वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gt अध्या. ४८
  • याईरचे घर सोडणे व नासरेथला पुनर्भेट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याईरचे घर सोडणे व नासरेथला पुनर्भेट
  • सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • मिळती जुळती माहिती
  • याईरचा निरोप घेणे व नासरेथास पुन्हा भेट देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • येशूचे चमत्कार—तुम्ही काय शिकू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • येशू मेलेल्यांना उठवतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • पृथ्वीवर असताना येशूने काय केलं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
gt अध्या. ४८

अध्याय ४८

याईरचे घर सोडणे व नासरेथला पुनर्भेट

दकापलीसहून परतीचा समुद्र-प्रवास, रक्‍तस्राव होणाऱ्‍या स्त्रीला बरे करणे व याईरच्या मुलीचे पुनरुत्थान हे सगळे करण्यात येशूचा हा दिवस गडबडीत गेला आहे. पण अजून दिवस संपलेला नाही. येशू याईरचे घर सोडत असताना दोन अंधळे, “अहो दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा,” असे ओरडत त्याच्यामागोमाग जाताना दिसतात.

येशूला “दावीदपुत्र” असे संबोधून येशू दावीदाच्या राज्याचा वारस आहे व त्यामुळे तोच वचनयुक्‍त मशीहा असल्याचा विश्‍वास ही माणसे व्यक्‍त करीत आहेत. परंतु कदाचित, त्यांच्या चिकाटीची परीक्षा पाहण्यासाठी, येशू त्यांच्या मदतीच्या हाकेकडे दुर्लक्ष करतो असे वाटते. ते येशूच्या बिऱ्‍हाडापर्यंत त्याच्यामागे येतात व तो घरात शिरतो तेव्हा तेही त्याच्या मागोमाग आत जातात.

तेथे येशू त्यांना विचारतोः “हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्‍वास धरता का?”

ते तत्काळ म्हणतातः “होय, प्रभू.”

त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून येशू म्हणतोः “तुमच्या विश्‍वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होवो.” अचानक त्यांना दिसू लागते! मग, येशू त्यांना निक्षून सांगतोः “पहा, हे कोणाला कळू देऊ नका.” परंतु अत्यानंदाने ते येशूच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करतात व अवघ्या देशात त्याच्याबद्दल सांगतात.

ही माणसे निघून जातात तेव्हा लोक एका भूतग्रस्त माणसाला घेऊन येतात. त्या भूताने त्याची वाचा हिरावून घेतलेली आहे. येशू त्या भूताला काढून टाकतो व तत्क्षणी तो माणूस बोलू लागतो. तेव्हा लोकसमुदाय आश्‍चर्य व्यक्‍त करतात व म्हणतातः “इस्राएलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”

तेथे परुशीही उपस्थित आहेत. ते चमत्कारांना नाकारु शकत नाहीत. पण त्यांच्या पापी अविश्‍वासात ते येशूच्या सामर्थ्यवान कामाबद्दल आपल्या आरोपाचा पुनरुच्चार करतात. ते म्हणतातः “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो.”

या घटनेनंतर लवकरच, येशू नासरेथ या आपल्या गावी परत येतो. यावेळी त्याचे शिष्य त्याच्याबरोबर असतात. जवळपास एका वर्षापूर्वी त्याने तेथील सभास्थानाला भेट दिली होती व तेथे शिक्षणही दिले होते. त्याच्या गोड शब्दांचे लोकांना प्रथम नवल वाटले असले तरी मागून त्याच्या शिकवणींचा त्यांना राग आला व त्यांनी त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आता दयाळूपणे, येशू आपल्या या जुन्या मित्रांना मदत करण्याचा आणखी एक प्रयत्न करतो.

येशू इतर ठिकाणी असताना लोक त्याच्याभोवती जमा होत असतात. पण येथे ते येत नाहीत असे दिसते. यासाठी, शब्बाथ दिवशी शिकवण्यासाठी तो सभास्थानात जातो. त्याचे बहुतेक श्रोते आश्‍चर्यचकित होतात. ते विचारतातः “हे ज्ञान व अद्‌भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्‍याला कोठून? हा सुताराचा पुत्र ना? ह्‍याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा हे ह्‍याचे भाऊ ना? ह्‍याच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग, हे सर्व याला कोठून?”

ते विचार करतातः ‘येशू आपल्याच सारखा एक स्थानिक माणूस आहे. आपण त्याला लहानाचा मोठा होताना पाहिले व आपण याच्या कुटुंबाला चांगले ओळखतो. हा मशीहा कसा असू शकेल?’ या कारणाने, त्याचे ज्ञान व चमत्कार, या सर्व पुराव्याला न जुमानता ते त्याचा अव्हेर करतात. आपसातील घनिष्ट संबंधामुळे त्याचे स्वतःचे नातलग देखील त्याच्या बाबतीत अडखळतात. त्यामुळे, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही. मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो” अशा निर्णयाला येशू येतो.

खरोखर, येशूला त्यांच्यामधील विश्‍वासाच्या कमतरतेचे नवल वाटते. त्यामुळे थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्यापलिकडे तो आणखी चमत्कार तेथे करीत नाही. मत्तय ९:२७-३४; १३:५४-५८; मार्क ६:१-६; यशया ९:७.

▪ येशूला “दावीदपुत्र” असे संबोधून ती अंध माणसे आपणाठायी कशाचा विश्‍वास असल्याचे ते स्वतः दाखवतात?

▪ येशूच्या चमत्कारांबद्दलच्या खुलाशाबद्दल परुशांनी काय ठाम मत बनवले आहे?

▪ नासरेथमधील लोकांना मदत करण्यासाठी परत येण्यात येशूचा दयाळूपणा का आहे?

▪ नासरेथमध्ये येशूचे कसे स्वागत होते व का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा