अध्याय १८
देवाची सेवा सदासर्वकाळ करणे हे तुमचे ध्येय बनवा
१, २. देवाविषयीचे ज्ञान स्वतःला असण्यापेक्षाही अधिक कशाची गरज आहे?
तुम्ही, मोठा खजिना ठेवलेल्या खोलीच्या बंद दरवाजापुढे उभे आहात अशी कल्पना करा. आपण असे म्हणू की, खोलीची मालकी असणाऱ्याने तुम्हाला किल्ली देऊन आतील मूल्यवान वस्तूमधून जे हवे आहे ते घ्या असे म्हटले आहे. ती किल्ली वापरली नाही तर तुम्हाला काही लाभ होऊ शकणार नाही. याचप्रमाणे, ज्ञानाचा लाभ मिळवण्याकरता तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे.
२ देवाविषयीच्या ज्ञानाबद्दल हे विशेषतः खरे आहे. यहोवा देव व येशू ख्रिस्ताबद्दलचे अचूक ज्ञान म्हणजे खरेच सार्वकालिक जीवन होय. (योहान १७:३) तरीपण हे भवितव्य, ज्ञानाला स्वतःपाशी जपून ठेवण्यामुळे साध्य होऊ शकणार नाही. महत्त्वपूर्ण किल्लीचा जसा तुम्ही वापर करता त्याचप्रमाणे देवाविषयीच्या ज्ञानाचा देखील तुमच्या जीवनात अवलंब करण्यास हवा. जे देवाच्या इच्छेप्रमाणे करतात अशांनाच केवळ ‘स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळेल’ असे येशूने म्हटले. अशा व्यक्तींना देवाची सदासर्वदा सेवा करण्याचा विशेषाधिकार लाभेल!—मत्तय ७:२१; १ योहान २:१७.
३. देवाची आमच्याकरता काय इच्छा आहे?
३ देवाची इच्छा काय आहे ते शिकून घेतल्यावर त्याप्रमाणे वागणे महत्त्वाचे आहे. देवाची तुमच्यासाठी काय इच्छा आहे असे तुम्हाला वाटते बरे? त्याचा या शब्दांत सारांश देता येईल: येशूचे अनुकरण करा. पहिले पेत्र २:२१ आम्हाला सांगते: “ह्याचकरिता तुम्हांस पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे.” यास्तव, देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी तुम्ही येशूच्या उदाहरणाचे शक्य तितक्या जवळून अनुकरण करण्याची गरज आहे. याच पद्धतीने तुम्ही देवाविषयीचे ज्ञान उपयोगात आणता.
येशूने देवाविषयीचे ज्ञान कसे वापरले
४. येशूला यहोवाबद्दल इतकी माहिती का होती आणि या ज्ञानाचा त्याने कसा उपयोग केला?
४ इतरांपेक्षा येशू ख्रिस्ताला देवाविषयीचे अधिक जवळचे ज्ञान आहे. येथे पृथ्वीवर येण्याआधी तो यहोवा देवाजवळ स्वर्गात अगणित युगे राहिला आहे. (कलस्सैकर १:१५, १६) पण येशूने त्या सर्व ज्ञानासंबंधाने काय केले? ते स्वतःकडे ठेवण्यामध्ये तो संतुष्ट नव्हता. येशू त्या ज्ञानानुरूप जगला. या कारणामुळेच सहमानवांसोबत व्यवहार करताना तो इतका दयाळू, सहनशील आणि प्रेमळ होता. अशा प्रकारे, येशू त्याच्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण करीत होता व यहोवाचे मार्ग व व्यक्तीत्व यांच्या सहमतात हालचाल करीत होता.—योहान ८:२३, २८, २९, ३८; १ योहान ४:८.
५. येशूने बाप्तिस्मा का घेतला आणि बाप्तिस्म्याच्या अर्थानुरूप त्याने कसे जीवन व्यतीत केले?
५ येशूला जे ज्ञान होते त्याद्वारे त्याला निर्णायक पाऊल घेण्याकडे निरवले. तो गालीलाहून यार्देन नदीवर आला व येथे योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला. (मत्तय ३:१३-१५) येशूचा बाप्तिस्मा कशाचे चिन्ह होता? यहुदी असल्यामुळे तो देवाला समर्पित असलेल्या राष्ट्रात जन्मला होता. या कारणामुळे तो जन्मतः समर्पित होता. (निर्गम १९:५, ६) तेव्हा बाप्तिस्मा घेण्यामुळे तो यहोवाची त्याच्यासाठी त्या काळी जी ईश्वरी इच्छा होती ती करण्याकरता स्वतःला सादर करीत होता. (इब्रीयांस १०:५, ७) आणि येशूने बाप्तिस्म्याच्या अर्थानुरूप स्वतःचे जीवन व्यतीत केले. त्याने यहोवाच्या सेवेत परिश्रम घेतले, प्रत्येक संधीला त्याने देवाविषयीच्या ज्ञानाची लोकांसोबत सहभागिता केली. येशूला देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात आनंद वाटला, ती त्याला जणू अन्नासारखी वाटत होती असेही त्याने म्हटले.—योहान ४:३४.
६. येशूने कोणत्या पद्धतीने स्वतःचा त्याग केला?
६ यहोवाच्या इच्छेप्रमाणे करणे खूपच भारी आहे हे येशूने पूर्णपणे ओळखले होते—त्यासाठी त्याला स्वतःच्या जीवनाची देखील किंमत द्यावी लागणार होती. असे असले तरी, येशूने स्वतःचा त्याग केला, स्वतःच्या व्यक्तिगत गरजांना दुय्यम स्थानी ठेवले. देवाच्या इच्छेप्रमाणे करणे हे नेहमीच सर्वप्रथम ठेवले होते. याबाबतीत, आपल्याला येशूच्या परिपूर्ण उदाहरणाचे कसे अनुकरण करता येईल?
चिरकालिक जीवनाकडे निरवणारी पावले
७. बाप्तिस्म्याला पात्र ठरण्याकरता एखाद्याने घेण्याजोगी काही पावले कोणती आहेत?
७ आपण अपरिपूर्ण आहोत त्यामुळे आपल्याला बाप्तिस्म्याचा टप्पा येशूप्रमाणे गाठता येणार नाही. तो केवळ इतर महत्त्वपूर्ण पावले टाकल्यानंतरच गाठता येऊ शकेल. हे यहोवा देव व येशू ख्रिस्ताबद्दलचे परिपूर्ण ज्ञान स्वतःच्या अंतःकरणात घेण्याद्वारे सुरू होते. असे करण्यामुळे विश्वास निर्माण होतो व देवाबद्दलचे गहन प्रेम उभारले जाते. (मत्तय २२:३७-४०; रोमकर १०:१७; इब्रीयांस ११:६) देवाचे नियम, तत्त्वे व दर्जे यांना मान्य करण्यामुळे आपल्याठायी पश्चात्ताप निर्माण होऊन आपल्या पूर्वीच्या पापांबद्दल ईश्वरी खेद व्यक्त झाला पाहिजे. यामुळे परिवर्तन घडते, म्हणजे पूर्वी जेव्हा देवाविषयीचे ज्ञान नसताना आपण जो चुकीचा मार्ग अनुसरत होतो त्यापासून मागे फिरणे व तो सोडून देणे घडते. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) पण आपण जे नीतिमत्त्व ते करण्याऐवजी अद्याप काही पाप गुप्तपणे आचरत असलो तर आपले मागे फिरणे खऱ्या अर्थाने घडले नाही; तसेच आपण देवाला फसवू शकत नाही. कारण यहोवा समोर सर्व ढोंगीपणा उघड आहे.—लूक १२:२, ३.
८. तुमची राज्य-प्रचाराच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे तर तुम्ही कोणती कृती करावी?
८ आता जेव्हा की तुम्ही देवाविषयीचे ज्ञान घेत आला आहात तर आध्यात्मिक गोष्टींचा विचार अगदी व्यक्तिगत पद्धतीने करणे उचित ठरणार नाही का? तुम्ही जे शिकता ते तुम्हाला तुमचे नातेवाईक, मित्र व इतरांना सांगावेसे कदाचित वाटेल. जसे येशूने अनौपचारिक स्थितीमध्ये सुवार्तेची सहभागिता केली तसे तुम्ही खरे पाहता हे करीत असाल. (लूक १०:३८, ३९; योहान ४:६-१५) आता तुमची अधिक करण्याची इच्छा असेल. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य-प्रचाराच्या हालचालीत सहभाग घेण्याला पात्र आहात व तो घेऊ शकता का ते ठरवण्याकरता ख्रिस्ती वडिलांना तुमच्यासोबत बोलण्यास निश्चये आवडेल. तुम्ही लायक आहात व ते कार्य करू शकता तर वडील सेवेकरता तुम्हाला कोणा साक्षीदाराची सोबत नेमून देतील. येशूच्या शिष्यांनी त्यांचे सेवकपण व्यवस्थितपणे करावे म्हणून त्याच्या सूचनांचे त्यांनी पालन केले. (मार्क ६:७, ३०; लूक १०:१) तुम्ही देखील घरोघरी तसेच इतर मार्गाने राज्य संदेशाचा प्रसार करताना अशाच प्रकारच्या मदतीकडून लाभ मिळवू शकाल.—प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१.
९. एखादी व्यक्ती देवाला समर्पण कशी करते, हे समर्पण त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम करते?
९ मंडळीच्या क्षेत्रात सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करणे हा धार्मिकतेचा मनोदय राखणाऱ्यांना शोधण्याचा व तुम्हाला विश्वास आहे हे दाखवणारी सत्कर्मे करण्याचा एक मार्ग आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; याकोब २:१७, १८, २६) ख्रिस्ती सभांमधील नियमित उपस्थिती तसेच प्रचारकार्यातील अर्थभरीत सहभाग या गोष्टी तुम्ही पश्चात्ताप केला असून मागे फिरला आहात आणि आता देवाविषयीच्या ज्ञानाच्या अनुषंगाने जगण्याचा तुमचा निश्चय आहे हे प्रदर्शित करण्याचे मार्ग आहेत. मग, पुढचे व्यावहारिक पाऊल कोणते असावे? ते यहोवा देवाला समर्पण करणे हे आहे. याचा अर्थ, तुम्ही कळकळीने प्रार्थना करून देवाला कळवता की, तुम्ही त्याला तुमचे जीवन, त्याच्या इच्छेनुसार करण्यासाठी स्वेच्छेने व पूर्ण अंतःकरणाने देत आहात. यहोवाला तुमचे समर्पण करण्याचा व येशू ख्रिस्ताचे सोईचे जू स्वतःवर घेण्याचा हा मार्ग आहे.—मत्तय ११:२९, ३०.
बाप्तिस्मा—त्याचा तुम्हासाठी काय अर्थ होतो
१०. तुम्ही यहोवाला तुमचे समर्पण केल्यावर बाप्तिस्मा का घेतला पाहिजे?
१० येशूच्या मते, त्याचे शिष्य होणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. (मत्तय २८:१९, २०) तुम्ही देवाला समर्पण केल्यावर ही गोष्ट करायची का गरज आहे? तुम्ही यहोवाला स्वतःचे समर्पण केले असल्यामुळे, तुमची त्याजवर प्रीती आहे हे देवाला ठाऊक आहे. तथापि, देवाबद्दल तुम्हाला वाटणारी प्रीती इतरांना माहीत करून देण्यामध्ये तुम्ही पुढील कृती नक्कीच कराल. तर मग, बाप्तिस्मा तुम्हाला, तुम्ही यहोवा देवाला केलेले समर्पण जाहीर करण्याची संधी देतो.—रोमकर १०:९, १०.
११. बाप्तिस्म्याचा काय अर्थ आहे?
११ बाप्तिस्म्याला समृद्ध लाक्षणिक अर्थ आहे. तुम्ही पाण्याखाली जाता किंवा “पुरले” जाता तेव्हा जणू तुमच्या पूर्वीच्या आचरणाला तुम्ही मरता. जेव्हा तुम्ही पाण्याच्या बाहेर येता तेव्हा जणू तुम्ही नव्या जीवनात, स्वतःच्या नव्हे तर देवाच्या इच्छेने नियंत्रित असलेल्या जीवनात प्रवेश करता. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की, तुमच्या हातून चुका घडणार नाहीत, कारण आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत व दररोज पाप करतो. तथापि, यहोवाचा समर्पित व बाप्तिस्मा घेतलेला सेवक या अर्थाने तुम्ही त्याच्यासोबत एका खास नातेसंबंधात प्रवेश केलेला असेल. तुम्ही पश्चात्ताप केल्यामुळे व बाप्तिस्म्याकरता स्वतःला नम्रपणे सादर केल्यामुळे यहोवा तुमच्या पापांची येशूच्या खंडणी बलिदानाआधारे क्षमा करण्यास इच्छूक असतो. अशा प्रकारे, बाप्तिस्मा देवासमोर शुद्ध विवेक राखण्याकडे निरवतो.—१ पेत्र ३:२१.
१२. (अ) ‘पित्याच्या नावाने,’ (ब) ‘पुत्राच्या नावाने,’ (क) ‘पवित्र आत्म्याच्या नावाने’ बाप्तिस्मा घेणे याचा काय अर्थ होतो?
१२ येशूने त्याच्या अनुयायांना नव्या शिष्यांचा “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा करावा अशी आज्ञा दिली. (मत्तय २८:१९) येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? ‘पित्याच्या नावाने’ बाप्तिस्मा, ज्या व्यक्तीचा बाप्तिस्मा होत आहे तो संपूर्ण अंतःकरणाने यहोवा देवाला निर्माणकर्ता व विश्वाचा सार्वभौम राजा म्हणून स्वीकारत असल्याचे सुचवतो. (स्तोत्र ३६:९; ८३:१८; उपदेशक १२:१) ‘पुत्राच्या नावाने’ बाप्तिस्मा घेण्याचा अर्थ, ती व्यक्ती येशू ख्रिस्ताला—आणि खासपणे त्याच्या खंडणी बलिदानाला—देवाने पुरवलेले तारणाचे एकमेव साधन म्हणून ओळखते असा होतो. (प्रेषितांची कृत्ये ४:१२) ‘पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा,’ बाप्तिस्मा घेणारा उमेदवार यहोवाचा पवित्र आत्मा किंवा क्रियाशील शक्ती, देवाचे उद्देश पूर्ण करण्याचे आणि त्याच्या सेवकांना त्याच्या आत्म्याने मार्गदर्शित असणाऱ्या संघटनेच्या सहवासात त्याच्या धार्मिक इच्छेची पूर्ती करण्यासाठी समर्थ बनवण्याचे एक साधन असल्याचे मानतो, असा अर्थ देतो.—उत्पत्ति १:२; स्तोत्र १०४:३०; योहान १४:२६; २ पेत्र १:२१.
तुम्ही बाप्तिस्म्याकरता तयार आहात का?
१३, १४. यहोवा देवाची सेवा करण्याची निवड करण्याचे भय आम्ही का बाळगू नये?
१३ बाप्तिस्मा इतका अर्थपूर्ण आहे आणि तो व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे तुम्हाला ते पाऊल उचलण्याची भीती वाटावी का? मुळीच नाही! बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेणे ही हलकी गोष्ट मानायची नसली तरी ती तुम्हाला करता येणारी सुज्ञ गोष्ट निश्चितच आहे.
१४ तुम्ही यहोवा देवाची सेवा करायची निवड केली आहे याचा पुरावा बाप्तिस्मा देतो. तुम्हाला ज्या लोकांचा संपर्क येतो त्यांचा विचार करा. यापैकीचा प्रत्येक जण कोणा ना कोणा प्रकारे एखाद्या धन्याची सेवा करीत नाही का? काही लोक धनाची सेवा करतात. (मत्तय ६:२४) दुसरे स्वतःच्या ध्येयाचा पाठलाग पराकाष्ठेने करीत आहेत किंवा त्यांच्या जीवनात स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देऊन ती पूर्ण करीत राहून स्वतःचीच सेवा करतात. तर दुसरे जण खोट्या दैवतांची सेवा करतात. पण तुम्ही खरा देव यहोवा याची सेवा करण्याची निवड केली आहे. दुसरा कोणी इतकी दया, कळवळा व प्रीती दाखवत नाही? तारणाची दिशा दाखवण्याचे उद्देशपूर्ण काम सोपवून देव मानवाला मोठेपणा देतो? सार्वकालिक जीवनाचे बक्षिस तो त्याच्या सेवकांना देतो? होय, येशूचे उदाहरण अनुसरणे व यहोवाला तुमचे जीवन देणे हा काही भेकड मार्ग नव्हे. खरे पाहता, हाच एकमात्र देवाला संतुष्ट करणारा व अर्थपूर्ण मार्ग आहे.—१ राजे १८:२१.
१५. बाप्तिस्म्याकरता काही सर्वसाधारण अडथळे कोणते आहेत?
१५ तथापि, बाप्तिस्मा कोणाच्या जबरदस्तीमुळे घेतला जाऊ नये. ती तुमच्यामधील व यहोवा यांजमधील व्यक्तिगत गोष्ट आहे. (गलतीकर ६:४) तुम्ही आध्यात्मिक प्रगती केलेली असल्यामुळे “मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” असे तुम्हाला वाटत असेल. (प्रेषितांची कृत्ये ८:३५, ३६) तुम्हाला स्वतःला विचारता येईल: ‘घरच्या विरोधामुळे मला मागे ठेवले जात आहे का? मी अद्याप काही अशास्त्रीय परिस्थिती किंवा पापी आचारसंहितेमध्ये गुंतलेलो आहे का? मला माझ्या समाजातील मर्जी गमवावी लागेल ही भीती तर वाटत नाही ना?’ या काही गोष्टी विचारात घेण्याजोग्या आहेत, पण त्यांना वास्तविकपणे तोलून बघा.
१६. यहोवाची सेवा करण्यामुळे तुम्हाला कसा लाभ मिळेल?
१६ यहोवाची सेवा करण्याचा लाभांचा विचार न करता या नकारात्मक गोष्टी तोलून बघणे व्यावहारिक नसणार. उदाहरणार्थ, कौटुंबिक विरोधाचा विचार करा. येशूने याचे अभिवचन दिले की, त्याला अनुसरण्यामुळे त्याच्या शिष्यांना त्यांच्या नातेवाईकांना मुकावे लागले तरी त्यांना मोठे आध्यात्मिक कुटुंब मिळेल. (मार्क १०:२९, ३०) हे समविश्वासू तुम्हाला बंधुप्रेम दाखवतील, छळ सहन करण्यात मदत करतील आणि जीवनाच्या मार्गावर तुम्हाला आधार देतील. (१ पेत्र ५:९) समस्यांना तसेच इतर आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यात मंडळीतील वडील तुमची खासपणे मदत करतील. (याकोब ५:१४-१६) या जगाची मर्जी गमावण्याबद्दल पाहता, तुम्ही स्वतःला विचारून बघा, ‘विश्वाच्या निर्मात्याची मर्जी संपादणे, मी निवडलेल्या जीवनक्रमामुळे त्याला आनंद मिळवून देणे याच्या तोडीची आणखी दुसरी कोणती गोष्ट आहे?’—नीतिसूत्रे २७:११.
तुमचे समर्पण व बाप्तिस्मा यानुरूप जगणे
१७. बाप्तिस्मा शेवट नसून ती सुरवात आहे असा दृष्टिकोन तुम्ही का बाळगावा?
१७ बाप्तिस्मा हा तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचा शेवट नव्हे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ती, यहोवाचा साक्षीदार व देवाचा नियुक्त सेवक या नात्याने जीवनभरच्या देवाच्या सेवेची सुरवात चिन्हांकित करते. बाप्तिस्मा जरी महत्त्वपूर्ण असला तरी तो काही तारणाची हमी देत नाही. ‘बाप्तिस्मा घेणाऱ्या प्रत्येकाचे तारण होईल,’ असे येशूने म्हटले नाही. उलटपक्षी, त्याने म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) या कारणास्तव, देवाच्या राज्याला स्वतःच्या जीवनात सर्वश्रेष्ठ गोष्ट बनवून त्याचा शोध घेत राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.—मत्तय ६:२५-३४.
१८. बाप्तिस्म्यानंतर कोणत्या ध्येयांचा पाठलाग करावा?
१८ यहोवाच्या सेवेत टिकून राहण्यासाठी तुम्हाला स्वतःपुढे आध्यात्मिक ध्येये ठेवावीशी वाटतील. देवाच्या वचनाचा नियमित रूपाने व्यक्तिगत अभ्यास करण्याद्वारे तुमचे देवाविषयीचे ज्ञान आणखी वाढवावे. हे एक उपयुक्त ध्येय आहे. बायबलचे दररोज वाचन करण्याची योजना करा. (स्तोत्र १:१, २) ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहा, कारण तेथे मिळणारा सहवास तुम्हाला आध्यात्मिक बळ देण्यास मदत करील. मंडळीच्या सभांमध्ये स्वतः अभिप्राय मांडण्याचे व त्याद्वारे यहोवाची स्तुती करण्याचे आणि इतरांची उभारणी करण्याचे ध्येय का बनवू नये? (रोमकर १:११, १२) आणखी एक ध्येय कदाचित, तुमच्या प्रार्थनेची शैली वाढवणे हे असू शकेल.—लूक ११:२-४.
१९. पवित्र आत्मा तुम्हाला कोणत्या गुणांचे प्रदर्शन करण्यामध्ये मदत करील?
१९ तुम्हाला तुमच्या बाप्तिस्म्याच्या अर्थानुरूप जगायचे आहे तर तुम्ही काय करता त्याकडे सतत लक्ष दिले पाहिजे व देवाच्या पवित्र आत्म्याला तुम्हामध्ये प्रीती, आनंद, शांती, दयाळुपणा, चांगुलपणा, विश्वास, लीनता व संयम या गोष्टींना निर्माण करण्यामध्ये वाव दिला पाहिजे. (गलतीकर ५:२२, २३; २ पेत्र ३:११) यहोवाकडे प्रार्थना करणाऱ्या आणि त्याचे विश्वासू सेवक या अर्थाने त्याची आज्ञा मानणाऱ्या सर्वांना तो त्याचा पवित्र आत्मा देत असतो हे लक्षात ठेवा. (लूक ११:१३; प्रेषितांची कृत्ये ५:३२) याकरता देवाकडे त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा आणि त्याला संतुष्ट करणाऱ्या गुणांचे प्रदर्शन करण्यासाठी मदत देण्याची विनंती करा. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रभावाला प्रतिसाद देत राहाल तसे हे गुण तुमच्या बोलण्यात व आचरणात अधिक दृश्यमान होत जातील. अर्थातच, ख्रिस्ती मंडळीतील प्रत्येक जण ख्रिस्ताप्रमाणे अधिक सदृश्य होता यावे म्हणून “नवा मनुष्य” विकसित करण्याच्या प्रयत्नात असतो. (कलस्सैकर ३:९-१४) सध्या आमची आध्यात्मिक प्रगतीची पातळी भिन्न स्वरूपाची असल्यामुळे आम्हापैकी प्रत्येकाला तसे करण्यामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. तुम्ही आता अपरिपूर्ण असल्यामुळे ख्रिस्तासारखे व्यक्तिमत्त्व संपादण्यामध्ये अधिक परिश्रम घेतले पाहिजे. पण यामध्ये केव्हाही निराश होऊ नका, कारण देवाच्या मदतीने ते शक्य आहे.
२०. तुम्हाला सेवकपणात येशूचे कसे अनुकरण करता येईल?
२० तुमच्या आध्यात्मिक ध्येयांपैकी एक, येशूचे आनंदी उदाहरण जवळून अनुसरणे हे असावे. (इब्रीयांस १२:१-३) त्याला सेवकपण आवडत होते. तुम्हाला राज्य-प्रचार कार्य करण्याचा विशेषाधिकार मिळाला असल्यास ही गोष्ट केवळ नित्याचा शिरस्ता होऊ देऊ नका. येशूप्रमाणेच इतरांना देवाच्या राज्याचे शिक्षण देण्यामध्ये समाधान मिळवत राहा. शिक्षक या नात्याने तुमची सुधारणूक व्हावी म्हणून मंडळी ज्या सूचना देते त्यांना उपयोगात आणा. शिवाय, तुमचे सेवकपण पूर्ण करायला यहोवा तुम्हाला बळ देईल याची खात्री बाळगा.—१ करिंथकर ९:१९-२३.
२१. (अ) यहोवा बाप्तिस्मा घेतलेल्या विश्वासू जणांना मोलवान समजतो हे आपल्याला कसे कळते? (ब) देव या दुष्ट व्यवस्थीकरणावर बजावत असलेल्या दंडामधून बचावून राहण्याकरता बाप्तिस्मा महत्त्वाचा आहे हे कसे दिसते?
२१ येशूचे विश्वासूपणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणारी समर्पित व बाप्तिस्मा घेतलेली व्यक्ती देवाला खास वाटते. यहोवा करोडो हृदयांचे परीक्षण करतो तेव्हा त्या प्रकारच्या व्यक्ती किती थोड्या आहेत ते त्याला कळते. तो अशांना मोलवान, “निवडक वस्तु” समजतो. (हाग्गय २:७) देव अशांना बचावासाठी चिन्हीत असल्याचे पाहतो, असे बायबलच्या भविष्यवाण्या दाखवितात. तो त्यांना या दुष्ट व्यवस्थीकरणावर लवकरच येत असलेल्या दंडामधून वाचवील. (यहेज्केल ९:१-६; मलाखी ३:१६, १८) तुम्ही “सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले” आहात का? (प्रेषितांची कृत्ये १३:४८) देवाची सेवा करणारा असे चिन्हांकित व्हावे अशी तुमची उत्कट इच्छा आहे का? समर्पण व बाप्तिस्मा हे त्या चिन्हाचा भाग आहेत आणि बचावासाठी जरूरीचे आहेत.
२२. “मोठा लोकसमुदाय” कोणत्या भवितव्याकडे बघू शकतो?
२२ जगव्याप्त जलप्रलय झाल्यानंतर नोहा व त्याचे कुटुंब शुद्ध झालेल्या पृथ्वीवर तारवातून बाहेर आले. त्याचप्रमाणे, आज देवाविषयीच्या ज्ञानाचा अवलंब करणाऱ्या व यहोवाची कृपापसंती मिळवलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायापुढे’ या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या समाप्तीतून बचावून जाण्याचे व कायमच्या शुद्ध झालेल्या पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचे भवितव्य उभे आहे. (प्रकटीकरण ७:९, १४) ते जीवन कशा प्रकारचे असेल?
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
तुम्ही यहोवाचे ज्ञान कसे उपयोगात आणावे अशी त्याची इच्छा आहे?
बाप्तिस्म्याकडे नेणारी कोणती पावले आहेत?
बाप्तिस्मा हा शेवट नसून सुरवात का आहे?
आपण आपले समर्पण व बाप्तिस्मा यानुरूप कसे जगू शकतो?
[१७२ पानांवरील चित्र]
तुम्ही देवाला प्रार्थनेद्वारे समर्पण केले आहे का?
[१७४ पानांवरील चित्र]
तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यापासून काय रोखत आहे?