वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ११/१ पृ. २१-२५
  • वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • न्याय करण्याआधी, समजून घेण्याचा प्रयत्न करा
  • परुशी कसे “स्वर्गाचे राज्य बंद करीत” होते
  • “त्यांच्या शास्त्र्यांप्रमाणे नव्हे”
  • जीवनी मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • इतरांचे बरे करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • धार्मिकता तोंडी संप्रदायाने नव्हे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ११/१ पृ. २१-२५

वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका

“मला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल.” —मत्तय ७:२१.

१. येशूच्या अनुयायांनी काय करीत राहायचे आहे?

मागत राहा. शोधत राहा. ठोकत राहा. प्रार्थनेत तत्पर राहा. डोंगरावरील प्रवचनात लिखित असणाऱ्‍या येशूच्या वचनांचा अभ्यास करा व ते आचरणात आणा. येशू शिष्यांना सांगतो की, ते पृथ्वीचे मीठ आहेत, कारण त्यांच्यापाशी मिठाने रुचकर झालेला व संरक्षक असा संदेश आहे. या मिठाला त्यांनी निरुपयोगी, बेचव बनवता किंवा त्यातील संरक्षक घटकाचा नाश करता कामा नये. ते जगाचा प्रकाश असून ख्रिस्त येशू व यहोवा देव यांच्याकडील प्रकाश केवळ आपल्या म्हणण्यातच नव्हे तर कृतीमध्येही प्रवर्तित करतात. त्यांची चांगली कामे त्यांच्या प्रज्वलित शब्दांप्रमाणेच झळकतात, आणि ते, परुशांच्या ढोंगाचा सराव झालेल्या, तसेच, म्हणतात एक पण कृती कमी आचरणाऱ्‍या धार्मिक व राजकीय नेत्यांच्या आवाजापेक्षा प्रबळ ठरतात.—मत्तय ५:१३-१६.

२. याकोबाने कोणती सूचना केली, पण काहीजण कोणती समाधानी वृत्ती चुकीने जोपासत आहेत?

२ याकोबाने अशी सूचना केलीः “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुमची भुलवणूक होते.” (याकोब १:२२) ‘एकदा तारण झाले की, कायमचे झाले’ अशी चुकीची धारणा काहींनी करुन घेतली आहे. अशांना वाटते की, आपण आता जणू सेवानिवृत्त झालो आहे व स्वर्गीय जीवनाचीच वाट ती काय बाकी आहे. पण, ही खोटी तत्त्वप्रणाली व पोकळ आशा आहे. येशूने म्हटले की, “शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल.” (मत्तय २४:१३) सार्वकालिक जीवनाची प्राप्ती मिळवावयाची आहे तर तुम्हाला “मरावे लागले तरी विश्‍वासू राहा.”—प्रकटीकरण २:१०; इब्रीयांस ६:४-६; १०:२६, २७.

३. डोंगरावरील प्रवचनात येशू न्याय करण्याबद्दलची कोणती सूचना करतो?

३ येशू डोंगरावरील आपले प्रवचन पुढे चालू ठेवीत असता ख्रिश्‍चनांनी अनुसरावीत अशी आणखी काही वचने त्याच्या मुखातून येतात. एक वचन तर दिसायला अगदी साधेसुदे आहे, पण तेच ज्याचा प्रतिकार करण्यात खूपच अडचण वाटते अशा प्रवृत्तीचा धिक्कार दर्शवतेः “तुमचा न्याय होऊ नये म्हणून तुम्ही न्याय करु नका. कारण ज्या प्रकारचा तुम्ही न्याय कराल त्या प्रकारचा तुमचा न्याय होईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल. तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? अथवा, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे! अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढ, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढावयास तुला स्पष्ट दिसेल.”—मत्तय ७:१-५.

४. लूकचा अहवाल आणखी कोणती सूचना सांगतो, व त्याचा अवलंब कशामध्ये परिणामित होतो?

४ लूकने डोंगरावरील प्रवचनाचा जो अहवाल दिला त्यामध्ये येशू आपल्या श्रोत्यांना दुसऱ्‍यांचे दोष न काढण्याचे सांगतो असे म्हटले आहे. याऐवजी, त्यांनी “सोडा”वे, म्हणजे, आपल्या सहमानवांच्या चुकांची क्षमा करावी. यामुळे दुसरे देखील तोच प्रतिसाद देऊ लागतील. येशूने म्हटलेः “देत राहा म्हणजे तुम्हांस दिले जाईल. चांगले माप दडपून, हालवून व शीग भरुन तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हास परत घालतील.”—लूक ६:३७, ३८.

५. आमच्यापेक्षा इतरांचे दोष बघणे हे इतके सहज व सोपे का आहे?

५ इ. स. च्या पहिल्या शतकात तोंडी संप्रदायामुळे दुसऱ्‍यांचा निष्ठुरतेने न्याय करण्याकडे परुशांचा कल होता. असे करण्याची येशूच्या ज्या श्रोत्यांना सवय होती त्यांनी ते करणे थांबवायचे होते. स्वतःच्या डोळ्यातील मुसळापेक्षा दुसऱ्‍यांच्या डोळ्यातील कुसळ अगदी सहज दिसते व ते आपल्या बढाईला मोठे अपीलकारक वाटते! एका माणसाने तर हे सुद्धा म्हटले की, “दुसऱ्‍यांची टिका करणे मला आवडते, कारण यामुळे मला खूप बरे वाटते!” इतरांची नित्याने कानउघाडणी करण्यामुळे आपणाठायी सद्‌गुण असल्याची भावना खेळत राहते व ही आम्हातील चुका, ज्या आम्ही लपवू इच्छित असतो त्यावर पांघरुण घालणारे समर्थक ठरते असे आपल्याला वाटते. तथापि, दुसऱ्‍याची सुधारणा करायची आहे तर ती सौम्यभावाने करण्यास हवी. जो इतरांची सुधारणा करीत असतो त्याने स्वतःठायीच्या कमतरतेची जाणीव राखली पाहिजे.—गलतीकर ६:१.

न्याय करण्याआधी, समजून घेण्याचा प्रयत्न करा

६. आवश्‍यक ठिकाणी आम्ही आपले न्याय करणे कशाच्या आधारावर ठेवावे, आणि आम्ही अगदीच टिकेखोर न होण्यासाठी आम्ही कोणती मदत शोधत राहावी?

६ येशू जगाचा न्याय करण्यासाठी नाही तर त्याचे तारण करण्यासाठी आला. त्याने जे न्याय केले ते त्याचे स्वतःचे नव्हते, तर देवाने त्याला जे शब्द बोलण्यासाठी दिले त्याच्यावर आधारलेले होते. (योहान १२:४७-५०) यास्तव, आपणही जे न्याय करू ते यहोवाच्या वचनाच्या सहमतात असले पाहिजे. आम्ही न्यायदानी असलेच पाहिजे या मानवी प्रवृत्तीला दडपून टाकण्यास हवे. हे करण्यासाठी आपण यहोवाच्या मदतीसाठी नित्याने प्रार्थना करावयास हवीः “मागत राहा म्हणजे तुम्हांस दिले जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोकत राहा म्हणजे तुम्हास उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्यास उघडले जाईल.” (मत्तय ७:७, ८) येशूने असे सुद्धा म्हटलेः “माझ्याने स्वतः होऊन काही करवत नाही; जसे मी ऐकतो, तसा न्यायनिवाडा करतो. आणि माझा न्यानिवाडा यथार्थ आहे; कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.”—योहान ५:३०.

७. आम्ही कोणती सवय स्वतःस जडवावी की, ज्यामुळे आम्हाला सुवर्ण नियमांचे पालन करता येईल?

७ आपण लोकांचा न्याय करण्याची नव्हे तर लोकांना समजून घेण्याची, स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवून बघण्याची सवय स्वतःमध्ये वाढवावी. हे करणे सोपे नाही. पण जर, आपल्याला येशूने दिलेल्या सुवर्ण नियमाचे पालन करायचे आहे तर मग ते जरुरीचे आहे. तो म्हणालाः “लोकांनी जसे तुम्हाबरोबर वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांबरोबर वर्तन करा, कारण नियमशास्त्र व संदिष्टशास्त्र यांचे सार हेच आहे.” (मत्तय ७:१२) या कारणास्तव, येशूच्या अनुयायांनी संवेदनाशील असले पाहिजे व त्यांनी इतरांची मानसिक, भावनिक, आणि आध्यात्मिक स्थिती बघितली पाहिजे. इतरांच्या गरजा जाणून त्या समजून घेण्यास हव्या व त्यांना मदत करण्यासाठी व्यक्‍तीगत आस्था घेतली पाहिजे. (फिलिप्पैकर २:२-४) काही वर्षांनी पौलाने लिहिलेः “‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर,’ हे एक वचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे.”—गलतीकर ५:१४.

८. कोणत्या दोन मार्गांची येशूने चर्चा केली, व यापैकी एकाची बहुतेक लोकांनी का निवड केली आहे?

८ “अरुंद दरवाजाने आत जा,” येशू पुढे म्हणाला. “कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे, आणि ज्यांस तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) त्या काळात बहुतेकांनी नाशाचा मार्ग निवडून घेतला आणि आजही बरेच जण तसेच करीत आहेत. पसरट मार्ग लोकांना, त्यांना आवडणाऱ्‍या पद्धतीने विचार करण्याची व राहण्याची मुभा देतो; त्यात कोणतेही नियम नाहीत, निर्बंध नाहीत, आरामशीर जीवनपद्धत व सर्वकाही सहजसोपे आहे. यापैकीचे कोणीही “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न” करीत नाही!—लूक १३:२४.

९. अरुंद मार्गाने जाण्यासाठी कशाची जरुरी आहे, व जे त्या मार्गावर आहेत अशांना येशू कोणता इशारा देतो?

९ पण तो अरुंद दरवाजा आहे, जो सार्वकालिक जीवनाच्या मार्गाला नेतो. ते संयम राखण्याचे आव्हान देणारे मार्गाक्रमण आहे. यात शिस्तही आहे, जी तुमच्या हेतूंचे परिक्षण करील आणि तुमच्या समर्पणाची गुणवत्ता तपासून पाहील. छळ येतो तेव्हा हा मार्ग अधिकच खडतर बनतो व सहनशीलतेला हाक देतो. या मार्गावर चालणाऱ्‍यांना येशू हा इशारा देतोः “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपा. ते मेंढरांच्या वेषाने तुम्हाकडे येतात, तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत.” (मत्तय ७:१५) हे वर्णन परुशांना तंतोतंत जुळणारे आहे. (मत्तय २३:२७, २८) ते “मोशाच्या आसनावर बसले”ले आहेत व देवाच्या वतीने बोलणारे आहेत असा दावा करीत, पण वस्तुतः माणसांचे संप्रदाय अनुसरीत.—मत्तय २३:२.

परुशी कसे “स्वर्गाचे राज्य बंद करीत” होते

१०. शास्त्री व परुशी लोकांनी कोणत्या प्रकाराने लोकांसाठी ‘स्वर्गाचे राज्य बंद कर’ण्याचा प्रयत्न केला?

१० याशिवाय, जे अरुंद दरवाजाने आत जाण्याचा यत्न करीत त्यांना हे यहुदी धार्मिक पुढारी अडखळण ठेवीत असत. “अहो शास्त्र्यांनो व परुश्‍यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हास धिक्कार असो! कारण लोकांनी आत जाऊ नये म्हणून तुम्ही स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतः आत जात नाही व आत जाणाऱ्‍यांनाही जाऊ देत नाही.” (मत्तय २३:१३) परुशांची ही पद्धत, येशूने आधी दिलेल्या इशाऱ्‍यासारखीच होती. ते “मनुष्याच्या पुत्रामुळे [त्याच्या शिष्यांचे] नाव वाईट म्हणून टाकून देतील.” (लूक ६:२२) जन्माने अंधळा असणाऱ्‍या परंतु येशूकडून बऱ्‍या झालेल्या माणसाने येशूवर आपला विश्‍वास प्रकट केला तेव्हा यांनी त्याला सभास्थानातून बहिष्कृत केले. या कारणामुळेच, ज्या इतरांनी येशूवर विश्‍वास ठेवला होता त्यांनी तो जाहीर करण्याची हेळसांड केली.—योहान ९:२२, ३४; १२:४२; १६:२.

११. ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मपुढारी ओळख देणारी कोणती फलप्राप्ती देत आहेत?

११ “तुम्ही त्यांच्या फळांवरुन त्यांस ओळखाल.” येशूने म्हटले. “प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते, आणि वाईट झाड वाईट फळ देते.“ (मत्तय ७:१६-२०) हाच नियम आजही लागू होतो. ख्रिस्ती धर्मजगतातील पुष्कळ धार्मिक पुढारी सांगतात एक, पण दुसरेच करतात. पवित्र शास्त्र शिकवीत असल्याचा ते दावा करीत असले तरी त्र्यैक, नरकाग्नी यासारख्या निंद्य गोष्टी शिकवतात. दुसरे खंडणीची शिकवण नाकारतात, निर्मितीऐवजी उत्क्रांतीचे शिक्षण देतात, व लोकांच्या कानांना गुदगुल्या करण्यासाठी आवडीच्या तत्त्वप्रणालींचे शिक्षण देतात. परुशांप्रमाणेच आज पुष्कळ धार्मिक पुढारी धनलोभी, आपल्या कळपाची पिळवणूक करून लाखो रुपये कमविणारे आहेत. (लूक १६:१४) सर्वांचा “प्रभुजी, प्रभुजी,” असा एकच गजर आहे, पण येशू अशांना म्हणतोः “माझी तुमची कधीच ओळख नव्हती! अहो अधर्म करणाऱ्‍यांनो, मजपुढून निघून जा.”—मत्तय ७:२१-२३.

१२. अरुंद मार्गाने चाललेले काही तेथून का मागे गेले, व याचा काय परिणाम झाला?

१२ अरुंद दरवाजाने प्रवेश केलेल्या काहींनी आज ते मार्गाक्रमण बंद केले आहे. आपली यहोवावर प्रीती आहे असे ते म्हणतात, पण प्रचार करण्याच्या त्याच्या आज्ञेचे ते पालन करीत नाहीत. ते म्हणतात, की येशूवर त्यांचे प्रेम आहे, पण ते त्याच्या कळपास चारीत नाहीत. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; योहान २१:१५-१७; १ योहान ५:३) येशूच्या पावलांना अनुसरणाऱ्‍यांसोबत एकत्र जडण्याची त्यांनी इच्छा नाही. त्यांना अरुंद मार्ग खूपच अरुंद वाटतो. चांगले ते करण्याचा त्यांना कंटाळा आला, त्यामुळे “ते आपल्यातूनच निघाले, तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते.” (१ योहान २:१९) ते अंधारात परतले, आणि “तो अंधार केवढा!” (मत्तय ६:२३) त्यांनी योहानाच्याही विनंतीकडे दुर्लक्ष केले की, “मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिव्हेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.”—१ योहान ३:१८.

१३, १४. येशूची वचने आपल्या जीवनात लागू करण्यासंबंधाने त्याने कोणते उदाहरण दिले, व हे पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी उपयुक्‍त उदाहरण का होते?

१३ येशूने डोंगरावरील आपले प्रवचन मोठ्या नाट्यमय उदाहरणाद्वारे संपविले. तो म्हणालाः “जो प्रत्येक जण माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोणाएका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.”—मत्तय ७:२४, २५.

१४ पॅलेस्टाईनमध्ये मुसळधार पाऊस, कोरड्या ओहोळाकडे वाहणाऱ्‍या पाण्याला नाशकारक पूराचे रुप देतो. यास्तव, घर मजबूत राहायचे असल्यास त्याचा पाया खडकात असणे जरुरीचे होते. लूकचा अहवाल दाखवितो की, त्या माणसाने “खणीत खणीत खोल जाऊन खडकावर आपला पाया घातला.” (लूक ६:४८) ते मोठ्या कष्टाचे काम होते, पण संकटकाळी त्याचा लाभ घडला. यास्तव, येशूच्या वचनांवर आधारीत ख्रिस्ती गुणवत्तेची बांधणी करणे हे प्रतिकूल परिस्थितींचा पूर लोटतो तेव्हा लाभदायक असल्याचे शाबीत होते.

१५. येशूची वचने पाळण्याऐवजी जे माणसांच्या संप्रदायांना अनुसरतात अशांचे काय होईल?

१५ दुसरे घर वाळूवर बांधण्यात आले. “जो प्रत्येक माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला व वाराही सुटला व त्या घरास लागला तेव्हा ते कोसळले व फारच जोराने पडले.” हेच, येशूला “प्रभुजी, प्रभुजी,” म्हणणाऱ्‍या पण त्याच्या वचनानुरुप कृती न करणाऱ्‍या लोकांच्या बाबतीत घडेल.—मत्तय ७:२६, २७.

“त्यांच्या शास्त्र्यांप्रमाणे नव्हे”

१६. येशूचे डोंगरावरील प्रवचन ज्यांनी ऐकले त्यांजवर कसा परिणाम घडला गेला?

१६ डोंगरावरील प्रवचनाचा कोणता परिणाम घडला? “येशूने ही वचने समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरुन थक्क झाला. कारण तो त्यांच्या शास्त्र्यांप्रमाणे नव्हे, तर अधिकारसंपन्‍न असल्यासारखे त्यांस शिकवीत असे.” (मत्तय ७:२८, २९) पूर्वी कधी ज्याचा अनुभव त्यांनी घेतला नाही, अशा अधिकारसंपन्‍न वक्‍तृत्वामुळे ते खूपच भारावून गेले.

१७. आपल्या शिक्षणाला श्रेय देण्यासाठी शास्त्र्यांना काय करावे लागले; आणि ज्यांचे त्यांनी अवतरण घेतले अशा संतांविषयी त्यांचा काय दावा होता?

१७ कोणाही शास्त्र्याने अधिकारसंपन्‍नतेत कधीही भाष्य केले नाही, जसे हा ऐतिहासिक अहवाल दाखवतो: “शास्त्र्यांनी आपल्या तत्त्वप्रणालीचे श्रेय त्यांचे संप्रदाय व या संप्रदायाचे कर्ते यांजकडून उसनवारीने घेतले. शास्त्र्यांच्या कोणाही प्रवचनाला अधिकारसंपन्‍नता किंवा महत्त्व नव्हते. ते उद्धृत करता येत नव्हते. . . . रब्बींचा एक सांप्रदाय होता, किंवा वाक्प्रचार होता; किंवा या प्रकारातील काही वचने होती. हिल्लेलने एखाद्या गोष्टीबद्दल असणारा सांप्रदाय खरेपणाने शिकवला; ‘तरीपण त्याने या गोष्टींचे दिवसभर संशोधन केले होते तरी . . . त्याने ते सांगेपर्यंत ती तत्वे या अर्थी स्वीकृत होऊ शकली नाही. मला तर याबद्दल शेमाया व अबतलीन [हिल्लेलच्या आधी असणारे अधिकारी] यांजकडून त्यांच्याबद्दल ऐकायला मिळाले.’” (ए कॉमेंट्री ऑन द न्यू टेस्टमेंट फ्रॉम द तालमूद ॲण्ड हेब्राईका, लेखक, जॉन लाईटफूट) परुशांनी तर बऱ्‍याच काळाआधीचे संत असल्याचा दावा केलाः “नीतीमानांचे ओठ जेव्हा त्यांच्या नामात ती शिकवण देतात तेव्हा कबरेतील त्यांचे ओठही पुटपुटत असतात.”—तोराह—फ्रॉम स्क्रोल टू सिंबल इन फॉरमॅटिव्ह जुडाईझम्‌.

१८. (अ) शास्त्री व येशूच्या शिकवणींत कोणता फरक होता? (ब) येशूचे शिक्षण कोणत्या मार्गी अपूर्व होते?

१८ शास्त्र्यांनी मेलेल्या माणसांचा अधिकार म्हणून वापर केला; येशूने तर जिवंत देवाच्या अधिकाराकडून बोलणी केली. (योहान १२:४९, ५०; १४:१०) रब्बींनी तर बंद पडलेल्या विहीरीतून शिळे पाणी काढले; येशूने ताज्या पाण्याचे उपळते झरे आणून दिले ज्यांनी अंतर्गत वाटणारी क्षुधा शमविली. त्याने रात्रभर प्रार्थना करून मनन केले व जेव्हा तो बोलला तेव्हा लोकांच्या अंतर्यामात शिरकाव करून त्यांना जागे केले; अशी ही जाणीव लोकांना पूर्वी कधीही झाली नाही. तो तर अशा सामर्थ्याने बोलला की ते लोकांना जाणवू शकले व या अधिकार संपन्‍नतेला शास्त्री, परूशी व सदुकी यांनाही आव्हान करण्याची भीती वाटली. (मत्तय २२:४६; मार्क १२:३४; लूक २०:४०) अशाप्रकारे कोणीही माणूस पूर्वी कधीच बोलला नव्हता! प्रवचन संपले तेव्हा लोकसमुदाय विस्मित झाला!

१९. यहोवाचे साक्षीदार आपल्या शिक्षणात जी पद्धत वापरीत आहेत त्यापैकीची काही येशूने डोंगरावरील प्रवचनात जी शिक्षणपद्धत वापरली तिच्या सदृश्‍य कशी आहे?

१९ पण आजच्याबद्दल काय? यहोवाचे साक्षीदार घरोघर जाणारे सेवक या अर्थी तीच पद्धत वापरतात. कोणी घरमालक तुम्हाला सांगतो की, “ही पृथ्वी जळून भस्म होणार असे माझे चर्च शिकवते.” तेव्हा तुम्ही म्हणताः “तुमचे स्वतःचेच पवित्र शास्त्र उपदेशक १:४ मध्ये म्हणते की, ‘पृथ्वीच कायती सदा कायम राहते.’” घरमालकाला आश्‍चर्य वाटते. तो म्हणतोः “हे माझ्या पवित्र शास्त्रात असताना मला कळू शकले नाही हे किती आश्‍चर्याचे!” दुसरा कोणी घरमालक म्हणतोः “पाप्यांना नरकाग्नीत जळण्याच्या यातना मिळणार हे मी नेहमीच ऐकले आहे.” “पण तुमचे पवित्र शास्त्र रोमकर ६:२३ मध्ये सांगते की, ‘पापाचे वेतन मरण आहे.’” किंवा त्र्यैक्याबद्दल कोणी असे सांगीलः “आमचे पाळक शिकवतात की, येशू व त्याचा पिता एक आहेत.” “पण योहान १४:२८ मध्ये तुमचेच पवित्र शास्त्र येशूला असे सांगताना म्हणते की, ‘माझा पिता मजपेक्षा थोर आहे.’” दुसरा कोणी तुम्हाला सांगतोः “देवाचे राज्य आम्हामध्ये आहे असे मी ऐकले आहे.” “तुम्ही म्हणताः “दानीएल २:४४ मध्ये तुमचे पवित्र शास्त्र सांगते: ‘त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही. . . . ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.’ तर मग, ते आम्हामध्ये कसे असू शकेल?”

२०. (अ) ख्रिस्ती धर्म जगतातील धार्मिक पुढारी व साक्षीदार यांच्यातील शिक्षणपद्धतीत कोणता फरक आहे? (ब) आता कसली वेळ आहे?

२० येशूने देवाकडून अधिकारयुक्‍त बोलणे केले. यहोवाचे साक्षीदार देखील देवाच्या वचनाच्या अधिकारावर बोलणी करतात. ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मपुढारी बाबेल व मिसर यापासून चालत आलेल्या तत्त्वांनी प्रदुषित असलेल्या धार्मिक सांप्रदायावर भाष्य करतात. प्रामाणिक लोकांना आपल्या विश्‍वासाचे पवित्र शास्त्राद्वारे खंडण झाल्याचे दिसते तेव्हा ते विस्मित होऊन म्हणतातः ‘ओह, हे माझ्या पवित्र शास्त्रात असू शकेल हे मला समजलेच नव्हते!’ पण ते आहे. तर आता, आध्यात्मिक गरजांविषयी जागे असणाऱ्‍या सर्वांपुढे ही संधी प्रस्तुत आहे की, त्यांनी येशूच्या डोंगरावरील प्रवचनाकडे लक्ष द्यावे व आपला पाया टिकाऊ खडकावर बांधावा.

उजळणीचे प्रश्‍न

◻ इतरांचे गुणदोष काढण्यापेक्षा आपण काय करण्याचा प्रयत्न करावा व का?

◻ आज इतक्या लोकांनी पसरट मार्ग का निवडला आहे?

◻ येशूची शिक्षणपद्धत शास्त्र्यांपेक्षा इतकी वेगळी का होती?

◻ डोंगरावरील प्रवचन ऐकणाऱ्‍या श्रोतेजनांवर त्याचा कसा परिणाम झाला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा