वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ५/१ पृ. २१-२६
  • यहोवाचे साक्षीदार जागृत का राहतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे साक्षीदार जागृत का राहतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आधीच्या शिष्यांनी जागृत राहण्याचा प्रयत्न केला
  • जागृत राहण्याचे थांबवले असे ते
  • वाढलेल्या जागृततेचा परिणाम
  • यांनी जागृत असल्याचे कसे शाबीत केले
  • तुम्ही जागृत आहात का?
  • जागृत राहण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • “जागृत राहा”—न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • यहोवा त्याच्या लोकांना कामासाठी एकत्रित व सुसज्ज करतो
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • “जागृत राहा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ५/१ पृ. २१-२६

यहोवाचे साक्षीदार जागृत का राहतात

“जागृत राहा . . . कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.”—मत्तय २४:४२.

१. “जागृत राहा” हा सल्ला कोणाला लागू होतो?

देवाच्या प्रत्येक सेवकाला—युवक असो की वृद्ध, नव्याने समर्पण घेतलेले असो किंवा अनेक वर्षांपासून सेवा करणारे असोत, पवित्र शास्त्राची ही सूचना लागू होते: “जागृत राहा!” (मत्त. २४:४२) हे इतके महत्त्वपूर्ण का आहे?

२, ३. (अ) येशूने कोणत्या चिन्हाचे वर्णन स्पष्टपणे केले, आणि भविष्यवाणीच्या पूर्णतेने काय दाखवले? (ब) मत्तय २४:४२ मध्ये उल्लेखण्यात आलेली कोणती परिस्थिती आमच्या विश्‍वासाच्या अस्सलपणाची परीक्षा घेते आणि कशाप्रकारे?

२ येशूने पृथ्वीवरील त्याची सेवा समाप्तीच्या लागास आली असता, राज्याधिकारातील त्याच्या अदृश्‍य उपस्थितीचे चिन्ह भाकीत केले. (मत्तय, अध्याय २४ व २५) त्याने स्पष्टपणे त्याच्या राजकीय उपस्थितीचे वर्णन केले—व भविष्यवाणीच्या पूर्णतेतील घटना, १९१४ पासून तो सिंहासनाधिष्ट राजा असल्याचे दाखवतात. आमच्या विश्‍वासाच्या अस्सलपणाची परीक्षा घेणाऱ्‍या परिस्थितीकडेही त्याने निर्देश केला. येशू, मोठ्या संकटात न्यायदंडाधिकारी या नात्याने सद्य दुष्ट व्यवस्थिकरणावर चाल करील त्या काळाला अनुलक्षून त्याने म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाही नाही.” तेच मनात ठेवून त्याने म्हटले: “म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांस ठाऊक नाही.”—मत्तय २४:३६, ४२.

३ मोठ्या संकटाच्या सुरवातीचा दिवस आणि ती घटका याविषयी काहीही माहीत नसल्यामुळे, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या आम्ही सर्वांनी प्रत्येक दिवशी खऱ्‍या ख्रिश्‍चनांप्रमाणे राहिले पाहिजे याची ते मागणी करते. तुम्ही ज्यारितीने तुमचे जीवन व्यतीत करता त्याला, मोठे संकट येईल तेव्हा प्रभुची कृपापसंती असेल का? किंवा तत्पूर्वीच मृत्यू आल्यास, तुम्ही सद्य जीवनाच्या शेवटपर्यंत प्रामाणिकपणे यहोवाची सेवा केल्याची आठवण त्याला असेल का?—मत्तय २४:१३; प्रकटीकरण २:१०.

आधीच्या शिष्यांनी जागृत राहण्याचा प्रयत्न केला

४. आध्यात्मिक जागृततेबद्दल येशूच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

४ आध्यात्मिक जागृततेविषयी स्वतः येशूने उत्तम उदाहरण मांडले. त्याने वारंवार व कळकळीने त्याच्या पित्याला प्रार्थना केली. (लूक ६:१२; २२:४२-४४) परीक्षांचा सामना करताना शास्त्रवचनांत असलेल्या मार्गदर्शनावर तो पूर्णपणे विसंबून राहिला. (मत्तय ४:३-१०; २६:५२-५४) यहोवाने त्याला ज्या कामाची नेमणूक दिली होती त्यापासून त्याने स्वतःला विचलित होऊ दिले नाही. (लूक ४:४०-४४; योहान ६:१५) येशूचे अनुयायी असल्याचा दृष्टिकोन जे स्वतःविषयी बाळगतात, तेही तसेच जागृत राहतील का?

५. (अ) येशूच्या प्रेषितांना आध्यात्मिकतेत तोल राखण्यासाठी समस्या का आल्या? (ब) येशूच्या पुनरूत्थानानंतर त्याने प्रेषितांना कोणती मदत दिली?

५ कधी कधी येशूचे प्रेषित देखील अडखळले. अति उत्सुक व चुकीचे विचार असल्यामुळे त्यांना निराशेचा सामना करावा लागला. (लूक १९:११; प्रे. कृत्ये १:६) यहोवावर पूर्ण विसंबून राहण्याचे शिकण्याआधी, अचानक आलेल्या परीक्षेने त्यांना गोंधळून टाकले. अशाप्रकारे, येशूला अटक केल्यावर, त्याचे प्रेषित पळून गेले. नंतर, त्या रात्री भीतीमुळे पेत्राने ख्रिस्ताची ओळख असतानाही त्याला पुन:पुन्हा नाकारले. प्रेषितांनी अजूनही येशूचा सल्ला गंभीरतेने घेतला नव्हता: “जागृत राहा व प्रार्थना करा.” (मत्तय २६:४१, ५५, ५६, ६९-७५) येशूने त्याच्या पुनरूत्थानानंतर शास्त्रवचनांचा उपयोग करून त्यांचा विश्‍वास दृढ केला. (लूक २४:४४-४८) काहींनी त्यांना सोपवलेल्या सेवेला दुय्यम स्थानी ठेवल्याचे दिसून येऊ लागले तेव्हा, येशूने अधिक महत्त्वपूर्ण कार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांच्या मनोवृत्तीला मजबूत केले.—योहान २१:१५-१७.

६. येशूने त्याच्या शिष्यांना, आधीच कोणत्या दोन पाशांविरूद्ध इशारा दिला?

६ आधीच, येशूने त्याच्या शिष्यांना ते जगाचे भाग नाहीत असा इशारा दिला होता. (योहान १५:१९) तसेच एक दुसऱ्‍यावर धनीपण गाजवू नका तर, सर्वांनी मिळून बंधू या नात्याने सेवा करण्याविषयी त्याने त्यांना सल्ला दिला होता. (मत्तय २०:२५-२७; २३:८-१२) त्यांनी त्याचा सल्ला ऐकला का? त्याने दिलेल्या कार्याला त्यांनी प्राथमिकता दिली का?

७, ८. (अ) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी स्थापित केलेला अहवाल, त्यांनी येशूचा सल्ला गंभीरतेने घेतल्याचे कशाप्रकारे दाखवतो? (ब) सतत आध्यात्मिक जागृतता महत्त्वाची का होती?

७ प्रेषित हयात होते तोवर, त्यांनी मंडळीचे रक्षण केले. इतिहास पुरावा देतो की, आरंभीचे ख्रिस्ती, रोमी साम्राज्याच्या राजकीय कारभारात गोवलेले नव्हते, व त्यांच्यात उच्च पदावर असलेला पाळक वर्ग नव्हता. दुसऱ्‍या बाजूला पाहता, ते देवाच्या वचनाचे अतिउत्साही उद्‌घोषक होते. पहिल्या शतकाच्या समाप्तीस, त्यांनी संपूर्ण रोमी साम्राज्यात साक्ष दिली होती, व आशिया, युरोप, आणि उत्तर आफ्रिकेत शिष्य बनविले.—कलस्सैकर १:२३.

८ तथापि, प्रचार कार्याला सिद्धिस नेल्याने असा अर्थ झाला नाही की, येथून पुढे त्यांना आध्यात्मिकतेत जागृत राहण्याची गरज नव्हती. येशूचे भाकीत येणे भवितव्यामध्ये फार लांबवर होणार होते. आणि मंडळीने सामान्य युगाच्या दुसऱ्‍या शतकात पदार्पण केले तसे, ख्रिश्‍चनांच्या आध्यात्मिकतेला धोक्यात टाकणाऱ्‍या परिस्थिती उद्‌भवू लागल्या. ते कसे?

जागृत राहण्याचे थांबवले असे ते

९, १०. (अ) प्रेषितांच्या मृत्युनंतर, अनेक तथाकथित ख्रिस्ती जागृत नसल्याचे कोणत्या विकासावरून दिसून आले? (ब) तथाकथित ख्रिश्‍चनांना आध्यात्मिकतेत दृढ राहण्यासाठी परिच्छेदात उद्धृत केलेल्या कोणत्या शास्त्रवचनांनी मदत केली असती?

९ मंडळीत आलेल्यांमधील काहींना त्यांचा विश्‍वास ग्रीक तत्त्वज्ञानाच्या रुपात व्यक्‍त करण्याची इच्छा झाली, जेणेकडून जगातील लोकांना ते जे काही प्रचार करीत होते ते अधिक स्वीकारणीय होऊ शकेल. हळूहळू, मूर्तीपूजक तत्त्वे, जसे की त्रैक्य आणि आत्म्याचे मूळचे अमरत्व, ख्रिश्‍चनत्त्वाचा दूषित स्वरुपाचा भाग बनला. यामुळे हजार वर्षीय राजवटीच्या आशेला टाळले जाऊ लागले. ते का? आत्म्याच्या अमरत्वाच्या विश्‍वासाचा स्वीकार केलेले, या समाप्तीस आले की जो आत्मा मानवी शरीरापासून मुक्‍त झाला आहे, त्याला आत्मिक वातावरणात ख्रिस्ताच्या राज्याचे आशीर्वाद प्राप्त होतील. यास्तव, ख्रिस्ताच्या उपस्थितीसाठी व त्याच्या येणाऱ्‍या राज्यासाठी जागृत राहण्याची त्यांना काहीच गरज नाही असे वाटले.—पडताळा गलतीकर ५:७-९; कलस्सैकर २:८; १ थेस्सलनीकाकर ५:२१.

१० या परिस्थितीला इतर वाढींमुळे महत्त्व आले. ख्रिस्ती पर्यवेक्षक म्हणून दावा करणारे काही जण स्वतःसाठी प्रामुख्यत्व मिळवण्यास मंडळीचा उपयोग करू लागले. स्वतःच्या कल्पना आणि शिकवणी शास्त्रवचनांच्या बरोबरीचे किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, असा दावा अत्यंत मार्मिकतेने त्यांनी केला. संधी चालून आली तेव्हा, हे धर्मत्यागी चर्च राजकीय बाबींमध्ये काम करण्यासाठी तयार झाले.—प्रे. कृत्ये २०:३०; २ पेत्र २:१, ३.

वाढलेल्या जागृततेचा परिणाम

११, १२. प्रॉटेस्टंट चळवळीने खऱ्‍या उपासनेकडे पुनरागमन करण्याचे चिन्ह का दिसून आले नाही?

११ रोमन कॅथोलिक चर्चच्या अनेक शतकांच्या गैरवर्तनानंतर, १६ व्या शतकात काही सुधारकांनी बंड पुकारले. परंतु हे खऱ्‍या भक्‍तीकडे परतण्याचे चिन्ह नव्हते. का नव्हते बरे?

१२ रोमच्या सत्तेखालून विविध प्रॉटेस्टंट गट बाहेर पडले तरी, त्यांनी त्यांच्यासोबत धर्मत्यागाच्या अनेक मूलभूत शिकवणी आणि रुढी—चर्च धर्माधिकारी कल्पना, तसेच त्रैक्यावरील विश्‍वास, जीवाचे अमरत्व, आणि मृत्युनंतर सार्वकालिक पीडा या गोष्टी नेल्या. तसेच रोमन कॅथोलिक चर्चप्रमाणेच, ते देखील राजकीय घटकांसोबत निकट संबंध ठेवून जगाचा एक भाग बनून राहिले. यासाठीच, ख्रिस्ताने राजा म्हणून येण्याच्या कोणत्याही अपेक्षेला धिक्कारण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.

१३. (अ) काही लोकांनी देवाच्या वचनाला खरोखर मौल्यवान समजले होते हे कशावरून दिसते? (ब) काही तथाकथित ख्रिश्‍चनांसाठी १९ व्या शतकात, कोणत्या घटना खास आस्थेच्या झाल्या? (क) अनेकांना निराशा का अनुभवावी लागली?

१३ तरीही, येशूने भाकीत केले होते की, त्याच्या प्रेषितांच्या मृत्युनंतर, राज्याचे खरे वारस (ज्यांची तुलना त्याने गव्हाबरोबर केली) कापणीच्या काळापर्यंत ख्रिश्‍चनांची नक्कल करणाऱ्‍यांसोबतच (किंवा, निदण) वाढतील. (मत्तय १३:२९, ३०) धन्याने ज्यांना गहू असे म्हटले आहे, त्या सर्वांची निश्‍चितपणे आम्ही यादी देऊ शकत नाही. परंतु लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे व ती म्हणजे १४ व्या, १५ व्या, व १६ व्या शतकापर्यंत, अशा व्यक्‍ती होत्या ज्यांनी पवित्र शास्त्राचे सामान्य माणसांच्या भाषेत भाषांतर करण्यासाठी स्वतःचे जीवन आणि स्वातंत्र्य धोक्यात घातले. इतरांनी पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे असा केवळ स्वीकारच केला नाही तर, त्रैक्याची शिकवण अशास्त्रीय आहे म्हणून तिचा त्याग देखील केला. काहींनी आत्म्याच्या अमरत्वाचा आणि नरकाग्नीतील पीडा या शिकवणी पूर्णपणे देवाच्या वचनाच्या एकवाक्यतेच्या बाहेर आहेत म्हणून त्यांचा अस्वीकार केला. पवित्र शास्त्राच्या वाढत्या अभ्यासामुळे, १९ व्या शतकात सुद्धा, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि रशियातील गट ख्रिस्ताचे येणे अगदी जवळ आले आहे अशी खात्री व्यक्‍त करू लागले. परंतु त्यांच्यामधील बहुतेकांच्या अपेक्षा निराशेत बदलल्या. ते का? बऱ्‍याच प्रमाणावर, याचे कारण हे होते की, शास्त्रवचनांवर अधिक अवलंबून राहण्यापेक्षा ते मनुष्यावर अवलंबून राहिले होते.

यांनी जागृत असल्याचे कसे शाबीत केले

१४. बंधू सी. टी. रसेल व त्यांच्या सोबत्यांनी पवित्र शास्त्र अभ्यासासाठी घेतलेल्या पावित्र्याचे वर्णन करा?

१४ यानंतर १८७० मध्ये, चार्ल्स टेझ रसेल आणि त्यांच्या काही साथीदारांनी ॲलेग्नी, पेनसिल्वेनिया, येथे पवित्र शास्त्र अभ्यासासाठी एक गट बनविला. त्यांनी कवटाळलेल्या पवित्र शास्त्रीय सत्याला समजणारे ते प्रथम नव्हते, परंतु अभ्यास करताना, एका दिलेल्या प्रश्‍नावर सर्व शास्त्रवचनांची काळजीपूर्वक तपासणी करण्याची त्यांनी सवयच लावून घेतली.a त्यांचा हेतू, आगाऊपणेच ठरविलेल्या कल्पनेविषयी पुराव्यासाठी वचने पाहण्याचा नव्हता तर, त्याबाबतीत पवित्र शास्त्र जे काही सांगते त्याच्या अनुषंगाने आहे की नाही हे पाहणे हा होता.

१५. (अ) बंधू रसेल व्यतिरिक्‍त इतरांना काय समजले होते? (ब) कोणत्या गोष्टीने पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना या लोकांपासून वेगळे केले?

१५ त्यांच्यापूर्वी काहींनी ओळखले होते की, ख्रिस्त आत्मिक व्यक्‍ती म्हणून अदृश्‍यरीत्या पुन्हा येणार आहे. काहींनी हे पाहिले होते की, ख्रिस्ताच्या येण्याचा हेतू, पृथ्वीला जाळून टाकून संपूर्ण मानवजातीला नष्ट करण्याचा नव्हता तर, पृथ्वीच्या सर्व कुटुंबांना आशीर्वाद देण्याचा होता. त्यांच्या मधील काही असेही होते ज्यांनी ओळखले होते की, १९१४ हे वर्ष परराष्ट्रीयांच्या काळाच्या समाप्तीला दर्शवित होते. परंतु बंधू रसेल बरोबर सहवास राखणाऱ्‍या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना, या गोष्टी वेदांतीय चर्चेपेक्षा अधिक होत्या. या सत्याभोवती त्यांनी आपले जीवन मजबूत केले होते व त्या युगात त्याला अभूतपूर्व प्रमाणावर आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी दिली.

१६. बंधू रसेल यांनी १९१४ या वर्षामध्ये: “आम्ही परीक्षेच्या काळात आहोत,” असे का लिहिले?

१६ अजूनही, त्यांना जागृत राहण्याची गरज होती. ती का? एका उदाहरणाप्रमाणे, १९१४ हे वर्ष पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीला दर्शवित होते हे त्यांना माहीत होते तरी, त्या वर्षी काय होणार होते ते त्यांना पूर्णपणे माहीत नव्हते. यामुळे त्यांच्यासमोर परीक्षा उभी राहिली. नोव्हेंबर १, १९१४ च्या द वॉचटावर मध्ये, बंधू रसेल यांनी लिहिले: “आपण परीक्षेच्या काळात आहोत याची आठवण करू या. . . . प्रभूमध्ये आणि त्याच्या सत्यामध्ये विश्‍वासाचा तसेच प्रभूसाठी त्याग करण्याचे सोडून देण्याचे कोणतेही कारण असेल, तर प्रभूमध्ये आस्था घेण्यास उत्तेजन देणाऱ्‍या देवासाठी त्यांच्या हृदयात प्रेम नसून दुसरे काही तरी आहे; कदाचित अशी आशा बाळगली असेल की वेळ फार कमी आहे; पावित्र्याचा संस्कार विशिष्ट काळासाठीच आहे.”

१७. ए. एच. मॅकमिलन आणि त्यांच्यासारख्या इतरांनी, आध्यात्मिक तोल कशाप्रकारे राखला?

१७ तेव्हा काहींनी यहोवाच्या सेवेचा त्याग केला. परंतु बंधू ए. एच. मॅकमिलन यांनी तसे केले नाही. अनेक वर्षांनंतर त्यांनी स्पष्टपणे कबूल केले की: “एका विशिष्ट तारखेसाठी कधी कधी आमच्या अपेक्षा, शास्त्रवचने ज्याचे समर्थन देते त्याहीपेक्षा अधिक होत्या.” मग, आध्यात्मिकतेत समतोलपणा राखण्यास कशामुळे त्यांना मदत मिळाली? त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी काय जाणले, ते कळून येते की, “त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे देवाचा हेतू बदलला नाही.” त्यांनी आणखी म्हटले: “आम्ही आमच्या चूका कबूल केल्या पाहिजेत आणि अधिक प्रज्वलितपणासाठी देवाच्या वचनामध्ये संशोधन केले पाहिजे असे मी शिकलो.”b आरंभीच्या त्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी नम्रपणे देवाच्या वचनाला त्यांचे दृष्टिकोन सुधारण्यास लावले.—२ तीमथ्य ३:१६, १७.

१८. जगाचा भाग न होण्याच्या बाबतीत, ख्रिश्‍चनांच्या जागृततेने प्रगतीशील लाभांना कशाप्रकारे प्राप्त केले आहे?

१८ यानंतरच्या वर्षांमध्ये, जागृत राहण्याची त्यांची गरज कमी झाली नाही. ख्रिश्‍चनांना या जगाचे भाग व्हावयाचे नव्हते, हे त्यांना नक्कीच ठाऊक होते. (योहान १७:१४; याकोब ४:४) त्याच्या अनुषंगाने, देवाच्या राज्याचा, राष्ट्रांचे लिग हा राजकीय नमुना आहे अशी मान्यता देणाऱ्‍या ख्रिस्ती धर्मजगताला ते सामील झाले नाहीत. पण १९३९ पर्यंत, त्यांनी ख्रिस्ती तटस्थतेचा वादविषय स्पष्टपणे पाहिला नव्हता.—नोव्हेंबर १, १९३९ चे द वॉचटावर पहा.

१९. संघटना जागृत राहिल्यामुळे, मंडळीतील देखरेखीच्या लाभांचा काय परिणाम झाला आहे?

१९ त्यांचा कधीही पाळक वर्ग नव्हता, परंतु त्यांच्यामध्ये निवडक असे वडील होते ज्यांना वाटले की मंडळीमधल्या सर्वांकडून प्रचारकार्याचीच अपेक्षा तेवढी केली जाते. तथापि, शास्त्रवचनांबरोबर जुळते घेण्याच्या तीव्र इच्छेमुळे, शास्त्रवचनांच्या प्रकाशात संस्थेने वारंवार द वॉचटावरच्या रकान्यातून वडिलांच्या भूमिकेची उजळणी केली. शास्त्रवचनात सुचवल्याप्रमाणे त्याच्या सुसंगतीत संघटनात्मक बदल केले गेले.

२०-२२. जगभरात राज्याची घोषणा करण्याचे भाकीत केलेले कार्य साध्य करण्यासाठी संपूर्ण संघटना प्रगतीशीलपणे कशाप्रकारे तयारी करत होती?

२० संपूर्ण संघटनेला देवाच्या वचनामध्ये आमच्या काळासाठी नेमून दिलेले काम पूर्णपणे साध्य करण्याच्या तयारीत लावले गेले. (यशया ६१:१, २) आमच्या दिवसामध्ये कोठपर्यंत सुवार्तेचा प्रचार करायचा होता? येशूने म्हटले: “प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) मानवी दृष्टिकोनातून, हे काम सहसा अशक्य कोटीतील असल्याचे दिसले.

२१ तरीही, मंडळीचा मस्तक या नात्याने ख्रिस्तामधील आत्मविश्‍वासामुळे, विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने पुढे प्रगमन केले. (मत्तय २४:४५) जे काम पूर्ण व्हावयाचे आहे ते यहोवाच्या लोकांना विश्‍वासूपणे आणि दृढपणे त्यांनी दाखवून दिले आहे. १९१९ पासून पुढे, क्षेत्र कार्यासाठी वाढता जोर दिला गेला. अनेकांसाठी, घरोघरी जाऊन अनोळखी लोकांबरोबर बोलणे सोपे नव्हते. (प्रे. कृत्ये २०:२०) परंतु “निर्भय असलेले धन्य” (१९१९ मध्ये) आणि “धैर्यवान बना” (१९२१ मध्ये) यासारख्या अभ्यासाच्या लेखांनी, यहोवावर भरवसा ठेवून कार्याची सुरवात करण्यास काहींना मदत केली.

२२ “राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा” या १९२२ मधील अपीलाने, या कामाला योग्य श्रेष्ठबळ मिळण्यासाठी आवश्‍यक ते उत्तेजन दिले. ज्या वडिलांनी त्या शास्त्रीय जबाबदारींचा स्वीकार केला नाही त्यांना, १९२७ पासून काढण्यात आले. त्यावेळेपर्यंत, संस्थेच्या फिरत्या प्रतिनिधींना, क्षेत्र कार्यामधील प्रचारकांना वैयक्‍तिक मदत देण्यासाठी प्रांतीय सेवा अधिकारी म्हणून नेमण्यात आले. सर्वचजण पायनियरींग करू शकत नव्हते, परंतु सप्ताहाच्या शेवटी बहुतेकजण पूर्ण दिवस सेवेमध्ये असत, पहाटेच लवकर चालू करून, एखादे सँडविच खाण्यासाठी थोडाच वेळ थांबायचे, आणि पुन्हा संध्याकाळपर्यंत सेवेमध्ये रमून जायचे. तो काळ ईश्‍वरशासित वाढींसाठी अभूतपूर्व होता, आणि यहोवा त्याच्या लोकांना ज्याप्रकारे नेत होता त्याची उजळणी केल्याने आम्हाला त्याचा बराच फायदा मिळतो. आजही तो असेच करत आहे. त्याच्या आशीर्वादामुळे, स्थापलेल्या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराचे काम यशस्वीपणे समाप्तीस आणले जाईल.

तुम्ही जागृत आहात का?

२३. ख्रिस्ती प्रेम आणि जगापासून अलिप्तता याबाबतीत, जागृत असल्याचे आम्ही वैयक्‍तिक या नात्याने कसे प्रदर्शित करु शकतो?

२३ यहोवाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद दिल्याने, त्याची संघटना आम्हाला जगाचा भाग बनवणाऱ्‍या चालीरिती आणि दृष्टिकोन याविषयी जागृत करते, जेणेकडून त्याच्याबरोबर नाहीसे होण्याचा धोका राहत नाही. (१ योहान २:१७) यासोबतच, आम्ही व्यक्‍तिगतपणे जागृत राहण्याची व यहोवाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देण्याची गरज आहे. यहोवा आम्हाला एकत्र राहण्याच्या आणि काम करण्याच्याही सूचना देतो. त्याच्या संघटनेने आम्हाला, ख्रिस्ती प्रीतीचा खरोखर काय अर्थ होतो याबद्दल गुणग्राहकता वाढवण्यासाठी मदत केली आहे. (१ पेत्र ४:७, ८) आमचे जागृत राहणे, मानवी अपरिपूर्णता असतानाही सल्ल्याचे अनुकरण करण्याचा आम्ही मनःपूर्वक प्रयत्न करण्याची मागणी करते.

२४, २५. कोणत्या महत्त्वाच्या बाबतीत आम्ही जागृत असले पाहिजे, व कोणत्या पुढील आशेला अनुलक्षून?

२४ विश्‍वासू बुद्धिमान दासांनी आम्हाला सतत आठवण करुन दिली आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर [यहोवा, NW] भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” (नीतीसूत्रे ३:५) “निरंतर प्रार्थना करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१७) आम्हाला, आमच्या निर्णयांना देवाच्या वचनांवर आधारित करण्यासाठी शिकले पाहिजे असा सल्ला दिला आहे, व त्या वचनाला ‘आपल्या पावलांकरता दिवा व मार्गावर प्रकाश’ देण्यासाठी परवानगी दिली पाहिजे. (स्तोत्रसंहिता ११९:१०५) येशूने भाकीत केलेले आमच्या दिवसातील कार्य, म्हणजे देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य आमच्या जीवनात प्रथम ठेवण्यासाठी आम्हाला प्रेमळपणे दिलेले उत्तेजन आहे.—मत्तय २४:१४.

२५ होय, विश्‍वासू आणि बुद्धिमान दास निश्‍चितच जागृत आहेत. व्यक्‍तिगतपणे आम्ही देखील जागृत राहिले पाहिजे. असे केल्याचा परिणाम आम्ही मनुष्याच्या पुत्र न्यायदंड बजावण्यासाठी येतो तेव्हा त्यासमोर मान्यताप्राप्त स्थितीत उभे राहिलेल्या मधील आढळून येवो.—मत्तय २४:३०; लूक २१:३४-३६.

[तळटीपा]

a ए. एच. मॅकमिलन यांचे विश्‍वास प्रगतीपथावर (इंग्रजी) प्रेंटीस-हॉल, इंका., १९५७, पृष्ठे १९-२२.

b ऑगस्ट १५, १९६६ च्या वॉचटावर मधील ५०४-१० पृष्ठे पहा.

उजळणीत

▫ मत्तय २४:४२ मध्ये दाखविल्याप्रमाणे, आम्ही जागृत असण्याची गरज का आहे?

▫ येशू तसेच पहिल्या शतकातील त्याच्या अनुयायांनी आध्यात्मिक जागृतता कशाप्रकारे राखली?

▫ यहोवाचे सेवक जागृत राहिल्यामुळे, १८७० पासून कोणते विकास झाले?

▫ आम्ही व्यक्‍तिगतरित्या जागृत आहोत याचा काय पुरावा दिसून येईल?

[२३ पानांवरील चित्रं]

येशू त्याच्या पित्याने नेमून दिलेल्या कार्यात व्यग्र राहिला. त्याने कळकळीने प्रार्थनाही केली

[२४ पानांवरील चित्रं]

चार्ल्स टेझ रसेल त्यांच्या उतारवयात

[२५ पानांवरील चित्रं]

संपूर्ण पृथ्वीभर ४७,००,००० पेक्षा अधिक राज्याचे उद्‌घोषक आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा