‘विश्वासू दास’ आणि त्याचे नियमन मंडळ
“आपल्या परिवाराला यथाकाळी खावयाला देण्यास ज्याला धन्याने त्याजवर नेमिले असा विश्वासू व बुद्धिमान दास कोण?”—मत्तय २४:४५.
१. यहोवा इतरांना का अधिकार देण्याची इच्छा करतो, व त्याने प्रामुख्यत्वे कोणाला तो दिला आहे?
यहोवा हा सुव्यवस्थेचा देव आहे. सर्व कायदेशीर अधिकाराचा तो उगम आहे. आपल्या विश्वासू सृष्टीच्या निष्ठेवरील आत्मविश्वासामुळे यहोवा इतरांना अधिकार सुपुर्द करतो. ज्याला त्याने बहुतेक अधिकार दिले आहेत तो, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. खरेच, देवाने “सर्वकाही याच्या पायाखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले.”—इफिसकर १:२२.
२. प्रेषित पौल ख्रिस्ती मंडळीला कसे संबोधितो, आणि ख्रिस्ताने कोणाला अधिकार दिला आहे?
२ प्रेषित पौल ख्रिस्ती मंडळीला “देवाचे घर” असे संबोधितो व म्हणतो की, यहोवाचा विश्वासू पुत्र येशू ख्रिस्त याला या घरावर नेमले आहे. (१ तीमथ्य ३:१५; इब्रीकर ३:६) पुढे, ख्रिस्त देखील देवाच्या घरातील सदस्यांना अधिकार सोपून देतो. हे आपल्याला मत्तय २४:४५-४७ मधील येशूच्या शब्दांवरुन कळते. तो म्हणालाः “आपल्या परिवाराला यथाकाळी खावयाला देण्यास ज्याला धन्याने त्याजवर नेमिले असा विश्वासू व बुद्धिमान दास कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य.”
पहिल्या शतकातील घरचा व्यवस्थापक
३. “विश्वासू व बुद्धिमान दास” कोणाचा बनलेला आहे, आणि यांना व्यक्तीगतपणे कोणती संज्ञा देण्यात आली आहे?
३ शास्त्रवचनाच्या काळजीपूर्वक अभ्यासाकरवी आम्हाला हे समजते की, देवाच्या घरातील आत्म्याने अभिषिक्त असणारे सदस्य हे आपापल्या काळी सामूहिकपणे “विश्वासू व बुद्धिमान दास,” “कारभारी,” किंवा “घरचा व्यवस्थापक” होते. यहोवाच्या घरातील वैयक्तीक सदस्यांना “घरचे,” किंवा “सेवकांचा वर्ग” या नात्याने संबोधिले आहे.—मत्तय २४:४५; लूक १२:४२; रेफरन्स बायबल, तळटीप.
४. येशूने आपल्या मृत्युच्या आधी कोणता प्रश्न विचारला, व त्याने स्वतःला कोणासारखे लेखिले?
४ आपल्या मृत्युच्या काही महिने आधी येशूने एक प्रश्न मांडला. त्याचे लिखाण लूक १२:४२ मध्ये असे आहेः “आपल्या सेवकांच्या वर्गाला यथाकाळी शिधासामग्री द्यावयास ज्याला धन्याने नेमिले आहे असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?” मग, आपल्या मृत्युच्या काही दिवस आधीच येशूने स्वतःला अशा एका माणसासारखे लेखिले जो परदेशी गेला, पण जाताना त्याने आपल्या दासांना बोलावले व आपले सर्वस्व त्यांना सोपविले.—मत्तय २५:१४.
५. (अ) येशूने इतरांना आपल्या सर्वस्वाची देखरेख करण्यास केव्हा नेमणूक दिली? (ब) जे त्याच्या घरच्या संयुक्त कारभारी वर्गाचे सदस्य होणार होते अशांना ख्रिस्ताने कोणती विस्तृत नेमणूक दिली?
५ येशूने आपल्या सर्वस्वाची देखरेख ठेवण्यास इतरांना केव्हा सोपून दिले? हे त्याच्या पुनरुत्थानानंतर घडले. आम्हाला परिचित असणाऱ्या मत्तय २८:१९, २० मधील वचनात, ख्रिस्ताने त्याच्या घरच्या संयुक्त कारभारी वर्गाचे सदस्य होणाऱ्यांना प्रथम शिक्षण देण्याचे व शिष्य बनविण्याचे विस्तृत काम सोपविले. “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्ष देण्याचे काम केल्यामुळे या सेवकाला, येशूने आपल्या पृथ्वीवरील उपाध्यपणाच्या काळात जे सुवार्तिक क्षेत्र सुरु केले होते त्याचा विस्तार करता येणार होता. (प्रे. कृत्ये १:८) यामध्ये त्यांनी “ख्रिस्ताच्या वतीने वकिली करणारे” असे वागवायचे होते. “देवाच्या पवित्र गूजांचे कारभारी” या नात्याने ते शिष्य बनविणार होते व त्यांना आध्यात्मिक आहार देणार होते.—२ करिंथकर ५:२०; १ करिंथकर ४:१, २.
परिवाराचे नियमन मंडळ
६. पहिल्या शतकातील कारभारी वर्गाला ईश्वरी प्रेरणेने कोणती गोष्ट पुरवता आली?
६ आत्म्याने अभिषेक झालेल्या ख्रिश्चनांनी सामूहिकरित्या आपल्या धन्याचा कारभारी वा घरचा व्यवस्थापक होऊन देवाच्या घरच्या सर्व सदस्यांना यथाकाळी आध्यात्मिक अन्न पुरवावयाचे होते. इ.स. ४१ ते इ.स. ९८ पर्यंतच्या काळात पहिल्या शतकातील कारभारी वर्गाच्या सदस्यांना ५ ऐतिहासिक अहवाल, २१ पत्रे तसेच प्रकटीकरणाचे पुस्तक, इतर बांधवांच्या लाभास्तव लिहिण्यासाठी ईश्वरी प्रेरणा लाभली. या प्रेरित लिखाणात परिवारासाठी म्हणजेच देवाच्या घरातील प्रत्येक अभिषिक्त जनासाठी सुंदर असे आध्यात्मिक अन्न भरलेले आहे.
७. दासवर्गातून पुरुषांच्या एका लहान गटाला ख्रिस्ताने कोणत्या उद्देशास्तव निवडले?
७ सर्व अभिषिक्त ख्रिस्ती सामूहिकपणे मिळून देवाचे घर बनत असले तरी ख्रिस्ताने दास वर्गातून एका छोट्या समूहाला दृश्य नियमन मंडळ या नात्याने सेवा करण्यासाठी निवडून घेतले हे दाखविण्यासाठी भरपूर पुरावा आहे. मंडळीचा आरंभाचा इतिहास दाखवितो की, मत्थिया मिळून १२ प्रेषित हे पहिल्या शतकातील नियमन मंडळाचे पाये होते. प्रे. कृत्ये १:२०-२६ आम्हाला या विषयाची माहिती देते. यहुदा इस्कर्योतची जागा भरून काढण्याच्या बाबतीत तेथे “देखरेखीचा हुद्दा,” तसेच “सेवकपण व प्रेषितपण” असा संदर्भ आढळतो.
८. पहिल्या शतकातील नियमन मंडळावर कोणत्या जबाबदाऱ्या होत्या?
८ या देखरेखीच्या हुद्यात प्रेषितांवर सेवेच्या कामासाठी योग्य व लायक पुरुषांची नेमणूक करण्याची तसेच सेवकपण संघटित करण्याची जबाबदारी समाविष्ट होती. पण आणखी काही त्यात होते. त्यात तत्त्वविषयक मुद्यांची स्पष्टता व शिक्षण देणे हेही समाविष्ट होते. योहान १६:१३ मध्ये येशूने दिलेल्या अभिवचनास अनुसरुन “सत्याचा आत्मा” ख्रिस्ती मंडळीचे सत्यासंबंधी प्रगतिशील मार्गदर्शन करणार होता. अगदी सुरवातीपासूनच ज्यांनी देवाचे वचन स्विकारले व बाप्तिस्मा घेतला अशा अभिषिक्त ख्रिश्चनांनी स्वतःला “प्रेषितांच्या शिक्षणात” मग्न करून घेतले. खरे म्हणजे, शिफारस करण्यात आलेल्या सात पुरुषांची शारीरिक अन्नाचे वाटप करण्यासाठी जी नियुक्ती करण्यात आली त्यामागील कारण तेच होते की, “बारा जणांना” ‘प्रार्थनेत व वचनसेवेत तत्पर राहता येण्यासाठी’ मोकळे होता येईल.—प्रे. कृत्ये २:४२; ६:१-६.
९. आरंभाच्या नियमन मंडळातील सदस्यांची संख्या ११वर कशी आली, आणि ही संख्या लगेच १२वर न आणण्याचे उघड कारण काय असावे?
९ असे दिसते की, आरंभाला नियमन मंडळात केवळ येशूचे प्रेषितच होते. पण हे असेच राहणार होते का? इ.स. ४४ च्या सुमाराला योहानाचा भाऊ प्रेषित याकोब याची हेरोद अग्रिप्पा १ याकरवी हत्या झाली. (प्रे. कृत्ये १२:१, २) यावेळी, जसे मागे यहुदाच्या बाबतीत करण्यात आले होते तसे दुसऱ्या प्रेषिताची नेमणूक करण्याचा प्रयत्न झाला नाही. ते का बरे? कारण याकोब हा १२ प्रेषितांपैकी पहिला असा निःसंशये विश्वासूपणे वारला होता. उलटपक्षी, यहुदा हा तर दुष्ट होता व यासाठीच त्याच्या बदली दुसरा नेमावा लागला की ज्याकरवी आध्यात्मिक इस्राएलाच्या पायाच्या धोंड्यांची सख्या १२ अशी राहू शकेल.—इफिसकर २:२०; प्रकटीकरण २१:१४.
१०. पहिल्या शतकातील नियमन मंडळाचा विस्तार केव्हा व कसा झाला, व याचा ख्रिस्ताने देवाच्या घरास मार्गदर्शन देण्यासाठी कसा वापर केला?
१० पहिल्या शतकातील नियमन मंडळातील मूळचे सर्व सदस्य प्रेषित होते. ते असे पुरुष होते ज्यांनी येशूसोबत आपला सहवास ठेवला होता व ते त्याचे मरण व पुनरुत्थानाचे साक्षी होते. (प्रे. कृत्ये १:२१, २२) पण ही परिस्थिती बदलणार होती. काही वर्षे निघून गेल्यावर इतर ख्रिश्चनांनी आध्यात्मिक गुणवत्ता संपादित केली व यांना यरुशलेम मंडळीत वडील या नात्याने नेमण्यात आले. इ.स. चे ४९ वे वर्ष आले तेव्हापर्यंत नियमन मंडळात केवळ उरलेले प्रेषितच नव्हे तर यरुशलेमातील इतर वडीलजनांचा समावेश झाला होता. (प्रे. कृत्ये १५:२) अशाप्रकारे नियमन मंडळाचे स्वरुप निश्चित ठेवण्यात आले नव्हते, तर देवाने त्याविषयीचे मार्गदर्शन देऊन त्याच्या लोकांच्या परिस्थितीशी जुळू शकेल असा बदल घडविला. मंडळीचा क्रियाशील मस्तक ख्रिस्त याने आपल्या विस्तारित नियमन मंडळाचा, यहुद्देत्तर ख्रिस्तीजनांनी सुंता करुन घेऊन मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन राहण्यास हवे का या महत्त्वपूर्ण तत्त्वाचा निवाडा देण्यासाठी उपयोग करून घेतला. नियमन मंडळाने आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देणारे तसेच तो पाळून चालण्याचा आदेश देणारे पत्र लिहिले.—प्रे. कृत्ये १५:२३-२९.
घरच्या कारभाऱ्याकडून जाब विचारण्याची वेळ
११. नियमन मंडळाने जे दृढ नेतृत्व घेतले होते त्याविषयी बंधूंनी आपली मान्यता दाखविली का, आणि या व्यवस्थेवर यहोवाने आशीर्वाद पाठविला होता हे कशावरुन दिसते?
११ नियमन मंडळाकरवीच्या या दृढ नेतृत्वाविषयी आरंभीच्या ख्रिश्चनांनी वैयक्तीकपणे व मंडळी या नात्याने आपली मान्यता दाखविली. अरामातील अंत्युखियाच्या मंडळीत नियमन मंडळाचे पत्र वाचले तेव्हा त्यातील उत्तेजनाबद्दल बंधूजनांना खूप आनंद झाला. याचप्रमाणे ही माहिती इतर मंडळ्यांना मिळाली व त्यांनीही तो बोध अनुसरला तेव्हा ते सर्व “विश्वासात स्थिर झाले व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.” (प्रे. कृत्ये १६:५) अशाप्रकारे देवाने या व्यवस्थेवर आपला आशीर्वाद दिला होता हे उघड आहे.—प्रे. कृत्ये १५:३०, ३१.
१२, १३. येशूने मोहरा व रुपयाच्या दृष्टांतात कोणत्या घटना भाकित केल्या?
१२ पण या अभूतपूर्व प्रकरणाच्या आणखी एका पैलूकडे आपण बघू या. मोहराच्या दृष्टांतात येशूने स्वतःला एका उमरावाची उपमा दिली, जो दूर देशी राज्य मिळवून परत यावे म्हणून गेला. (लूक १९:११, १२) येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान इ.स. ३३ मध्ये घडल्यावर त्याला देवाच्या उजव्या हाती उंचावण्यात आले. येथे तो आपले शत्रू आपल्या पायाचे आसन होईपर्यंत बसून राहणार होता.—प्रे. कृत्ये २:३३-३५.
१३ या दृष्टांताशी समांतर असणाऱ्या आणखी एका दृष्टांतात म्हणजे रुपयांच्या दृष्टांतात येशूने म्हटले की, बऱ्याच काळानंतर धन्याने येऊन आपल्या दासाकडून हिशेब घेतला. ज्याने विश्वासूपणाने आपले काम केले त्या दासाला धनी म्हणालाः “तू थोडक्याविषयी विश्वासू झालास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; आपल्या धन्याचे सुख भोगावयास ये.” पण अविश्वासू दासाविषयी त्याने म्हटलेः “त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याजपासून काढून घेतले जाईल. ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका.”—मत्तय २५:२१-२३, २९, ३०.
१४. येशूने आपल्या आत्म्याने अभिषिक्त असणाऱ्या दासाविषयी केवढी अपेक्षा धरली?
१४ बऱ्याच काळानंतर म्हणजे जवळजवळ १९ शतकानंतर येशूला, १९१४ मध्ये “विदेश्यांच्या काळा”ची समाप्ती झाल्यावर बादशाही अधिकार बहाल केला गेला. (लूक २१:२४) यानंतर, त्याने काही काळातच ‘येऊन आपल्या दासांकडून [आत्म्याने अभिषिक्त असलेले ख्रिश्चन] हिशेब घेतला.’ (मत्तय २५:१९) यावेळी येशूने यांच्याकडून व्यक्तीगतरित्या तसेच सामूहिकपणे केवढी अपेक्षा धरली होती? कारभाऱ्याची नेमणूक पहिल्या शतकात जशी होती तशीच आताही होती. ख्रिस्ताने प्रत्येकाला मोहर सोपविली होती. ती “ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे” होती. यामुळे येशूने प्रमाणबद्ध परिणामाची अपेक्षा धरली. (मत्तय २५:१५) येथे १ करिंथकर ४:२ मध्ये नमूद असणारा नियम लागू होतो, जो असे म्हणतोः “कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे.” मोहरा कामी लावणे याचा अर्थ देवाचे प्रतिनिधी असे विश्वासूपणे काम करणे, शिष्य बनविणे व त्यांना आध्यात्मिक सत्ये पुरविणे असा होत होता.—२ करिंथकर ५:२०.
शेवटला काळ जवळ आला तेव्हा असणारा “दास” व त्याचे नियमन मंडळ
१५. (अ) ख्रिस्ताने आपल्या सामूहिक घर-व्यवस्थापकाविषयी कोणती अपेक्षा धरली? (ब) ख्रिस्ताने ही गोष्ट त्याच्या येण्याच्या व घराची तपासणी करण्याआधी त्याच्या दासाने करावी अशी अपेक्षा केली होती हे कशावरुन सूचित होते?
१५ येशूने अभिषिक्त ख्रिश्चनांविषयी सामूहिकपणे हे अपेक्षिले की, ते विश्वासू कारभारी या नात्याने आपल्या सेवकांच्या वर्गाला “यथाकाळी शिधासामग्री” देतील. (लूक १२:४२) लूक १२:४३ नुसार येशूने असे म्हटलेः “ज्या दासाला त्याचा धनी येऊन तसे करताना पाहील तो धन्य.” याचा हा अर्थ होतो की, ख्रिस्ताने येऊन आत्म्याने अभिषिक्त असणाऱ्या आपल्या दासाकडून हिशेब घेण्याच्या आधी काही काळापासून ते देवाचे घर, ख्रिस्ती मंडळी हिच्या सभासदांना आध्यात्मिक अन्नाच्या वाटपाच्या कामात मग्न असतील. तर मग, ख्रिस्त जेव्हा १९१४ मध्ये आपला बादशाही अधिकार घेऊन परतला व त्याने १९१८ मध्ये देवाच्या घराची तपासणी सुरु केली तेव्हा त्याला कोण तसे करताना आढळले?—मलाखी ३:१-४; लूक १९:१२; १ पेत्र ४:१७.
१६. देवाच्या घराचे परिक्षण करण्यासाठी ख्रिस्त १९१८ मध्ये आला तेव्हा त्याला ख्रिस्ती धर्मराज्यातील चर्चेस आध्यात्मिक अन्नाचे वाटप यथाकाळी करीत असल्याचे का दिसून आले नाही?
१६ येशूने यहोवाच्या उजव्या हाती थांबून राहण्याचा दीर्घ मुदतीचा काळ संपण्याच्या बेतात आला तेव्हा ख्रिस्ताच्या परिवाराला १९१४ च्या आधीपासून कोण शिधासामग्री पुरविण्याचे काम करीत होता ते स्पष्ट झाले. ती ख्रिस्ती धर्मराज्यातील चर्चेस होती असे तुम्हाला वाटते का? निश्चितच नाही. कारण ते तर पार राजकारणात गुंतले होते. ते वसाहतींचा विस्तार करण्यामध्ये स्वतःला साधन बनवून होते व आपण दुसऱ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहोत हे देशभक्तीच्या माध्यमाने दाखवीत होते व अशाकरवी ते राष्ट्रभक्तीला प्राधान्य देत होते. यामुळे असे झाले की, त्यांना पहिल्या महायुद्ध काळात युद्धात समाविष्ट असणाऱ्या राजकारणी सत्तांना आपले क्रियाशील पाठबळ द्यावे लागले व मग ओघाओघाने त्यांच्यावर जबरदस्त रक्तदोष आला. आध्यात्मिक रितीने पाहू जाता, त्यांचा विश्वास आधुनिक तत्त्वाकरवी क्षीण झाला होता. त्यांच्यातील बहुतेक पाळक उच्च टिका व उत्क्रांतवाद याच्या सहज बळी पडल्यामुळे त्यांच्यामध्ये आध्यात्मिक आणीबाणी ओढावली. यामुळेच ख्रिस्ती धर्मराज्यातील पाळकांकडून कसल्याही प्रकारची आध्यात्मिक पौष्टीकता अपेक्षिता येणार नव्हती!
१७. ख्रिस्ताने काही अभिषिक्त ख्रिश्चनांचा का त्याग केला, व याचा त्यांना काय परिणाम मिळाला?
१७ याचप्रमाणे ज्या अभिषिक्त ख्रिश्चनांना धन्याच्या मोहराचा वापर करण्याच्या कामापेक्षा स्वतःच्या व्यक्तीगत तारणाविषयी अधिक चिंता वाटत होती त्यांच्याकडून देखील कसलेही पोषक आध्यात्मिक अन्न येत नव्हते. असे हे लोक “आळशी” बनले; त्यांनी धन्याच्या सर्वस्वाची काळजी करण्याविषयी आपण नालायक आहोत हे दाखविले. या कारणास्तव, त्यांना जेथे ख्रिस्ती धर्मराज्यातील चर्चेस अद्याप आहेत त्या “बाहेरील काळोखात” लोटून देण्यात आले.—मत्तय २५:२४-३०.
१८. आपल्या सेवकवर्गाला आध्यात्मिक अन्न यथाकाळी कोण देत असल्याचे धन्याला आढळले, व हे कसे सिद्ध होते?
१८ तर मग, १९१८ मध्ये आपल्या दासाचे परिक्षण करण्यासाठी आल्यावर धनी, येशू ख्रिस्ताला, आपल्या सेवकाच्या वर्गाला त्यांचे अन्न यथाकाळी कोण देत असल्याचे आढळले? याचे उत्तर मिळण्यासाठी, त्या काळापावेतो प्रामाणिक सत्य शोधकांना खंडणी यज्ञार्पण, ईश्वरी नाम, ख्रिस्ताची अदृश्य उपस्थिती, तसेच १९१४ ची अभूतपूर्वता याविषयी अचूक समज कोणी देऊ केली होती? कोणी त्रैक्य, मानवी जीवाचे अमरत्व व अग्नि नरक याविषयीचे खोटेपण उघड करून दाखविले होते? याचप्रमाणे उत्क्रांती व भूतविद्या याविषयीच्या धोक्यांबद्दल कोणी इशार दिला होता? वस्तुस्थिती दाखवते की, झायन्स वॉचटावर ॲण्ड हेरल्ड ऑफ ख्राइस्टस् प्रेझेन्स (सध्या द वॉचटावर अनाऊंसिंग जेहोवाज् किंग्डम्) या मासिकाच्या प्रकाशकांसोबत संलग्न असणारा अभिषिक्त ख्रिश्चनांचा एक गट होता जो हे काम करीत होता.
१९. विश्वासू दासवर्गाने १९१८ च्या आधीच कसे स्वतःला प्रदर्शित केले होते, त्याने आध्यात्मिक अन्नाचे वितरण कोणत्या माध्यमाने केले व केव्हापासून?
१९ द वॉचटावर मासिकाने आपल्या नोव्हेंबर १, १९४४ च्या अंकात म्हटलेः “१९१८ मध्ये प्रभु आपल्या मंदिरात येण्याच्या चाळीस वर्षे आधी म्हणजे १८७८ मध्ये पवित्र कार्याला वाहून घेतलेला प्रामाणिक ख्रिश्चनांचा एक गट होता. याने स्वतःला पुरोहित व पाळकांच्या संघटनेपासून वेगळे केले होते व तो ख्रिस्ती धर्माचे आचरण करीत होता. . . . देवाने ख्रिस्ताद्वारे ‘यथाकाळी पुरविलेले अन्न’ त्याच्या समर्पित मुलांना व घराण्याला नियमितरित्या वाटता यावे यासाठी पुढच्या वर्षी, म्हणजे जुलै १८७९ पासून हे मासिक, द वॉचटावर याचे प्रकाशन सुरु झाले.”
२०. (अ) आधुनिक नियमन मंडळाने स्वतःला कसे सामोरे आणले? (ब) नियमन मंडळाचे सदस्य काय करीत होते व कोणाच्या मार्गदर्शनाखाली?
२० सध्याच्या नियमन मंडळाविषयीच्या वाढीविषयीची माहिती देताना द वॉचटावर मासिकाच्या डिसेंबर १५, १९७१ च्या अंकात असे स्पष्ट करण्यात आलेः “पाच वर्षांनी [१८८४ मध्ये] झायन्स वॉच टावर सोसायटीची प्रस्थापना झाली व तिने देवाचा शोध घेणाऱ्या व त्याच्या वचनाची . . . समज मिळवू पाहणाऱ्या हजारो प्रांजळ लोकांना आध्यात्मिक अन्नाचे वितरण करता येण्यासाठी ‘प्रतिनिधी’ म्हणून काम केले. सर्व समर्पित, बाप्तिस्मा झालेले अभिषिक्त ख्रिस्तीजन या संस्थेसोबत तिच्या पेन्सिल्व्हेनिया येथील दप्तरी सहवास ठेवू लागले. त्यांनी संचालकपदी असो वा नसो, स्वतःला ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ वर्गाच्या खास कामासाठी देऊ केले. दास वर्गाची भरवणूक व मार्गदर्शनाच्या कामी त्यांनी आपले साहाय्य दिले व अशाप्रकारे नियमन मंडळाने आपले स्वरुप प्रकटविले. हे यहोवाची अदृष्य कार्यकारी शक्ती किंवा पवित्र आत्मा याच्या मार्गदर्शनाखाली घडले हे उघड आहे. याचप्रमाणे ते ख्रिस्ती मंडळीचा मस्तक, येशू ख्रिस्त याच्याही मार्गदर्शनाखाली घडून आले.”
२१. (अ) आध्यात्मिक अन्नाचे वितरण कोण करीत असल्याचे ख्रिस्ताला आढळले, व त्याने त्यांना कोणते बक्षिस दिले? (ब) विश्वासू दास व त्याचे नियमन मंडळ कशाकडे दृष्टी लावून होते?
२१ येशूचे दास असल्याचा दावा करणाऱ्यांची ख्रिस्ताने १९१८ मध्ये पाहणी केली तेव्हा त्याला ख्रिश्चनांचा एक आंतरराष्ट्रीय गट आढळला जो, मंडळीतील लोकांसाठी तसेच प्रचार कार्यात आढळणाऱ्या लोकांसाठी पवित्र शास्त्रीय सत्याचे प्रकाशन करीत होता. मग, १९१९ मध्ये ख्रिस्ताने भाकित केल्याप्रमाणेच घडले की, “धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.” (मत्तय २४:४६, ४७) हे खरे ख्रिस्ती आपल्या धन्याच्या आनंदात सामील झाले. “थोडक्याविषयी विश्वासू” असल्याचे शाबीत झाल्यामुळे त्यांची धन्याने “पुष्कळांवर” नेमणूक केली. (मत्तय २५:२१) विश्वासू दास व त्याचे नियमन मंडळ हे आपापल्या जागी स्थिरावले होते व ते आता विस्तृत नेमणूक मिळण्यासाठी तयार होते. त्यांना ही नेमणूक मिळाली म्हणून आपल्याला किती धन्यता वाटली पाहिजे, कारण निष्ठावंत ख्रिस्तीजन आज विश्वासू दास व त्याचे नियमन मंडळ याद्वारे समृद्ध लाभ मिळवीत आहेत!
स्मरणात ठेवण्यासाठी मुख्य मुद्दे
◻ देवाच्या घराचा मस्तक कोण आहे, आणि त्याने कोणास हा अधिकार दिला आहे?
◻ ख्रिस्ताने दास वर्गाला कोणती सामूहिक जबाबदारी सोपविली?
◻ दास वर्गातच कोणता एक सामूहिक वर्ग अस्तित्वात होता व त्याचे खास काम कोणते होते?
◻ ख्रिस्त देवाच्या घराची पाहणी करण्यास आला तेव्हा तेथील सदस्यांना कोण आध्यात्मिक अन्न देत होते?
◻ आजचे नियमन मंडळ कसे सामोरे आले?
[१० पानांवरील चित्रं]
पहिल्या शतकातील “दास” याचे नियमन मंडळ प्रेषित व यरुशलेम मंडळीतील वडीलजन यांचे मिळून बनलेले होते