वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • kl अध्या. ११ पृ. ९८-१०७
  • हा शेवटला काळ आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हा शेवटला काळ आहे!
  • सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शेवटल्या काळाची प्रमुख लक्षणे
  • पुराव्याला प्रतिसाद द्या
  • आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • “जगाचा शेवट” अगदी जवळ आला आहे!
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • जगाचा अंत जवळ आहे का?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • आम्ही “शेवटल्या दिवसात” आहोत हे कसे जाणतो
    देव खरोखरी आपली काळजी करतो का?
अधिक माहिती पाहा
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
kl अध्या. ११ पृ. ९८-१०७

अध्याय ११

हा शेवटला काळ आहे!

१. जगाचे दृश्‍य बघून गंभीर विचार करीत असता काही लोकांना कसेतरी का वाटते, पण जगाच्या परिस्थितीबद्दल खात्रीलायक स्पष्टीकरण कोठे मिळू शकते?

आपले हे प्रक्षुब्ध जग एवढ्या थराला कसे पोहंचले? आपण पुढे कोठे जात आहोत? तुम्ही कधी अशा प्रकारचे प्रश्‍न विचारले आहेत का? जगाची परिस्थिती पाहून पुष्कळांना गोंधळात पडल्यासारखे वाटते. युद्धे, आजार आणि गुन्हे यासारख्या वास्तविक गोष्टी लोकांना, भवितव्यात काय राखलेले आहे त्याबद्दल नवल वाटायला लावतात. सरकारी अधिकारी खूपच कमी आशा देतात. तथापि, सध्याच्या त्रस्त दिवसांबद्दलचे खात्रीलायक स्पष्टीकरण देवाकडून त्याच्या वचनामध्ये दिलेले आहे. काळाच्या ओघात आपण कोठे आहोत ते पाहण्याकरता बायबल आपल्याला खात्रीपूर्वक मदत देते. आपण सद्य व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत असे ते आम्हास दाखवते.—२ तीमथ्य ३:१.

२. येशूच्या शिष्यांनी त्याला कोणता प्रश्‍न विचारला होता व त्याने कसे उत्तर दिले?

२ उदाहरणार्थ, येशूच्या शिष्यांनी त्याला काही प्रश्‍न विचारले असता त्याने जे उत्तर दिले त्याचा जरा विचार करा. येशू मरण्याच्या तीन दिवस आधी त्यांनी त्याला विचारले: “आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?”a (मत्तय २४:३) याचे उत्तर देताना येशूने विशिष्ट जागतिक घटना व परिस्थिती सांगितल्या ज्या हे अभक्‍त व्यवस्थीकरण त्याच्या शेवटल्या काळात आले असल्याचे स्पष्टपणे दाखवणार होत्या.

३. येशूने राज्याधिकार सुरू केला तशा पृथ्वीवरील परिस्थिती बिकट का होत गेल्या?

३ अगोदरच्या अध्यायात दाखवले आहे त्याप्रमाणे बायबलची कालगणना, देवाच्या राज्याचे आधिपत्य आधीच सुरू झाले आहे या निष्कर्षाकडे निरवते. पण ते कसे असू शकेल? सर्व गोष्टी चांगल्या होण्याऐवजी वाईटच होत आहेत. खरे पाहता, हे तर देवाचे राज्य आधीच आधिपत्य करू लागल्याचे जोरदार चिन्ह आहे. ते का? कारण, स्तोत्र ११०:२ आपल्याला कळवते की, येशू काही काळाकरता ‘आपल्या शत्रूंवर प्रभुत्व करणार आहे.’ खरे म्हणजे, त्याचे, स्वर्गीय राजा झाल्यानंतरचे पहिले कृत्य सैतान व त्याच्या दुरात्म्यांना खाली पृथ्वीच्या परिसरात टाकून देणे हे होते. (प्रकटीकरण १२:९) याचा काय परिणाम घडला? प्रकटीकरण १२:१२ ने भाकीत केल्याप्रमाणेच होता: “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आपला आहे.” त्या ‘थोड्या काळामध्ये’ आज आपण जगत आहोत.

४. शेवटल्या काळाची कोणती काही लक्षणे आहेत व ती काय सुचवतात? (चौकोनी रकाना पाहा.)

४ या कारणास्तव, येशूला त्याची उपस्थिती व व्यवस्थीकरणाची समाप्ती कधी असेल अशी विचारणा करण्यात आली तेव्हा त्याचे उत्तर खऱ्‍या वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे होते यात काही आश्‍चर्य नाही. त्या चिन्हाचे विविध घटक पृष्ठ १०२ वरील चौकोनी रकान्यात देण्यात आलेले आहेत. शेवटल्या काळाबद्दल पौल, पेत्र व योहान हे ख्रिस्ती प्रेषित आम्हाला आणखी विस्तृत माहिती देतात हे तुम्हाला दिसेलच. हे खरे की, चिन्ह तसेच शेवटल्या काळाबद्दलच्या विविध गोष्टी त्रासदायक परिस्थितींना सामावून आहेत. तरीही, या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेने या दुष्ट व्यवस्थेचा शेवट जवळ आहे अशी आपल्याला खात्री पटवली पाहिजे. शेवटल्या काळाबद्दलच्या काही प्रमुख लक्षणांचे आपण जवळून परीक्षण करून बघू या.

शेवटल्या काळाची प्रमुख लक्षणे

५, ६. युद्धे व दुष्काळ याबद्दलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत?

५ “राष्ट्रावर राष्ट्रे व राज्यावर राज्य उठेल.” (मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:४) अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी पहिल्या जागतिक युद्धाला “पृथ्वीवर आतापर्यंत झाली नाही अशी अत्यंत अवाढव्य, घातकी, अनियंत्रित कत्तल” असे म्हटले. जगाची कडक परीक्षा—१९१४-१९१९ (इंग्रजी) या पुस्तकानुसार, हा “युद्धाचा नवा विस्तार, मानवजातीच्या अनुभवामधील पहिलेच सार्वत्रिक युद्ध [होते]. त्याचा कालावधी, प्रखरता आणि विस्तार आधी माहीत असणाऱ्‍या किंवा सर्वसाधारणपणे अपेक्षिलेल्या युद्धापेक्षा वरचढ” होता. यानंतर दुसरे जागतिक महायुद्ध आले, जे पहिल्या जागतिक युद्धापेक्षा अधिक विनाशकारी असल्याचे सिद्ध झाले. इतिहासाचे प्राध्यापक ह्‍यु थॉमस म्हणतात: “विसाव्या शतकावर मशीनगन, रणगाडे, बी-५२ बॉम्बचा मारा करणारे विमान, अणुशस्त्र बॉम्ब व शेवटी, क्षेपणास्त्र यांचे वर्चस्व झाले आहे. ते इतर कोणत्याही युगापेक्षा अधिक रक्‍तपाती व विनाशकारी युद्धांनी चिन्हांकित झालेले आहे.” शीतयुद्ध संपल्यावर निःशस्त्रीकरणाबद्दल खुपसे बोलले जात होते हे खरे. तरीही, ठरवण्यात आलेली कपात केल्यावर देखील १०,००० ते २०,००० युद्धाची अणुशस्त्रे उरतील—दुसऱ्‍या जागतिक महायुद्धात वापरण्यात आलेल्या अग्नीशक्‍तिपेक्षा ९०० पटीने अधिक, असा अंदाज एक अहवाल व्यक्‍त करतो.

६ ‘जागोजागी दुष्काळ पडतील.’ (मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:५, ६, ८) १९१४ पासून निदान २० तरी प्रमुख दुष्काळ पडले. ते इथियोपिया, कम्बोडिया, ग्रीस, चीन, नायजेरिया, बांगला देश, बुरुंडी, भारत, र्‌वांडा, रशिया, सुदान व सोमालिया हे ते दुष्काळग्रस्त देश होत. तथापि, दुष्काळ नेहमीच अन्‍नटंचाईमुळे पडत नाहीत. शेती वैज्ञानिक व अर्थशास्त्र तज्ज्ञांच्या एका गटाने असे अनुमान काढले: “अलीकडील दशकात जगाचा अन्‍नसाठा लोकसंख्येपेक्षा वाढला आहे. तथापि, ८० कोटी लोक अत्यंत दरिद्री अवस्थेत राहात असल्यामुळे, . . . त्यांना कुपोषणाच्या जुनाट रोगामधून बाहेर पडण्यासाठी पुरेसे अन्‍न विकत घेता येत नाही.” इतर कारणांमध्ये राजकारणी लुडबूडीचाही समावेश आहे. टोरंटो विश्‍वविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आबीदलगालील एल्मेकी अशी दोन उदाहरणे सांगतात, जेथे लोकांची उपासमार होते, पण तेच देश अन्‍नसाठा प्रचंड प्रमाणात निर्यात करीत होते. स्वतःच्या नागरिकांना अन्‍न देण्यापेक्षा सरकारांना स्वतःच्या युद्धबळाला आर्थिक साहाय्य देता यावे म्हणून विदेशी चलन वाढविण्याची अधिक चिंता होती असे दिसते. मग, डॉ. एल्मेकी यांचा निर्वाळा काय आहे? दुष्काळ हा “अन्‍नाचे वितरण व सरकारी धोरण यावर आधारलेली बाब बनला आहे.”

७. मऱ्‍यांबद्दलची आजची वस्तुस्थिती काय आहे?

७ “मऱ्‍या.” (लूक २१:११; प्रकटीकरण ६:८) १९१८-१९ च्या स्पॅनिश फ्ल्यूने निदान २ कोटी १० लाखांचा बळी घेतला. “इतक्या लवकर कितीतरी लोकांचा संहार घडल्याचे जगाच्या इतिहासात कधीही दिसले नव्हते,” असे ए. ए. होअलिंग महामारी (इंग्रजी) या पुस्तकामध्ये लिहितात. आज मऱ्‍या वाढतच आहेत. दरवर्षी कर्करोग पन्‍नास लाख लोकांचा, अतिसार तीस लाखांपेक्षा अधिक अर्भके व मुलांचा आणि क्षयरोग तीस लाखांचा बळी घेतो. श्‍वासोच्छ्‌वासाचे संसर्गजन्य रोग, खासपणे न्यूमोनिया वर्षाला पाच वर्षे वयोगटाखालील ३ कोटी ५० लाख मुलांचा बळी घेतो. शिवाय, अपर्याप्त किंवा दूषित पाणी आणि आरोग्य रक्षणार्थ घेतल्या जाणाऱ्‍या अल्प जबाबदाऱ्‍या यामुळे निर्माण होणाऱ्‍या आजारांचा फटका २५ अब्ज लोकसंख्येला—जगाची अर्धी लोकसंख्या—बसत आहे ही धक्कादायक गोष्ट आहे. एडस्‌ची पीडा, मानवाने जरी अभूतपूर्व वैद्यकीय साध्यता मिळवली असली तरी त्याला मऱ्‍यांचे उच्चाटन करणे अशक्य आहे ही त्याला आणखी स्मरण देणारी गोष्ट आहे.

८. लोक “धनलोभी” असल्याचे कसे सिद्ध होत आहे?

८ “माणसे . . . धनलोभी” होतील. (२ तीमथ्य ३:२) जगभरातील लोकांना मोठी धनसंपत्ती मिळवण्याची अधाशी भूकच लागलेली दिसते. एखाद्याच्या लठ्ठ पगारावर त्याचे “यश” आणि त्याच्याकडे जे आहे त्यावर त्याचे “संपादन” ठरवले जाते. “अमेरिकन समाजात . . . भौतिक धनसंपदा उत्तेजक शक्‍ती म्हणून राहील आणि इतर प्रमुख व्यापारी पेठांना वाढता जोर असेल,” असे जाहिरात संस्थेच्या एका महिला उपाध्यक्षांनी म्हटले. तुम्ही जेथे राहता तेथे ही गोष्ट घडत आहे का?

९. आईबापाची आज्ञा न मानण्याच्या बाबतीत जे भाकीत केलेले आहे त्याबद्दल काय म्हणता येईल?

९ “आईबापास न मानणारी.” (२ तीमथ्य ३:२) सध्याचे पालक, शिक्षक व इतरांकडे, पुष्कळ मुले उद्धट व आज्ञाभंजक असल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. यापैकी काही तरुण मुले त्यांच्या पालकांच्या गैरवर्तणुकीची नक्कल किंवा आचरण करतात. मुलांच्या वाढत्या संख्येचा शाळा, कायदा, धर्म व त्यांचे पालक यावरील विश्‍वास ढासळत आहे व ते त्यांच्या पालकांविरुद्ध बंडही पुकारतात. माध्यमिक शाळेचे एक प्रख्यात शिक्षक म्हणतात: “त्यांना कोणत्याही गोष्टीचा खूपच कमी आदर वाटतो; ही एक प्रथाच बनली आहे.” तरी देखील कित्येक देवभिरू मुले आपल्या वागण्यात उदाहरणशील आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.

१०, ११. लोक बरेच क्रूर व ममताहीन आहेत याचा काय पुरावा आहे?

१० “क्रूर.” (२ तीमथ्य ३:३) ज्याचे “क्रूर” असे भाषांतर करण्यात आले त्या ग्रीक शब्दाचा ‘अनिर्बंधित, हिंसक, सहानुभूती व निर्दयी’ असा अर्थ होतो. हे वर्णन आजच्या हिंसक कृत्यांबद्दल किती तंतोतंत जुळणारे आहे! “जीवन अत्यंत क्लेशकारक, रक्‍ताच्या डागांनी भरलेल्या भयंकर गोष्टींनी युक्‍त आहे ज्यामुळे दररोजच्या बातम्या वाचण्यासाठी देखील असंवेदनाक्षम हृदय असावे लागते.” असे एका संपादकाने म्हटले. एका गृहरचनेच्या सुरक्षा अधिकाऱ्‍याने हे निरीक्षिले की, पुष्कळ युवक आपल्या कृतीचा काय परिणाम होईल याचा मुळी विचारच करीत नाहीत. त्यांनी म्हटले: “‘उद्या काय होणार त्याची मला चिंता नाही, मला जे पाहिजे ते आजच मिळाले पाहिजे,’ अशी त्यांची वृत्ती बनली आहे.”

११ “ममताहीन.” (२ तीमथ्य ३:३) ही संज्ञा अशा ग्रीक शब्दाकरवी भाषांतरीत झालेली आहे ज्याचा अर्थ, “निर्दयी, अमानुष” असा होतो व “स्वाभाविक व कौटुंबिक जिव्हाळ्याची उणीव” याला तो सूचित करतो. (द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेन्ट थिऑलॉजी) होय, जिव्हाळा ज्या वातावरणात फुलण्यास हवा तेथेच—घरात—सहसा गायब झाल्याचा दिसतो. वैवाहिक दांपत्य, मुले व शिवाय वयोवृद्ध पालकांद्वारे केली जाणारी शिवीगाळ यामुळे सर्वसाधारणपणे त्रासदायक वातावरण बनले आहे. संशोधन करणाऱ्‍या एका गटाने म्हटले: “मानवी हिंसाचार—मग तो, चापट मारणे, ढकलाढकली, सुरा दाखवणे किंवा गोळी झाडणे, यापैकी कोणताही असो—समाजात इतर ठिकाणापेक्षा कौटुंबिक वर्तुळात अधिक नित्याने घडत आहे.”

१२. लोकांठायी केवळ सुभक्‍तीचे बाह्‍य रूप आहे असे का म्हणता येऊ शकेल?

१२ “सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी.” (२ तीमथ्य ३:५) बायबलमध्ये लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची शक्‍ती आहे. (इफिसकर ४:२२-२४) तरीपण आज, पुष्कळ जण त्यांच्या धर्माचा पडद्यासारखा वापर करून देवास असंतुष्ट करणारी अधार्मिक कृत्ये आचरतात. खोटे बोलणे, चोरी करणे किंवा लैंगिक गैरवागणूक या अशा गोष्टी आहेत ज्यांच्याकडे सहसा प्रत्यक्ष धर्मपुढारी डोळेझाक करतात. अनेक धर्म प्रेमाचे पोवाडे गातात, पण युद्धाला पाठबळ देतात. इंडिया टुडे (इंग्रजी) मासिकाच्या संपादकांनी याचे असे परीक्षण केले: “सर्वोच्च निर्माणकर्त्याच्या नावात मानवाने त्याच्या सहमानवाविरुद्ध अत्यंत निंद्य अशी रानटी कृत्ये आचरली आहेत.” खरे म्हणजे, आधुनिक काळातील दोन अत्यंत रक्‍तपाती युद्धे—पहिले व दुसरे जागतिक युद्ध—ख्रिस्ती धर्मजगताद्वारेच लढण्यात आली.

१३. पृथ्वीची नासाडी होत असल्याचा पुरावा काय आहे?

१३ “पृथ्वीची नासाडी.” (प्रकटीकरण ११:१८) १०४ नोबेल पारितोषिक विजेत्यांसह जगभरातील १,६०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञांनी चिंताग्रस्त शास्त्रज्ञांच्या संघटनेने (युसीएस) प्रस्तुत केलेल्या इशाऱ्‍याला आपली मान्यता दिली, ज्यात म्हटले आहे: “मानवजात व नैसर्गिक परिस्थितीकी आता कोलमडण्याच्या बेतात आहे. . . . हा धोका टाळण्याची संधी पुढील काही दशकांत हरपली गेली असेल.” जीवनास धोका संभवणारी माणसांची कृत्ये “जगाचा इतका कायापालट करतील की, ती आम्हाला माहीत असलेली जीवनशैली टिकवून ठेवण्याला असमर्थ बनवतील,” असे अहवालात म्हटले आहे. ओझोन थर कमी होणे, पाण्याचे प्रदूषण, जंगलतोड, जमीनीचा कस नाहीसा होणे आणि पुष्कळ जनावरे व वनस्पतीच्या जातींचे उच्चाटन यांना तातडीच्या समस्या असल्याचे दाखवून त्याबद्दल काहीतरी करण्याची गरज दाखवण्यात आली. युसीएस संघटनेने म्हटले: “जीवनाच्या जाळ्याशी असणाऱ्‍या परस्परावलंबनाशी आपण उगाच काहीतरी खटपट करीत राहिल्यामुळे ज्याची आपल्याला पूर्ण कल्पना नाही त्या जीवशास्त्रीय व्यवस्थेच्या नमुन्याचे पतन होण्यासोबत अधिक घातक परिणाम पसरवण्याकरता चाप ओढला जाईल.”

१४. आपल्या काळात मत्तय २४:१४ ची पूर्णता होत आहे हे तुम्ही कसे सिद्ध करू शकाल?

१४ “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:१४) राज्याची सुवार्ता सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून सर्व जगात गाजवण्यात येईल असे येशूने भाकीत केले. यहोवाचे लाखो साक्षीदार ईश्‍वरी मदतीने व आशीर्वादाने या प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कामात कोट्यावधी तास खर्च करीत आहेत. (मत्तय २८:१९, २०) सुवार्ता गाजवली नाही तर त्याचा रक्‍तदोष आपणावर येईल हे साक्षीदारांना माहीत आहे. (यहेज्केल ३:१८, १९) तथापि, दरवर्षी हजारो लोक कृतज्ञतेने राज्य संदेशाला प्रतिसाद देत आहेत व ते खरे ख्रिस्ती, यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपली भूमिका बजावत आहेत याचा यांना आनंद वाटतो. यहोवाची सेवा करणे व त्याद्वारे देवाबद्दलच्या ज्ञानाचा प्रसार करणे हा अनमोल विशेषाधिकार आहे. या सुवार्तेचा प्रचार सर्व जगात केला गेल्यानंतर या दुष्ट व्यवस्थेचा शेवट होईल.

पुराव्याला प्रतिसाद द्या

१५.सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाची कशी समाप्ती घडेल?

१५ हे व्यवस्थीकरण कसे संपेल? बायबल एका ‘मोठ्या संकटाबद्दल’ भाकीत करते, जे “मोठी बाबेल,” खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य यावरील जगाच्या राजकीय घटकाने केलेल्या हल्ल्याद्वारे सुरू होईल. (मत्तय २४:२१; प्रकटीकरण १७:५, १६) येशूने म्हटले की, त्या काळी ‘सूर्य अंधकारमय होणार होता, चंद्र प्रकाश देणार नव्हता, तारे आकाशातून पडणार व आकाशाची बळे डळमळणार होती.’ (मत्तय २४:२९) हे कदाचित खरोखरीच्या दिव्य अपूर्व घटनांना अनुलक्षून असेल. काहीही असो, धार्मिक जगाच्या झळकत्या प्रकाशाला उघड करण्यात येऊन तो मालवला जाईल. त्यानंतर, ज्याला “मागोग देशातील गोग” असे म्हटले आहे तो सैतान यहोवाच्या लोकांवर आपला शेवटला निकराचा हल्ला करण्यासाठी भ्रष्ट लोकांचा उपयोग करील. पण यात सैतान यशस्वी होणार नाही; कारण देव त्यांच्या सहाय्याकरता धावून येईल. (यहेज्केल ३८:१, २, १४-२३) “मोठे संकट” “सर्वसमर्थ देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई,” हर्मगिदोनमध्ये आपला कळस गाठील. सैतानाच्या पार्थिव संघटनेचा शेवटला मागमूस ही ते काढून टाकील आणि बचावलेल्या मानवजातीला अनंतकालिक आशीर्वादाकरता मार्ग मोकळा करील.—प्रकटीकरण ७:९, १४; ११:१५; १६:१४, १६; २१:३, ४.

१६. शेवटल्या काळासंबंधाने भाकीत करण्यात आलेली लक्षणे आपल्या काळाकरता लागू होतात हे आपल्याला कसे कळते?

१६ शेवटल्या काळाचे वर्णन करणाऱ्‍या भविष्यवाण्यांतील काही लक्षणे तसे पाहता, इतिहासाच्या इतर काळाकरता लागू होत आहेत असे दिसेल. पण ती एकत्र करून बघता ते भविष्यवादित पुरावे आपल्या काळाकडे निर्देश करतात असे दिसेल. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाच्या अंगठ्यावरील रेषा, बोटाच्या ठशांचा असा नमुना तयार करतात जो इतर कोणाही माणसाचा असू शकत नाही. याचप्रमाणे, शेवटल्या काळाला देखील स्वतःच्या चिन्हांचा किंवा घटनांचा एक नमूना आहे. तो असा “ठसा” बनवतो, जो इतर कोणत्याही काळाला लागू होऊ शकत नाही. यांचा, देवाचे स्वर्गीय राज्य सध्या आधिपत्य करीत आहे, या बायबलच्या संकेताबरोबर विचार केल्यास, सध्याचा शेवटला काळ खराच आहे हा निर्वाळा घेण्याकरता सबळ आधार मिळतो. याशिवाय, सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण लवकरच नष्ट होईल याचा स्पष्ट शास्त्रवचनीय पुरावा आहे.

१७. हा शेवटला काळ आहे याचे ज्ञान आपल्याला काय करण्यास प्रवर्तक ठरले पाहिजे?

१७ हा शेवटला काळ आहे याच्या पुराव्याला तुम्ही कसा प्रतिसाद देणार? विचार करा: एखादे भयानक विनाशकारी वादळ जवळ येत असल्यास आपण विलंब न लावता लगेच दक्षतेचे पाऊल उचलतो. त्याचप्रमाणे, बायबल सध्याच्या व्यवस्थीकरणाबद्दल जे म्हणते त्याने आम्हाला कृती करायला प्रवृत्त केले पाहिजे. (मत्तय १६:१-३) सध्याच्या जागतिक व्यवस्थेच्या शेवटल्या काळात आपण जगत आहोत हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. यास्तव, देवाची कृपा मिळवण्याकरता ह्‍या गोष्टीने आपल्याला हवी ती सुधारणा करण्याकरता चालना दिली पाहिजे. (२ पेत्र ३:३, १०-१२) स्वतःला तारणाचा प्रतिनिधी या अर्थी उल्लेखून येशू हे तातडीचे आमंत्रण देत आहे: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”—लूक २१:३४-३६.

[तळटीप]

a काही बायबलमध्ये “व्यवस्थीकरण” या शब्दाऐवजी “जग” ही संज्ञा वापरली आहे. डब्ल्यू ई. वाईन यांचा एक्झपोसिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेन्ट वर्डस्‌ हा शब्दकोष म्हणतो की, आ․योनʹ हा ग्रीक शब्द “अनिश्‍चित लांबीच्या काळाला सूचित करतो किंवा त्या कालावधीत जे घडते त्याच्या अनुषंगाने पाहिलेला काळ अशी सूचित करतो.” पार्कहर्स्ट यांचा ग्रीक ॲण्ड इंग्लिश लेक्सिकन टू दी न्यू टेस्टमेन्ट (पृष्ठ १७) इब्रीयांस १:२ मधील आ․योनʹ (अनेकवचन) च्या वापराची चर्चा करताना “व्यवस्थीकरण” हा शब्दप्रयोग वापरतो. यास्तव, “व्यवस्थीकरण” हा शब्दप्रयोग वापरणे हे मूळ ग्रीक शास्त्रवचनांच्या सहमतात आहे.

तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा

ख्रिस्ताच्या आधिपत्याच्या आरंभाला कोणत्या जागतिक घडामोडी घडतील असे बायबलने भाकीत केले?

शेवटल्या काळाची काही लक्षणे कोणती आहेत?

कशामुळे तुम्हाला हा शेवटला काळ असल्याची खात्री वाटते?

[१०२ पानांवरील चौकट]

शेवटल्या काळाची काही लक्षणे

• अभूतपूर्व लढाया.—मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:४.

• दुष्काळ.—मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:५, ६, ८.

• मऱ्‍या.—लूक २१:११; प्रकटीकरण ६:८.

• वाढता अधर्म.—मत्तय २४:१२.

• पृथ्वीची नासाडी.—प्रकटीकरण ११:१८.

• भूकंप.—मत्तय २४:७.

• कठीण दिवस.—२ तीमथ्य ३:१.

• धनाचा फाजील लोभ.—२ तीमथ्य ३:२.

• पालकांचा आज्ञाभंग.—२ तीमथ्य ३:२.

• ममतेचा अभाव.—२ तीमथ्य ३:३.

• देवापेक्षा सुखविलासाची जास्त आवड.—२ तीमथ्य ३:४.

• संयमाचा अभाव.—२ तीमथ्य ३:३.

• चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे.—२ तीमथ्य ३:३.

• येणाऱ्‍या धोक्याबद्दल कसलीही दखल न घेणे.—मत्तय २४:३९.

• थट्टेखोर शेवटल्या काळाच्या पुराव्याला धिक्कारतात.—२ पेत्र ३:३, ४.

• देवाच्या राज्याचा जगभर प्रचार.—मत्तय २४:१४.

[Full-page picture on page 101]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा