“धर्मत्यागी पुरुष” याजविरुद्धचा देवाचा न्यायदंड
“जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकण्यात येते.”—मत्तय ७:१९.
१, २. धर्मत्यागी मनुष्य काय आहे, व त्याची कशी वाढ झाली?
प्रेषित पौलाला “धर्मत्यागी पुरुष” याच्या आगमनाविषयीचे भाकित करण्याची देवाकडून प्रेरणा लाभली तेव्हा त्याने म्हटले की, तो त्याच्या काळातच दिसू लागला होता. मागील लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे, पौल तेथे काही विशिष्ट वर्गाची माहिती देत होता जो खऱ्या ख्रिस्ती धर्माकडून धर्मत्यागाकडे वळण्यामध्ये पुढाकार घेणार होता. हे सत्याकडून दूर जाणे पहिल्या शतकाच्या संपण्याच्या बेताला, खासपणे शेवटच्या प्रेषितांच्या मृत्युनंतर घडले. त्या धर्मत्यागी वर्गाने देववचनाच्या विरुद्ध असणाऱ्या तत्त्वप्रणाली व प्रथांची ओळख करून दिली.—२ थेस्सलनीकाकर २:३, ७; प्रे. कृत्ये २०:२९, ३०; २ तीमथ्य ३:१६, १७; ४:३, ४.
२ काही काळातच हा धर्मत्यागी वर्ग ख्रिस्ती धर्म-जगताच्या पाळकवर्गात विकसित झाला. चौथ्या शतकात जेव्हा चर्चेस व मूर्तिपूजक राज्य यांचे संधान जुळले तेव्हा रोमी सम्राट कॉन्स्टंटाईन याने या वर्गाला अधिकार सूत्रे बहाल केली. ख्रिस्ती धर्मजगताचे अधिकाधिक पंथांमध्ये विघटन होत गेले तसतसे पाळकवर्गाने आपल्याला दुय्यम वर्गाच्या सर्वसाधारण लोकांपेक्षा आणि बहुधा प्रापंचिक अधिपतींपेक्षाही उंचाविले.—२ थेस्सलनीकाकर २:४.
३. धर्मत्यागी माणसाला शेवटी कोणती कर्मगति मिळणार?
३ मग, धर्मत्यागी माणसाला कोणती कर्मगति मिळणार? पौलाने भाकित केलेः “तो धर्मत्यागी प्रकट होईल, त्याला प्रभु येशू . . . मारुन टाकील; आणि आपण येताच स्वदर्शनाने त्याला नाहीसे करील.” (२ थेस्सलनीकाकर २:८) याचा हा अर्थ होतो की, देव जेव्हा सैतानाच्या सबंध व्यवस्थेचा नाश करील त्यावेळी धर्मपुढाऱ्यांचा नाश घडेल. विध्वंस घडवून आणणाऱ्या दिव्यदूतांचे मार्गदर्शन करण्यासाठी देव आपला स्वर्गीय राजा, ख्रिस्त येशू याचा वापर करील. (२ थेस्सलनीकाकर १:६-९; प्रकटीकरण १९:११-२१) धर्मपुढाऱ्यांना हे असे भवितव्य लाभणार ते यामुळे की, त्यांनी देव ख्रिस्ताचा अपमान केला आहे व लाखोंना खऱ्या उपासनेपासून दूरवर नेले आहे.
४. कोणत्या तत्वानुरुप धर्मत्यागी माणसाचा न्याय केला जाईल?
४ धर्मत्यागी पुरुषाचा निवाडा ज्या तत्त्वाआधारे होणार ते येशूने सागितले. तो म्हणालाः “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपा. ते मेंढरांच्या वेषाने तुम्हाकडे येतात, तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत. तुम्ही त्यांच्या फळावरुन त्यांस ओळखाल. काटेरी झाडावरुन द्राक्षे, किंवा रिंगणीच्या झाडावरुन अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते, आणि वाईट झाड वाईट फळ देते. चांगल्या झाडाला वाईट फळे येत नाहीत, आणि वाईट झाडाला चांगली फळे येत नाहीत. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकण्यात येते. . . . मला ‘प्रभुजी, प्रभुजी’ असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल.”—मत्तय ७:१५-२१; तसेच तीत १:१६ पहा; १ योहान २:१७.
उत्तम ख्रिस्ती फलप्राप्ती
५. उत्तम ख्रिस्ती फलप्राप्तीचा कोणता पाया आहे, आणि कोणती आज्ञा मूलभूत आहे?
५ उत्तम ख्रिस्ती फलप्राप्तीचा पाया १ ले योहान ५:३ मध्ये देण्यात आलेला आहे. तो असाः “देवावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे.” त्याची मूलभूत आज्ञा ही आहे की, “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी.” (मत्तय २२:३९) अशाप्रकारे देवाच्या खऱ्या सेवकांमध्ये, ते जरी वेगळ्या वंशांचे किंवा राष्ट्रीयत्वाचे असले तरीही शेजारप्रीती दिसून आली पाहिजे.—मत्तय ५:४३-४८; रोमकर १२:१७-२१.
६. ख्रिस्ती प्रेम खासपणे कोणाच्या बाबतीत दाखविले गेले पाहिजे?
६ जे आध्यात्मिक बांधव आहेत अशांसाठी तर खासपणे देवाच्या सेवकांनी प्रेम बाळगण्यास हवे. “‘मी देवावर प्रीती करतो,’ असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो लबाड आहे. कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्याजवर जो प्रीती करीत नाही त्याच्याने, न पाहिलेल्या देवावर प्रीती करवत नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही आज्ञा त्याजपासून आपल्याला आहे.” (१ योहान ४:२०, २१) हेच प्रेम, येशूने म्हटले की, खऱ्या ख्रिश्चनांचे ओळखचिन्ह असेल. तो म्हणालाः “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५; तसेच रोमकर १४:१९; गलतीकर ६:१०; १ योहान ३:१०-१२ देखील पहा.
७. खरे ख्रिस्ती जगभरात एकमेकांशी कसे बांधलेले आहेत?
७ बंधूप्रेम हा असा “डिंक” आहे जो देवाच्या सेवकांना ऐक्यात चिकटवीत असतो. “पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर अंगी ल्या.” (कलस्सैकर ३:१४) खरे पाहता, खऱ्या ख्रिश्चनांनी आपल्या बांधवासोबत जागतिकपणे ऐक्य टिकवून ठेवले पाहिजे, कारण देवाच्या वचनाची अशी आज्ञा आहेः “तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे म्हणून तुम्हात फुटी होऊ नयेत. तुम्ही एकचित्ताने व एकमताने यथास्थित व्हावे.” (१ करिंथकर १:१०) हे प्रेम व ऐक्य गोलार्धव्याप्तपणे टिकवून ठेवता यावे यासाठी देवाच्या सेवकांनी या जगाच्या राजकारणी घडामोडीमध्ये तटस्थ असण्यास हवे. येशूने म्हटलेः “जसा मी या जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.”—योहान १७:१६.
८. ख्रिश्चनांनी काय करण्यास हवे ते येशूने कसे प्रदर्शित कले?
८ येशूला धरण्यासाठी माणसे आली असता पेत्राने तरवार उपसून त्यापैकीच्या एकाचा कान छाटून टाकला अशावेळी येशूने, त्याच्या मनात असलेली इच्छा दर्शविली. देवाच्या पुत्राचे संरक्षण व्हावे यासाठी विरोधकांविरुद्ध अशी हालचाल होणे जरुरीचे आहे हे येशूला वाटत होते का? नाही. त्याने पेत्राला असे म्हटलेः “तू आपली तरवार परत जागच्या जागी घाल.” (मत्तय २६:५२) अशाप्रकारे, खरे ख्रिस्ती राष्ट्रांमधील युद्धात भाग घेत नाहीत तसेच इतर कोणत्याही प्रकाराने रक्तपात घडवून आणीत नाही. तसे करण्यास नकार दिल्यामुळे जरी त्यांना तटस्थ भूमिकेमुळे हुतात्मा व्हावे लागले तरीही ते त्यांनी केले नाही. हेच कित्येक शतके व आमच्याही काळात घडले आहे. युद्ध व रक्तपात हा केवळ देवाच्याच मशीही राज्याकरवी कायमचा संपुष्टात येऊ शकतो हे त्यांना ठाऊक आहे.—स्तोत्रसंहिता ४६:९; मत्तय ६:९, १०; २ पेत्र ३:११-१३.
९. (अ) आरंभीच्या ख्रिस्ती जनांविषयी इतिहास आपल्याला काय सांगतो? (ब) हे ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मांच्या परस्पर विरोधात कसे दिसते?
९ पहिल्या शतकातील ख्रिस्तीजन रक्तपात करीत नव्हते याविषयी इतिहास साक्ष देतो. इंग्लंडमधील वेदांतशाळेचे माजी प्राध्यापक पीटर डी. रोसा लिहितातः “रक्तपात करणे हे भयंकर पाप होते. या कारणास्तव ख्रिश्चनांचा आखाड्यातील झुंजीला विरोध होता. . . . रोमचे अस्तित्व टिकवण्यासाठी युद्ध व शक्तीचा वापर जरुरीचा होता तरीपण ख्रिस्ती यात सहभागी होत नव्हते. . . . ख्रिश्चनांनी स्वतःबाबतीत येशूप्रमाणे शांतीचे संदेशवाहक अशी भूमिका ग्रहण केली होती. ते कोणत्याही परिस्थितीत मृत्युचे प्रतिनिधि होऊ इच्छित नव्हते.” पण तेच, दुसऱ्या बाजूने बघता ख्रिस्ती धर्मजगतातील फुटीर धर्मांनी प्रेमाच्या आज्ञेला तिलांजली दिली व प्रचंड प्रमाणात रक्तपात घडवून आणला. ते शांतीचे संदेशवाहक बनले नाही तर वेळोवेळी स्वतःला मृत्युचे प्रतिनिधी आहो असे शाबीत केले.
रक्तपाती मोठी बाबेल
१०. मोठी बाबेल काय आहे व तिला तसे का संबोधिण्यात येते?
१० सैतान “या जगाचा अधिकारी” तसेच “या व्यवस्थीकरणाचा देव” आहे. (योहान १२:३१; २ करिंथकर ४:४) सैतानाच्या जगतातील एक भाग म्हणजे त्याने पृथ्वीवर कित्येक शतकापासून उभारलेली खोटी धर्मव्यवस्था होय, ज्यामध्ये ख्रिस्ती धर्मजगत तसेच त्याच्या धर्मपुढाऱ्यांचाही समावेश आहे. खोट्या धर्माच्या या जागतिक व्यवस्थेला पवित्र शास्त्र “मोठी बाबेल [आध्यात्मिक] कळवंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” असे नाव देते. (प्रकटीकरण १७:५) आजच्या खोट्या धर्माची मूळे मागे प्राचीन बाबेल शहरापर्यंत जातात, हेच शहर खोटा धर्म तसेच देवाची निंदा करणाऱ्या शिकवणी व प्रथा यांनी पुरेपूर भरले होते. याच कारणास्तव त्या प्राचीन बाबेलच्या नमुन्याला आता मोठी बाबेल असे म्हणण्यात येते, जे खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य आहे.
११. पवित्र शास्त्र मोठ्या बाबेलविषयी काय म्हणते व का?
११ या बाबेल धर्माविषयी देवाचे वचन म्हणतेः “तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधिलेल्या सर्वांचे रक्त सापडले.” (प्रकटीकरण १८:२४) ज्यांची हत्या होऊन रक्तपात घडला गेला त्याविषयी या जगाचे धर्म कसे जबाबदार होतात बरे? ते याप्रकारे की, ख्रिस्ती धर्मराज्यातील चर्चेस तसेच ख्रिस्त्तेतर धर्मांनी देखील राष्ट्रांच्या युद्धांना आपले पाठबळ एवढेच काय पण नेतृत्वही दिले; आणि ज्यांनी यात आपली सहमती दर्शविली नाही त्या देवभिरु लोकांचा यांनी छळ केला व त्यांना ठार मारले.
देवाला अपमानित करणारा अहवाल
१२. इतर धार्मिक पुढाऱ्यांपेक्षा ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढारी अधिक दोषी का आहेत?
१२ इतर धार्मिक पुढाऱ्यांपेक्षा ख्रिस्ती धर्मराज्यातील धार्मिक पुढारीच रक्तपात घडविण्यास अधिक जबाबदार आहेत. ते का? कारण एक तर त्यांनी स्वतःवर देवाचे नाव लावून घेतले आहे आणि ख्रिस्तालाही ते आपले समजतात. तेव्हा येशूच्या शिक्षणाचा अवलंब करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. (योहान १५:१०-१४) पण या शिक्षणाचा अवलंब न केल्यामुळे त्यांनी देवाचा तसेच ख्रिस्ताचाही अपमान केला आहे. धार्मिक पुढाऱ्यांवर धर्मयुद्धे, इतर धर्मातील युद्धे, चौकशीसत्रे व छळ यामुळे रक्तपाताचा दोष थेटपणे येतो तर, जेथे चर्च दुसऱ्या देशातील आपल्या सहकाऱ्यांचा वध करण्यासाठी गुंतले त्या युद्धांना पाठबळ दाखविल्यामुळे अप्रत्यक्षरित्या येतो.
१३. ११ ते १३ शतकापर्यंत धार्मिक पुढारी कशाच्या बाबतीत दोषी ठरले?
१३ उदाहरणार्थ, ११ ते १३ शतकांच्या दरम्यान ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढाऱ्यांनी धर्मयुद्धे आरंभिली. यामुळे देव व ख्रिस्ताच्या नावाखाली मोठा रक्तपात व लूट घडली गेली. हजारोंचा वध केला गेला. १२१२ व्या साली मुलांना धर्मयुद्धात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले व यामुळे हजारो बालकांची निर्दयीपणे हत्या झाली.
१४, १५. तेराव्या शतकात कॅथोलिक चर्चने ज्याची सुरवात केली त्याविषयी एक कॅथोलिक लेखक काय म्हणतात?
१४ तेराव्या शतकात रोमन कॅथोलिक चर्चने आणखी एका देवनिंद्य अशा प्रकारास आपली शासकीय मान्यता दिली व ते होते चौकशीसत्र. ते युरोपात सुरु झाले व अमेरिकेपर्यंत पसरत गेले व सहा शतके टिकले. पोपच्या बादशाही सत्तेपासून याचा मूळारंभ झाला व पाठबळ मिळाले. याचा हेतू हा होता की, चर्चसोबत सहमत न दाखवणाऱ्या सर्वांचा छळ केला जावा व त्यांना मिटवले जावे. गतकाळात देखील चर्चने कॅथोलिक नसणाऱ्यांचा छळ केला होता पण आता चौकशीसत्रामुळे तो मोठा व्यापक रुपात घडू लागला.
१५ स्वतः “निष्ठावंत कॅथोलिक” आहोत असा दावा करणाऱ्या पीटर डी. रोसा यांनी आपल्या अलिकडील पुस्तकात, विकार्स ऑफ ख्राइस्ट—द डार्क साइड ऑफ द पॅपसी यामध्ये म्हटलेः “यहुद्यांचा छळ, चौकशी सत्रे, पाखंड्यांचा हजारोंनी वध करणे, युरोपात न्यायालयीन कारवाई या अर्थाने परत छळाचा प्रस्ताव आणणे या सर्वांविषयी चर्च दोषी होते. . . . पोपनी बादशहांना आसनस्थ तसेच पदभ्रष्टही केले; बादशहांनी ख्रिस्ती धर्म आपल्या प्रजाजनांवर लादावा, अन्यथा छळ व मृत्यु घडेल अशी धमकीची मागणीही त्यांनी केली. . . . अशाप्रकारे शुभवर्तमान प्रचारार्थ अंगावर शहारे आणणारी किंमत मोजावी लागली.” ज्या काहींचा खून करण्यात आला त्यांचा “गुन्हा” हा होता की, त्यांच्यापाशी पवित्र शास्त्र मिळाले.
१६, १७. चौकशीसत्राच्या बाबतीत कोणते निवेदन करण्यात आले आहे?
१६ तेराव्या शतकाच्या आरंभाला असणाऱ्या पोप इनोसंट तिसरे याविषयी डी. रोसा म्हणतातः “[रोमी] बादशहा डायोक्लेटन याच्या काळी [तिसऱ्या शतकात] जगभरातील सुमारे दोन हजार ख्रिस्ती लोकांचा वध झाला हे भयंकर व अत्याचारी कृत्य सर्वांना ज्ञात आहे. पण पोप इनोसंट यांच्या [फ्रान्समध्ये पाखंडी लोकांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या] धर्मयुद्धात दहा पटीने लोकांची हत्या घडली गेली. . . . डायोक्लेटनपेक्षा अधिक ख्रिश्चनांची सरसकट हत्या पोपकरवी घडविण्यात आली हे आढळल्यावर मोठाच धक्का बसला. . . . ज्या गोष्टीला प्रत्यक्षात ख्रिस्ताने विरोध दर्शविला होता तीच गोष्ट ख्रिस्ताच्याच नावात करण्यात [इनोसंटला] कसलीही टोचणी किंवा रुखरुख वाटली नाही.”
१७ डी रोसा यांनी असेही परिक्षिले आहेः [चौकशी सत्राच्या अधिकाऱ्यांनी] पोपच्या नावाखाली केलेली रानटी व जबरदस्त हत्या मानवी इतिहासातील महाभयंकर हत्या होय.” स्पेनमधील चौकशीसत्रातील डॉमिनिकन टोरक्वेमाडा याविषयी ते म्हणतातः “१४८३ मध्ये नेमणूक झाल्यापासून पंधरा वर्षांपर्यंत त्याने मोठ्या जुलमी पद्धतीने राज्य केले. त्याने १,१४,००० लोकांचे बळी घेतले, ज्यामध्ये तर १०,२२० जणांना जाळून ठार केले.”
१८. चौकशीसत्राच्या गुणलक्षणाची एक लेखक कशी चर्चा करतो व ते सहा शतकभर का चालले त्याविषयी तो कोणती कारणे देतो?
१८ लेखक शेवटी समारोप करतातः “चौकशीसत्राचा अहवाल हा कोणाही संघटनेला मोठा धक्कादायक वाटेल; कॅथोलिक चर्चला तर तो विध्वंसक स्वरुपाचा आहे. . . . इतिहास हे स्पष्ट करतो की, सहापेक्षा अधिक शतके अखंडपणे पोपचा बादशाही कारभार मूलभूत न्यायाच्या विरुद्ध चालवला गेला. तेराव्या शतकापासून सुरु झालेल्या ऐंशी पोपपर्यंतच्या मालिकेच्या कालावधीत एकानेही चौकशीसत्राच्या वेदांत व साम्रगीविषयी आपली नापसंती दर्शविली नाही. उलट, या प्राणघातक प्रकाराला एकामागून एकाने आपला आणखी क्रूर स्पर्श दिला. तेव्हा प्रश्न हा होता की, अशा या पाखंड मतात पोप पिढीजातपणे कसे राहू शकले? ते ख्रिस्ताचे शुभवर्तमान दरवेळी कसे नाकारु शकले?” याचे उत्तर तेच देऊन म्हणतातः “चुकीपासून मोकळा असणारा पूर्वाधिकारी बनण्यापेक्षा शुभतर्वमानाविरुद्ध जाणे हेच पाँटीफसने पत्करले, कारण जर असे नसते तर बादशाही कारभार बारगळला असता.”
१९. बहुतेक धर्मपुढाऱ्यांनी कोणत्या बेकायदेशीर कृत्याला आपली अनुमति दिली?
१९ याचप्रमाणे धार्मिक पुढाऱ्यांनी गुलामगिरीची हिंसक पद्धती स्थापण्यात जो सहभाग घेतला तोही बेकायदेशीर होता. ख्रिस्ती धर्मजगतातील राष्ट्रांनी हजारो आफ्रिकन लोकांचे अपहरण केले, त्यांना त्यांच्या देशाहून दूर नेले आणि शतके त्यांचा शारीरिक व मानसिक रितीने गुलाम म्हणून छळ केला. धार्मिक पुढारी वर्गाच्या खूपच थोड्यांनी याला विरोध दर्शविला. काहींनी तर म्हटले की, हीच देवाची इच्छा आहे.—पहा मत्तय ७:१२.
२० व्या शतकातील रक्तदोष
२०. या शतकात धर्मत्यागी पुरुषाचा रक्तदोष कसा कळसास पोहंचला आहे?
२० धर्मत्यागी पुरुषाचा रक्तदोष या आमच्या शतकात कळसास पोहंचला आहे. धर्मपुढाऱ्यांनी युद्धांना आपले पाठबळ दिले, ज्यात लाखो लोकांचे बळी घेण्यात आले; ती इतिहासातील अगदीच वाईट युद्धे होती. दोन्ही जागतिक युद्धात त्यांनी दोन्ही बाजूच्या वतीने आपले पाठबळ दिले, जेथे एकाच धर्माच्या “बंधूंनी” एकमेकांची हत्या केली. उदाहरणार्थ, दुसऱ्या जागतिक महायुद्धात फ्रेंच व अमेरिकन कॅथोलिकांनी जर्मन व इटालियन कॅथोलिकांची हत्या केली; ब्रिटीश व अमेरिकन प्रॉटेस्टंट लोकांनी जर्मन प्रॉटेस्टंट लोकांची हत्या केली. इतर वेळी त्यांनी आपल्याच धर्माच्या नव्हे तर आपल्याच राष्ट्राची पार्श्वभूमि असणाऱ्या लोकांची हत्या केली. दोन्ही जागतिक महायुद्धांचा भडका ख्रिस्ती धर्मजगतातच पेटला. वस्तुतः जर धार्मिक पुढाऱ्यांनी प्रेमविषयक आज्ञेचे पालन केले असते व त्याविषयीचे शिक्षण आपल्या अनुयायांना अनुसरण्यासाठी शिकवले असते तर ही युद्धे झाली नसती.
२१. धार्मिक पुढाऱ्यांनी युद्धास दिलेल्या पाठिंब्याविषयी प्रापंचिक उगम काय सांगतात?
२१ द न्यू यॉर्क टाइम्सने पुष्टी दिली आहेः “गतकाळी स्थानिक धर्मपुढाऱ्यांच्या गटाने सर्वसाधारणपणे राष्ट्रांच्या युद्धांना नेहमीच पाठबळ दिले, सैन्याच्या तुकड्यांवर आशीर्वाद मागितले, विजयासाठी प्रार्थना म्हटल्या, तर दुसऱ्या बाजूनेही बिशपाच्या गटाने विरुद्ध पक्षाला विपरीत परिणाम मिळावा यासाठी जाहीरपणे प्रार्थना केल्या. . . . ख्रिस्ती आत्मा व युद्धनीती यामधील विरुद्धता . . . आता सर्वांना स्पष्टरित्या दिसत आहे; कारण युद्धाची अस्रे भयानक होत आहेत.” याचप्रमाणे यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट यानेही हे परिक्षिलेः “तथाकथित ख्रिश्चन राष्ट्रांनी हिंसाचाराचा ज्या तऱ्हेने व वेळोवेळी वापर केला त्यामुळे जगात ख्रिस्ती धर्माची प्रतिष्ठा भयंकरपणे डागाळली आहे.”
२२. आमच्या काळात धार्मिक पुढारी कशाच्या बाबतीत जबाबदार आहेत?
२२ आज शासकीय चौकशीसत्र नसले तरीही धर्मगुरुंनी, वेगळी मतप्रणाली असणाऱ्या “संदेष्टे” व “पवित्र जन” यांचा छळ करण्यासाठी राज्याचा भूज वापरला आहे. त्यांनी राजकारणी पुढाऱ्यांना ‘कायद्याचे साह्य घेऊन कुरापती करण्याच्या योजना’ करण्यासाठी दबाव आणला. या पद्धतीने, त्यांनी आमच्या शतकात देवभिरु लोकांवर बंदी, तुरुंगवास, मारहाण, यातना, व शिवाय मृत्यु देखील घडविले किंवा तशी संमती दर्शविली.—प्रकटीकरण १७:६; स्तोत्रसंहिता ९४:२०, द न्यू इंग्लिश बायबल.
जाब विचारण्यात आला
२३. देव धर्मत्यागी पुरुषास का जाब विचारणार आहे?
२३ होय, खोट्या धर्मात संदेष्टे, पवित्र जन व पृथ्वीवर वधिलेल्या सर्वांचे रक्त खरेच सापडले आहे. (प्रकटीकरण १८:२४) बहुतेक रक्तपात हा ख्रिस्ती धर्मजगतात घडला गेल्यामुळे तेथील धार्मिक पुढाऱ्यांचा दोष भारी आहे. यामुळेच पवित्र शास्त्र त्यांना “धर्मत्यागी पुरुष” असे जे म्हणते ते किती योग्य आहे! देवाचे वचन आणखी असे म्हणतेः “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण मनुष्य जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) या कारणास्तव देव या धर्मत्यागी धर्मपुढाऱ्यांकडून जाब विचारणार आहे.
२४. जगास हादरविणाऱ्या कोणत्या घटना लवकरच घडणार आहेत?
२४ येशूने म्हटलेः “अहो, अधर्म करणाऱ्यांनो, मजपुढून निघून जा.” (मत्तय ७:२३) तसेच त्याने असेही म्हटलेः “जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते ते तोडून अग्नीत टाकण्यात येते.” (मत्तय ७:१९) आता धर्मत्यागी पुरुषाचा व सर्व खोट्या धर्मांचा अग्नीमय नाश घडण्याची वेळ जवळ आली आहे. तो, ज्याच्यासोबत त्यांनी शिंदळकी केली तो राजकारणी घटक त्यांच्यावर उलटेल तेव्हा होईल. ते “कळवंतिणीचा द्वेष करतील, तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व अग्नीने तिला जाळून टाकतील.” (प्रकटीकरण १७:१६) जगास हादरविणाऱ्या या घटना लवकरच होत असल्यामुळे देवाच्या सेवकांनी त्या इतरांना कळविल्या पाहिजेत. ते हे कसे करीत आहेत याविषयी पुढचा लेख चर्चा करील.
उजळणीसाठी प्रश्न
◻ धर्मत्यागी पुरुष काय आहे व तो कसा वाढीस लागला?
◻ ख्रिस्तीजनांनी कोणती चांगली फलप्राप्ती निपजविली पाहिजे?
◻ मोठी बाबेल कोण आहे व ती केवढी रक्तपाती आहे?
◻ धर्मत्यागी पुरुषाने देवाला अपमानित करणारा कोणता निंद्य अहवाल उभारला आहे?
◻ देव धर्मत्यागी पुरुषाला कसा जाब विचारणार?
[२० पानांवरील चित्रं]
देव व ख्रिस्ताच्या नावाखाली धर्मयुद्धांमुळे मोठा रक्तपात घडला गेला
[२१ पानांवरील चित्रं]
“स्थानिक धर्मपुढाऱ्यांच्या गटाने सर्वसाधारणपणे राष्ट्रांच्या युद्धांना नेहमीच पाठबळ दिले”