-
तुम्ही देवाबरोबर चालाल का?टेहळणी बुरूज—२००५ | नोव्हेंबर १
-
-
५. येशूने, आपले आयुष्य गजभर वाढवण्याविषयी का उल्लेख केला?
५ बायबलमध्ये बरेचदा एखाद्याच्या आयुष्याची तुलना प्रवासाशी केलेली आहे. कधीकधी ही तुलना अगदी उघडपणे तर काही ठिकाणी ती काहीशी अप्रत्यक्षरितीने केलेली आढळते. उदाहरणार्थ, येशूने म्हटले: “चिंता करून आपले आयुष्य गजभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?” (मत्तय ६:२७, NW) हे शब्द वाचल्यावर कदाचित तुम्ही बुचकळ्यात पडाल. व्यक्तीच्या ‘आयुष्याबद्दल’ बोलताना येशूने काळ मोजण्याची संज्ञा न वापरता, ‘गज’ ही अंतर मोजण्याची संज्ञा का वापरली?a साहजिकच येशू जीवनाची तुलना प्रवासाशी करत होता. दुसऱ्या शब्दांत तो असे सांगू इच्छित होता, की आपण कितीही चिंता करत बसलो तरीही जीवनाच्या प्रवासात एका पावलाचे अंतरही आपल्याला वाढवता येत नाही. तर मग, आपण देवाबरोबर किती काळ चालत राहणार हे आपल्या हातात नाही असे समजावे का? मुळीच नाही! यासंदर्भात आणखी एक प्रश्न उद्भवतो, तो असा, की आपण देवाबरोबर का चालावे?
-
-
तुम्ही देवाबरोबर चालाल का?टेहळणी बुरूज—२००५ | नोव्हेंबर १
-
-
a काही बायबल भाषांतरांत या वचनात “गजभर” म्हणण्याऐवजी “क्षणभर” (दी एम्फॅटिक डायग्लॉट्) किंवा “घटकाभर” (चार्ल्स बी. विल्यम्स यांचे अ ट्रान्सलेशन इन द लँग्वेज ऑफ द पीपल) हे शब्द वापरले आहेत. पण मूळ भाषेत वापरलेल्या शब्दाचा अर्थ निश्चितच एक गज म्हणजेच जवळजवळ १८ इंच असा आहे.
-