येशूचे जीवन व उपाध्यपण
योहानाठायी विश्वासाची उणीव होती का?
नाईन येथील विधवेच्या मुलाचे पुनरुत्थान करण्यात आले आहे याचा वृत्तांत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला समजतो. त्याला आता कैदेत राहून एक वर्ष होत आले आहे. पण त्या घटनेच्या अर्थसूचकतेविषयी योहानाला येशूकडून थेटपणे जाणण्याची इच्छा असते. यासाठीच तो आपल्या शिष्यांपैकी दोघांना त्याला हे विचारण्यास पाठवितोः “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
वस्तुतः हा प्रश्न जरासा विचित्र वाटतो. कारण सुमारे दोन वर्षांआधी योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला तेव्हा त्याच्यावर पवित्र आत्मा आल्याचे आणि देवाने आपल्या वाणीकरवी येशूविषयीची पसंती व्यक्त केल्याचे त्याने स्वतःच ऐकले होते. याकारणास्तव योहानाने विचारलेल्या प्रश्नावरुन योहानाचा यावेळेपावेतो विश्वास दुर्बल झाला असावा अशी कोणाची समजूत होऊ शकते. पण ते तसे नाही. कारण योहानाने संशय व्यक्त करण्यास सुरवात केली असती तर येशूने त्याच्याविषयी चांगली बोलणी केलीच नसती, जी त्याने याप्रसंगी केली. तर मग, योहानाने असा प्रश्न का विचारला?
येशू हा मशीहा आहे ही पुष्टी योहानाला करवून घ्यावयाची होती हे त्याचे साधे उत्तर आहे. स्वतः कैदेत झुरत असल्यामुळे या गोष्टीच्या पुष्टीमुळे योहानाला मोठे बळ मिळणार होते. पण योहानाने विचारलेल्या प्रश्नात आणखी काही समाविष्ट होते हे उघड आहे. त्याला याची माहिती हवी होती की, येशूनंतर आणखी कोणी, जणू त्याचा वारस या अर्थी येणार होता का की, जो, भविष्यवादात पूर्वभाकित असणाऱ्या, मशीहाकरवी पूर्ण केल्या जाणाऱ्या गोष्टींची पूर्णता करुन दाखविणार.
योहानास परिचित असणाऱ्या पवित्र शास्त्र भविष्यवादानुसार देवाकरवी अभिषेक झालेला राजा, मुक्तिदाता असणार होता. पण येशूचा बाप्तिस्मा होऊन कित्येक महिने झाले आणि आता योहान तर तुरुंगात अडकून पडला आहे. या कारणास्तव योहानाने विचारलेल्या प्रश्नामागील अर्थ हा आहेः ‘देवाच्या राज्याची स्थापना आपल्या सामर्थ्याकरवी करणारे आपणच आहात की, मशीहाच्या वैभवाच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व भविष्यवादांची पूर्णता होण्यासंबंधाने आम्ही दुसऱ्या कोणाकडे किंवा कोणा वारसाकडे आपले डोळे लावावेत?’
येशूने योहानाच्या शिष्यांना उत्तर देताना, ‘अर्थात, येणारा तो मीच आहे!’ असे म्हटले नाही. याउलट, त्याच घटकेला येशू पुष्कळ लोकांना सर्व प्रकारचे आजार व दुखणी यापासून मुक्त करुन अप्रतिम देखावा सादर करतो. यानंतर तो शिष्यांना म्हणतोः “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगाः अंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरीबांना सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
येशूच्या या स्पष्टीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या शब्दात आम्हाला असे म्हणता येईल की, येशू सध्या जे काही करीत आहे त्यापेक्षा त्याने अधिक करावे म्हणजे, त्याने योहानाला कैदेतून मोकळे करुन दाखवावे असा योहानाच्या प्रश्नाचा भावार्थ निघत असल्यामुळे येशूने आपल्या कार्याकरवी योहानाला हे स्पष्ट केले की, यापेक्षा अधिकाची त्याने अपेक्षा धरु नये.
योहानाचे शिष्य निघून गेल्यावर येशू लोकसमुदायाकडे वळून त्यांना योहानाबद्दल म्हणतो की, तो मलाखी ३:१ मध्ये भाकित असणारा यहोवाचा “निरोप्या” तसेच मलाखी ४:५, ६ मध्ये भाकित असलेला एलीया संदेष्टा आहे. याप्रकारे, तो योहानाला त्याच्याआधी जे संदेष्टे होऊन गेले त्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगून म्हणतोः
“मी तुम्हास खचित सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठी कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्याकडे लोकांची वाटचाल होत आहे आणि जे पराकाष्ठा करीत आहेत त्यांना ते प्राप्त होत आहे.”
याद्वारे येशू स्पष्ट करतो की योहान देवाच्या राज्यामध्ये स्वर्गात असणार नाही, कारण तेथे कनिष्ठ असणारा त्याच्यापेक्षा मोठा असणार. योहानाने येशूकरता मार्ग तयार केला, पण ख्रिस्ताने त्याच्या राज्यात सहअधिपती असावे म्हणून त्याच्या शिष्यांसोबत जो करार किंवा ठराव केला तो योहानाच्या मृत्युनंतर झाला. याकरताच येशू म्हणतो की, योहान देवाच्या राज्यामध्ये स्वर्गात असणार नाही. उलटपक्षी, तो देवाच्या राज्यामध्ये पृथ्वीवरील प्रजाजनांपैकी असणार. लूक ७:१८-३०; मत्तय ११:२-१५.
◆ योहान येशूला, येणारा हा तोच आहे की कोणा दुसऱ्याची त्याने अपेक्षा धरावी असे का विचारतो?
◆ योहानाने कोणता भविष्यवाद पूर्ण केला असे येशू म्हणतो?
◆ बाप्तिस्मा करणारा योहान येशूसोबत स्वर्गात का असणार नाही?