वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१ पृ. १६-२१
  • जागृत राहण्याचा काळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जागृत राहण्याचा काळ
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “जागृत राहा”!
  • नाहीशी होत असलेली “पिढी”
  • ‘तो दिवस आणि घटका’
  • नीतिमान “नवे आकाश व नवी पृथ्वी”
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • ‘दुष्ट पिढीतून’ बचावलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१ पृ. १६-२१

जागृत राहण्याचा काळ

“प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे. . . . परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल.”—मार्क १३:१०, १३.

१. आपण टिकाव आणि धैर्य का धरले पाहिजे?

विश्‍वासहीन आणि कुटिल पिढीत—आपण टिकाव धरलाच पाहिजे! सन १९१४ पासूनच्या पिढीचे लोक येशूच्या दिवसांतील लोकांप्रमाणेच भ्रष्ट झाले आहेत. आज भ्रष्टाचार जगभर पसरलेला आहे. प्रेषित पौलाने वर्णन केलेले ‘शेवटल्या काळातील कठीण दिवस’ मानवजातीला पीडित करीत आहेत. ‘दुष्ट माणसे दुष्टपणात अधिक सरसावत आहेत.’ स्पष्टपणे, दियाबल सैतान या ‘दुष्टाला सगळे जग वश झाले आहे,’ व तो आता पृथ्वीचा नाश करण्याचा अंतिम प्रयत्न करीत आहे. परंतु धीर धरा! एक ‘मोठे संकट’ येत आहे, जे धार्मिकतेवर प्रीती करणाऱ्‍या सर्वांकरता चिरस्थायी मुक्‍तता आणील.—२ तीमथ्य ३:१-५, १३; १ योहान ५:१९; प्रकटीकरण ७:१४.

२. सन १९१४ मध्ये भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

२ मानवजातीच्या जुलमी शत्रूंना काढून टाकण्याच्या तयारीत, यहोवाने आता प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गात सिंहासनाधिष्ट केले, हे आनंदाचे आहे. (प्रकटीकरण ११:१५) दानीएलाने लिहिलेल्या एका बायबल भविष्यवाणीची पूर्णता जशी मशीहाच्या पहिल्या येण्याच्या वेळी झाली तशीच या शतकातही त्याने लिहिलेल्या एका उल्लेखनीय भविष्यवाणीची पूर्णता होत आहे. दानीएल ४:१६, १७, ३२ मध्ये, आपल्याला पृथ्वीवर ‘सात काळाच्या’ अवधीपर्यंत न्याय्य राज्याधिकार स्थगित करण्याविषयी सांगण्यात आले आहे. त्याची मोठ्या प्रमाणातील पूर्णता, हे सात काळ म्हणजे प्रत्येकी ३६० ‘दिवस’ असलेली बायबलची सात वर्षें किंवा एकूण २,५२० वर्षे होत.a या वर्षांची कालावधी, बॅबिलोनने सा. यु. पू. ६०७ मध्ये इस्राएलाच्या राज्याला तुडवण्यास आरंभ केला तेव्हापासून ते सा. यु. १९१४ या वर्षी येशू मानवजातीचा न्याय्य राजा म्हणून स्वर्गात सिंहासनाधिष्ट झाला तेथपर्यंत होती. मग “परराष्ट्रीयांची सद्दी” संपली. (लूक २१:२४) परंतु, राष्ट्रांनी येणाऱ्‍या मशीही राज्याला शरण जाण्याचे नाकारले आहे.—स्तोत्र २:१-६, १०-१२; ११०:१, २.

३, ४. (अ) पहिल्या शतकातील घटनांची तुलना आपल्या काळासोबत कशी केली जाऊ शकते? (ब) कोणते समर्पक प्रश्‍न विचारले जाऊ शकतात?

३ सत्तर सप्तकीय वर्षे (सा. यु. २९-३६) आली आणि १९१४ हे वर्ष जवळ आले तेव्हा, पुन्हा एकदा देवभीरू लोक मशीहाच्या येण्याची वाट पाहत होते. तो निश्‍चितच आला! तथापि, प्रत्येक बाबतीत त्याच्या येण्याची रीत अपेक्षा केल्यापेक्षा वेगळी होती. प्रत्येक बाबतीत तुलनात्मकरित्या संक्षिप्त कालावधीनंतर, दुष्ट ‘पिढी’ ईश्‍वरी हुकूमाद्वारे शेवटी न्यायदंड सोसते.—मत्तय २४:३४.

४ येशूला ठार मारण्याची मागणी करणाऱ्‍या दुष्ट यहूदी पिढीचा कसा अंत झाला, हे आपण आधीच्या लेखात पाहिले आहे. तर मग, त्याला आता विरोध व दुर्लक्ष करणाऱ्‍या मानवजातीच्या या विध्वंसक पिढीविषयी काय? या विश्‍वासहीन पिढीवर न्यायदंड कधी बजावला जाईल?

“जागृत राहा”!

५. (अ) आपल्याला, यहोवाचा ‘दिवस व घटकेचा’ समय कोणत्या चांगल्या कारणामुळे जाणण्याची आवश्‍यकता नाही? (ब) मार्कच्या मते, येशूने आपल्या भविष्यवाणीची समाप्ती कोणत्या योग्य सल्ल्याने केली?

५ ‘मोठ्या संकटाच्या’ काळापर्यंत नेणाऱ्‍या घटनांची भविष्यवाणी केल्यावर, येशूने म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतासहि नाही, पुत्रालाहि नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.” (मत्तय २४:३-३६; मार्क १३:३-३२) आपल्याला घटनांचा अचूक काळ माहीत असण्याची आवश्‍यकता नाही. आपण तारखेची गणती न करता उलटपक्षी, जागृत राहणे, दृढ विश्‍वासास वाढविणे व यहोवाच्या सेवेत व्यग्र असणे यावर आपले लक्ष केंद्रित ठेवले पाहिजे. येशूने आपल्या महान भविष्यवाणीची समाप्ती असे म्हणून केली: “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. . . . जागृत राहा . . . जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.” (मार्क १३:३३-३७) आजच्या जागतिक अंधकारात धोका लपलेला आहे. आपण सावध राहिले पाहिजे!—रोमकर १३:११-१३.

६. (अ) आपला विश्‍वास कशावर आधारलेला असण्यास हवा? (ब) ‘आपण आपल्या दिवसांची गणती’ कशी करू शकू? (क) येशूने “पिढी” असे म्हटले तेव्हा त्याचा मुलभूतपणे काय अर्थ होतो?

६ आपण या दुष्ट व्यवस्थेच्या शेवटल्या दिवसाविषयीच्या प्रेरित भविष्यवाण्यांकडे केवळ लक्षच देऊ नये तर आपला विश्‍वास प्रामुख्याने, ख्रिस्त येशूच्या बहुमोल यज्ञार्पणावर आणि त्यावर आधारित असलेल्या देवाच्या अद्‌भुत अभिवचनांवर स्थिर केला पाहिजे. (इब्रीयांस ६:१७-१९; ९:१४; १ पेत्र १:१८, १९; २ पेत्र १:१६-१९) या दुष्ट व्यवस्थेचा अंत पाहण्यास उत्सुक असल्यामुळे, यहोवाच्या लोकांनी काही वेळा ‘मोठ्या संकटाची’ सुरवात कधी होईल त्या काळाबद्दल तर्क केला, इतकेच नव्हे तर १९१४ पासूनच्या पिढीचे आयुष्यमान किती आहे हे गणण्यासोबत याचा मेळ घातला. तथापि, एक पिढी किती वर्षांची किंवा दिवसांची बनते असा तर्क करून नव्हे तर आनंदाने यहोवाची स्तुती करण्यासाठी ‘आपण दिवस कसे गणतो’ यावर विचार केल्याने “आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.” (स्तोत्र ९०:१२) समयाची गणना करण्यासाठी एखादा नियम देण्याऐवजी, येशूने वापरलेली “पिढी” ही संज्ञा, विशिष्ट ऐतिहासिक कालमर्यादेतील वैशिष्टपूर्ण गुणलक्षणे असलेल्या समकालीन लोकांना सूचित होते.b

७. इतिहासाचे एक प्राध्यापक “१९१४ ची पिढी” याविषयी काय लिहितात आणि याचा मेळ येशूच्या भविष्यवाणीसोबत कसा बसतो?

७ वर सांगितलेल्या माहितीनुसार, इतिहासाचे प्राध्यापक रॉबर्ट वोल्ल यांनी १९१४ ची पिढी (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे लिहिले: “ऐतिहासिक पिढीचे वर्णन तिच्या ऐतिहासिक तारखांद्वारे करण्यात येत नाही. . . . तो काही तारखांचे क्षेत्र नव्हे.” पण त्यांनी दर्शवले की, पहिल्या जागतिक युद्धाने “गतकाळातील संबंध तोडण्याच्या मोठ्या जाणीवेला उत्पन्‍न केले,” त्यांनी पुढे असे म्हटले: “युद्धातून बचावलेले, ऑगस्ट १९१४ मध्ये एक जग संपले व दुसऱ्‍याची सुरवात झाली, ही गोष्ट ते कधीही विसरू शकले नाहीत.” ते किती सत्य आहे! हे विधान गोष्टींच्या कठीण मुद्यावर एकाग्र करते. सन १९१४ पासून मानवजातीच्या ‘या पिढीने’ भयानक बदलांचा अनुभव घेतला आहे. तिने पृथ्वीला कोट्यावधी लोकांच्या रक्‍ताने माखलेले पाहिले आहे. संपूर्ण जगभरात युद्धे, जातीसंहार, दहशतवाद, गुन्हे आणि स्वैराचार उद्‌भवलेला आहे. अन्‍नटंचाई, आजार आणि अनैतिकता आपल्या जगावर तोरा मिरवत आहे. येशूने भविष्यवाणी केली: “ह्‍या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही [त्याचे शिष्य] ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की, सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.”—लूक २१:३१, ३२.

८. यहोवाच्या संदेष्ट्यांनी जागृत राहण्याच्या गरजेवर कसा जोर दिला?

८ होय, मशीही राज्याचा पूर्ण विजय जवळ आला आहे! तर मग, तारखा पाहून किंवा एका ‘पिढीच्या’ वास्तविक आयुष्यमानाबद्दल तर्क करून काही प्राप्त होणार आहे का? नक्कीच नाही! हबक्कूक २:३ स्पष्टपणे सांगते: “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवायचा नाही; त्यांस विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.” जाब विचारण्याचा यहोवाचा दिवस अधिक वेगाने समीप येत आहे.—यिर्मया २५:३१-३३; मलाखी ४:१.

९. सन १९१४ पासून कोणते विकास काळाचा संक्षेप करण्यात आल्याचे दाखवतात?

९ ख्रिस्ताचे राज्य शासन १९१४ मध्ये सुरू झाल्यावर, सैतानाला खाली पृथ्वीवर टाकून देण्यात आले. याचा अर्थ, ‘पृथ्वीवर अनर्थ . . . कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.’ (प्रकटीकरण १२:१२) वस्तुतः तो काळ, सैतानाच्या शासनाच्या हजारो वर्षांच्या तुलनेत थोडा आहे. ते राज्य जवळ आहे तसेच या दुष्ट पिढीवर न्यायदंड बजावण्याचा यहोवाचा दिवस आणि घटिका देखील जवळ आहे!—नीतिसूत्रे ३:२५; १०:२४, २५.

नाहीशी होत असलेली “पिढी”

१०. “ही पिढी” नोहाच्या दिवसाप्रमाणे कशी आहे?

१० आपण मत्तय २४:३४, ३५ मधील येशूच्या विधानाचे बारकाईने परीक्षण करू या: “मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.” येशूचे पुढील शब्द, ‘तो दिवस व त्या घटकेविषयी कोणालाच ठाऊक नसल्याचे’ दाखवतात. अधिक महत्त्वाचे म्हणजे, या पिढीत आम्हा सभोवतालचे पाश टाळले पाहिजे, असे तो दाखवतो. अशा प्रकारे येशू पुढे म्हणतो: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.” (मत्तय २४:३६-३९) येथे येशूने या पिढीची तुलना नोहाच्या दिवसातील पिढीसोबत केली.—उत्पत्ति ६:५, ९; NW, रेफरन्स बायबल तळटीप पाहा.

११. मत्तय व लूक यांनी नमूद केल्याप्रमाणे येशूने ‘पिढ्यांची’ कोणती तुलना केली?

११ येशूला ‘पिढ्यांची’ अशी तुलना करत असल्याचे ऐकण्याची, ही त्याच्या प्रेषितांची पहिलीच वेळ नव्हती, कारण काही दिवसाआधी त्याने स्वतःविषयी असे म्हटले: ‘मनुष्याच्या पुत्राने प्रथम फार दुःख भोगावे व ह्‍या पिढीकडून नाकारले जावे ह्‍याचे अगत्य आहे. तसेच, नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल.’ (लूक १७:२४-२६) अशा प्रकारे, मत्तय अध्याय २४ आणि लूक अध्याय १७ एकसारखीच तुलना करतात. नोहाच्या दिवसात “पृथ्वीवरील [ज्या] सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती,” व ज्यांचा जलप्रलयात नाश झाला ते तेव्हाची “ही पिढी” होते. येशूच्या दिवसात त्याला नाकारणारे धर्मत्यागी यहुदी लोक त्या काळात ‘या पिढीतील’ होते.—(तिरपे वळण आमचे.) उत्पत्ति ६:११, १२; ७:१.

१२, १३. (अ) आज नाहीशी झाली पाहिजे ती, “ही पिढी” कोणती आहे? (ब) यहोवाचे लोक आता या ‘कुटिल व विपरीत पिढीला’ तोंड कसे देत आहेत?

१२ या कारणास्तव, येशूच्या भविष्यवाणीच्या अंतीम पूर्णतेत, आज ख्रिस्ताच्या उपस्थितीचे चिन्ह पाहणाऱ्‍या पण त्यांच्या मार्गांमध्ये काही सुधारणा न करणाऱ्‍या पृथ्वीवरील लोकांचा उल्लेख, “ही पिढी” असा होतो हे स्पष्टच आहे. दुसऱ्‍या बाजूस पाहता, येशूचे शिष्य असल्यामुळे आपण ‘या पिढीच्या’ जीवनशैलीप्रमाणे घडविले जाऊ देण्याचे नाकारतो. जगात राहत असलो तरी आपण त्याचे भाग नाही, “कारण [नेमलेला, NW] समय जवळ आला आहे.” (प्रकटीकरण १:३; योहान १७:१६) प्रेषित पौल आपल्याला बोध करतो: “जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा; ह्‍यासाठी की, ह्‍या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता.”—फिलिप्पैकर २:१४, १५; कलस्सैकर ३:५-१०; १ योहान २:१५-१७.

१३ आपले ‘ज्योतिसारखे चकाकणे’ यात केवळ शुद्ध ख्रिस्ती व्यक्‍तित्त्व दाखवण्याचाच समावेश होत नाही, तर सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे येशूची भविष्यसूचक आज्ञा: “सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल,” ही पूर्ण करण्याचा समावेश होतो. (मत्तय २४:१४) तो शेवट केव्हा येईल हे कोणाही मानवाला सांगता येऊ शकत नाही पण आपल्याला माहीत आहे की, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” देवाचे समाधान होईपर्यंत साक्ष देऊन झाल्यावरच दुष्ट लोकांच्या ‘या पिढीचा’ शेवट होईल.—प्रेषितांची कृत्ये १:८.

‘तो दिवस आणि घटका’

१४. येशू व पौल, यांनी “काळ व समय” याबद्दल कोणता उपदेश दिला आणि आपण कशी प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

१४ यहोवाच्या उद्देशानुसार जगव्याप्त साक्ष देण्याचे साध्य झाल्यावर, या जगाच्या व्यवस्थेला काढून टाकण्याचा तो त्याचा ‘दिवस व घटका’ असेल. आपल्याला ती तारीख आगाऊ माहीत असण्याची आवश्‍यकता नाही. अशा प्रकारे, येशूच्या उदाहरणाचे अनुसरण करून प्रेषित पौलाने बोध केला: “बंधूनो काळ व समय ह्‍यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. शांति आहे, निर्भय आहे, असे ते म्हणतात तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.” पौलाच्या या बोलण्याकडे लक्ष द्या: “असे ते म्हणतात तेव्हा.” (तिरपे वळण आमचे.) होय, ‘शांती सुरक्षिततेविषयी’ बोलणी चालतील तेव्हा, मुळीच अपेक्षा नसताना देवाचा न्यायदंड अकस्मात बजावला जाईल. पौलाचा सल्ला किती उचित आहे: “ह्‍यावरुन आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे.”—१ थेस्सलनीकाकर ५:१-३, ६; तसेच ७-११ वचने देखील पाहा; प्रेषितांची कृत्ये १:७.

१५, १६. (अ) हर्मगिदोन, आपण विश्‍वास धरला होता त्यापेक्षाही अधिक पुढे आहे, असा विचार का करू नये? (ब) नजीकच्या भवितव्यात यहोवाच्या सार्वभौमत्वाला कसे गौरविले जाण्यास हवे?

१५ “ही पिढी” यावरील आपल्या अधिक असंदिग्ध दृष्टिकोनाचा अर्थ, आपण पूर्वी केलेल्या विचारापेक्षा हर्मगिदोन बरेच पुढे आहे, असा होतो का? कदापि नाही! तो ‘दिवस व घटका’ आपल्याला कधीही माहीत होणार नसली, तरी यहोवा देवाला ती नेहमीच माहीत आहे आणि तो त्यात बदल करत नाही. (मलाखी ३:६) जग नाशात अधिकाधिक बुडत चालले आहे, हे स्पष्ट दिसत आहे. जागृत राहण्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक कठीण होत आहे. यहोवाने, “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत” त्या प्रकट केल्या आहेत आणि आपण त्यांना तातडीच्या पूर्ण जाणीवेने प्रतिसाद दिला पाहिजे.—प्रकटीकरण १:१; ११:१८; १६:१४, १६.

१६ वेळ जवळ येत आहे तसे, जागृत राहा कारण सैतानाच्या सर्व व्यवस्थेवर यहोवा विपत्ती आणणार आहे! (यिर्मया २५:२९-३१) यहोवा म्हणतो: “मी आपला महिमा व पवित्रता प्रगट करीन, आणि बहुत राष्ट्रांस माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांस समजेल की मी परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे.” (यहेज्केल ३८:२३) ‘यहोवाचा तो निर्णायक दिवस’ जवळ आला आहे!—योएल १:१५; २:१, २; आमोस ५:१८-२०; सफन्या २:२, ३.

नीतिमान “नवे आकाश व नवी पृथ्वी”

१७, १८. (अ) येशू आणि पेत्राच्या मतानुसार, “ही पिढी” कशी नाहीशी होते? (ब) आपण वर्तन आणि सुभक्‍तीत जागृत का राहिले पाहिजे?

१७ ‘ज्या सर्व गोष्टी घडून आल्या पाहिजेत,’ त्याबद्दल येशूने म्हटले: “आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.” (मत्तय २४:३४, ३५) बहुधा, येशूच्या मनात ‘या पिढीचे’—“आकाश व पृथ्वी”—शासक आणि प्रजा असावी. प्रेषित पेत्राने “आताचे आकाश व पृथ्वी” ही “न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत,” असा उल्लेख करताना या प्रकारचेच शब्द वापरले. तो पुढे, “चोर येतो तसा प्रभूचा [यहोवा, NW] दिवस येईल; त्या दिवशी [सरकारी] आकाश मोठा नाद करीत [कसे] नाहीसे होईल,” यासोबत भ्रष्ट मानवी समाज, किंवा “पृथ्वी,” व तिच्या पापमय कार्यांचा देखील कशाप्रकारे नाश होईल, याचे वर्णन करतो. मग प्रेषित असा बोध करतो की, ‘पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून [आपण] देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा हे लक्षात ठेवतो कारण त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील!’ त्यानंतर काय होते? पेत्र आपले लक्ष, ‘ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी’ याकडे आकर्षितो.—२ पेत्र ३:७, १०-१३.c

१८ “नवे आकाश,” म्हणजे येशू ख्रिस्त व त्याचे सहकारी राजे यांजद्वारेचे राज्य शासन, मानवी समाजाच्या धार्मिक ‘नव्या पृथ्वीवर’ आशीर्वादांचा वर्षाव करील. तुम्ही त्या समाजाचे भावी सदस्य आहात का? असल्यास, राखून ठेवलेल्या महान भवितव्याबद्दल उल्लास करण्यासाठी तुमच्याकडे कारण आहे!—यशया ६५:१७-१९; प्रकटीकरण २१:१-५.

१९. आता आपण कोणत्या महान विशेषाधिकाराचा आनंद लुटू शकतो?

१९ होय, मानवजातीची एक धार्मिक “पिढी” आता देखील एकत्र केली जात आहे. आज अभिषिक्‍त ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास,’ स्तोत्र ७८:१, ४ मधील शब्दांच्या अनुषंगाने ईश्‍वरी शिक्षण देत आहे: ‘अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या; माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. यहोवाची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्‌भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगा.’ (मत्तय २४:४५-४७) या वर्षाच्या एप्रिल १४ या दिवशी, संपूर्ण जगभरातील सुमारे २३० देशांतील ७५,५०० पेक्षा अधिक मंडळ्यांमध्ये १,२०,००,००० पेक्षा अधिक लोक ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला उपस्थित राहिले होते. तुम्ही त्यांच्यापैकी एक होता का? तुम्ही आपला विश्‍वास ख्रिस्त येशूवर ठेवा आणि ‘तारणासाठी यहोवाच्या नावाचा धावा करा.’—रोमकर १०:१०-१३.

२०. ‘काळाचा संक्षेप करण्यात आल्यामुळे’, आपण जागृत कसे राहिले पाहिजे आणि कोणत्या भवितव्याला दृष्टिसमोर ठेवून?

२० “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे,” असे प्रेषित पौलाने म्हटले. अशा प्रकारे, मानवजातीच्या दुष्ट पिढीने आपल्यावर लादलेल्या परीक्षा व द्वेषाचा सामना करत असताना, आपण पूर्ण जागृत राहून यहोवाच्या कार्यात व्यग्र राहण्याची ही वेळ आहे. (१ करिंथकर ७:२९; मत्तय १०:२२; २४:१३, १४) बायबलमध्ये भाकीत करण्यात आलेल्या सर्व गोष्टी ‘या पिढीवर’ येत असल्याचे निरीक्षण करून, आपण सावध राहू या. (लूक २१:३१-३३) ह्‍या सर्व गोष्टींमधून बचावून आणि मनुष्याच्या पुत्रासमोर ईश्‍वरी अनुग्रहासहित उभे राहून आपण सरतेशेवटी, सार्वकालिक जीवनाचे बक्षीस प्राप्त करू शकू.

[तळटीपा]

a ‘सात काळाबद्दलच्या’ सविस्तर माहितीकरता वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेले “तुझे राज्य येवो” या पुस्तकाची पृष्ठे १२७-३९, १८६-९१ पाहा.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेले शास्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, खंड १, पृष्ठे ९१८ पाहा.

c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेले आपले आगामी जागतिक सरकार—देवाचे राज्य (इंग्रजी) या पुस्तकातील पृष्ठे १५२-६ व १८०-१ देखील पाहा.

उजळणीचे प्रश्‍न:

◻ दानीएल ४:३२ ची पूर्णता पाहिल्यावर, आता आपण “जागृत” कसे राहिले पाहिजे?

◻ मत्तय व लूक यांची शुभवर्तमाने “ही पिढी” याची कशी ओळख देतात?

◻ आपण ‘तो दिवस आणि घटका’ याची वाट पाहतो तसे, काय निरीक्षतो आणि त्याला कसा प्रतिसाद दिला पाहिजे?

◻ “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांच्या नीतिमान भवितव्याने आपल्याला काय करण्याचे उत्तेजन देण्यास हवे?

[१७ पानांवरील चित्रं]

ही हिंसक व दुष्ट पिढी नाहीशी झाल्यावर व्यथित मानवजातीला दिलासा मिळेल

[१८ पानांवरील चित्रं]

मानवजातीच्या सर्व वंशांकरता सुंदर “नवे आकाश व नवी पृथ्वी” अगदी समीप आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा