-
सकारात्मक दृष्टिकोन कसा टिकवून ठेवावा?टेहळणी बुरूज—२०१४ | मार्च १५
-
-
८, ९. (क) गरीब विधवेची परिस्थिती कशी होती? (ख) तिच्या मनात कदाचित कोणत्या नकारात्मक भावना आल्या असतील?
८ जेरूसलेमच्या मंदिरात येशूने एका गरीब विधवेला पाहिले. समस्या असतानादेखील आपण सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगू शकतो हे आपण तिच्या उदाहरणावरून शिकू शकतो. (लूक २१:१-४ वाचा.) त्या विधवेची परिस्थिती लक्षात घ्या: तिला तिच्या पतीला गमावण्याचे दुःख तर होतेच पण त्यासोबतच ती अशा एका काळात राहत होती जेव्हा धार्मिक पुढारी विधवांना मदत करण्याऐवजी त्यांची “घरे गिळंकृत” करत होते. (लूक २०:४७) ती इतकी गरीब होती की एक मजूर फक्त काही मिनिटांत कमावू शकेल इतकेच पैसे ती मंदिरात दान म्हणून देऊ शकत होती.
९ फक्त दोन नाणी घेऊन त्या विधवेने मंदिराच्या आवारात प्रवेश केला असेल तेव्हा तिच्या मनात कोणत्या भावना आल्या असतील याची कल्पना करा. तिच्या मनात असा विचार आला असेल का की तिचे पती जिवंत असताना ती जितके दान द्यायची त्याच्या तुलनेत हे दान खूपच कमी आहे? तिच्या पुढे असलेले इतर जण दानपेटीत खूप पैसे टाकत आहेत हे पाहून तिच्या मनात कमीपणाची भावना आली असेल का? तिला असे वाटले असेल का की ती देत असलेल्या दानाचे काहीच मोल नाही? तिच्या मनात असे विचार आले असले, तरी खऱ्या उपासनेकरता तिच्याकडून जे शक्य होते ते तिने केले.
-
-
सकारात्मक दृष्टिकोन कसा टिकवून ठेवावा?टेहळणी बुरूज—२०१४ | मार्च १५
-
-
११. गरीब विधवेच्या अहवालावरून आपण काय शिकू शकतो?
११ तुम्ही यहोवाला जे देऊ शकता ते तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असते. म्हातारपणामुळे किंवा आजारामुळे तुम्ही कदाचित क्षेत्र सेवेला जास्त वेळ देऊ शकत नसाल. अशा वेळी असा विचार करणे योग्य असेल का की मी जी थोडी सेवा करत आहे तिचा अहवाल देण्यात काय अर्थ आहे? किंवा तुम्हाला कदाचित म्हातारपण किंवा आजार अशा समस्या नसतील, पण तरीसुद्धा तुम्हाला असे वाटत असेल की जगभरातील देवाचे लोक त्याच्या उपासनेत दरवर्षी जितके तास घालवतात त्याच्या तुलनेत तुमचा सहभाग खूप क्षुल्लक आहे. पण, गरीब विधवेच्या अहवालातून आपण शिकतो की आपण यहोवासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची तो दखल घेतो व ती मौल्यवान समजतो, खासकरून आपण कठीण परिस्थितीत असे करतो तेव्हा. मागच्या वर्षी तुम्ही यहोवाच्या सेवेत जे काही केले त्याचा विचार करा. तुम्ही त्याच्या सेवेत जो वेळ घालवला त्यातील एखादा तास असा असेल ज्यासाठी तुम्हाला मोठा त्याग करावा लागला असेल. असे असल्यास तुम्ही खासकरून त्या तासात जी सेवा केली त्याची यहोवा कदर करतो ही खात्री बाळगा. गरीब विधवेप्रमाणे तुम्ही जेव्हा यहोवाच्या सेवेत शक्य तितके करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही ही खात्री बाळगू शकता की तुम्ही “विश्वासात” आहात.
-