वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ९/१ पृ. ११-१६
  • प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवाची भीती बाळगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवाची भीती बाळगा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सनातन राजाकडे येणे
  • एक निर्बंधित हक्क
  • “पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना”
  • कधीही परतवून लावले जात नाही
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • प्रार्थनेतून मदत कशी मिळवावी
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • तुम्हाला देवाजवळ कसे येता येईल
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • तुमच्या प्रार्थना तुमच्याविषयी काय सांगतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ९/१ पृ. ११-१६

प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवाची भीती बाळगा

“तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुजकडे सर्व मानवजात येते.”—स्तोत्रसंहिता ६५:२.

१. यहोवाकडे प्रार्थना घेऊन येणाऱ्‍यांच्या बाबतीत त्याने काही विशिष्ट गरजा राखाव्या हे आम्ही का अपेक्षू शकतो?

यहोवा देव हा “सनातन राजा” आहे. तो ‘प्रार्थना ऐकणारा’ देखील आहे व त्याच्याकडे “सर्व मानवजात येते.” (प्रकटीकरण १५:३; स्तोत्रसंहिता ६५:२) पण त्यांनी त्याच्याकडे कसे आले पाहिजे? पृथ्वीवरील राजे, त्यांना भेटू इच्छिणाऱ्‍यांच्या बाबतीत पेहराव तसेच त्यांची वागण्याची पद्धत यावर निर्बंध घालून आहेत. तेव्हा सनातन राजाने देखील, त्याच्याकडे आपली विनंती तसेच उपकारस्मरण घेऊन येऊ इच्छिणाऱ्‍यांच्या संबंधाने काही गरजा आखून देणे हे उचित आहे.—फिलिप्पैकर ४:६, ७.

२. प्रार्थनेच्या विषयाबद्दल कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

२ तर मग, आपली प्रार्थना घेऊन येणाऱ्‍यांबद्दल हा सनातन राजा कोणत्या गरजा अपेक्षून आहे? त्याची प्रार्थना कोण करू शकतो व ती ऐकली जाईल अशी कोण अपेक्षा धरू शकतो? आणि यांना कशाविषयी प्रार्थना करता येतील?

सनातन राजाकडे येणे

३. देवाच्या आरंभीच्या सेवकांनी सादर केलेल्या प्रार्थनेविषयी तुम्हाला कोणती उदाहरणे देता येतील, आणि ते कोणा मध्यस्ताद्वारे त्याच्याकडे आले का?

३ आदामाने पापी होण्याआधी, “देवाचा पुत्र” या नात्याने नक्कीच सनातन राजाशी दळणवळण राखले होते. (लूक ३:३८; उत्पत्ती १:२६-२८) आदामाचा पुत्र हाबेल याने “कळपातील प्रथम जन्मलेल्या पुष्ट मेंढरांपैकीचे काही” देवाला सादर केले तेव्हा त्यासोबत त्याने स्तुति तसेच विनवणीचे काही बोल देखील अवश्‍य म्हटले असतील. (उत्पत्ती ४:२-४) नोहा, अब्राहाम, इसहाक व याकोब यांनी वेदी बांधून यहोवाला प्रार्थनापूर्वकतेने आपली अर्पणे सादर केली. (उत्पत्ती ८:१८-२२; १२:७, ८; १३:३, ४, १८; २२:९-१४; २६:२३-२५; ३३:१८-२०; ३५:१, ३, ७) याचप्रमाणे, शलमोन, एज्रा तसेच ईश्‍वरी प्रेरणा लाभलेले स्तोत्रकार यांनीही केलेल्या प्रार्थना, इस्राएल लोक कोणा मध्यस्ताविना देवाला आपल्या मागण्या सादर करीत होते हे सूचित करतात.—१ राजे ८:२२-२४; एज्रा ९:५, ६; स्तोत्रसंहिता ६:१, २; ४३:१; ५५:१; ६१:१; ७२:१; ८०:१; १४३:१.

४. (अ) देवाकडे येण्याचे कोणते नवे माध्यम पहिल्या शतकात उघडण्यात आले? (ब) येशूच्या नामाने प्रार्थना सादर करणे हे खासपणे का उचित आहे?

४ तथापि, देवाकडे प्रार्थनेद्वारे जाण्याचा नवा पवित्रा आमच्या समान शकाच्या पहिल्या शतकात प्रस्थापण्यात आला. तो, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारेचा होता. यालाही मानवजातीविषयी खास प्रीती वाटत होती. आपल्या मानवीप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात असताना येशूने “कुशल कारागीर” या नात्याने आनंदाने सेवा केली; त्याला मानवजातीतील गोष्टींविषयी बरीच आवड होती. (नीतीसूत्रे ८:३०, ३१) पृथ्वीवर मानव म्हणून असताना येशूने अपूर्ण मानवांना आध्यात्मिकदृष्ट्या मदत दिली; त्याने प्रेमळपणे आजाऱ्‍यांना बरे केले व मृतांनाही पुनरुत्थित केले. (मत्तय ९:३५-३८; लूक ८:१-३, ४९-५६) सर्वात महत्त्वाचे म्हणून येशूने “बहुतांसाठी खंडणीसाठी आपला जीव” दिला. (मत्तय २०:२८) तर मग, ज्यांना या खंडणीपासून लाभ मिळवून घ्यावयाचा आहे अशांनी, देवाकडे, मानवजातीविषयी इतके प्रेम दाखविणाऱ्‍या या व्यक्‍तीद्वारे येणे हे किती उचित आहे बरे! सनातन राजाकडे येण्याचा केवळ हाच एकमात्र मार्ग उपलब्ध आहे, कारण येशूनेच असे म्हटले होतेः “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणी जात नाही” तसेच, “तुम्ही पित्याजवळ काही मागाल ते तो तुम्हास माझ्या नावाने देईल.” (योहान १४:६; १६:२३) येशूच्या नामाने मागणे याचा अर्थ, प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवाकडे येण्याचे तो एक माध्यम आहे असे ओळखणे होय.

५. मानवजातीविषयी देवाला कसे वाटते, व याचा प्रार्थनेशी कोणता संबंध आहे?

५ खंडणीची तरतुद पुरविण्याद्वारे यहोवाने आपले जे प्रेम व्यक्‍त केले त्याविषयी आपल्याला कदर वाटली पाहिजे. येशूने म्हटलेः “देवाने [मानवजातीच्या] जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; यासाठी की जो कोणी त्याजवर विश्‍वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) देवाच्या प्रेमाची खोली किती गाढ आहे ते स्तोत्रकर्त्याच्या शब्दात अगदी खुलून सांगितले आहेः “जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्‍यांवर विपुल आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा यहोवा आपले भय धरणाऱ्‍यांवर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो लक्षात ठेवतो.” (स्तोत्रसंहिता १०३:११-१४) यहोवाच्या समर्पित साक्षीदारांच्या प्रार्थना अशा या प्रेमळ पित्याला त्याच्या पुत्राकरवी सादर होतात हे जाणणे किती आनंदाचे आहे!

एक निर्बंधित हक्क

६. यहोवाकडे प्रार्थनेद्वारे कोणत्या मनोदयाने आले पाहिजे?

६ मानवी राजे कोणालाही आपल्या राजमहालात गुपचूप प्रवेश देत नाहीत. राजासमोर हजर होणे हा एक निर्बंधित हक्क आहे. हेच सनातन राजाला केल्या जाणाऱ्‍या प्रार्थनेविषयीही म्हणता येईल. अर्थात, जे त्याच्याकडे येशू ख्रिस्ताद्वारे देवाच्या वैभवी सर्वोच्चतेची योग्य कदर राखून येतात अशांना आपली विनंती ऐकली जाईल अशी अपेक्षा धरता येईल. सनातन राजाकडे सद्‌भयाने व भक्‍तीमानपणे आले पाहिजे. आपली विनंती मान्य व्हावी अशी अपेक्षा धरणाऱ्‍यांनी “यहोवाचे भय” धरलेच पाहिजे.—नीतीसूत्रे १:७.

७. “यहोवाचे भय” काय आहे?

७ हे “यहोवाचे भय” काय आहे? हे देवास भक्‍तीभावाने आळविण्याचे व सोबत तो नाखूष होईल असे काही न करण्याची हितकारक भीती आहे. हे सद्‌भय त्याची दया व चांगुलपणा याबद्दलच्या खोल कृतज्ञतेकरवी प्रकट होते. (स्तोत्रसंहिता १०६:१) यामध्ये तो सनातन राजा आहे हे ओळखण्याचे तसेच जे आज्ञाभंजक त्यांना शिक्षा करण्याचे इतकेच काय पण त्यांना ठार मारण्याचेही सामर्थ्य व हक्क त्याचा आहे हेही ओळखण्याचे समाविष्ट आहे. यहोवाचे भय मानणाऱ्‍यांना, तो त्यांची विनंती ऐकेल अशी अपेक्षा धरून त्याला प्रार्थना करता येईल.

८. यहोवाचे भय धरणाऱ्‍यांच्या केवळ प्रार्थना तो ऐकतो असे का?

८ देव दुष्ट लोक, बेईमान तसेच स्व-धार्मिक लोकांच्या प्रार्थना ऐकत नाही हे उघड आहे. (नीतीसूत्रे १५:२९; यशया १:१५; लूक १८:९-१४) पण त्याची भीती बाळगणाऱ्‍यांना उत्तर मिळते, कारण ते त्याचे धार्मिक दर्जे पूर्णपणे आचरतात. पण त्यांनी आणखी काही केलेले असते. यहोवाचे भय धरणाऱ्‍यांनी यहोवाला प्रार्थनेद्वारे आपले समर्पण केलेले असते व त्याचे चिन्ह म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतलेला असतो. यामुळेच त्यांना प्रार्थनेचा निर्बंधित हक्क मिळतो.

९, १०. बाप्तिस्मा न झालेला असा कोणी आपली प्रार्थना ऐकली जाईल अशा आशेने प्रार्थना करू शकतो का?

९ देवाने प्रार्थना ऐकावयाची आहे तर त्या व्यक्‍तीने ईश्‍वरी इच्छेच्या सहमतात आपल्या प्रार्थनापर भावना व्यक्‍त करण्याची गरज आहे. होय, त्याने प्रांजळ असावे पण यापेक्षा अधिक काही आहे. “विश्‍वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे,” असे पौलाने लिहिले. “कारण,” तो पुढे म्हणतो की, “देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास धरला पाहिजे की तो आहे, आणि त्याकडे धाव घेणाऱ्‍याला तो प्रतिफळ देणारा असा होतो.” (इब्रीयांस ११:६) तर मग, ज्याचा बाप्तिस्मा झालेला नाही अशा व्यक्‍तीला प्रार्थना करण्याचे व ती ऐकली जाईल असे उत्तेजन देता येईल का?

१० प्रार्थना एक निर्बंधित हक्क आहे याची जाणीव राखूनच शलमोन राजाने हे प्रार्थिले की, जे परदेशीय यरुशलेम येथील मंदिराच्या दिशेकडे पाहून यहोवाची प्रार्थना करतील अशांचीच केवळ त्याने प्रार्थना ऐकावी. (१ राजे ८:४१-४३) काही शतकानंतर, एक मूर्तिपूजक परदेशीय कर्नेल्य याने भक्‍तीमानपणे ‘देवाची नित्य विनंती’ केली. मग, अचूक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर त्याने स्वतःचे देवास समर्पण केले आणि देवाने त्याला आपला पवित्र आत्मा दिला. यानंतर, कर्नेल्य व इतर विदेश्‍यांचा बाप्तिस्मा झाला. (प्रे. कृत्ये १०:१-४४) कर्नेल्याप्रमाणे आज जे आपल्या समर्पणात प्रगति करीत आहेत अशांना प्रार्थना करण्याचे उत्तेजन देता येईल. पण जो शास्त्रवचनांचा अभ्यास करण्याविषयी हेळसांडपणा दाखवीत आहे, प्रार्थनेविषयीच्या ईश्‍वरी गरजा जाणून नाही, आणि देवास संतुष्ट वाटणारी मनोवृत्ती अद्याप ज्याने दाखवली नाही अशाला यहोवा भीती आहे, विश्‍वास आहे, किंवा तो त्याचा शोध घेत आहे असे म्हणता येणार नाही. असा माणूस देव स्वीकारु शकेल अशा प्रार्थना सादर करण्याच्या स्थितीत नाही.

११. समर्पणाप्रत प्रगति करणाऱ्‍या काहींचे काय घडले, आणि यांनी स्वतःला काय विचारावे?

११ एकेकाळी समर्पणाप्रत आपली प्रगति करणारे काही जण नंतर मागे पडल्याचे दिसले आहे. यांना, देवाला बिनशर्त समर्पण करण्यास चालना देणारे असे आपल्या अंतःकरणात जर त्याच्याविषयीचे पुरेसे प्रेम नाही, तर प्रार्थनेचा अद्‌भूत हक्क आपल्यापाशी असू शकेल का याविषयी स्वतःला विचारुन पाहिले पाहिजे. तो हक्क असू शकणार नाही, कारण देवाकडे जाणाऱ्‍याने त्याचा कसून शोध केला पाहिजे व स्वतः धार्मिक व नम्र असले पाहिजे. (सफन्या २:३) यहोवाची खरेपणाने भीती धरणारा हा विश्‍वास ग्रहण करणारा व्यक्‍ती असतो व तो देवास आपले समर्पण करून त्याचे चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घेतो. (प्रे. कृत्ये ८:१३; १८:८) अशा केवळ बाप्तिस्मा घेतलेल्या विश्‍वासधारकांनाच सनातन राजाला प्रार्थना करण्याचा निर्बंधित हक्क आहे.

“पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना”

१२. कोणी “पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना” करीत आहे असे केव्हा म्हणता येते?

१२ कोणा व्यक्‍तीने देवास स्वतःचे समर्पण केल्यावर व त्यानुरुप बाप्तिस्मा घेतल्यावर तो “पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना” करण्याच्या स्थितीत येतो. याबद्दल, यहूदाने लिहिलेः “प्रिय बंधूनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्‍वासावर स्वतःची रचना करून, पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्गप्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा.” (यहूदा २०, २१) देवाच्या आत्म्याच्या किंवा कार्यकारी शक्‍तीच्या प्रभावाखाली राहून तसेच त्याच्या वचनात सांगितलेल्या गोष्टींच्या सहमतात एखादा पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करीत असतो. यहोवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या शास्त्रवचनात प्रार्थना कशी करावी व त्यामध्ये कोणती विनंती करावी हे दाखविले आहे. उदाहरणार्थ, आम्ही आत्मविश्‍वासाने देवाजवळ पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करू शकतो. (लूक ११:१३) आम्ही पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करतो तेव्हा यहोवास संतुष्ट वाटणारी आमच्या अंतःकरणाची स्थिती आहे असे आमच्या प्रार्थनेकरवी दिसून येत असते.

१३. पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करीत असता आम्ही काय टाळू, आणि येशूच्या कोणत्या सूचनेचा अवलंब करू?

१३ पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करीत असता आमच्या प्रार्थना मोठ्या, वजनदार शब्दांनी भारावलेल्या असणार नाहीत. त्यामध्ये वेळोवेळी पुनरावृत्ती केली जाणारी सूत्रे नसतील. नाही, त्यात अर्थहीन अशी शब्दावली, स्तुतीचे वरपांगी वक्‍तव्य नसणार. अशा प्रार्थना तर ख्रिस्तीधर्मजगत तसेच खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, मोठी बाबेल यात महामूर दिसतात. तथापि, खरे ख्रिस्ती येशूची ही सूचना ऐकतातः “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे होऊ नका; कारण मनुष्यांनी आपणास पहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते. . . . तुम्ही प्रार्थना करता तेव्हा विदेश्‍यांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपल्या बहुभाषणामुळे आपले मागणे मान्य होईल असे त्यांस [चुकीने] वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका.”—मत्तय ६:५-८, बाईंग्टन.

१४. प्रार्थनेविषयी समजशक्‍ती राखणारी कोणती विधाने काही जणांनी केली आहेत?

१४ येशू तसेच इतर पवित्र शास्त्र लेखकांशिवाय इतरांनी देखील प्रार्थनेबद्दल समजशक्‍तीची विधाने मांडली आहेत. उदाहरणार्थ, जॉन बनयान (१६२८-८८) या इंग्लिश लेखकांनी म्हटलेः “प्रार्थना ही देवास ख्रिस्ताद्वारे प्रांजळ, सूज्ञ व भावनोत्कटपणे जीव ओतून म्हटलेले बोल होत. ते पवित्र आत्म्याचे बळ व साहाय्याद्वारे देवाने वचन दिलेल्या गोष्टींप्रीत्यर्थ बोलले जातात.” थॉमस ब्रुक्स (१६०८-८०) या प्युरिटन उपाध्यायाने म्हटलेः “देव तुमच्या प्रार्थनेच्या वक्‍तृत्वाकडे, मग ते कितीही प्रगल्भ असो, पहात नाही; तसेच तो त्याच्या बीजगणिताकडे की, ते किती लांब आहे, आणि गणिताकडे की, ते किती गुंतागुंतीचे आहे हे बघत नाही. याचप्रमाणे तो त्याची तर्कशुद्धता, मग ती कितीही पद्धतशीर असो, पहात नाही; तर ही प्रार्थना किती प्रामाणिक व प्रांजळ आहे त्याकडे तो बघतो.” या विधानाला आम्ही बनयान यांच्या या शेऱ्‍याची पुष्टी देऊ शकतोः “प्रार्थनेत अंतःकरणविना शब्द असण्याऐवजी शब्दांशिवाय आपले अंतःकरण असणे हे चांगले.” तथापि, आपण प्रांजळ असलो व ईश्‍वरी गरजा पुऱ्‍या करीत असलो तर सनातन राजा आमच्या प्रार्थना ऐकू शकेल याविषयीची आम्ही कशी खात्री धरू शकतो?

कधीही परतवून लावले जात नाही

१५. येशूने लूक ११:५-८ मध्ये काय म्हटले ते सारांशरुपाने सांगा.

१५ यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थनेपासून कधीही कान फिरवीत नाही. हे, येशूच्या शिष्यांनी त्याला प्रार्थनेविषयी काही उपदेश मागितला तेव्हा येशूने सांगितलेल्या उबदार शब्दांद्वारे प्रकट होते. त्याने थोडक्यात असे म्हटलेः “तुम्हामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याजकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतोः ‘गड्या, मला तीन भाकरी उसन्या दे. कारण माझा एक मित्र प्रवासाहून मजकडे आला आहे, आणि त्याला वाढावयास मजजवळ काही नाही’? आणि तो आतून उत्तर देईलः ‘मला त्रास देऊ नको; आता दार लावले आहे, आणि माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, माझ्याने उठून तुला देववत नाही.’ मी तुम्हास सांगतो की, तो त्याचा मित्र आहे यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे जे काही पाहिजे ते उठून त्याला देईल.” (लूक ११:१, ५-८) या दृष्टांताचा कोणता मतितार्थ होता?

१६. प्रार्थनेच्या बाबतीत आम्ही काय करावे अशी येशूची इच्छा आहे?

१६ आम्हाला मदत देण्याची यहोवाची मुळीच इच्छा नाही असा येशूचा निश्‍चितच अर्थ नव्हता. उलटपक्षी, आम्ही देवावर आपला पूर्ण विश्‍वास ठेवावा आणि त्याच्यावर प्रेम करून त्याला निरंतर प्रार्थना करीत राहावी अशी ख्रिस्ताची आम्हाबाबत इच्छा आहे. या कारणास्तव, येशूने पुढे म्हटलेः “मी तुम्हास सांगतो की, मागत राहा म्हणजे तुम्हास दिले जाईल, ठोकत राहा म्हणजे तुम्हास उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो, त्याला ते मिळते, जो शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते.” (लूक ११:९, १०) अर्थातच, आम्ही छळ अनुभवीत असलो, कोणा व्यक्‍तीगत अशक्‍तपणात खोलवर अडकलो असलो, किंवा कोणत्याही परिक्षेत आलो असलो तर प्रार्थना करीत राहिले पाहिजे. यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांना सहाय्य देण्यात नेहमी तत्पर असतो. “मला त्रास देऊ नको,” असे तो आम्हास कधीही सांगत नाही.

१७, १८. (अ) आम्ही पवित्र आत्म्याविषयी विचारणा करावी यासंबंधीचे प्रोत्साहन येशू कसे देतो आणि त्याच्या वक्‍तव्यामागील कोणता जोर आहे हे कशामुळे कळते? (ब) येशूने ऐहिक पित्याच्या दळणवळणाची स्वर्गीय पित्याच्या दळणवळणाशी कशी तुलना केली?

१७ देवासोबतचे जवळचे नातेसंबंध आपल्याला अनुभवावयाचे आहेत तर आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याची, किंवा क्रियाशील शक्‍तीची गरज आहे. या कारणास्तव, येशूने पुढे म्हटलेः “तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की, त्याच्याजवळ त्याच्या मुलाने मासा मागितला असता त्याला तो साप देईल? किंवा अंडे मागितले असता विंचू देईल? तर तुम्ही वाईट असता आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल!” (लूक ११:११-१३) मत्तय ७:९-११ भाकरी ऐवजी धोंडा देण्याविषयीची अधिक माहिती देते. येशूच्या शब्दातील जोर आम्हाला कळू शकतो, कारण प्राचीन काळातील पवित्र शास्त्रीय देशात भाकरीचा आकार हा सपाट व गोल धोंड्यासारखा होता. काही प्रकारचे साप विशिष्ट माशासारखे दिसत असत आणि पांढऱ्‍या विंचवाची अशी एक जात होती जी, अंड्यासारखी दिसत असे. आता भाकर, मासा किंवा अंडे मागितल्यास कोण असा बाप होता की तो याऐवजी आपल्या मुलाला धोंडा, साप किंवा विंचू देईल?

१८ येशूने पुढे ऐहिक पालकांच्या दळणवळणाची तुलना देव आपल्या उपासकांच्या कुटुंबासोबत जे दळणवळण ठेवून आहे त्याच्याशी केली. आम्ही वारशाने मिळालेल्या आपल्या पापामुळे जरी थोड्या अधिक प्रमाणात दुष्ट असलो तरीही आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते तर स्वर्गीय पित्याने, जे त्याच्या पवित्र आत्म्याच्या अद्‌भूत देणगीची नम्रपणे विचारणा करतात अशांना तो द्यावा हे किती अधिकपणे अपेक्षू शकतो बरे!

१९. (अ) लूक ११:११-१३ तसेच मत्तय ७:९-११ मधील येशूच्या शब्दांकरवी काय सूचित करण्यात आले आहे? (ब) आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहोत तर आम्हावर येणाऱ्‍या परिक्षांबद्दल आमचा कोणता दृष्टीकोण असणार?

१९ येशूचे शब्द सूचित करतात की आम्ही देवाला अधिक पवित्र आत्म्याविषयी विचारणा करावी. आम्ही त्याच्या प्रेरणेने चालत आहोत तर मग, आमच्या जीवनातील स्थितीविषयी आम्ही कुरकुरत राहणार नाही आणि आम्हावरील परिक्षा व निराशमय गोष्टी खऱ्‍याच घातक आहेत असा दृष्टीकोण धरणार नाही. (यहूदा १६) हे खरे की, “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरीत असतो.” (ईयोब १४:१) पण प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवाने ज्या ज्या परिक्षांना आम्हावर येण्याची अनुमति दिली आहे त्यांना आम्ही धोंडे, साप आणि विंचू दिल्याप्रमाणे समजू नये. तो तर प्रेमाची सर्वांगपूर्णता आहे आणि कोणाची वाईट गोष्टींनी परिक्षा घेत नाही. उलटपक्षी, तो “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” आम्हाला देत असतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या व त्याचे भय धरणाऱ्‍या सर्वांचे तो सर्वकाही यथास्थित करील. (याकोब १:१२-१७; १ योहान ४:८) जे कित्येक वर्षापासून सत्यात चालत आले आहेत अशांना अनुभवाने हे कळले की, त्यांची प्रार्थना व विश्‍वास यामुळे काही कठीण परिक्षांना लाभदायकरित्या परिणाम मिळाले व यामुळे त्यांच्या जीवनात देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती अधिक प्रमाणात निर्मिली गेली. (३ योहान ४) वस्तुतः आमच्या स्वर्गीय पित्यावर पूर्णपणे विसंबून राहण्याचा तसेच प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता व इंद्रियदमन या आत्म्याच्या फलप्राप्तीची जोपासना करण्यामध्ये मदत मिळण्याचा या व्यतिरिक्‍त दुसरा चांगला मार्ग कोणता आहे?—गलतीकर ५:२२, २३.

२०. लूक ११:५-१३ मध्ये नमूद असणाऱ्‍या येशूच्या शब्दांचा आम्हावर कोणता परिणाम घडला पाहिजे?

२० अशाप्रकारे लूक ११:५-१३ मध्ये नमूद असणारे येशूचे शब्द आम्हाला यहोवाचे प्रेम व त्याची काळजी याबद्दल कृपायुक्‍त खात्री देतात. याद्वारे आमचे अंतःकरण अत्यंत कृतज्ञतेने व प्रेमाने भरून वाहण्यास हवे. त्याने आमचा विश्‍वास अधिक दृढ झाला पाहिजे आणि सनातन राजाच्या चरणांजवळ सतत जात राहून त्याच्या प्रेमळ सान्‍निध्यात राहण्याची आमची इच्छा अधिक वाढवली पाहिजे. याचप्रमाणे येशूचे शब्द आम्हास खात्री देतात की, आम्हाला कधीच रिकामे परतवून लावले जाणार नाही. आम्ही आपला भार आपल्या स्वर्गीय पित्यावर टाकतो तेव्हा ते त्याला आवडते. (स्तोत्रसंहिता ५५:२२; १२१:१-३) आपण, त्याचे विश्‍वासू व समर्पित सेवक त्याच्या पवित्र आत्म्याची विचारणा करतो तेव्हा तो आम्हाला मोकळेपणाने तो देतो. हाच आमचा प्रेमळ देव होय व या प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवावर आमची पूर्ण श्रद्धा आहे.

तुम्हाला आठवते का?

◻ आम्ही प्रार्थना करताना देवाकडे कोणाद्वारे येण्यास हवे व का?

◻ प्रार्थना हा एक निर्बंधित हक्क कशाप्रकारे आहे?

◻ ‘पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना’ करणे म्हणजे काय?

◻ यहोवाच्या विश्‍वासू, बाप्तिस्मा झालेल्या साक्षीदारांची प्रार्थना ऐकली जाते हे तुम्ही शास्त्रवचनाधाराने कसे सिद्ध कराल?

[१५ पानांवरील चित्रं]

जसे मानवी पिता आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देतात तसेच यहोवा पवित्र आत्म्याच्या प्राप्तीचा शोध घेणाऱ्‍यांना तो देतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा