वाचकांचे प्रश्न
◼ योहान ६:५३ मध्ये जेव्हा येशू बोलला की, “मी तुम्हाला खचित, खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही,” यावेळी तो केवळ अभिषिक्त ख्रिश्चनांनाच उल्लेखून हे सांगत होता का?
कित्येक वर्षांपासून आम्ही या वचनाचे विवेचन अभिषिक्त ख्रिश्चन, जे येशू ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी स्वर्गात घेतले जातील त्यांच्यापुरतेच मर्यादित आहे या अर्थी केले होते. परंतु या प्रकरणाविषयीचा आणखी अभ्यास योहान ६:५३ चा अवलंब अधिक विस्तारीत असल्याचे सुचवितो.
गेली काही वर्षे आम्ही या वचनाचा विचार, अशाच स्वरुपाचे वक्तव्य करणाऱ्या इतर काही वचनांच्या प्रकाशात केला होता. उदाहरणार्थ, “तुम्हामध्ये जीवन” ही संज्ञा येशूच्या योहान ५:२६ मधील उद्गारांसारखीच आहे ज्याचा अवलंब यहोवा व येशूपुरता मर्यादित आहे. तरीपण या मासिकाच्या ऑगस्ट १, १९८६ च्या अंकातील पृष्ठ १७ व १८ मध्ये दाखविल्याप्रमाणे योहान ५:२६ चा संदर्भ त्या वचनातील “स्वतःचे जीवन” या शब्दांच्या समजावणूकीचा आधार देतो. तथापि योहान ६:५३ मधील शब्द एक वर्षानंतर उद्गारण्यात आले व त्याची पार्श्वभूमीही वेगळी आहे.
योहान ६:५३ विषयी आमच्या पूर्वीच्या दृष्टिकोणाविषयीचा आधार येशूने ‘त्याचे मांस खाणे व रक्त पिणे’ याविषयी जे म्हटले तो होता. याची साम्यता ख्रिस्ताने प्रभुच्या सांजभोजनाची प्रस्थापना करतेवळी जे म्हटले त्याच्यासोबत दिसत होती. ती प्रस्थापना करतेवळी त्याने त्याचे मांस व रक्त याविषयीचे बोलणे केले व त्याविषयीची बोधचिन्हे (बेखमीर भाकर व द्राक्षारस) ज्यांना नव्या करारात तसेच राज्याविषयीच्या करारात घेतले जाणार होते त्या त्याच्या अनुयायांना सेवनाकरता त्याने सादर केली. (लूक २२:१४–२२, २८–३०) त्यामुळेच योहान ६:५३ ची पार्श्वभुमि परत लक्षात घेतली जाण्यास हवी.
योहान ६:५३ मध्ये येशूने जे उद्गार काढले ते प्रभुच्या सांज भोजनाची स्थापना होण्याच्या एक वर्षाआधीचे होते. या प्रसंगी ज्यांनी येशूचे ऐकले त्यांना त्या वार्षिक महोत्सवाबद्दल व त्याची खरी बोधचिन्हे ख्रिस्ताचे मांस व रक्त याचे प्रतिनिधित्व करणारी आहेत याची मुळीच कल्पना नव्हती. उलटपक्षी योहानाच्या ६ व्या अध्यायातील येशूचा विषय वा त्याने केलेली चर्चा, त्याचा देह मान्न्याशी कसा तुल्य आहे याला अनुलक्षून होती. पण त्यात त्याने फरक दर्शविला. त्याचा देह (व त्याने आणखी पुढे म्हटलेले त्याचे रक्त) खऱ्या मान्न्यापेक्षा अधिक श्रेष्ठ दर्जाचा होता ते या अर्थी की तो जगाच्या जीवनासाठी दिला जाणार होता व त्याकरवी सार्वकालिक जीवन मिळू शकणार होते.—योहान ६:४८–५१.
अशाप्रकारे अलिकडच्या अधिक संशोधनाने हे प्रकटविले की येशूने योहान ५:२६ मध्ये उद्गारिलेले शब्द व योहानाच्या ६ व्या अध्यायातील त्याचे विचार यात एका वर्षाच्या कालावधीचा फरक होता; व यानंतर एका वर्षाने त्याने प्रभुच्या सांजभोजनाची प्रस्थापना केली. योहान ६:५३ चा लागलेच असणारा संदर्भ वा पार्श्वभुमि सुध्दा यावर अधिक प्रभाव पाडते. तद्वत, पृष्ठ २१–२६ मधील लेखाने योहान ६:५३ चा विस्तारित अवलंब दर्शविला आहे, ज्यामध्ये स्वर्गीय जीवनासाठी नव्या करारात आलेल्यांचा आणि ज्यांना नंदनवनमय पृथ्वीवर अनंतकाल जीवनाचे भवितव्य आहे अशांचाही समावेश आहे.
◼ बेथानी येथील शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी येशूने केलेले भोजन व त्यावेळी त्याचा सुवासिक तेलाने करण्यात आलेला अभिषेक याविषयी शुभवर्तमान अहवाल व सांदर्भिक ग्रंथ यांची वेगवेगळी मते दिसतात. तर त्या घटना केव्हा घडल्या असाव्यात?
या घटना (यहुदी पंचांगाच्या) इ. स. ३३ व्या वर्षी निसान ९ तारखेला घडलेल्या असाव्यात असे दिसते. याबद्दलच्या कारणाविषयी खाली करण्यात आलेली स्पष्टता लक्षात घेताना तुम्हाल हे स्पष्टतया समजू शकेल की देवाच्या वचनाचा सतत अभ्यास करणे हे का जरुरीचे आहे की ज्यामुळे आपले ज्ञान व समज वाढविली जाते.
या मेजवानीविषयीचा वृत्तांत चारपैकीच्या तीन शुभवर्तमानात आहे. (मत्तय २६:६–१३; मार्क १४:३–९; योहान १२:२–८) मत्तय व मार्क या मेजवानीच्या प्रसंगाचे वर्णन येशूने यरुशलेमात विजयोत्सवाने केलेला प्रवेश, त्याने अंजिराच्या निष्फळ झाडास दिलेला शाप, आणि प्रेषितांनी त्याला व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयी विचारलेल्या प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर या घटनांच्या उल्लेखानंतर करतात. मत्तय व मार्क हे दोघेही मेजवानीचा अहवाल सांगितल्यावर यहुदा येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहुदी धर्मपुढाऱ्यांशी कसे संगनमत करतो त्याची माहिती देतात. त्यामुळेच या अहवालांचा विचार करता ते भोजन निसान १२ तारखेला म्हणजेच निसान १४ रोजी येशूचा झालेला विश्वासघात व त्याला आलेला मृत्यु याच्या दोन दिवस आधी घडले असावे असे दिसते. या कारणास्तव कित्येक तक्त्यात आणि आमच्या पूर्वीच्या काही प्रकाशनात निसान १२ ही तारीख येशूच्या जीवनात घडलेली घटना या अर्थी उल्लेखित करण्यात आली आहे.
योहानाच्या १२ व्या अध्यायात शिमोनाच्या घरी देण्यात आलेले भोजन एका वेगळ्याच पार्श्वभुमीत दाखविण्यात आले आहे. योहान १२:१ कळविते की, येशू यरुशलेमानजीक असलेल्या बेथानीस “वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस” आला. याचा अर्थ तो निसान ८ तारखेला तेथे होता. वचने २–८ बेथानी येथील सायंकाळच्या भोजनाचे वर्णन देतात आणि वचने ९–११ सांगतात की ज्या यहुद्यांना येशू तेथे आहे असे कळले ते त्याला भेटावयाला तेथे आले. यानंतर १२–१५ वचने सांगतात की, “दुसऱ्या दिवशी” ख्रिस्ताने यरुशलेमात विजयोत्सवाने प्रवेश केला. (पडताळा प्रे. कृत्ये २०:७–११) अशाप्रकारे योहान १२:१–१५ सुचविते की शिमोनाच्या घरी निसान ९ ला सायंकाळी भोजन होते, ही वेळ यहुद्यांच्या पंचांगानुसार नव्या दिवसाची सुरुवात होती व याच दिवसाच्या (निसान ९) उजेडाच्या प्रहरात येशूने यरुशलेमात प्रवेश केला.
वर नमूद असलेल्या दोन विभिन्न शक्यतांमध्ये दुसरी शक्यता वजनदार वाटते. ते का बरे? याकरता आपण शुभवर्तमान अहवाल व त्यांचा संदर्भ पडताळून पाहू या. मत्तय व मार्क हे दोघेही शिमोनाच्या घरी झालेल्या जेवणाच्या बाबतीत कसलीही तारीख देत नाहीत. तरीपण या विशिष्ठ प्रसंगी मरीयेने मुल्यवान सुगंधी द्रव्य वापरल्यामुळे कुरकुर उद्भवली असे दोघेही सांगतात; तर योहान ही तक्रार लोभीष्ठ यहुदाने केली असे सांगतो. (मत्तय २६:८, ९; मार्क १४:४, ५; योहान १२:४–६) आम्ही हे पाहिलेच आहे की मत्तय व मार्क हे दोघे, मेजवानीच्या ह्या प्रसंगाचे वर्णन केल्यानंतर यहुदाने ख्रिस्ताचा विश्वासघात किती मोलासाठी करावा याकरता याजकांकडे जी विचारणा केली त्याविषयीची माहिती देतात. यहुदा हा केवढा लोभी होता व त्याने आपल्या लोभीष्टपणाचे वक्तव्य कसे केले ते दाखविण्याकरता कदाचित मत्तय व मार्क यांनी आपल्या शुभवर्तमानात आधी मेजवानीचा प्रसंग व त्यानंतर यहुदाने याजकांकडे विचारणा करणे अशी रचना सादर केली असावी.
तथापि योहान या मेजवानीची स्पष्ट तारीख सुचवितो व हे दाखवितो की ती कालक्रमणानुसार अगदी योग्य जागी आहे. याकरवीच हा निर्वाळा मिळतो की येशू इ. स. ३३ च्या निसान ८ रोजी बेथानीस आल्यावर तो संध्याकाळी शिमोनाच्या घरी जेवावयास गेला. शिवाय योहानाने आणखी जी माहिती दिली की, ‘ज्या यहुद्यांना येशू बेथानीस आहे असे कळाले’ व जे यरुशलेमाहून त्याला व बेथानी येथे राहत असलेल्या पण या मेजवानीप्रसंगी आपल्या बहिणींसोबत हजर होता त्या लाजर याला भेटण्यास आले होते ती वस्तुस्थितीही लक्षात घ्या. येशू बेथानीस आहे हे ‘कळलेल्या’ यहुद्यांनी दिलेली भेट येशूने यरुशलेमात प्रवेश करण्याच्या प्रसंगाच्या आधी घडली असावी हे ग्राह्य मानता येते. कारण ख्रिस्ताला “दुसऱ्या दिवशी” म्हणजे निसान ९ या दिवसाच्या उजेडाच्या प्रहरी जे उत्स्फुर्त स्वागत लाभले ते यामुळेच मिळाले असावे.
काळजीपूर्वक संशोधनामुळे लाभलेला हा निर्वाळा किंग्डम इन्टरलिनियर ट्रान्स्लेशन ऑफ द ग्रीक स्क्रिपचर्स च्या १९८५ च्या अलिकडील आवृत्तीतील “येशूच्या पृथ्वीवरील जीवनातील प्रमुख घटना” या तक्त्यात प्रवर्तित होत आहे. हा छोटा व पारिभाषिक मुद्दा असला तरी तो हे चित्रित करतो की देववचनाच्या सुंदर माहितीच्या ज्ञानात व समजावणूकीत आम्ही सर्वांनीच सातत्याने वाढत राहण्याची केवढी गरज आहे.