“प्रभु ख्रिस्ताची चाकरी करीत जा”
चाकरीच्या ओझ्यामुळे संपूर्ण इतिहासात लाखो लोकांनी दुःख सहन केले आहे. इजिप्शियन अधिकाऱ्यांनी इस्राएलांचे केलेले हालहाल हे याचे एक उदाहरण आहे. बायबल याविषयी सांगते, या अधिकाऱ्यांनी “इस्राएल लोकांवर कामाचा मोठा बोजा लादण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले,” विशेषतः विटा बनविण्याच्या वेळी.—निर्गम १:११, द जरूसलेम बायबल.
आज अनेक देशांत लोक अक्षरशः चाकरी करीत नसतीलही; परंतु अनेक लोकांकडून जास्त वेळ काम करण्याची मागणी केली जाते—काहीवेळा तर प्रतिकूल—परिस्थितींमध्येही. ते फार मोठ्या ओझ्याखाली आहेत त्या ओझ्याला आर्थिक दास्यत्व म्हणता येईल.
तथापि, ही एक अशा प्रकारची चाकरी आहे जी इतकी भारी नाही. प्रेषित पौलाने सहविश्वासू जणांना आर्जवले: “प्रभु ख्रिस्ताची चाकरी करीत जा.” (कलस्सैकर ३:२४) ख्रिस्ताची चाकरी करण्याची निवड करणाऱ्यांना त्यांच्या मोठ्या ओझ्यापासून सुटका मिळते. येशूने स्वतः म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.
ख्रिस्ताचे जू स्वीकारल्यामुळे एखादा मनुष्य कुटुंबाची भौतिकरीत्या काळजी घेण्याच्या जबाबदारीपासून मुक्त होत नाही. (१ तीमथ्य ५:८) तथापि, ख्रिस्ताचे जू स्वीकारल्यामुळे भौतिकवादी गोष्टींच्या पाशातून आपली सुटका मात्र होते. भौतिक सुखसोईंना आपल्या जीवनातील प्रमुख लक्ष्य न ठेवता ख्रिस्ती लोक जीवनाच्या मूलभूत गोष्टींमध्ये समाधान मानतात.—१ तीमथ्य ६:६-१०; पडताळा १ करिंथकर ७:३१.
देवाच्या राज्याची “सुवार्ता” प्रचार करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यातच ख्रिश्चनांना सांत्वन मिळते. (मत्तय २४:१४) यामुळे निर्भेळ आनंद आणि समाधान लाभते!
आपण “प्रभु ख्रिस्ताची चाकरी” करू शकतो म्हणून कृतज्ञ असले पाहिजे!
[३२ पानांवरील चित्र]
Pictorial Archive (Near Eastern History) Est.