त्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवले जाईल. यहोवा खात्री देतो: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५) कदाचित, “नीतिमानांचे” पुनरुत्थान आधी होईल व ते परादीसच्या विस्ताराला हातभार लावतील. हर्मगिदोनातून बचावलेल्यांना अनेक काळापूर्वी मृत्यू पावलेल्या त्या विश्‍वासू जनांचे पुनरुत्थान झाल्यावर त्यांचे अनुभव ऐकण्याची केवढी मोहक संधी असेल!—योहान ५:२८, २९.

१५. नवीन जगात आपण अनुभवणार आहोत अशा काही परिस्थितींचे वर्णन करा.

१५ तेव्हा हयात असलेले सर्वजण स्तोत्रकर्ता यहोवाविषयी जे बोलला त्याचा अनुभव घेतील: “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.” (स्तोत्र १४५:१६) अन्‍नटंचाई नसेल: पृथ्वीचा परिस्थितीकी समतोल पूर्ववत केला जाईल व ती विपुल मात्रेत उत्पन्‍न देईल. (स्तोत्र ७२:१६) कोणीही बेघर नसेल: “ते घरे बांधून त्यात राहतील,” व प्रत्येक जण “आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.” (यशया ६५:२१, २२; मीखा ४:४) कसलेही भय नसेल: युद्धे, हिंसा किंवा गुन्हेगारी नसेल. (स्तोत्र ४६:८, ९; नीतिसूत्रे २:२२) “सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे; लोक गाण्याचा गजर करीत आहेत.”—यशया १४:७.

१६. नवीन जगात धार्मिकतेचा प्रभाव का असेल?

१६ नवीन जगात, सैतानाच्या प्रसार माध्यमाला काढून टाकलेले असेल. त्याऐवजी, ‘जगात राहणारे धार्मिकता शिकतील.’ (यशया २६:९; ५४:१३) वर्षांनुवर्षाच्या हितकारक आध्यात्मिक प्रशिक्षणामुळे “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) मानवजातीवर उभारणीकारक विचार व कृती यांचा प्रभाव झालेला असेल. (फिलिप्पैकर ४:८) गुन्हेगारी, अहंकार, ईर्ष्या यांपासून मुक्‍त असलेल्या लोकांचा जागतिक समाज—त्यातील प्रत्येक जण देवाच्या आत्म्याचे फळ उत्पन्‍न करत असणाऱ्‍या अशा एका आंतरराष्ट्रीय बंधुत्वाची कल्पना करा. खरेच, मोठा लोकसमुदाय आताही हे गुण विकसित करत आहे.—गलतीकर ५:२२, २३.

यहोवा इतका वेळ का थांबून राहिला?

१७. दुष्टाईचा अंत करण्याआधी यहोवा इतका वेळ का थांबून राहिला?

१७ परंतु, दुष्टाई काढण्यासाठी व आपल्या लोकांना वाचवून एका नवीन जगात प्रवेश देण्यासाठी यहोवा इतका वेळ का थांबून राहिला आहे? कोणत्या गोष्टी पूर्ण करावयाच्या होत्या याचा जरा विचार करा. यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन, शासन करण्याचा त्याचा अधिकार सर्वात महत्त्वाचा आहे. पुरेसा वेळ निघून जाऊ देण्याद्वारा त्याने हे दाखवून दिले, की निःसंशये, त्याच्या सार्वभौमत्वाविना मानवी शासन प्रचंड प्रमाणात अपयशी ठरले आहे. (यिर्मया १०:२३) यास्तव, यहोवाला आता मानवी शासनाऐवजी ख्रिस्ताच्या अधिकाराखाली आपले स्वर्गीय शासन आणण्याचा पूर्ण अधिकार आहे.—दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०.

१८. अब्राहामाच्या वंशजाला कनान देशाचा वारसा केव्हा प्राप्त होणार होता?

१८ या सर्व शतकांदरम्यान घडलेल्या गोष्टींमध्ये आणि अब्राहामाच्या काळी घडलेल्या गोष्टींमध्ये साम्य आहे. यहोवाने अब्राहामास सांगितले, की त्याच्या वंशाला कनान देशाचा वारस मिळेल—पण त्यांना चारशे वर्षांपर्यंत थांबावे लागले कारण ‘अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला [नव्हता].’ (उत्पत्ति १२:१-५; १५:१३-१६) येथे “अमोरी” (एक प्रबल जाती) ही संज्ञा कदाचित कनानमधील सर्व लोकांना चित्रित करत असावी. यास्तव, आपल्या लोकांना कनान देशावर कब्जा घेऊ देण्याआधी सुमारे चार शतके उलटणार होते. यावेळेपावेतो, यहोवाने कनानमधील राष्ट्रांना आपला समाज वाढू दिला. त्याचा परिणाम काय झाला?

१९, २०. कनानमध्ये कोणत्या प्रकारच्या संस्कृतीं निर्माण झाल्या?

१९ हेन्री एच. हॅली आपल्या बायबल हॅण्डबुक नामक पुस्तकात अशी नोंद करतात, की पुराणवस्तुशास्त्रज्ञांना मेगिद्दो येथे बालाची पत्नी-देवता अशथोरेथ हिच्या मंदिराचे अवशेष सापडले. ते लिहितात: “या मंदिरापासून काही अंतरावरच एक कब्रस्थान होते जेथे, या मंदिरात बली दिलेल्या अनेक मुलांचे अवशेष असलेले घडे सापडले . . . बाल आणि अशथोरेथ यांचे संदेष्टे लहान मुलांचे अधिकृत खुनी होते.” “‘पाया बलिदान’ नामक आणखी एक अघोर प्रथा होती. घर बांधण्याआधी, एका मुलाचा बली दिला जाई व त्याचे शरीर भिंतीत घातले जाई.”

२० हॅली असे विवेचन मांडतात: “बाल, अशथोरेथ आणि इतर कनानी दैवतांच्या उपासनेत बेसुमार रंगेलपणा होता; त्यांची देवळे अनैतिक कामांची केंद्रे होती. . . . कनानी लोक अनैतिक लालसेद्वारा उपासना करीत . . . आणि मग, आपल्या ज्येष्ठ लेकराचा या दैवतांप्रीत्यर्थ यज्ञ करीत. असे दिसते, की मोठ्या प्रमाणावर, कनान देश राष्ट्रीय पातळीवर पाहता एक प्रकारे सदोम आणि गमोराच बनले होते. . . . इतका निंद्य गलिच्छपणा व क्रूरता असलेल्या संस्कृतीला अस्तित्वात असण्याचा काही अधिकार होता का? . . . कनानी शहरांचे संशोधन करणाऱ्‍या पुराणवस्तुशास्त्रज्ञांना, देवाने या शहरांचा आधी का नाश केला नाही याचे आश्‍चर्य वाटते.”—पडताळा १ राजे २१:२५, २६.

२१. कनानी लोकांच्या परिस्थितीत आणि आपल्या दिवसातील परिस्थितीत काय समांतरता आहे?

२१ अमोरी लोकांच्या पापाचा घडा “भरला.” यास्तव, त्यांचा नाश करण्याचा यहोवाला पूर्ण अधिकार होता. आजही तेच खरे आहे. हे जग हिंसा, अनैतिकता यांनी भरले आहे व देवाच्या नियमांचा तिटकारा करते. शिवाय, प्राचीन कनानमधील मुलांचा बळी देण्याच्या हिडिस प्रथेमुळे आपण जर उचितपणे दुःखित होतो तर, कनानपेक्षा कितीतरी पटीने भयंकर असलेल्या या जगाच्या युद्धांमध्ये दिल्या जात असलेल्या कोट्यवधी तरुणांचा बळी दिला जातो त्याचे काय? निश्‍चितच, या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्याचा यहोवाला आताही पूर्ण अधिकार आहे.

काही तरी वेगळी साध्यता

२२. आपल्या काळात यहोवाच्या सहनशीलतेमुळे काय साध्य होते?

२२ यहोवाच्या सहनशीलतेमुळे या शेवटल्या दिवसांमध्ये काही तरी वेगळे साध्य होत आहे. तो, मोठ्या लोकसमुदायाला गोळा करण्यासाठी व मोठ्या लोकसमुदायात आधीच एकत्र झालेल्या पाच कोटी लोकांना शिक्षण देण्यासाठी वेळ देत आहे. यहोवाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचे आगेकूच करणारे संघठन बनले आहे. इतरांना बायबलची सत्ये शिकवण्याकरता पुरुषांना, स्त्रियांना व तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या सभा आणि बायबल आधारित प्रकाशनांद्वारा त्यांना देवाचे प्रेमळ मार्ग माहीत होतात. (योहान १३:३४, ३५; कलस्सैकर ३:१४; इब्री लोकांस १०:२४, २५) याशिवाय, ‘सुवार्तेच्या’ प्रचाराला आधार देण्याकरता ते बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, छपाईकाम आणि इतर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकसित करीत आहेत. (मत्तय २४:१४) कदाचित, अशा प्रकारचे शिकवण्याचे व बांधकामाचे कौशल्य नवीन जगात मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जाईल.

२३. या समयात जिवंत असणे सुहक्क का आहे?

२३ होय, आज यहोवा आपल्या सेवकांना ‘मोठ्या संकटातून’ पार होऊन एका धार्मिक नवीन जगात प्रवेश करण्याकरता तयार करीत आहे. ह्‍यापुढे आपल्याला सैतान आणि त्याच्या दुष्ट जगासोबत दिवस कंठावे लागणार नाहीत, आजारपण, दुःख आणि मृत्यू नसेल. मोठ्या आवेशाने व आनंदाने यहोवाचे लोक, परादीस बनवण्याच्या आनंदी नियुक्‍तीस सुरवात करतील. जेथे प्रत्येक दिवस “उदंड शांतिसुखाचा” असेल. या दुष्ट युगाच्या अंतसमयी जगण्याचा, यहोवाची ओळख करून त्याची सेवा करण्याचा व ‘आपला मुक्‍तिसमय जवळ आल्यामुळे आपण लवकरच आपली डोकी वर’ करणार आहोत हे जाणण्याचा केवढा सुहक्क आपल्याला लाभला आहे!—लूक २१:२८; स्तोत्र १४६:५.

उजळणीचे प्रश्‍न

◻ “मोठे संकट” काय आहे, व त्याची सुरवात कशी होते?

◻ गोगचा यहोवाच्या सेवकांवरील हल्ला अपयशी का ठरेल?

◻ ‘मोठ्या संकटाचा’ अंत कसा होतो?

◻ नवीन जग कोणकोणते सर्वोत्कृष्ट लाभ पुरवील?

◻ या युगाचा अंत आणण्याआधी यहोवा इतका वेळ थांबून का राहिला?

[१६ पानांवरील चित्र]

संपूर्ण पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर होईल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा