वचनयुक्त देशाचे देखावे
“हे खोराजिना, तुला धिक्कार असो!”–का?
देवाने तुमच्या बाबतीत धिक्कार दर्शवावा असे तुम्हाला कदापि वाटणार नाही, हो ना? पण जेव्हा देवाचा पुत्र व न्यायाधीश याने तीन गालील शहरांना हे घोषित केले तेव्हा त्यांना कसे वाटले असावे त्याचा विचार कराः
“हे खोराजिना, तुला धिक्कार असो! हे बेथ्सैदा, तुला धिक्कार असो! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच तरट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. ह्यामुळे मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन यांस तुम्हापेक्षा सोपे जाईल. हे कफर्णहूमा, तू . . . अधोलोकापर्यंत उतरशील.”—मत्तय ११:२१-२३.
वर दाखविण्यात आलेले चित्र हे या तीन नगरापैकीचे, खोराजिनचे आहे. हे चित्र यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८९ च्या वार्षिक पंचांगमध्ये जुलै/ऑगस्ट महिन्याकरता छापण्यात आले आहे. मग, या खोराजिनविषयी आपल्याला काय जाणून घ्यायचे आहे?
प्राचीन खोराजिन कोठे होते ते प्रथम ध्यानात घ्या. या चित्राच्या खालच्या अंगाला त्या शहराचे अवशेष तुम्हाला दिसतील. आता उत्तरेकडे गालील समुद्रकिनाऱ्यालगत असलेली झाडे पहा. येथेच कफर्णहूम आहे, जे दोन मैलावर आहे. या छायाचित्रामुळे असे वाटेल की, हा सपाट भूप्रदेश आहे. पण वास्तविकपणे खोराजिन हे समुद्रसपाटीपासून ८८५ फूट उंचीवर टेकडीवर वसलेले आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील कफर्णहूमापासून जवळजवळ तितक्याच अंतरावर बेथ्सैदा आहे. अशाप्रकारे या तीन शहरांचा निषेध करण्यात येशू गालीलातील त्याच्या कार्याच्या परिसरात वसलेल्या या छोट्या भागाचा विचार करीत होता. (मत्तय ४:१३; मार्क २:१; लूक ४:३१) पण येशूने त्यांना धिक्कार का वदविला?
या क्षेत्रभागात येशूने बराच काळ खर्च केला होता व येथे त्याने बहूत अद्भूतकृत्ये केली. बेथ्सैदाजवळ त्याने ५,००० पेक्षा अधिक लोकांना अद्भूतरितीने भरविले, आणि एका अंधळ्यास दृष्टी प्रदान केली. (मार्क ८:२२-२५; लूक ९:१०-१७) कफर्णहूममध्ये किंवा जवळपास त्याने जे चमत्कार केले त्यामध्ये एका मुलाला दूरवर असताना बरे करणे, एका भूतग्रस्ताला बरे करणे, पक्षघाती माणसाला चालण्याची शक्ती देणे आणि सभास्थानाच्या एका अधिकाऱ्याच्या मुलीचे पुनरुत्थान करणे हे होते. (मार्क २:१-१२; ५:२१-४३; लूक ४:३१-३७; योहान ४:४६-५४) वस्तुतः खोराजिनमध्ये कोणती अद्भूत कृत्ये करण्यात आली त्याविषयी पवित्र शास्त्र माहिती देत नसले तरीही मत्तय ११:२१ हे सूचित करते की, येशूने येथे वा जवळपास ती केली असावीत. तरीपण लोकांनी पश्चाताप दाखविला नाही आणि येशूला, तो मशीहा व देवाच्या साहाय्याने कार्य करणारा आहे असे मानले नाही.
येशू करीत असलेल्या अद्भूत कृत्याचे हे बाजूला असलेले चित्र पाहिल्यावर तुम्ही कदाचित विचाराल की, ‘खोराजिनमधले लोक एवढे संमती न दाखविणारे कसे असू शकतील?’ याचे उत्तर आपल्याला, भूगर्भसंशोधकांनी शहराच्या अवशेषातून उत्खननाकरवी जे लाव्हाचे दगड काढले त्यावरील माहितीकरवी कदाचित मिळू शकते. हे तिसऱ्या शतकातील दगड आहेत. हे अवशेष एका सभास्थानाचे व जवळ असलेल्या निवासस्थानाचे आहेत. सभास्थानातील दगडांवर अप्रतिम नक्षीकाम होते. ते कशाचे? ग्रीक दंतकथेतील कुरळ्या केसांची मेदुसा व अर्धमानव व अर्धाघोडा असलेलेल दैवत यांच्या चित्रांचे नक्षीकाम. यहुदी धर्माने तर या मूर्तिपूजक नक्षीकामांना अगदी जोरदारपणे धिक्कारण्यास हवे असताना खोराजिनमधील यहुदी पुढाऱ्यांनी त्यांना आपल्या सभास्थानात का कोरु दिले बरे?
एक अशी समजूत आहे की, “येथे वसाहतीत मोकळ्या मनाची प्रवृत्ती सांप्रदायिकपणे दिसत होती.” यामुळे येशूनेही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा धरली असावी.a पण सभास्थानातील ते नक्षीकाम, येशूच्या काळातील लोकांच्या प्रवृत्तीविषयी काही सुचवीत असले तर मग हे दिसते की, खोराजिनमधील लोक “पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने” करण्याची चिंता बाळगून नव्हते. (योहान ४:२३) हीच गोष्ट त्यांनी अद्भूत चमत्कार करणाऱ्या मशीहाचा धिक्कार करण्याद्वारे दर्शविली.
येशूने आपल्या ७० शिष्यांना प्रचारासाठी पाठविले तेव्हा त्याने पुन्हा खोराजिन, बेथ्सैदा व कफर्णहूमच्या संमती न दर्शविणाऱ्या प्रवृत्तीचा अलंकारिकपणे उपयोग केला. खोराजिनमध्ये राहणाऱ्या येशूच्या शहरवासी गालीलकरांनी येशूच्या अद्भूत कामाशी परिचित असताना देखील त्याला योग्य असा प्रतिसाद दर्शविला नाही तर मग, त्याचे शिष्य इतर गावात प्रचार करीत असताना तेथील लोकांनी सुद्धा तशीच प्रवृत्ती दाखवून त्यांचा स्वीकार केला नाही तर त्याचे त्यांना नवल वाटू देऊ नये.—लूक १०:१०-१५.
अशाप्रकारे, आपण खोराजिनच्या निर्जिव काळ्या अवशेषांकडे लक्ष देतो तेव्हा येशूने “धिक्कार” दाखविण्यात जो इशारा सूचित केला तो आम्ही आपल्या अंतःकरणी लावून घेण्यास हवा. पश्चाताप न करणे, देवाच्या लोकांकरवी त्याचे जे कार्य होत आहे त्याला प्रतिसाद न देणे हे अधोगती आणि विध्वंसकारी भविष्य देऊ शकेल.
[तळटीपा]
a द वर्ल्ड ऑफ द बायबल, खंड ५, पृष्ठ ४४, एज्युकेशनल हेरिटेज, इन्का. न्यूयॉर्क यांच्याकरवी १९५९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले.
[२६ पानांवरील नकाशा]
[For fully formatted text, see publication]
खोराजिन
बेथ्सैदा
कफर्णहूम
गालील समुद्र
तिबिर्य
[चित्राचे श्रेय]
Pictorial Archive (Near Eastern History) Est. and Survey of Israel
[२७ पानांवरील चित्र]
[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]
Pictorial Archive (Near Eastern History) Est.