वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • पवित्र आत्मा—देवाची क्रियाशील शक्‍ती
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
    • मत्तय २८:१९ मध्ये “पवित्र आत्म्याच्या नामाने” असा संदर्भ आला आहे. तथापि, “नाम” याचा अर्थ नेहमीच व्यक्‍तिगत नावाला उद्देशून नसतो. इंग्रजीत जेव्हा असे म्हटले जाते की, “इन दे नेम ऑफ द लॉ” तेव्हा कोणा व्यक्‍तीचा संदर्भ त्यात नसतो. तर त्याचा अर्थ कायदा ज्याचे प्रतिक असतो तो म्हणजे अधिकाराला ते सूचित असते. (‘इन द नेम ऑफ . . .’ ही जी परिभाषा इंग्रजीत वापरली जाते तिचा मराठीतील अर्थ ‘. . . ला स्मरुन’ असा आहे.) रॉबर्टसन यांचे वर्ड पिक्चर इन द न्यू टेस्टमेंट म्हणतेः “सेप्ट्युजंट आणि भूर्जपत्रातील लिखाणात नाम (ओनोमा) या शब्दाचा वापर सामर्थ्य वा अधिकार दर्शविण्यासाठी केला गेला आहे.” तद्वत, ‘पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा घेणे’ म्हणजे आत्म्याचा अधिकार ओळखणे हे आहे; म्हणजेच ती शक्‍ती देवाकडून आहे आणि ईश्‍वरी इच्छेनुरुप तिचे कार्यप्रवण होते हे कबूल करणे होय.

  • त्रैक्य “सिद्ध करुन दाखविणारी वचने” यांच्याविषयी काय?
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
    • न्यू कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ अशी तीन “सिद्ध करुन दाखविणारी वचने” प्रस्तुत करते, तथापि हेही कबूल करतेः “पवित्र त्रैक्य जु[ना] क[रार] यात शिकविण्यात आलेले नाही. याविषयीचा अगदी प्राचीन पुरावा प्रेषित पौलाच्या लिखाणात आढळतो व तो खासपणे २ करिंथकर १३:१३ [काही भाषांतरात वचन १४], आणि १ करिंथकर १२:४-६ मध्ये दिसतो. शुभवर्तमानात त्रैक्याचा पुरावा केवळ एकदाच व तो मत्तय २८:१९ मध्ये बाप्तिस्म्याच्या नमुन्यात दिसतो.”

      द न्यू जरुसलेम बायबल मध्ये त्या वचनांत तीन “व्यक्‍तींचा” अनुक्रमे असा उल्लेख केला गेला आहे. दुसरे करिंथकर १३:१३ (१४) तिघांना याप्रकारे एकत्र जोडतेः “प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो.” पहिले करिंथकर १२:४-६ म्हणतेः “कृपादानांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभु एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत तरी देव एकच आहे जो सर्वात सर्व कार्ये करणारा आहे.” तसेच मत्तय २८:१९ मध्ये असे वाचण्यात येतेः “यास्तव, तुम्ही जा, आणि सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; आणि यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या.”

      ही वचने देव, ख्रिस्त आणि पवित्र आत्मा त्रिमस्तकीय देवात सामावलेले आहेत, तिघे सत्व, सामर्थ्य आणि सनातनत्व यात बरोबरीचे आहेत असे म्हणतात का? नाही. ते सांगत नाहीत. या अर्थाने या वचनांचे प्रतिपादन करणे म्हणजे कोणीतरी तिघे कोठे एकत्र भेटले व तिघे एकत्र झाले असे म्हणण्यासारखे आहे.

      मॅक्लीनटॉक आणि स्ट्राँग यांचा सायक्लोपिडिआ ऑफ बिब्लिकल, थिऑलॉजिकल ॲण्ड एक्लेसियास्टिकल लिटरेचर म्हणतो की, “अशा प्रकारचे संदर्भ, नाव देण्यात आलेल्या तीन गोष्टींचे कथन करतात, . . . पण हे तिघे ईश्‍वरी गुणांचे आहेत आणि तिघा जणांत एकाच प्रकारचा ईश्‍वरी सन्मान आहे हे सिद्ध करीत नाहीत.”

      तो संदर्भग्रंथ त्रैक्याचा पुरस्कर्ता असला तरी २ करिंथकर १३:१३ (१४) विषयी सांगतोः “तिघात एकाच प्रकारचा अधिकार किंवा एकसारखाच गुण आहे असे अनुमान आपल्याला निश्‍चितपणे काढता येत नाही.” मत्तय २८:१८-२० बद्दल तो ग्रंथ म्हणतोः “ते वचन, जसेच्या तसे घेतले तरी तेथे ज्या तिघांचा उल्लेख आहे त्यांचे व्यक्‍तीत्व, किंवा त्यांची समानता वा ईश्‍वरीपणा याविषयीचा निर्णायक निर्णय देऊ शकत नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा