-
जा आणि लोकांना शिष्य कराटेहळणी बुरूज (अभ्यास)—२०२० | जानेवारी
-
-
१-२. येशूच्या कबरीजवळ आलेल्या स्त्रियांना एका स्वर्गदूताने काय सांगितलं आणि येशूने त्यांना कोणती सूचना दिली?
इ. स. ३३ च्या निसान १६ या दिवसाची सकाळची वेळ. देवाची सेवा करणाऱ्या काही स्त्रिया खूप दुःखी आहेत आणि त्या एका कबरीजवळ येतात. येशूचं शरीर दोन दिवसांआधी इथे ठेवण्यात आलं होतं. त्या स्त्रिया त्याच्या शरीराला सुगंधी मसाले आणि सुवासिक तेल लावण्याच्या हेतूने तिथे आल्या आहेत. पण ती कबर रिकामी पाहून त्या अचंबित होतात. एक स्वर्गदूत त्या स्त्रियांना म्हणतो की येशूला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे. तो पुढे म्हणतो: “तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. तुम्ही त्याला तिथे पाहाल.”—मत्त. २८:१-७; लूक २३:५६; २४:१०.
-
-
जा आणि लोकांना शिष्य कराटेहळणी बुरूज (अभ्यास)—२०२० | जानेवारी
-
-
४ येशूची इच्छा आहे की त्याच्या सर्व शिष्यांनी प्रचारकार्य करावं. पण ही आज्ञा त्याने फक्त त्याच्या ११ विश्वासू प्रेषितांना दिली नाही. असं आपण खातरीने का म्हणू शकतो? कारण गालीलच्या डोंगरावर जेव्हा शिष्य बनवण्याची आज्ञा देण्यात आली तेव्हा फक्त प्रेषितच तिथे उपस्थित नव्हते. त्या स्वर्गदूताने त्या स्त्रियांना काय सांगितलं होतं ते आठवा. त्याने म्हटलं होतं: “तुम्ही त्याला [गालीलमध्ये] पाहाल.” याचाच अर्थ त्या विश्वासू स्त्रियाही तिथे उपस्थित होत्या. तसंच, प्रेषित पौलने म्हटलं की येशू “एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला.” (१ करिंथ. १५:६) तर यावरून आपण असं म्हणू शकतो की तिथे आणखी लोकसुद्धा उपस्थित होते. पण इतके शिष्य नेमके कुठे जमले होते?
-