-
प्रथम हन्ना व मग कयफाकडे नेण्यात येतेसर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
-
-
येशू त्याला उत्तर देतोः “मी वाईट रितीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रितीने बोललो असलो तर मला का मारतोस?” असा वाद झाल्यावर हन्ना येशूला बांधलेल्या स्थितीतच कयफाकडे पाठवतो.
आतापर्यंत सर्व मुख्य याजक व वडील मंडळी आणि शास्त्री, होय सर्व न्यायसभा भरू लागली आहे. कयफाच्या घरी त्यांची सभा भरलेली असल्याचे उघड आहे. वल्हांडण सणाच्या रात्री अशी सभा भरवणे यहूदी नियमशास्त्राविरुद्ध आहे. पण त्यामुळे त्या धार्मिक नेत्यांच्या दुष्टतेमध्ये खंड पडत नाही.
काही आठवड्यांपूर्वी येशूने लाजराचे पुनरुत्थान केल्यावर, तो मेलाच पाहिजे असा निर्णय न्यायसभेने आपसात घेतलेला आहे. आणि केवळ दोन दिवसांपूर्वी, बुधवारी, येशूला मारण्यासाठी कपटाने धरण्याचा कट त्या धार्मिक नेत्यांनी केला. कल्पना करा, येशूची सुनावणी होण्यापूर्वीच त्याला खरोखर दोषी ठरवले गेले होते!
-
-
अंगणात नाकारणेसर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
-
-
गेथशेमाने बागेत येशूचा त्याग करून इतर प्रेषितांबरोबर भीतीने पळाल्यानंतर पेत्र व योहान मध्येच थांबतात. येशूला हन्नाच्या घरी नेत असताना कदाचित ते त्याला गाठतात. हन्ना येशूला प्रमुख याजक कयफाकडे पाठवतो तेव्हा पेत्र व योहान मध्ये बरेच अंतर ठेवून त्यांच्या पाठोपाठ जातात. स्वतःच्या जिवाची धास्ती आणि आपल्या धन्याचे काय होईल याची तीव्र काळजी यामध्ये त्यांचे मन द्विधा झाले असावे.
-