-
थकलो पण खचलो नाहीटेहळणी बुरूज—२००४ | ऑगस्ट १५
-
-
१, २. (अ) शुद्ध उपासना करू इच्छिणाऱ्या सर्वांना कोणते अपीलकारक आवाहन देण्यात आले आहे? (ब) आपल्या आध्यात्मिकतेला कशामुळे गंभीर धोका संभवू शकतो?
आपण येशूचे शिष्य आहोत, त्याअर्थी आपल्याला त्याचे हे अपीलकारक आवाहन ओळखीचे आहे: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. . . . कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०) ख्रिश्चनांना ‘प्रभूजवळून विश्रांतीचे समय’ देखील देऊ करण्यात आले आहेत. (प्रेषितांची कृत्ये ३:१९) बायबलची सत्ये शिकून घेतल्याने, भविष्याकरता एक उज्ज्वल आशा मिळाल्याने व तुमच्या जीवनात यहोवाच्या तत्त्वांचे पालन केल्याने जे तजेलादायक परिणाम घडून येतात ते नक्कीच तुम्ही स्वतः अनुभवले असतील.
२ तरीसुद्धा यहोवाच्या उपासकांपैकी काहींना वेळोवेळी भावनिकरित्या खचून गेल्यासारखे वाटते. कधीकधी ही निराशा केवळ काही काळ राहते तर कधीकधी ती बऱ्याच काळपर्यंत चालत राहते. काळाच्या ओघात काहींना त्यांच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या, येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे विसावा देणाऱ्या न वाटता ओझ्यासमान वाटू लागतात. अशाप्रकारच्या नकारात्मक भावनांमुळे एका ख्रिस्ती व्यक्तीच्या यहोवासोबतच्या नातेसंबंधाला गंभीर धोका संभवू शकतो.
-
-
थकलो पण खचलो नाहीटेहळणी बुरूज—२००४ | ऑगस्ट १५
-
-
ख्रिस्ती मार्गाक्रमण जाचक नाही
५. ख्रिस्ती शिष्यत्वासंबंधी कोणता विरोधाभास आहे असे वाटते?
५ अर्थात, ख्रिस्ती या नात्याने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता कठीण परिश्रम घ्यावे लागतात हे खरे आहे. (लूक १३:२४) येशूने तर म्हटले, “जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.” (लूक १४:२७) वरवर पाहिल्यास, आपले ओझे हलके आहे आणि आपण विसावा देऊ या येशूच्या विधानाशी वरील शब्दांची तुलना केल्यास आपल्याला विरोधाभास आढळेल, पण खरे पाहता यांत काहीही विरोधाभास नाही.
६, ७. आपली उपासना पद्धत थकवा आणणारी नाही असे का म्हणता येईल?
६ कठीण परिश्रम आणि मेहनत जरी शारीरिकरित्या माणसाला थकवू शकते तरीसुद्धा चांगल्या कारणासाठी ती केली जाते तेव्हा त्यामुळे समाधान आणि विसावा मिळतो. (उपदेशक ३:१३, २२) आणि आपल्या शेजाऱ्यांना बायबलमधील अद्भुत सत्ये सांगण्यापेक्षा अधिक चांगले कारण कोणते असू शकते? तसेच देवाच्या उच्च नैतिक दर्जांनुसार जगल्यामुळे आपल्याला जे उत्तम परिणाम अनुभवायला मिळतात त्यांच्या तुलनेत आपल्याला यासाठी करावा लागणारा संघर्ष नगण्य ठरतो. (नीतिसूत्रे २:१०-२०) आपला छळ होतो तेव्हा देखील आपण देवाच्या राज्याकरता हाल सोसणे यास एक बहुमानच समजतो.—१ पेत्र ४:१४.
७ येशूचे ओझे खरोखरच विसावा देणारे आहे; खासकरून जे खोट्या धर्माच्या जुवाखाली राहतात त्यांच्या आध्यात्मिक अंधकाराशी तुलना केल्यास याची सत्यता पटते. देवाला आपल्याविषयी कोमल प्रीती आहे आणि त्यामुळे तो कधीही आपल्याला पेलणार नाहीत अशा अपेक्षा आपल्याकडून करत नाही. यहोवाच्या “आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) शास्त्रवचनात प्रकट केलेले ख्रिस्ती मार्गाक्रमण निश्चितच जाचक नाही. स्पष्टपणे, आपली उपासना पद्धत ही कधीही थकवा व निराशा यांना कारणीभूत ठरू शकत नाही.
-